मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..) Landscape Photography..

Submitted by अ'निरु'द्ध on 18 October, 2020 - 08:31

मुखपृष्ठ :

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..

फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. Wink )

जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा ही निसर्गृश्य जास्त प्रमाणात क्लिक केली जातात, याचं कारण असं की..
फोटो काढण्यासाठी ती सहज उपलब्ध असतात…
स्थिर असतात..
डोळ्यांना, मनाला आनंद देतात…
आपल्या सहलीच्या स्मृती अगदी सहज जिवंत ठेवतात..
इतरांना दाखवायला आणि त्यांनाही बघायला आवडतात..
ह्या सृष्टी सौंदर्याच्या आवडीशी आपली एक नैसर्गिक नाळ जोडली गेलेली असते..

ह्या धाग्यामधे आपण आपली अशीच विविध निसर्गदृश्य देऊ या, पाहू या..

ह्या निसर्गचित्रात (लँडस्केप) मधे काय असेल..
तर.. कुठलाही डोंगर, टेकडी, तलाव, नदी, समुद्र, समुद्रकिनारा, जंगल, कुरण, वनश्री, बर्फाच्छादित प्रदेश आणि अगदी वाळवंटही..
अशा गोष्टींची नयनरम्य प्रकाशचित्रं (दूरचित्र/ Long Shots..) असतील..
लहानपणी आपण डोंगर, नदी, गावं, छोटी छोटी घरं असं चित्र काढायचो, तसे फोटोही चालतील..

सूर्योदय आणि सूर्यास्त हे ही खरं तर यातच मोडतात पण त्यासाठी आपला वेगळा धागा आहेच.

Wild Life Photography चे Long Shots ही खरं तर निसर्गदृश्यात मोडू शकतात पण ते ही आपण शक्यतो टाळणार आहोत.

निसर्गाचित्र/दृश्य ही निसर्गाशी संबंधित असली तरी निसर्गामधलं एकटं झाड, झुडूप, फळ, फुल, फुलं यांचे क्लोजअप्स यात मोडणार नाहीत.

आपलं प्रकाशचित्रं देताना त्याचं ठिकाण तर सांगाच..
पण त्या ठिकाणाची, फोटो काढतानाची काही खास आठवण असेल तर ती ही जरुर सांगा..
मग ती आपली शाळेची/काॅलेजची सहल असेल, मधुचंद्राच्या वेळी गेलेल्या हिल-स्टेशनचे फोटो असतील (दुसरा, तिसरा मधुचंद्रही चालेल कारण त्यावेळेला कदाचित फोटोग्राफीकडे आपलं जास्त लक्ष असेल Wink ) किंवा जिवलग मित्रांसोबतचं धमाल गेट टुगेदर असेल..
काही जण ट्रेकला गेले असतील किंवा काही एकांडे शिलेदार एकटेच अन-वाईंड व्हायला..

त्या तेव्हाच्या आठवणी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा जाग्या होतील..

हे फोटो काढताना काही स्पेशल सेटींग्ज वापरली असतील, कुठले फिल्टर्स वापरले असतील तर ते ही जरुर कळवा..
अशा फोटोग्राफीच्या काही टिप्स आणि/अथवा ट्रिक्स असतील तर जाणकारांनी त्याबाबत इथे मार्गदर्शन केलं तर नवोदित फोटोग्राफर्सना नक्कीच त्यातून काही घेण्यासारखं असेल..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

आणि सर्वात महत्वाचं : हा धागा फक्त बेफाट सुंदर फोटो काढणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्व मायबोलीकरांसाठी आहे.

हल्ली बहुतेकांकडे कॅमेरे असतील.
सगळ्यांकडे मोबाईल तर असतोच ज्यामधूनही चांगले चांगले फोटो येतात.
ते बिनधास्त इथे द्या. शेवटी बघणारे सर्व आपलेच मायबोलीकर असणार आहेत.

