दर रविवारची सकाळ म्हणजे मस्त आराम, वर्तमानपत्र व पुरवण्यांचे मनसोक्त ऐसपैस वाचन, चहा नाश्त्याच्या वेळेला घरातल्यांशी दिलखुलास गप्पा आणि दिवसभरात काय काय कामे निपटायची आहेत याचा थोडासा आढावा हा कार्यक्रम हमखास ठरलेला असतो! त्याला पुन्हा टी.व्ही.वरील मनपसंत मालिकेची फोडणी ही तर अगदी गृहित असते. पण या नव्या ठिकाणी रहायला आल्यापासून दर रविवारची माझी सकाळ एका जीवघेण्या आक्रोशाच्या छायेत उगवते!
आमची ही नवी जागा 'गावठाण' भागात आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या येथील माणसे एकमेकांना ओळखतात. त्यांचे व्यवसायही बर्यापैकी पारंपारिक. आणि माझ्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावरच्या, अशाच व्यवसायांचा अविभाज्य भाग असलेल्या खाटीकांच्या टपर्या व दुकाने! ह्याच टपर्यांमध्ये बोकड, बकर्या, शेळ्या, कोंबड्या इत्यादींची रोज लोकांच्या मागणीनुसार कत्तल होत असते. आयुष्यातील ते एक वास्तव आहे! पूर्वी म्हणे ठराविक काळातच मांसाला भरपूर मागणी असे. पण सध्याच्या काळात सुट्ट्या, सण, निवडणुका, साप्ताहिक सुट्ट्या अशी कोणतीही निमित्ते लोकांची गर्दी ह्या दुकानांकडे खेचण्यास पुरेशी ठरतात. मग त्यासाठी दर रविवारी सकाळी अगदी माझ्या दारासमोर दोन-तीन ट्रक टेंपो थांबतात... आतमधील शेळ्या, बकर्या व त्यांची पिल्ले जणू मृत्यूची चाहूल लागल्याप्रमाणे इतकी करुण आवाजात आक्रंदत असतात की कोणाच्याही ह्रदयाला पीळ पडेल! त्यांना परमेश्वराने जर वाणी दिली असती तर त्यांचा हा आवाज नक्कीच म्हणाला असता, "देवा, वाचव रे बाबा आमच्या लेकरांना! कोणीतरी दया करा रे आमच्यावर! असे निर्घृणपणे नका ठार मारू आम्हाला! देवाने आम्हाला पण जगायचा हक्क दिलाय्...तो असा हिरावून नका घेऊ आमच्याकडून... आमचे प्राण घेऊन तुम्हाला काही क्षणांचे सुख मिळेल, तुमच्या जिभेचे चोचले पुरविले जातील... पण आमच्या प्राणांची, आमच्या बछड्यांच्या प्राणांची किंमत देऊन... आम्ही तुमचा असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्ही आमची हत्या करून परतफेड करणार आहात.... दया करा रे आमच्यावर, जगू द्या आम्हालाही....!!"
त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः कधीकधी मला स्वतःचे विचारही ऐकू येत नाहीत! जेव्हा त्यांना पाय बांधलेल्या अवस्थेत खाटीकखान्याकडे नेले जाते तेव्हा तर त्यांच्या किंकाळ्या मन पोखरत राहतात.
कधी काळी मीदेखील मधूनच मांसाहार करायचे. मोठ्या चवीने खायचे. पण नंतर मांसाहारातून उद्भवणार्या समस्या, मानवी शरीरावर त्याचे होणारे अनिष्ट परिणाम यांविषयी ऐकले, वाचले, अनुभवले आणि माझा मांसाहार आपोआप संपुष्टात आला. चवीच्या दृष्टीने म्हणाल तर त्यांत वापरले जाणारे मसाले आपल्या नेहमीच्या भाज्या, रस्से वगैरेंमध्ये वापरले की जिभेचे 'ते' चोचले पण पुरविले जातात. भीतीने गळाठलेल्या, आक्रोशणार्या प्राण्यांच्या मांसामध्ये त्यांनी मृत्यूसमयी अनुभवलेली भीती, धक्का, संताप, दु:ख, आक्रंदन यांमुळे त्यांच्या शरीरात जे रासायनिक बदल, हार्मोनल चेंजेस घडून येतात त्यांचाही समावेश असतो! मग पैसे फेकून त्याबदल्यात अशी विकतची भीती, दु:ख कशाला घ्या! आपल्याकडे सुदैवाने व निसर्गाच्या कृपेने भरपूर भाज्या, फळे, धान्ये पिकतात. त्यांच्या किंमतीही मांसाच्या तुलनेत पहायला गेलो तर खूपच कमी आहेत. पण तरीही 'वशाट' खाण्याचा हा अट्टाहास का?
