गूढ अनुभव आणि त्यांचा झालेला उलगडा

Submitted by मानव पृथ्वीकर on 30 September, 2020 - 07:25

हा विरंगुळा धागा नाही. आणि हा अमानवीय अनुभवांचा धागा नाही.

आपल्याला सुरवातीला गूढ, अनाकलनीय असे वाटलेले, पण त्याचा नंतर आपसूक झालेला अथवा आपण छडा लावून केलेला उलगडा - म्हणजे सापडलेले / शोधलेले शास्त्रीय कारण - अशा अनुभवांबद्दल लिहायचे आहे. अशा उलगड्या अभावी कुणाला ते अमानवीय वाटले असण्याची शक्यता आहे.
अशा अनुभवांची देवाण घेवाण केल्याने कुणाला असे अनुभव येत असतील तर त्या व्यक्तीला त्याचे कारण कदाचित लक्षात येईल अथवा शोधायला दिशा मिळेल, हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे.

कृपया आपले असे अनुभव इथे गंभीरपणे मांडावेत.

एक नमुद करु इच्छीतो की ज्यांना गंभीर अमानवीय अनुभव येतात त्यात तथ्य नाही असा कुठला दावा करण्याचा हेतु नाही. ज्यांना ते येतात ते त्यांच्या दृष्टीने पूर्ण खरे असतात आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे मांडलेले असतात. तेव्हा इतर कुणाचे तसे अनुभव सांगून, त्यामागील कारण मिमांसा करण्याचा प्रयत्न येथे करु नये. मात्र तुमचे स्वत:चे जर तसे काही अनुभव असतील आणि त्यामागील कारण मिमांसा जाणुन घेण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करायची असेल तर करु शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी धागा आहे एकदम!
स्लीप पॅरॅलिसिस कॉमन दिसतेय. मलाही खूपदा असं वाटतं ओरडायचेय पण आवाज फुटत नाही, कोणाला तरी जोरात मारायचेय पण हातात जोर नाही.

@Cuty
स्लीप पॅरालिसीस होत असताना एक करण्यासारखे आहे ते म्हणजे आपण आता ते अनुभवतो आहोत हे लक्षात घेऊन उठण्याऐवजी परत झोपी जाण्याचा प्रयत्न करणे, काहीतरी हालचाल केली पाहिजे याची होणारी तीव्र इच्छा दाबून. हे नेहमीच काम करते असे नाही पण बरेचदा करते असा माझा अनुभव.

आणि स्लीप पॅरालिसिसचा अटॅक येऊच नये यासाठी शांत / गाढ झोप लागेल यासाठी (झोपेच्या गोळया व्यतिरिक्त इतर) उपाय करणे. जसे की दमणूक होईल एवढा व्यायाम/काम, वेळच्या वेळी झोपणे, झोपल्यानंतर झोप डिस्टर्ब होणार नाही अशा गोष्टी करणे (उदा. बाहेरून आवाज येत असतील तर खिडकी, दार बंद ठेवणे, कानात कापुस घालणे) इत्यादी.
तसेच दुपार नंतर कॅफिनयुक्त पेये टाळणे (चहातही कॅफिन असते, दुपार नंतर जास्त घेऊन नये.)

पण वर्षभर हे काटेकोरपणे पाळणे शक्य
होत नाही. कधी आपण अति थकलेले असतो, कधी जागरण अनिवार्य असते आणि बहुधा ती रात्र स्लीप पॅरालिसिसची ठरते. पण या उपायांनी त्याची वारंवारता कमी करता येते.

मलाही स्लीप पॅरेलिसीसचा अटॅक यायचे. बरीच वर्षे झाली बंद होऊन.
आज निवांतपणेवाचला हा धागा. भारी अनुभव आहेत एकेकाचे.

