दर रविवारची सकाळ म्हणजे मस्त आराम, वर्तमानपत्र व पुरवण्यांचे मनसोक्त ऐसपैस वाचन, चहा नाश्त्याच्या वेळेला घरातल्यांशी दिलखुलास गप्पा आणि दिवसभरात काय काय कामे निपटायची आहेत याचा थोडासा आढावा हा कार्यक्रम हमखास ठरलेला असतो! त्याला पुन्हा टी.व्ही.वरील मनपसंत मालिकेची फोडणी ही तर अगदी गृहित असते. पण या नव्या ठिकाणी रहायला आल्यापासून दर रविवारची माझी सकाळ एका जीवघेण्या आक्रोशाच्या छायेत उगवते!
आमची ही नवी जागा 'गावठाण' भागात आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या येथील माणसे एकमेकांना ओळखतात. त्यांचे व्यवसायही बर्यापैकी पारंपारिक. आणि माझ्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावरच्या, अशाच व्यवसायांचा अविभाज्य भाग असलेल्या खाटीकांच्या टपर्या व दुकाने! ह्याच टपर्यांमध्ये बोकड, बकर्या, शेळ्या, कोंबड्या इत्यादींची रोज लोकांच्या मागणीनुसार कत्तल होत असते. आयुष्यातील ते एक वास्तव आहे! पूर्वी म्हणे ठराविक काळातच मांसाला भरपूर मागणी असे. पण सध्याच्या काळात सुट्ट्या, सण, निवडणुका, साप्ताहिक सुट्ट्या अशी कोणतीही निमित्ते लोकांची गर्दी ह्या दुकानांकडे खेचण्यास पुरेशी ठरतात. मग त्यासाठी दर रविवारी सकाळी अगदी माझ्या दारासमोर दोन-तीन ट्रक टेंपो थांबतात... आतमधील शेळ्या, बकर्या व त्यांची पिल्ले जणू मृत्यूची चाहूल लागल्याप्रमाणे इतकी करुण आवाजात आक्रंदत असतात की कोणाच्याही ह्रदयाला पीळ पडेल! त्यांना परमेश्वराने जर वाणी दिली असती तर त्यांचा हा आवाज नक्कीच म्हणाला असता, "देवा, वाचव रे बाबा आमच्या लेकरांना! कोणीतरी दया करा रे आमच्यावर! असे निर्घृणपणे नका ठार मारू आम्हाला! देवाने आम्हाला पण जगायचा हक्क दिलाय्...तो असा हिरावून नका घेऊ आमच्याकडून... आमचे प्राण घेऊन तुम्हाला काही क्षणांचे सुख मिळेल, तुमच्या जिभेचे चोचले पुरविले जातील... पण आमच्या प्राणांची, आमच्या बछड्यांच्या प्राणांची किंमत देऊन... आम्ही तुमचा असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्ही आमची हत्या करून परतफेड करणार आहात.... दया करा रे आमच्यावर, जगू द्या आम्हालाही....!!"
त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः कधीकधी मला स्वतःचे विचारही ऐकू येत नाहीत! जेव्हा त्यांना पाय बांधलेल्या अवस्थेत खाटीकखान्याकडे नेले जाते तेव्हा तर त्यांच्या किंकाळ्या मन पोखरत राहतात.
कधी काळी मीदेखील मधूनच मांसाहार करायचे. मोठ्या चवीने खायचे. पण नंतर मांसाहारातून उद्भवणार्या समस्या, मानवी शरीरावर त्याचे होणारे अनिष्ट परिणाम यांविषयी ऐकले, वाचले, अनुभवले आणि माझा मांसाहार आपोआप संपुष्टात आला. चवीच्या दृष्टीने म्हणाल तर त्यांत वापरले जाणारे मसाले आपल्या नेहमीच्या भाज्या, रस्से वगैरेंमध्ये वापरले की जिभेचे 'ते' चोचले पण पुरविले जातात. भीतीने गळाठलेल्या, आक्रोशणार्या प्राण्यांच्या मांसामध्ये त्यांनी मृत्यूसमयी अनुभवलेली भीती, धक्का, संताप, दु:ख, आक्रंदन यांमुळे त्यांच्या शरीरात जे रासायनिक बदल, हार्मोनल चेंजेस घडून येतात त्यांचाही समावेश असतो! मग पैसे फेकून त्याबदल्यात अशी विकतची भीती, दु:ख कशाला घ्या! आपल्याकडे सुदैवाने व निसर्गाच्या कृपेने भरपूर भाज्या, फळे, धान्ये पिकतात. त्यांच्या किंमतीही मांसाच्या तुलनेत पहायला गेलो तर खूपच कमी आहेत. पण तरीही 'वशाट' खाण्याचा हा अट्टाहास का?