माझी काही मांसाहार करणारी स्नेहीमंडळी आमच्यात हा विषय निघाला की हटकून मला मांसाहार आरोग्यासाठी किती चांगला आहे, त्यांतून शरीराला किती उपयुक्त घटक मिळतात, अगदी आयुर्वेदातही मांसाहाराविषयी सांगितले आहे, पुरातन काळापासून मांसाहार चालू आहे ह्याचे दाखले देतात. पण मग सवाल असा उठतो की तो जर इतका चांगला आहे तर त्याचे एवढे दुष्परिणाम का आढळून येतात?
उत्तर काहीसे सोपे आहे... आजची जीवनशैली मुळातच तणावपूर्ण आहे. शहरांमध्ये तर आयुष्याची वेगवान गती, बैठे काम, अपुरा व्यायाम व इतर अनेक हानीकारक बाबी, जसे प्रदूषण, अनारोग्यकारक वातावरण, चढाओढ ह्यांची चढती भांजणी दिसते. त्यांत मांसाहार करणारे अनेकजण ते मांस कोठून येते, तिथे स्वच्छता किती असते, आरोग्याचे नियम पाळले जातात का यांविषयी बेपर्वा दिसतात. ज्या प्राण्याचे मांस मोठ्या चवीने खाल्ले जाते त्या प्राण्याच्या शरीरात काही मानवी शरीरास अपायकारक कृत्रिम संप्रेरके, खाद्य, जंतु यांचा समावेश होता का याबद्द्लही त्यांना फिकीर नसते. आयुर्वेदात जरी मांसाहार सांगितला असला तरी तो विशिष्ट ॠतूंमध्ये, विशिष्ट प्रकारे व ठराविक प्रमाणात करावयास सांगितले आहे. शिवाय तो कोणास लाभदायक आहे व कोणास कुपथ्यकारक त्याचीही सूची आढळते. मात्र त्या सर्वाशी मांसाहार करणार्या माणसाला सहसा देणेघेणे नसते. आपल्या आतड्यांची लांबी, दातांची व जबड्यांची रचना ही शाकाहारास अनुकूल आहे. परंतु हे वास्तव मांसाहारी मंडळी नजरेआड करताना दिसतात.
आज माझ्या घराजवळील खाटीकखान्यातून पंचक्रोशीतील हॉटेलवाले मांस खरेदी करतात. पण त्या हॉटेलांच्या एअरकंडिशन्ड वातावरणात बसून समोरच्या नॉनव्हेजवर ताव मारणार्यांना ते मांस जिथे विक्रीस ठेवले होते तिथल्या घोंगावणार्या माशा, घुटमळणारी भटकी कुत्री, झेपावणारे कावळे, खुडबुडणारे उंदीर घुशी, जवळच महापालिकेच्या कचर्याचा ओसंडून वाहणारा कंटेनर आणि सांडपाण्याच्या जोडीला दुकानासमोरून वाहणारे रक्ताचे पाट दिसत नाहीत. की त्यांना खाटीकाच्या दुकानात काम करणारे मळक्या कळकट गलिच्छ अवतारातील नोकर दिसत नाहीत.
आज शहराच्या तथाकथित सुसंस्कृत, सभ्य, पर्यावरणाविषयी जागरूक भागातील खाटीक खान्याची ही अवस्था आहे, तर मग इतर दुर्लक्षित भागांची कल्पनाच न केलेली परवडली!
परंतु सर्वात शेवटी मला मांसाहार करणार्या लोकांमधील 'माणसा'ला साद घालावीशी वाटते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात खाटीक खान्याला अवश्य भेट द्या. आज त्या अश्राप शेळ्या, बकर्यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!
माझ्या घराजवळचा खाटीक खाना बंद होईल की नाही हे मला माहीत नाही, पण हा लेख वाचून जर तुम्ही मांसाहार बंद अथवा कमी करण्याचे ठरवलेत तर माझी खात्री आहे की त्या प्राण वाचलेल्या निरपराध जीवाचे तुम्हांला अनंत दुवा मिळतील!