@ अंगात येणे, माहितीबद्दल सर्वांचे धन्यवाद. असेच काही असणार कल्पना होतीच. पण नेमके काय ते पाहिजे होते जेणेकरून कोणी वाद घालायला आल्यास ते सांगता येते.

@ स्लीप पॅरालिसिस कॉमन असते खूप. छातीवर कोणी अमानवीय बसलेय. उठता न येणे. आणि आवाजही न फुटणे. मला कित्येकदा झालेय. खास करून नवीन जागी झोपले की हे मला होतेच. तसेच उताणा छातीवर हात ठेऊन झोपलो तरी होते. म्हणून मी कुशीतच झोपतो. सध्या याची ईतकी सवय झालीय की कुशीत वळल्याशिवाय मला झोपच लागत नाही. या कुशीच्या फंड्यामागे काही लॉजिक आहे की नाही कल्पना नाही पण माझ्याबाबत हे काम करते.

स्लीप पॅरालिसीस होत असताना एक करण्यासारखे आहे ते म्हणजे आपण आता ते अनुभवतो आहोत हे लक्षात घेऊन उठण्याऐवजी परत झोपी जाण्याचा प्रयत्न करणे,
>>>
हे मी करतो. पण मला वाटते हे तेव्हाच करू शकतो जेव्हा पुर्ण स्वप्नात नसतो वा थोडेसे बास्तवाचे भान असते. असे माझ्याशी होते बरेचदा. यातून बाहेर पडताना मी मनाला बजावतोही की हे आपल्याशी नेहमी होते. यामागे काही भूत नाही. आपण आपल्याच घरात आहोत. अंग रिलॅक्स करून पडून राहूया आपसूक यातून सुटू.. हल्ली हे सवयीने जमायला लागल्याने याचा शेवट कंट्रोलमध्ये होतो. त्यामुळे वाईट स्वप्नातून ऊठल्यावर छाती धडधडायला लागणे वगैरे होत नाही.

Here is my experience.

Many years ago while studying at a small village/town engineering college, I lived as a paying guest with other boys.
We had a habit of going to the movies for 9 PM shows,.the last one of the day.
Our house was the last one on the street and almost on the edge of the village. Beyond that was no residential area. Only open fields.
There was a small lake inearby and the road to our house would go by this lake.

As in the case of small towns/villages, there were stories of ghostly experiences in and around this town/village too.

The old lady who owned the house always used to express her displeasure about us coming back late at nights.

On one of such occasions, coming back from the movie theater around midnight which was next to the ST stand, I was by myself.
As i came more and more towards the house and away from the ST stand the crowd of people reduced.

After a turn towards our area and the nearby lake I was now the only one on the street.
I started dragging my chappals thereby making some noise to keep myself some company.
After some distance I saw the lake and night sky was dark. Must have been a no moon night.

I was trying not to look around and walked as fast I could. At the same time forcing my mind not to dwell on all of those hearsay ghost stories.

And then ....
I heard a voice in Marathi....
"Kay re? Kuthe Challayas itkya Ratri?"

Goosebumps even now after so many years as I type this. A chill went down my spine and I felt a very cold shiver.
I decided to run towards the house with all my strength. The house was only around 3 or 4 minutes away.
But the very next second I thought to myself
Who the x is that and I am going to find out and deal with that x
Besides, the voice sounded familiar.
I suppose courage took over fear in my mind.

And then I turned in that direction.
It was a mentally challenged guy who lived in the same area that I had seen him many times before.
That was such a relief to find him sitting on the steps of a closed shop in dark.
I actually went on to converse with him and told him he scared the x out of me.
Of course he didnt care or even understood.