माझी काही मांसाहार करणारी स्नेहीमंडळी आमच्यात हा विषय निघाला की हटकून मला मांसाहार आरोग्यासाठी किती चांगला आहे, त्यांतून शरीराला किती उपयुक्त घटक मिळतात, अगदी आयुर्वेदातही मांसाहाराविषयी सांगितले आहे, पुरातन काळापासून मांसाहार चालू आहे ह्याचे दाखले देतात. पण मग सवाल असा उठतो की तो जर इतका चांगला आहे तर त्याचे एवढे दुष्परिणाम का आढळून येतात?
उत्तर काहीसे सोपे आहे... आजची जीवनशैली मुळातच तणावपूर्ण आहे. शहरांमध्ये तर आयुष्याची वेगवान गती, बैठे काम, अपुरा व्यायाम व इतर अनेक हानीकारक बाबी, जसे प्रदूषण, अनारोग्यकारक वातावरण, चढाओढ ह्यांची चढती भांजणी दिसते. त्यांत मांसाहार करणारे अनेकजण ते मांस कोठून येते, तिथे स्वच्छता किती असते, आरोग्याचे नियम पाळले जातात का यांविषयी बेपर्वा दिसतात. ज्या प्राण्याचे मांस मोठ्या चवीने खाल्ले जाते त्या प्राण्याच्या शरीरात काही मानवी शरीरास अपायकारक कृत्रिम संप्रेरके, खाद्य, जंतु यांचा समावेश होता का याबद्द्लही त्यांना फिकीर नसते. आयुर्वेदात जरी मांसाहार सांगितला असला तरी तो विशिष्ट ॠतूंमध्ये, विशिष्ट प्रकारे व ठराविक प्रमाणात करावयास सांगितले आहे. शिवाय तो कोणास लाभदायक आहे व कोणास कुपथ्यकारक त्याचीही सूची आढळते. मात्र त्या सर्वाशी मांसाहार करणार्या माणसाला सहसा देणेघेणे नसते. आपल्या आतड्यांची लांबी, दातांची व जबड्यांची रचना ही शाकाहारास अनुकूल आहे. परंतु हे वास्तव मांसाहारी मंडळी नजरेआड करताना दिसतात.
आज माझ्या घराजवळील खाटीकखान्यातून पंचक्रोशीतील हॉटेलवाले मांस खरेदी करतात. पण त्या हॉटेलांच्या एअरकंडिशन्ड वातावरणात बसून समोरच्या नॉनव्हेजवर ताव मारणार्यांना ते मांस जिथे विक्रीस ठेवले होते तिथल्या घोंगावणार्या माशा, घुटमळणारी भटकी कुत्री, झेपावणारे कावळे, खुडबुडणारे उंदीर घुशी, जवळच महापालिकेच्या कचर्याचा ओसंडून वाहणारा कंटेनर आणि सांडपाण्याच्या जोडीला दुकानासमोरून वाहणारे रक्ताचे पाट दिसत नाहीत. की त्यांना खाटीकाच्या दुकानात काम करणारे मळक्या कळकट गलिच्छ अवतारातील नोकर दिसत नाहीत.
आज शहराच्या तथाकथित सुसंस्कृत, सभ्य, पर्यावरणाविषयी जागरूक भागातील खाटीक खान्याची ही अवस्था आहे, तर मग इतर दुर्लक्षित भागांची कल्पनाच न केलेली परवडली!
परंतु सर्वात शेवटी मला मांसाहार करणार्या लोकांमधील 'माणसा'ला साद घालावीशी वाटते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात खाटीक खान्याला अवश्य भेट द्या. आज त्या अश्राप शेळ्या, बकर्यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!