अभक्ष्य भक्षण आणि माणूस
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 May, 2009 - 18:40
गुलमोहर:
शेअर करा
किरण
किरण
लिएंडर पेसला जो आजार झालेला
लिएंडर पेसला जो आजार झालेला होता त्याचा विषाणू हा कोबीत अर्धा आणि डुकरात अर्धा वाढणारा असतो...
>>>>>>>>>>>>>>>>
लिएंडर पेसने बहुधा कोबी खाल्लेल्या डुकराचे मांस खाल्ले असणार..... त्यामुळे विषाणू पूर्ण झाला असावा

Kiranyake | 11 December, 2011
Kiranyake | 11 December, 2011 - 11:12 नवीन
ध्यानधारणा करावी. त्यातून समाधी अवस्था प्राप्त होते. अशा अवस्थेस पोहोचलेल्या साधकास शाकाहार / मांसाहार अशा वादात पडण्याचे कारण उरत नाही. कारण तो निव्वळ हवेवर देखील हजारो वर्षे जगू शकतो.
स्वामी भोजनानंद
<<
ठ्ठ्ठो!
Neurocysticercosis हा आजार
Neurocysticercosis हा आजार लियांदर पेसला झाला होता.. तो डुकरात आणि माणसात वाढतो. कोबी कुठून आला मध्येच?
कोबी ब्रायण्ट?
कोबी ब्रायण्ट?
भारतात खरंतर शाकाहार वि.
भारतात खरंतर शाकाहार वि. मांसाहार अशी चर्चा करणे वायफळ आहे. भारतात शाकाहार-मांसाहार गट हे मुख्यतः धार्मिक कारणाने पडलेले होते (आता धार्मिक कारणं नसल्याने इतर कारणं शोधून दिली जातात). ते कारण संपले पण हे बिनबुडाचे वाद हिरीरीने सुरू आहेतच.
आपल्याकडे बरेचसे मांसाहारी हे खरेतर मिश्राहारी असतात. त्यातही शाकाहाराचं प्रमाणच जास्त असतं. मांसाहारातही मासे खाणारे जास्त, त्यानंतर चिकन आणि मग मटण इ. 'रेड मीट' खाणारे असतात. सरसकट पाश्चिमात्य थिअर्या इथे चिकटवणे योग्य होणार नाही. फारतर प्रमाण कमी करून आपले पारंपारिक प्रकार नक्की खावेत.
डॉ. मांसाहार बंद किंवा कमी करायला सांगितला याचा अर्थ केवळ मांसाहारामुळे कोलॅस्टरॉल आणि इतर रोग वाढीस लागतात असा काढणेही चुकीचे ठरेल. (कोणत्याही कारणाने) कोलॅस्टरॉल वाढल्याने ते जलद गतीने कमी करण्यासाठी भात, तेल, तूप आणि मटण कमी खाण्यास सांगितले जाते. शिवाय आपल्याकडे जेवण बनवण्याकरता तेला-तुपाचा जो वापर होतो, तोही चुकीचा ठरतो. जर स्टीम्ड फिश, बॉएल्ड चिकन इ. प्रकार खाल्ले तर त्यामुळे शरीराला उपयोगी प्रथिने मिळतील आणि कोलॅस्टरॉल वाढणार नाही.
रच्याकने : जगातले महत्त्वाचे शोध, नामवंत शास्त्रज्ञ, खेळाडू मांसाहारी पाश्चात्य देशातच घडले. भारतातही पूर्वी ऋषीमुनी मांसाहार करत आणि त्यावेळी त्यांनी बर्यापैकी शोध लावले. यावर संशोधन व्हायला हवे.
(हलकेच घ्या. फार डोक्याला ताप करून वाद घालू नका)
मामी: जबरा पोस्ट ते कारण
मामी:
जबरा पोस्ट
ते कारण संपले पण हे बिनबुडाचे वाद हिरीरीने सुरू आहेतच.
बिनबुडाचे वाद घालण्यात तर आपल्या मराठी माणसांचा कुणी हात धरणार नाही. आणि पाश्चात्यानी मांडलेल्या थेअरीज तावातावाने मांडायच्या, आणि मॉडर्न सायंन्सचे निकष प्रत्येक पारंपारीक भारतीय शास्त्रांवर लादायचे आणि नपुंसक (unproductive च भाषांतर काय करायच मला सुचल नाही.) वाद घालत रहायचे-यात आपण खूप हुश्शार! आपल्या मायबोलीवरच बघा ना! पब्लिक शिरा ताणून कसले कसले वाद घालत असतात.