भारी अनुभव असुफ.
मी जो सुरुवातीला अनुभव लिहिलाय (भिंतीतून घोरण्याचा आवाज येण्याचा) तो जेव्हा मी पहिल्यांदा घेतला, तेव्हा मीपण खूप घाबरले होते. कारण मी एकटीच जागी होते आणि आवाज तर असा येत होता की जणू काही कुणी तरी भिंतीच्या पलीकडे किंवा खरं तर भिंतीतच झोपून घोरतंय.
तेव्हा भीतीवर मात करण्यासाठी मीही हाच विचार केला होता, की आपण कशाला घाबरायचं? आपण इथे legitimately राहतोय, जर दुसरं कुणी असेल, तर त्याने घाबरलं पाहिजे Happy and it worked.

छान धागा. प्रतिसाद ही सगळे छान. ह्याला स्लिप पॅरालिसिस म्हणतात हे मलाही माहीत नव्हतं . होतं असं मलाही , जोरात ओरडायच असतं पण आवाज फुटत नाही, पळायचं असतं तर पाय उचलत नाहीत किंवा स्लो मोशनमध्ये दाखवतात तसं पळायला होतं. जनरली हॉरर मुव्ही, क्राईम प
पॅट्रोल चे बरेच एपिसोड बघितलं असेल तर होतं.

करोना सुरू व्हायच्या आधी एक किस्सा घडला होता घरी. दुसऱ्या मजल्यावर छोटं ओपन टेरेस आहे . आणि तिथून वर जायला लोखंडी जीना आहे. ओपन टेरेसला जी भिंत लागून आहे तिथे मोठी खिडकी आहे. तिला पडदा नाहीये. त्या खिडकीजवळ इस्त्री करायचे टेबल आहे त्यावर मी रात्री झोपायच्या आधी पाण्याचं तांब्या भांड ठेवते. ओपन टेरेसवर नुकताच पत्रा घालून घेतला होता. आजूबाजूला मोकळे प्लॉटस बरेच आहेत. आणि एक दोन ठिकाणी चोऱ्या झालेल्या. रात्री दीड पावणेदोनला मुलगा उठला आणि हळू आवाजात हाका मारायला लागला . म्हणून उठून बाहेर आलो. म्हणाला चोर आलेत बहुतेक . मला खिडकीच्या काचेवर हात दिसला. टेरेसला लागून आंब्याचे झाड आहे ,त्यावर चढून सहज टेरेसवर येता येते. तेवढ्यात जोरात धडाधड पळण्याचा आवाज आला लोखंडी जिन्यावरून. सावल्या हल्ल्या खिडकीतून. आणि कुणीतरी टेरेसवरून उडी मारल्याचाही आवाज आला . आम्ही आतूनच कोण आहे असं जोरात ओरडत होतो . मनात घेतलं की चोरच होते. मिस्टरांनी लगेच पोलिसांना फोन केला , रात्रीचे गस्त घालणारे पोलीस अर्ध्या तासात आले. सगळीकडे फिरून आले आणि म्हणले जाऊद्या चोरी तर नाही ना झाली. कॉलनीत सगळीकडे बातमी झाली की ... कडे चोर येऊन गेले रात्री. गुरख्याला सांगून झाले जरा कॉलनीत फेरी मारून जावा रात्री. परत दोन दिवसांनी रात्री दोनच्या आसपास धाडधाड आवाज . आता चोर लगेच दोन दिवसात त्याच घरी कसा येईल . म्हणून दोघेही उठून काठी, झाडू घेऊन दार उघडले तर दोन गलेलठ्ठ मांजरं लोखंडी जिन्यातून धाडधाड करत आली आणि आंब्याच्या झाडाच्या इथून खाली उडी मारून गेली. डोक्यावर हात मारून घेतला मग.

असुफ
वर्णिता
दोन्ही किस्से मजेशीर आहेत Lol

मी दहावीत असतानाची गोष्ट आहे. तीन खोल्यांच घर होतं आमचं.
पुढची खोली लहान, त्यात एक पलंग होता, तिथे बाबा झोपत. मधली खोली जरा मोठी, त्यात एक पलंग तिथे आई झोपे आणि खाली गाद्या टाकून आम्ही भावंडं झोपु. आणि त्या पुढे स्वयंपाकघर.