माझ्या घराजवळचा खाटीक खाना बंद होईल की नाही हे मला माहीत नाही, पण हा लेख वाचून जर तुम्ही मांसाहार बंद अथवा कमी करण्याचे ठरवलेत तर माझी खात्री आहे की त्या प्राण वाचलेल्या निरपराध जीवाचे तुम्हांला अनंत दुवा मिळतील!
अभक्ष्य भक्षण आणि माणूस
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 May, 2009 - 18:40
गुलमोहर:
शेअर करा
झिंगर,
झिंगर, अनुमोदन
कृपया
कृपया भूतदयेची व्याख्या स्पष्ट करा. आणि त्याचा आहाराशी काय संबंध?
गम्मत/मनोरंजन/स्वार्थ म्हणून निसर्गचक्रात काही ढवळाढवळ करणे म्हणजे नक्कीच क्रौर्य - शिकार, बोन्साय, हुंडाबळी, भ्रूणहत्या.
असे मुद्दामहून न करणे म्हणजे भूतदया - जी मिश्राहारी अथवा शाकाहारी असण्याशी संबंधित नाही.
शाकाहारी अन्न खाणारी व्यक्ती रस्त्यावरच्या कुत्र्याला दगड मारत असेल तर तिच्यात भूतदया नाही असेच कोणी म्हणेल. तर मांसाहारी व्यक्ती जर जखमी कुत्र्याला प्राणीसंस्थेत जरी दाखल करत असेल तरी ती भूतदया!
चांगल
चांगल लिहिलय. तुम्हाला ते सगळ बघुन झालेला त्रास लेखात दिसुन येतो. पण म्हणुन मांसाहार वाइट असे म्हणता येणार नाही. युरोपात पाहाल तर ही लोकं सकाळ्/दुपार/संध्याकाळ/रात्री मांसाहारच करतात. मलातर त्यांच्यात काहीच दुश्परिणाम दिसले नाहीत! तर, खाद्यपदार्थ हे त्या त्या भागात काय मुबलक आहे? हवामान कस आहे यावर अवलंबुन असतात.
जाइजुइ चा प्रतिसाद आवडला.
>>गलिच्छ अवतारातील नोकर
हे सारं भाजीबाजारातही पाहायला मिळतं. म्हणुनच आपल्याकडे भाज्या/मांस भरपुर शिजवुन खातात.
युरोपात पाहाल तर, आपल्याएवढे शिजवलेले नसते (खरतर काहिच शिजवलेले नसते) कारण तिथली साफसफाइ आणि थंड/कोरडी हवा (रोग पसरायला पुरक नसते).
>> दुर्दैवाची गोष्ट की स्वाईन फ्ल्यु श्वासावाटे देखिल पसरतो अशी बातमी आहे!
तो श्वासावाटेच पसरतो... डुक्कर खाल्याने नाही. त्याचा उगम डुकरांशी संपर्कात असलेल्या लोकांपासुन झाला, एवढच. उगाचच अफवा पसरु नका.
मला वाटत, (आपल्याकडेतरी) मांसाहार हा पुरक असावा, स्विट डिश प्रमाणे (आता तो किती करावा हा ज्याने त्याने विचार केला पाहिजे) पण, तेवढाच धान्य/भाजीपाल्यावरचा भार कमी होतो.
किती टक्के कमी हे कोणी सांगु शकेल का??
<<<
<<< वनस्पतीना भावना नसतात. त्याना nervous system नस्ते. मेन्दू नसतो. त्यामुळे जाणीव नसते.
बाकी प्रत्येकाची खाण्याची, न खाण्याची कारणे वेगळी. ज्याला जे खायचे ते खावू द्यावे झाले. हे मात्र खरे.
Mrinmayee | 15 मे, 2009 - 17:52 नवीन
झिंगर, अगदी बरोबर! >>>>
शाळेत शिकवलेलं विसरु नका रे. जगदिशचंद्र बोसांनीच सिद्ध केलय वनस्पतींना भावना असतात म्हणून.
लेखिकेच्य
लेखिकेच्या भावना पोचल्या आणि जाईच्या सगळ्या पोस्ट्सना मोदक / मोदकं (दोन्ही चालेल
)
अरुंधती,
अरुंधती, लेख आवडला. भावना पोचल्या. तुम्ही एकेकाळी मांसाहारी होता पण आता ते सोडले हे वाचुन पण बरे वाटले. मी पण एकदा हा अनुभव घेतलाय, म्हणजे त्या शेळीचे करुण डोळे पाहिलेत.