कधी फोटो सुंदर असेल, कधी त्याच्या आठवणी सुंदर असतील.. तर कधी दोन्हीही सुंदर असेल..

तेव्हा निसर्गदृश्याचे प्रचि आणि आठवणी द्यायला विलंब करु नका..
(आणि जरी सर्व निसर्गचित्र/दृश्य "Landscape" या Term ने ओळखली जातात आणि म्हणून बहुतांशी Landscape म्हणजे आडव्या Format असतात तरी उभ्या स्वरुपातल्या निसर्गदृश्यांचही स्वागत आहे..)

नमुना प्रचि :

काबो-दे-रामा किल्ल्यावरुन बेतिलबेतिम (South Goa) ला परत येणाऱ्या रस्त्यावर ही खाडी लागली.
पुलावरुन (Assolna Bridge बहुतेक) गाडी चालली होती, सूर्य मावळतीला आला होता आणि पुलावरुन जाताना सहज खाली नजर गेली तर ही एवढी नारळाची झाडं हारीने उभं राहून पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब निरखत होती...


टीप : मायबोलीच्या प्रकाशचित्रांविषयक धोरणानुसार :

इथे दिलेले प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहायला मिळेल - https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झायॉन नॅशनल पार्क

IMG_1011.JPG

ह्या फोटोतला परिसर इथल्या अनेकांना परिचित असेल. >>>>>
छान टिपला आहे !
पण नक्की कुठले स्थळ ?
पुण्यातील च आहे हे नक्की ! पण कोणता भाग ?

ह्यावर्षी कोकणात जाणे झाले नाही. नाहीतर दरवर्षी एकतरी फेरी असतेच. हा एके वर्षी दापोली ला जात असतानाचा फोटो.
तासनतास प्रवास केल्यानंतर अथांग सागर जेंव्हा पहिल्यांदा दिसतो तो क्षण काय वर्णावा. ती मनाची अवस्था आणि त्यावेळच्या उर्मी कॅमेऱ्यात कैद करता येत नाहीत. पण जे काही कॅमेरा टिपतो ते पाहिल्यानंतर सुद्धा किती छान वाटते.

20140502_121743.jpg

ऊन खात पहूडलेल्या सिंहगडाच्या आसपासच्या पर्वतरांगा नेहमीच मनाला भुरळ घालतात. अशा वेळी जर आसपास शांतता असेल तर ह्या सह्यकडा आपणास अंतर्मुख करतात, पाहताना तंद्री लागते.

20160207_075119.jpg

पण नक्की कुठले स्थळ ?

एसेम जोशी पुलावरून म्हात्रे पुलाच्या दिशेने बघत असताना हे दृष्य दिसते.

दिवे घाटातून दिसणारा अनेक वेळा बघितलेला हा तलाव मस्तानी तलाव म्हणून ओळखला जातो. हा तलाव पेशवेकालीन असून मानवनिर्मीत आहे. दगडी बांधकामाद्वारे पाणी अडवलेले असून नैसर्गिक झरे नसल्याकारणाने अनेकदा उन्हाळ्यात कोरडा ठक्क पडलेला दिसून येतो. पहिल्यांदाच त्याच्या काठी गेलो. काठावर दिसत आहे ते गणपतीचे मंदीर. परिसरात एक महादेवाचे मंदीरही आहे. तिकडे एक भुयार असून ते म्हणे थेट शनिवार वाड्यापाशी जाते. मी नुकताच माझ्या मित्रांसोबत सायकलवर (लॉकडाऊन नंतर प्रथमच) गेलेलो. तसेच माझा मुलगाही सोबत होता. मी माझ्या मुलासोबत सायकलवर केलेली ही पहिलीच लाँगराईड.

IMG_20201010_091241.jpg

प्रत्येक फोटो सुंदर...
ह्या धाग्यामुळे सुंदर स्थळांचे फोटो पाहायला मिळत आहेत.