एकदा रात्री आम्ही सगळे झोपलो होतो. मध्यरात्र उलटून गेल्यावर मला स्वप्न पडले की मी कुठेतरी झाडाखाली झोपलो आहे आणि झाडावर एक विचित्र प्राणी बसलाय. त्याने अचानक माझ्या अंगावर झेप घेतली माझ्या पोटावर हल्ला केला. हे स्वप्न एवढं खरं होतं की माझ्या पोटावर खरोखर भार पडल्याची, स्पर्शाची, पोट दाबल्या गेल्याची अगदी स्पष्ट जाणीव झाली मला, आणि मी दचकून ओरडलो.

रात्री कुणी ओरडले, कसला मोठा आवाज आला की माझी एक बहीण आणि आई हे झोपेत असतील तर ओरडणा~या व्यक्तीपेक्षा आपणच जास्त ओरडतात. आणि त्या रात्रीही तसेच झाले. त्या दोघी एवढ्या किंचाळल्या की आम्ही सगळे घाबरलो, सगळे उठले, तेव्हा लक्षात आले की तेव्हा लाईट गेले होते. त्या मुळे एक बहीण अजुन ओरडतच होती. बाबा पण खोलीत आले, आणि आईला बहीणीलाच विचारु लागले काय झाले ते. त्या म्हणाल्या कोणीतरी ओरडले आधी म्हणुन आम्ही ओरडलो. त्यांना वेगळे असे काही झाले नव्हते. मी म्हणालो मी ओरडलो, आणि माझे स्वप्न सांगितले. दुस~या बहिणीने तोवर मेणबत्ती लावली. मी सांगितले मला स्वप्न अगदी खरे घडल्या सारखे वाटतेय, पोट दुखत आहे अजुन, असे म्हणुन मी पोटावरुन बनियन वर केले अन सगळेच एकदम ओरडले. माझ्या पोटावर ओरखडे उठले होते आणि किंचितसे रक्त ठिबकत होते. मी ते पाहुन तर चांगलाच हादरलो. कुणी म्हणालं तूच घाबरुन ओरबाडलं असशील. पण माझे नख अजिबात वाढले नव्हते आणि एका ठिकाणी ओरखडा खोल होता ज्यातून रक्त ठिबकत होते, तेवढा माझ्या नखांनी शक्य नव्हता. तरी मी मांडीबर स्वत:ला बोचकारुन पाहिले, माझ्या एवढ्याशा वाढलेल्या नखांनी असे सहज रक्त काढणे शक्य नव्हते. आणि मी त्या प्राण्याला ढकलून द्यायचे सोडुन स्वत:लाच का ओरबाडेन. तेही बनियन वर करुन.
म्हणजे स्वप्नात प्राणी पोटावर आल्याचे दिसणे आणि पोटावर ओरखडे असे खरेच झाले होते! असं सिनेमात घडतं, प्रत्यक्षात कसं काय घडलं?
झाला प्रकार हा काहीतरी भयानकच प्रकार होता.