झींगर ला अनुमोदन.
मी पण शाकाहारी आहे पहिल्यापासुन. फक्त माझ्यापुरते का ते लिहिते.
आई-बाबा कधी खात नसत म्हणुन अगदी लहान असताना अर्थातच शाकाहार केला. पण जरा मोठी झाल्यावर (१०-१२ वर्षाची) कळले की मैत्रीणी खायच्या, म्हणायच्या 'तु ही खा', त्यावेळी विचार केला की आपण मांसाहार करावा की नको. तेव्हा पहिला हाच विचार मनात... "एका प्राण्याला मारुन त्याचे अंग, रक्त खायचे???? स्वच्छ केलेले, शिजवलेले, मसाले टाकलेले असले तरी काय झाले? नाही....." .
आणि मी शाकाहारीच रहायचे ठरवले. हा विचार त्या वयाला अनुसरुन आलेला विचार होता. शास्त्रीय दृष्ट्या आलेला नव्हता..
मी जेव्हा मांसाहार करणार्या मित्र-मैत्रीणींशी ते न खाण्याबाबत बोलते, तेव्हा बहुतेकांनी उत्तर दिले की ' फायदे-तोटे काही असले तरी ते फार चविष्ट असते आणि आता इतकी सवय झाली आहे की त्यांना आता सोडता येणार नाही'. मग मी फक्त त्यांना कमी खाण्याबद्दल सुचवते व त्याचवेळी खाण्यात भाज्या-फळांचे प्रमाण वाढवायला सांगते. त्याला ते 'हो हो' म्हणतात पण करतात की नाही माहीत नाही
.
ब्राह्मण
ब्राह्मण असल्याने आमच्याकडे पुर्ण शाकाहारच होता पहील्यापासून. आसपासची वस्ती तर इतर जातीयांची (खाणार्यांची संख्या) जास्त असलेल्यांचीच होती. लहानपणी 'एकदा खाऊन बघ, परत मागशील', 'चोरून खाऊ घातलं तरी तुला कळणार नाही,' ' खाऊन तर बघ, मटण काजूसारखं आणि खोबर्यासारखं लागतं,' अशी वाक्य रोज ऐकली आहेत आम्ही भावंडांनी. मी तर एकदा वैतागून उत्तर दिलं होतं की मग खोबरं आणि काजूच खा ना, कशाला मुके प्राणी मारून खायचे?
जसं जसं कळायला लागलं तसं त्या लोकांच्या आग्रहाला बळी पडून मी चव सुद्धा घेतली नाही त्याचं बरं वाटलं. 
अर्थात कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या मैत्रिणी खातात सगळं, अगदी ताटाला ताट लावून बसल्या तरी मला फरक पडत नाही. मांसाहाराच्या बाबतीत मी इतकी काही कट्टर नाही. पण काही लोक असतात. माझ्याच फॅमिलीतल्या एक ज्येष्ठ महीला अत्यंत धार्मिक आहेत, त्यांच्या आई तर 'अंडं' असा उच्चार ही विटाळकारी मानतात त्यामुळे अंड्याला त्या 'पांढरा कांदा' म्हणतात. हे अगदी अती झालं.
सरते शेवटी एक स्वार्थी विचार... सध्याची लोकसंख्या पाहता, काही टक्के लोक मांसाहारी आहेत म्हणून आमच्या सारख्या शाकाहारी लोकांना अन्नाचा तुटवडा भासत नाही. पण मुक्या प्राण्यांचा जीव हकनाक जातो यासाठी हळहळत वाटतेच.
माणसाचे
माणसाचे शरीर हे आतून माकडासारखे आहे..... म्हणजे आपण शाकाहारी आहोत... वाचा... माझा साक्षात्कारी ह्रुदयविकार ( डॉ. अभय बन्ग)
ती विषारी डाळ राजस्तानात आढलते... केसरी डाळ असे त्याचे नाव आहे.
>>>>> माणसाचे
>>>>> माणसाचे शरीर हे आतून माकडासारखे आहे
जगोबा, यात काही शन्का असावी का कुणाला?