ह्युटन, मिशिगन इथल्या एका डोंगरावरून डोकीवणारा हा एक नैसर्गिक बुरुज अन खाली पसरलेली हिरवाई। फॉलमधे अतिशय सुंदर दिसतं म्हणे। मी समरमधे गेलेले त्यामुळे हिरवाईच अनुभवली। गंमत म्हणजे आम्ही तिथे गेलेलो तेव्हा एक लग्न चालू होतं तिथे! डेस्टिनेशन वेडिंग! कसलं भारी न Happy
IMG_20201021_183122.jpg

मी काही फोटोग्राफिचं टेक्निकल शिक्षण घेतलेलं नाही। ट्रायल एरर, काही वाचन इत्यादींतून काही गोष्टी कळत गेल्या। मागे एकदा काही मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून एक ब्लॉग काढला अन फोटो काढताना मनात येणारे नियम तिथे सांगण्याचा प्रयत्न केला.
सध्या वेळ जरा कमी आहे म्हणून त्या ब्लॉगचीच लिंक इथे देऊन ठेवते। सवडीने इथे लिहेनही।
पुन्हा एकदा सांगू इच्छिते मी एक हौशी फोटोग्राफर आहे। काही चुकलं तर तज्ञांनी जरूर दुरुस्त करावं।

>> मी एक हौशी फोटोग्राफर आहे। काही चुकलं तर तज्ञांनी जरूर दुरुस्त करावं।
+१ मी पण आहे यात

@अवल... तुमचा ब्लोग आत्ताच ओझरता वाचला. तुम्ही तरीही "चुकलं तर तज्ञांनी" असे म्हणत असाल तर मग माझा नंबर तुमच्या नंतर लागेल. मे बी सर्वात शेवटी Happy

अतुल Happy
निरु लिंक टाकलीय। तेव्हढं पापलेट द्या बरं एक Wink

<<सध्या वेळ जरा कमी आहे म्हणून त्या ब्लॉगचीच लिंक इथे देऊन ठेवते। सवडीने इथे लिहेनही।>>

अवल, लिंक बद्दल मनःपूर्वक धन्यवाद..
हा धागा फक्त फोटोग्राफ्स देण्याबद्दल न होता फोटोग्राफी बद्दल अधिक काहीतरी देण्यासाठीही व्हावा अशी खरं तर संकल्पना आहे.
नवोदितांनीही फोटो दिले, काही शंका विचारल्या.. त्यावरही जाणकारांनी काही टिप्स दिल्या तर ती देवाणघेवाण, ते आदानप्रदान जास्त छान आणि संवादपूरक ठरेल..
हा संवाद तुमच्या लिंक मुळे सुरु झाला, होईल हे खरंच छान वाटतंय..

<<<तेव्हढं पापलेट द्या बरं एक Wink>>

हे बरंय हो... Lol
(थोडं लहान मुलांसारखं उत्तर देतो : संपलं हो Rofl )
पण प्रत्यक्ष भेटीचा कधी योग आला तर नक्की देईन..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1 आता हेडर मधे समाविष्ट केली आहे..

कधी कधी समोर दिसणारी फ्रेम (दृष्य) खुप मनाला भावतं। पण आसपासचा निसर्ग आणि प्रकाशही फारसा सकारात्मक नसतो। मग तेव्हा उपयोगी पडते ती ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी। त्यातलाच हा एक प्रयत्न
IMG_20201022_222847.jpg

बेडरूमच्या खिडकीतून घेतलेला हिरव्या विस्तीर्ण माळरानाचा आणि मागच्या संरक्षक भिंतीवर भरलेल्या काकसभेचा फोटो..

window 1.jpeg

जीम बंद असल्यामुळे सकाळी चालायला जाणं हा सध्या माझा आवडता छंद झाला आहे. पावसाळ्यातील एका सकाळी घराजवळील मैदानावर चालत असताना पावसाळी धुंद वातावरणाचा फोटो घेण्याचा मला मोह आवरला नाही.