आयुर्वेद, ज्योतिषशास्र ही काही सायन्स नव्हेत (इथे सायन्स् म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री इ.), देव हा माणसाचा कल्पना विस्तार-- हे तर वादाकरता आपले आवडते प्रांत! आपले पूर्वज या गोष्टींना का शास्र म्हणायचे? त्यांच्या चिकीत्सा पद्धती काय होत्या? त्यांचे निकष काय होते? याचा कदाचित नव्याने अभ्यास करायची गरज आहे. ज्या गोष्टी सध्या आपल्याला पूर्णपणे उमगलेल्या नाहीत त्याच्या बाबतीत अतिशय चिकित्सक होऊन अभ्यास, संशोधन करायच सोडून Unscientific म्हणून खिल्ली उडवायची अस का? असो.
Magic is just a science we do not understand-Arthur C Clarck
अरे देवा! ह्या लेखातली साद
अरे देवा!
ह्या लेखातली साद ऐकून माझ्यातील 'माणूस' जागा झाला आहे. याआधीही इथे असे काहीतरी वाचल्याचे आठवते (पण तेव्हा जाग आली नाही). दीर्घायुष्य आणि आरोग्य इतके सोपे आहे हे मला माहीत नव्हते. आता (फ्रीज/फ्रीजरमधल्या गोष्टी करुन संपल्यावर) पूर्ण शाकाहार करणार. बटाटेवडे खाणार, रश्श्यांमध्ये बटाटे इ. वापरणार. व्यायाम बंद. एवढे प्लेन आणि सिंपल आहे तर कोणी सांगितलाय उपद्व्याप?
इथून पुढे फक्त शाकाहारी लोकांशीच बोलणार, मैत्री करणार. इथे एक 'शाकाहारी' ग्रूप तयार करावा अशी अॅडमिनना विनंती.
चर्चा करणं यात गैर कांहीच
चर्चा करणं यात गैर कांहीच नाही; पण या विषयावर ती होते तेंव्हा कांहीसा " शाकाहारी वरिष्ठ, मांसाहारी कनिष्ठ " असा नैतिकतेचा टेंभा मिरवण्याचाही भाग बर्याचदां डोकावतो. मांसाहारीना/ मासेखाऊना त्याचीच 'अॅलर्जी' असल्याने चर्चा मोकळेपणाने होत नसावी.
<< इथे एक 'शाकाहारी' ग्रूप तयार करावा अशी अॅडमिनना विनंती. >> अन्कॅनीजी, तिथंही एकमेकांचं डोकं तर खाणारच ना !! पण तुमचा निश्चय अगदींच पक्का असेल तर तुमच्या मांसाहारी रेसिपी मात्र आम्हाला देऊन जा !!!
भाऊकाका, " शाकाहारी वरिष्ठ,
भाऊकाका,
" शाकाहारी वरिष्ठ, मांसाहारी कनिष्ठ" याबरोबरच " शाकाहारी बावळट, मांसाहारी धडाडीचे" असाही एक टेंभा मिरवला जातोच. जिथे शाकाहारी जास्त असतात तिथे ते मांसाहारींना कमी लेखतात आणि जिथे मांसाहारी जास्त असतात तिथे शाकाहारींना ते कमी लेखतात. दोन्हीही तेवढेच चुकीचे आहे.
नी, +१००
नी, +१००
मला तरी १००% पटला हा लेख..
मला तरी १००% पटला हा लेख.. खाणार्यांचे जिभेचे चोचले आहेत... हे खरे..
परंतु सर्वात शेवटी मला मांसाहार करणार्या लोकांमधील 'माणसा'ला साद घालावीशी वाटते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात खाटीक खान्याला अवश्य भेट द्या. आज त्या अश्राप शेळ्या, बकर्यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!
---- हे पटले...
जिथे शाकाहारी जास्त असतात
जिथे शाकाहारी जास्त असतात तिथे ते मांसाहारींना कमी लेखतात आणि जिथे मांसाहारी जास्त असतात तिथे शाकाहारींना ते कमी लेखतात. दोन्हीही तेवढेच चुकीचे आहे.>>> नी, तुझं हे बोलणं १००% पटलं पण खालचं वाक्य नाही पटलं. >>>>
दूध पिणं सोडा सांगण्यासाठी ही पोस्ट नाही. पण आपण जेव्हा दूध, दही इत्यादी गोष्टी ग्रहण करतो तेव्हा त्यामागची ही हिंसा लक्षात राहूदेत म्हणजे मग अरेरे मांसाहार करणारे वाईट असं म्हणायला जीभ धजावणार नाही. >>>
कबुल की वासराचं दूध हिरावुन घेणं योग्य नाही पण तरीही वासरु आणि आई जिवंत तरी असतात ना ग? मांसाहार म्हणजे सरळ त्यांचं जगणंच हिराउन घेतल्यासारखं आहे.