अहो आतुनच काय, बाह्यतः देखिल बरीच माणसे माकडासारखीच वागतात्-जगतात!
दक्षे, मान्साहार "पोटभरीकरता" अस्तो नी म्हणून शाकाहारी अन्न बाकिच्यान्ना उरते हा एक मोठ्ठा गैरसमज आहे! (माझ्या मते तरी)
दादा कोन्डकेच्या सिनेमात दाखवल्याप्रमाणे अगदी "छटाकभर" नसले तरी पावशेर आतशेर मटण्/चिकन आणून त्यात हव्वेतितके मसाले घालून, कान्दे घालून, ढिगभर भात्/भाकर्यान्बरोबर चारपाच जणात हाणले जाते, हे वास्तव!
माझ्या एका मत्स्याहारी मित्रास मी नेहेमी विचारायचो, अन त्यास तो प्रश्नच कळायचा नाही
असे की, मी चार चपात्या भाजी बरोबर खाल्ल्या की पोट भरते, तर नुस्ते किती पापलेट हाणले तर पोट "भरल्यासारखे वाटेल"? त्याला काय उत्तर देता येईना! शेवटी मीच एकदा मुम्बैत गेलेलो अस्ताना दोन तीन डिश माशाच्याच खाल्ल्या! वेटर येडा झाला होता, कारण त्या जोडीला मी इतर काहीच घेतले नव्हते!
तसेच पुनागेट मधे चिकन अन्गारा म्हणून प्रकार मिळतो, हल्ली हे असे बोनलेस प्रकार ड्रिन्क्स बरोबर "चकणा" म्हणून खाण्याची पद्धत वाढली आहे! तर हि एक डिश, म्हणजे अन्दाजे एक कोम्बडी खाल्ली, तर मात्र पोट तात्पुरते भरल्या सारखे वाटते, त्यात बराचसा भाग हा बिअर किन्वा इतर द्रव अपेयपानाचाही अस्तो!
तरीही, पोटभरीसाठी मान्साहार केला जातो हे अमान्य होते!
असो
मी काय त्यातला तज्ञ नाही!
माझ्या हिशेबाने, द्वितीय स्थान बिघडलेले असेल, वा त्यावर "मन्गळादी" क्रुर ग्रहान्ची दृष्टी असेल, तर त्या वक्तिकडून मान्साहार होतोच होतो! अपेयपान वा अभक्षभक्षणाचे ग्रहादि योग पोपटाच्या बीबीवर विचारुन घेतले पाहिजेत!
>> काही
>> काही टक्के लोक मांसाहारी आहेत म्हणून आमच्या सारख्या शाकाहारी लोकांना अन्नाचा तुटवडा भासत नाही.
'भारतीय जेवणात सरासरी किती टक्के शाकाहार्/मांसाहार' हे कोणी सांगु शकेल का?
मला सापडलेली टक्केवारी,
२००६ Hindu-CNN-IBN Nation Survey: ३१% शाकाहारी, आणखी ९% अंड खातात. बाकीचे मांसाहारी.
FAO [2], and USDA [3] : २०%-४२% शाकाहारी. ३०% पेक्षा कमी लोग नियमीतपणे मांसाहार करतात.
[संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Vegetarianism_in_India]
हे झालं लोकांबद्दल, पण ती लोकं जे अन्न घेतात त्याची विभागणी कोणी सांगु शकेल का? (शाकाहारी व मांसाहारी लोकं मिळुन, सरासरी किती टक्के मांस खाल्ल जात?)
>>>> काही
>>>> काही टक्के लोक मांसाहारी आहेत म्हणून आमच्या सारख्या शाकाहारी लोकांना अन्नाचा तुटवडा भासत नाही.
अरे स्याम, ती आकडेवारी शोधूच, पण वरील वाक्य अजुन एका अर्थाने मला पटत नाहीये
"पुण्यात बुधवार्-शुक्रवार पेठा आहेत (रेडलाईट एरिया) म्हणून बाकी घरच्या लेकी सुना सुरक्षित आहेत" अशा अर्थाचा बेधडक पण पळपुटा षण्ढ युक्तिवाद केलेला कित्येकदा ऐकला आहे!