१.

view window 1.jpeg

२.

ground 1.jpeg

३.

ground 2.jpeg

पृ. २...
अश्विनी ११ : भोर नदीजवळचा नदीचा नेकलेस सुंदरच. मला वाटतं यमुनेचाही ताजच्या मागे असाच चंद्रहार होतो. आणि पेरियार जवळचं झाडाच्या खोडावरचं पक्षाचं घरट पण छान टिपलंय.

वावे : बंगलोरच्या लालबागेतल तळं, वाट आणि ती उंच उभी झाडं सगळंच छान.. मी ही ह्या झाडांचा फोटो काढलाय... पण जवळून.
त्या बागेतले माझे बरेचसे फोटो झाडांचा तपशील घेण्याकरता जवळून काढलेले आहेत..

टवणे सर : झायाॅन नॅशनल पार्कचा फोटो आवडला. खडकांचे हे रंग वेगळे आणि आपल्याकडे न आढळणारे..

कंसराज, ग्रिंनेल गलेशिर ट्रेकचे दोन्ही फोटो केवळ अप्रतिम... फ्रेम, शार्पनेस, रंग... जबरदस्त..
भंडारदऱ्याचा नेकलेस फाॅल्स पण मस्तच.. माझ्याकडेही याचे फोटो आहेत पण एक पातळी वरचे म्हणजे रस्ता आणि विशेषतः ती मोरी आहे तिथले... आणि धुकट पावसाळ्यातले.. मिळाले तर देतो इथे.
पण रस्त्याच्या खाली उतरल्यामुळे तुम्हाला तो हिरवा, पिवळा गालिचा आणि मुख्य म्हणजे नेकलेसचा अजून लांबचा अँगल छान मिळाला..

अतुल, दापोलीच्या वाटेवरचा समुद्र आवडला.. सह्यकडा पण शांत, निवांत..

हर्पेन, मस्तानी तलाव आणि मुलासोबतची सायकलवरची पहिलीच लाँगराईड : एकदम यादगार ट्रीप and for entire life. मस्तच..

अवल, ह्युटनचा नैसर्गिक बुरुज भारी.. असाच एक जबरदस्त राॅक सिगिरिया, श्रीलंकेत पाहिला.. (झब्बू देणार).. डोंगरावरचा रस्ता पण छान.
असे रस्ते पाहिले की माझं मन उगाचच त्यावरुन नकळत प्रवास करायला लागतं... चालत किंवा गाडीने... हर्पेन आणि आशुचँप मला वाटत मनातल्या मनात सायकल हाणत असतील.. Happy
ब्लॅक अँड व्हाईट फोटो आणि त्याची ट्रीक पण छान..
ब्लॅक अँड व्हाईटची खरं तर खासियत अशी की जे नको ते तो गाळतो (दिसत असूनही).. आणि हवं ते खुलवतो (एरवी किंवा प्रत्यक्षात दिसत नसलं तरी) आपल्या भारतीय साडीसारखाच म्हणा ना..
म्हणूनच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीवर प्रभुत्व असलेले दिग्गज, रंगीत फोटोग्राफी आपल्याकडे सुरु झाल्यावर नाराज झाले होते.
त्यांचं म्हणणं असं की : मुळात हा छाया प्रकाशाचा खेळ आहे. रंग हा घटक त्यात ॲड झाला म्हणजे त्यात भेसळ झाली किंवा कला डायल्युट झाली.

मनिम्याऊ, काल्पेनी, लक्षद्विप माझ्यासाठी परत नाॅस्टॅल्जिक.. हिरवाई रिफ्रेशिंग..

रुपाली, तुमच्याही घरामागचा परिसर, प्रभातफेरीचा परिसर आणि मुख्य म्हणजे फोटो छान.. पावसाळी वातावरण छान टिपलंय..

Pages