आता हे वाचल्यावर वाटेल की मी शाकाहारी आहे, पण नाही मी मासे आणि चिकन खाल्लय. लहानपणापासून खाल्लय म्हणुन खाते. पण खाताना कुठेतरी गिल्ट फिलींग असतचं तरीही खाते कारण एकच, जिभेचे चोचले.
शाकाहारी मांसाहारी हा वाद चुकिचाच आहे. तरीही जेव्हा मांसाहारी लोकं 'झाडपाला सुद्धा जिंवंत असतो त्याला मारुन बरे खाता' असं म्हणतात तेव्हा ते फक्त स्वतःच्या मांसाहाराचे समर्थन करीत असतात.
असो.
माझे विचार लिहीले बाकी चालुदे.
अमृता, मांसाहारींना समर्थन
अमृता, मांसाहारींना समर्थन करायला लागेल अशी वेळ त्यांच्यावर कशाला आणायची आपण? 'मांसाहार वाईट' यावर इथे हा मी वाचलेला दुसरा लेख आहे. 'मांसाहारी व्हा' असे उलट आवाहन करणारा लेख मी अजून पाहिला नाही.
'मांसाहारी व्हा' असे उलट
'मांसाहारी व्हा' असे उलट आवाहन करणारा लेख मी अजून पाहिला नाही.>>लेख लिहिण्यात वेळ वाया का घालवा असा विचार असेल
शाकाहारी मांसाहारी हा वाद चुकिचाच आहे. तरीही जेव्हा मांसाहारी लोकं 'झाडपाला सुद्धा जिंवंत असतो त्याला मारुन बरे खाता' असं म्हणतात तेव्हा ते फक्त स्वतःच्या मांसाहाराचे समर्थन करीत असतात.>> किंवा दर दोन दिवसांनी उगवणार्या ह्या बिनबुडांच्या वादांना (लेखाला नव्हे ) दिलेले तेव्हढेच बिनबुडाचे उत्तर असेल.
<< दोन्हीही तेवढेच चुकीचे
<< दोन्हीही तेवढेच चुकीचे आहे. >> मान्य. पण नीधपजी, इथं "अभक्ष्य भक्षण"नेच चर्चेला सुरवात करण्याऐवजी "मांसाहार"ने करणं सहज शक्य, योग्य व औचित्यपूर्ण नसतं झालं ? बरोबर असो कीं चूकीचं, पण आज मानवजातीतल्या एका प्रचंड मोठ्या टक्केवारीचं मांसाहार हें 'अन्न' आहे; त्यालाच"अभक्ष्य" म्हणून सुरवातीलाच निंदून काय साधलं जाणार आहे ? उलट, तीव्र प्रतिक्रियाना मुद्दाम दिलेलं हे निमंत्रणच नाही का !
>> "तोंडात काय जात या ऐवजी
>> "तोंडात काय जात या ऐवजी तोंडातून बाहेर काय येत यावर कटाक्षाने लक्ष द्या. शाकाहार करून विषारी शब्दांचे फुत्कार टाकणारे लोक अध्यात्मिक प्रगती साधू शकतील का?"
>> पाळीव प्राण्यांवर प्रेम करावे असे टीचरदीदी सांगतात!!!
येथे येण्याचे सार्थक झाले
मांसाहार म्हणजे भक्ष्य पकडून
मांसाहार म्हणजे भक्ष्य पकडून खाणे... त्यामुळे खरे तर शाकाहारालाच अ-भक्ष्य म्हणायला हवे नै का?
अभक्ष म्हणजे लोखंड, दगड इ. इ.
अभक्ष म्हणजे लोखंड, दगड इ. इ. वस्तू
माणूसभक्षण हे अभक्षभक्षण होऊ शकत नाही. शाकाहारीच असतो तो
बरोबरे अमृता. फरक आहेच. पण
बरोबरे अमृता. फरक आहेच. पण सरळसरळ दुसर्याच्या अन्नाला नावं ठेवणे आणि ते अन्नग्रहण केलं जातं म्हणून त्या व्यक्तीला 'होलिअर दॅन दाऊ!' नोटवर नावं ठेवणे इत्यादी करताना निदान आपण सात्विक म्हणत म्हणत जे दूध पितो ते एका नवीन जन्माला आलेल्या जीवासाठी म्हणून निसर्गाकडून तयार होणारे पोषक अन्न असते. ते आपल्याला हवे यासाठी एका मादीला तिच्या इच्छेविरूद्ध गर्भारपण आणि बाळंतपणाच्या चक्रातून जायला लावतो. हे तरी किमान लक्षात असेल तर बरं ना.