तसेच, मान्साहारी आहेत म्हणून शाकाहारी जगु तरी शकताहेत अशा अर्थाचा हा युक्तिवाद देखिल पटत नाही!
तुमच्या लेकीसुना सुरक्षित रहाव्यात म्हणून "वेश्याव्यवसायात" ओढल्या गेलेल्या किन्वा ढकलल्या गेलेल्या दुर्दैवी स्त्रियान्च्या तशा जगत रहाण्याचे कोणताही सूज्ञ माणूस समर्थन करणार नाही, (तर, समाजातील भ्रष्ट्/विकृत पुरूषान्चे निर्दाळन करण्यास पाठीम्बा देईल) तसेच, तुमच्या जीभेच्या चोचल्यासाठी, मुक्या जीवन्त प्राण्यान्ची आधी वाढवून, मग हत्त्या करणे समर्थनीय नाहीच नाही! त्यापेक्षा जीभेला आवर हाच उपाय!
(वि.सू. १: येथे "तुमच्या" हा शब्द सर्वसाधारणतः वापरला आहे, नेमक्या कुणा व्यक्तीन्च्या/माबोकरान्च्या समुहास उद्देशून नाही
वि.सू. २: वरील युक्तिवादास दक्षीणा जबाबदार आहे असे मी मानत नाही, किन्वा तिच्याकडूनच पहिल्यान्दा हे ऐकले, असेही नाही! तिने केवळ ऐकिव माहितीवर आधारीत उल्लेख केला, म्हणुन ती निमित्तमात्र)
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****
बाप रे! तो
बाप रे! तो तर फार मोठा सर्व्हे होईल आणि त्यात ही बरीच व्हेरिएशन्स सापडतील.
पण मी खूप लोक असे पाहीलेत जे रात्रंदिनी मांसाहार करतात..
जागोंच्या म्हणण्यानुसार माणसाचं शरीर माकडासारखं आहे तर इतकं जड अन्न पचवतो कसा माणूस?
लिंम्ब्या
लिंम्ब्या तुझ्या पोस्टला माझं अनुमोदन आहे.
माझं वाक्य मी स्वार्थी विचार अशा उल्लेखानंच सुरवातलंय.
असो; ते दक्षिणा तलं क्षी दिर्घ लिहीलंयस ते र्हस्व कर बघु आधी...
>>
>> मान्साहारी आहेत म्हणून शाकाहारी जगु तरी शकताहेत
ही जरा अतिशयोक्ती होतीये, मांसाहारामुळे शाकाहारी अन्नावरचा बोजा कमी होतो का? असा प्रश्ण आहे.
मलादेखिल याबद्दल शंका आहे, म्हणुनच मी टक्केवारी शोधायचा प्रयत्न केला.
वरील टक्केवारीनुसार ३०% हुन कमी लोक नियमितरित्या मांसाहार करतात, म्हणजे एकुन अन्नधान्यात मांसाचे प्रमाण थोडे का होइना पण महत्वपुर्ण असावे असे मला वाटते.
लिंबु
लिंबु तुम्ही खाता का खात नाही हो? कारण तुम्ही प्राण्याना मारु नये ह्या बाजुने बोलताय आणि अख्खी कोंबडी पण फस्त करताय म्हणुन गोंधळले बघा..
सुनिधी,
सुनिधी, प्रत्यक्ष आद्य श्री शन्कराचार्यास देखिल, एका विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, "अनुभव" घ्यावा लागला अशी एक कथा आहे!
मी तर पडलो एक सामान्य पामर! तेव्हा अनुभव असावा, म्हणून मी खाऊन बघितली आहे!
अनुभवास आल म्हणून बकरी मारताना नी नन्तर सोलताना हातभारही लावला आहे!
पण या गोष्टी तेव्हाच्या जेव्हा मी "फारच जास्त अडाणी" होतो!
असो
लिम्ब्या
लिम्ब्या लिम्ब्या, अरे कुठें फेडशील ही पापं?
दक्षिणा,
दक्षिणा, सद्य बुद्धिप्रामाण्यवादाच्याद्वारे तुझा प्रश्नच अप्रस्तुत आहे!




पाप पुण्य वगैरे कल्पनाच "थोताण्ड" आहेत असा "त्यान्चा" निष्कर्ष आहे! सबब तू तुझा प्रश्न मागे घ्यावास किन्वा "पापः" म्हणजे काय अन ते कस फेडायच हे प्रयोगशाळेत सिद्ध करुन दाखव!
(याकरता "बाप दाखव नाहीतर "श्राद्ध घाल" ही म्हण देखिल मी वापरीत नाहीये, हे सुज्ञान्नी ध्यानात घ्यावे)
असो, माझ्या दृष्टिने, पाप या जन्मीच फेडावे लागेल, प्रचण्ड जीवसन्ख्येमुळे, तेवढ्या जीवान्चे, या, पुढल्या, त्या पुढल्या जन्मान्चे हिशोब ठेवायला चित्रगुप्ताकडे वेळ नसतो हल्ली!
बायदिवे,
या बीबीवरील प्रश्नाची दुसरी एक बाजू आहे
गेल्या वर्षी, आमच्या कम्पनीतील एक "ब्राह्मण" अधिकारी रशियातील, उत्तरी भागातील किनारी प्रदेशात गेले होते (सायबेरिया किन्वा त्याच्या वरील बाजुस). परत आल्यानन्तरचे त्यान्चे खाण्यापिण्याबाबतचे किस्से ऐकुन अन्गावर शहारे येत होते
ज्या ठिकाणी उणे वीस पन्चवीस इतके तपमान जवळपास कायमच अस्ते, तिथे कसलाही भाजीपाला, धान्य वगैरे शाक उगवु शकत नाही, त्याची पैदास करता येत नाही! तिथे, केवळ अन केवळ निसर्गातून मिळणार्या सजीवान्वरच भुकेसाठी अवलम्बुन रहावे लागते! त्यान्च्या म्हणण्याप्रमाणे, पानात काय पडले आहे, याचा आकार, रुप, चव इत्यादिक विचार करणे सोडून देऊन, ते शब्दशः गिळायचे! जर गिळले नस्ते तर उपाशी मेले अस्ते!
तर, या पृथ्विवर अशी परिस्थिती देखिल आहे, जिथे मान्साहाराला पर्याय नाही, हे विसरुन चालणार नाही
हे जेव्हा मी लिम्बीला सान्गितले, अन म्हणले की बाईग, मला किमान ऑम्लेट तरी खाऊ दे, तेव्हा ती जी भडकली म्हणता.......... तिच्या शब्दात म्हणजे,
"सायबेरियात घर घ्या, तिथे रहायला जा, तिथे मग जनावरच काय, जनावराच शेण देखिल खाल्लत तरी मी काही बोलणार नाही!
पण इथे पुण्यात, भारतात मात्र मी म्हणते तेच खाल्ले पाहिजे! इथे काय धान्य भाजिपाला पिकत नाही म्हणुन तू अण्डी खायचे म्हणतोस? यालाच मी अवदसा आठवणे असे म्हणते"
एलटी
एलटी
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू फुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....
<<<<"सायबेरिय
<<<<"सायबेरियात घर घ्या, तिथे रहायला जा, तिथे मग जनावरच काय, जनावराच शेण देखिल खाल्लत तरी मी काही बोलणार नाही!
पण इथे पुण्यात, भारतात मात्र मी म्हणते तेच खाल्ले पाहिजे! इथे काय धान्य भाजिपाला पिकत नाही म्हणुन तू अण्डी खायचे म्हणतोस? यालाच मी अवदसा आठवणे असे म्हणते">>>>
कु./सौ./श्रीमती लिम्बी यांना १००१ मोदकं.
धन्यवाद!
आपल्यला जे आवडते ते चविने
आपल्यला जे आवडते ते चविने खावे वाया घालवु नये...
खाण्या-पिण्यावर उगिचच चर्चा नको.......
भाकरी फार वाइट आहे...
खाण्या-पिण्यावर उगिचच चर्चा
खाण्या-पिण्यावर उगिचच चर्चा नको.......
भाकरी फार वाइट आहे...
<<<
:d
एकूण सारी दुनिया 'सोयीनुसार'
एकूण सारी दुनिया 'सोयीनुसार' तत्त्वज्ञानाने भरलेली आहे. चालायचेच.