फॉर द रेकॉर्ड मी ठार शाकाहारी आहे. अंडी खाते आणि कधीमधी माश्याचा एखादा घास ट्राय केलाय इतकंच. पण शाकाहार हा माझ्यासाठी केवळ जन्मापासूनची सवय एवढाच भाग आहे.
बोअर
बोअर
स्त्रीमुक्ती आंदोलनाची
स्त्रीमुक्ती आंदोलनाची व्याप्ती पुरुष म्हणून कोणत्याच प्रजातीत जन्माला येणेच नको म्हणण्याइतकी भयानक दिसत आहे.
असो! आपल्याला काही मांसाहार मनापासून आवडत नाही, जे आवडते ते रश्श्याची टेस्ट, जी मांसाविनाही येऊ शकतेच (बहुधा)!
'मुमताझ'मध्ये मी एक कडवे लिहिले होते.
मुक जीव मारताना तू सांग ना कसाया
की आर्त हाक ऐकू येते कि येत नाही
पण (शाकाहार प्रसारकांच्या) दुर्दैवाने नऊ दशांश लोक मांसाहारावर जगत आहेत.
इट्स अ फॅक्ट!
-'बेफिकीर'!
मी शाकाहारी आहे (अपवाद -
मी शाकाहारी आहे (अपवाद - अंडी), मल पण प्राण्यांची हत्या करुन खाणे पट्त नाही.
पण जेव्हा मी घरतील मुंग्या, झुरळ, कोळी बेधड्क मारतो, तेव्हा काही वेळा विचार येतो आपण हत्या तर करतोच आहे, फक्त ते खात नाही ... बळी तो कान पिळी ? ....
आज त्या अश्राप शेळ्या,
आज त्या अश्राप शेळ्या, बकर्यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... >>> मुंग्या, झुरळ, कोळी, इतर किट्क यांनाही तुम्ही जगु देत असाल तरच हा लेख पटला, नाहीतर हा दांभीकपणा आहे ...
मुंग्या, झुरळ, कोळी, इतर
मुंग्या, झुरळ, कोळी, इतर किट्क यांनाही तुम्ही जगु देत असाल तरच हा लेख पटला, नाहीतर हा दांभीकपणा आहे ... <<<
इतर सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, व्हायरस इत्यादी राह्यलेच.
किंवा दर दोन दिवसांनी
किंवा दर दोन दिवसांनी उगवणार्या ह्या बिनबुडांच्या वादांना (लेखाला नव्हे ) दिलेले तेव्हढेच बिनबुडाचे उत्तर असेल >> ये ब्बात. अगदी बरोब्बर बोललास.
इतर सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, व्हायरस इत्यादी राह्यलेच. >>
<<<कबुल की वासराचं दूध
<<<कबुल की वासराचं दूध हिरावुन घेणं योग्य नाही पण तरीही वासरु आणि आई जिवंत तरी असतात ना ग? मांसाहार म्हणजे सरळ त्यांचं जगणंच हिराउन घेतल्यासारखं आहे.>>>
पिटाच्या इन्व्हेस्टिगेशननुसार भारतातल्या दूध उद्योगातील गायी म्हशींचे रोजचे जगणे ही मरणाइतकेच भयंकर आहे.
पिटा PETA चे हे पत्रक वाचून व्हेगन व्हावं का असा विचार पडला होता. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.
इतर सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया,
इतर सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, व्हायरस इत्यादी राह्यलेच. >> त्याना जीव असतो क? नर्व्ह.. सिस्टीम असते का? हा वादाचा विषय नको म्हणुन वगळ्ले.
विशेष काही त्रास नसताना ही आपण (मी पण) मुंग्या, झुरळ, कोळी कीती सह्ज पणे मारतो...
तो कातडी आणि रेशिम यांचा
तो कातडी आणि रेशिम यांचा मुद्दाही येऊ द्यात म्हणजे चर्चा (?) परिपूर्ण होईल.
कातडी, रेशिम बरोबरच लोकरीच्या
कातडी, रेशिम बरोबरच लोकरीच्या शाली राह्यल्या मामी..
Pages