लिंबी वहिनीला साजुक तुप
लिंबी वहिनीला साजुक तुप घातलेला उकडीचा नाजुक मोठ्ठा मोदक
मी स्वतः शाकाहारी आहे, मी मुस्लिम प्रांतात रहाते जिथे भाज्या महाग आणि मटण स्वस्त अशी स्थिती आहे. माझ्या शाकाहारी असण्याबद्दल बहारीनी लोक नेहमी आश्चर्य व्यक्त करतात. त्यावर मी जे स्पष्टीकरण दिले त्यानंतर माझी एक बहारीनी मुस्लिम मैत्रीण शाकाहारी बनली, नंतर मी तिला जैन आणि इस्कॉन आहार सांगितला तर ती अवाक झाली. तिने माझ्याकडुन शाकाहारी पाककृतींची पुस्तके मागवली, तिचे इंग्लिश चांगले नसल्याने ती पुस्तके तिने तिच्या एका प्राध्यापक बहारीनी मैत्रीणीकडुन अरेबिक मध्ये ट्रान्स्लेट करुन घेतली व नंतर छापलिही (थोडा अरेबिक टच देऊन). एकेका पदार्थापासुन किती विविध प्रकारच्या डीशेस बनवता येतात, उदा. पालकापासुन किती काय काय बनवता येते, त्यातील प्रोटीन्सची क्षमता वगैरे पाहुन इथले लोक प्रभावीत झाले.
कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण विनंती इतकीच केवळ आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी नाहक कुणाचा निर्घुण बळी जात असतो हे लक्षात ठेऊन पुढच्या वेळी खा, आणि जमल्यास ती शेवटची आर्त हाक ऐका.........
बहुतेक मी रीपीट मारलेलं
बहुतेक मी रीपीट मारलेलं आहे.... क्शमस्व
समजा जगातले सारे मांसाहारी शाकाहारी झाले तर....
सर्व मानव जात, जनावरं गवत (veg ) खायला लागेल्....आणि veg चा तुटवडा निर्माण होइल.
त्याच्या उलटं....सर्वच जण मांसाहारी झाले तर सर्व प्राणी (मानव सुद्धा) नाहिसे होतिल...
आणि मग काय्....पृथ्वीवर सगळीकडे गवतच गवत ....
< हिरवी पृथ्वी ????
>
म्हणुन असं असेल की ही दुनिया अर्धी(?) शाकाहारी अर्धी मांसाहारी आहे...
हे सगळं कसं साध्य केलं असेल तर्....धर्माच्या आधारावर्...
हिंदुनी शाकाहारी असावं...(आता काही हिंदु देवांना बळी लागतो....पण ते eqution balance करण्यासाठी )
मुस्लीमांनी / ख्रिस्तींनी (अर्थात काही अपवाद वगळता....ते पण eqution balance करण्यासाठी ) मांसाहारी असावं (?)
अर्थात हवामान हादेखील महत्वाचा घटक आहेच.
टीप : ज्या प्राण्यांचा reproduction rate अपवादात्मक रित्या जास्त आहे, त्यांचाच
मांसाहार म्हणुन उपयोग होतो...उदा : कोंबडी, शेळी....
(No subject)
शाकाहार उत्तमच पण रं.पा.
शाकाहार उत्तमच पण रं.पा. बरोबर मेथीची भाजी कशी लागेल?
काय हे? अजून दळण चालूच? सगळे
काय हे? अजून दळण चालूच?
सगळे जण आहारच सोडून द्या बघू.. मांसाहारींनी कोंबडी - बकरीच्या आर्त हाकेला "ओ" द्या! आणि शाकाहारींनी एकरांनी शेतात पिकवलेल्या गव्हा-भाताच्या, भाज्यांच्या अख्ख्या पीढ्या गारद करणं सोडून द्या! वासरांच्या तोन्डचे दूध काढून बनवलेलं चीज, दूध, आईसक्रीम हे दोन्ही पक्ष सोडून द्या..!
हाय काय नि नाय काय?
जाजु
जाजु
विनोद चांगला आहे पण विनोद
विनोद चांगला आहे पण विनोद म्हणुनच! वास्तव नाही. ह्याला हसणेही चांगले पण म्हणुन संवेदनक्षम विषय टाळता येत नाही.
Pages