एवढ्यात लाईट आले. नाईट लॅम्प लागला, कोणीतरी लगेच ट्युब लाईट लावला. आणि काहीच वेळात वरुन वेगळाच आवाज आला, आणि पंखा भलाताच विचीत्र हिंदोळक्या देत फ़िरु लागला. तो आवाज आणि त्या पंख्याच्या हिंदोळक्या पाहुन ती बहीण आणि आई परत ओरडु लागले. मी जाउन पंख्याचे बटन बंद केले. पंखा थांबत आला तेव्हा लक्षात आले की त्याचे एक पाते खुपच वाकडे झाले आहे खालच्या बाजुला. हे पाहुन अजुन गोंधळ वाढला. आज घरात काहीतरी विचीत्र घडत होतं. आई रामरक्षा की काहीतरी म्हणत देवापुढे दिवा लावायला गेली, तिघीही बहीणी काहीतरी प्रार्थना म्हणु लागल्या आणि आम्ही काय झाले असेल याचा विचार करत बसलो.
असा थोडावेळ शांततेत गेला.
तेवढ्यात बाजुच्या लाकडी कपाटा घालुन मांजर सरकन बाहेर आली आणि समोरच्या भिंतीवर जाउन तिने जिवाच्या आकांताने वर ऊड्या मारल्या. तिथे भींतीवर उंचावर व्हेंटीलेटर होते. तिथ पर्यंत तिची झेप जाणे शक्य नव्हते. दोन तीनदा तिने प्रयत्न केला. दरम्यान मांजराच्या या अचानक उड्यांने बहीणींचा ओरडण्याचा अजुन एक राउंड झाला आणि मांजर परत वेगाने जाउन कपाटाखाली लपली.
आणि मग झाल्या प्रकाराचा सगळा उलगडा झाला.

आमच्या घरावर अ‍ॅस्बेस्टॉसचे पत्रे होते. पुढच्या खोलीत आणि स्वयंपाक घरात उतार होता आणि मधल्या खोलीत मध्ये उंच आणि दोन्ही बाजुंनी उतार. त्यामुळे मधली खोली चांगलीच उंच होती. मधल्या खोलीला दोन बाजुंना समोरासमोर उंचीवर व्हेंटीलेटर्स होते, त्यांत उभे गज बसवले होते. आणि त्या दोन्ही व्हेंटीलेटर मधुन जाणारा एक आडवा पाईप बसवला होता आणि त्या पाइपला मध्यभागी पंखा बसवला होता.
रात्री लाईट गेली असताना एका व्हेंटिलेटर मधुन मांजर आली. तिथुन पूर्ण खाली उडी मारणे जरा जास्तच उंच होते. एक तर तिने विरुद्ध भिंतीला लावुन ठेवलेल्या लाकडी कपाटावर उडी मारली किंवा पंख्याच्या पात्यावरुन जंप घेउन लाकडी कपाटावर जाण्याच्या प्रयत्न केला. एकंदरीत ती पंख्याच्या पात्यावर आली आणि ते पाते वाकडे होउन तोल जाउन खाली सरळ माझ्या पोटावर पडली. आणि अचानक झालेल्या ओरड्याने घाबरुन कपाटाखाली जाउन बसली. माझ्या पोटावर होती त्या अर्ध्या सेकंदात मला मी झाडाखाली झोपलो आहे, विचित्र प्राणी त्यावर बसलाय आणि तो अचानक माझ्यावर झेप घेतो असे पाच सेकंदाचे स्वप्न पडले. (स्वप्नात वेळेचे गणित वेगळेच असते.). म्हणजे माझ्या पोटावर त्या मांजराच्या नखाचेच ओरखडे होते.
मग जेव्हा सगळा आरडोओरडा बंद होउन शांतता झाली तेव्हा इतक्या वेळ जीव मुठीत धरुन बसलेली मांजर बाहेर आली आणि आल्या मार्गे परत जायचा प्रयत्न करु लागली आणि तो जमला नाही तेव्हा परत कपाटा खाली जाउन बसली.
मग तिच्या साठी आम्ही स्वयंपाक घराचे मागचे दार उघडुन ठेवले. काहीवेळाने सुटकेचा मार्ग तिच्या लक्षात आला आणि तिने तिकडे धुम ठोकली. मग झाल्या प्रकारावर अर्धा तास चर्चा झोडुन आम्ही परत झोपी गेलो.

जर मांजराला आधीच दुसरा मार्ग असता आणि ते आम्हाला नकळत निघुन गेले असते तर असा रंगे हात पुरावा मिळाला नसता. पण पंख्याच्या वाकडे झालेल्या पात्याने अंदाज आला असता, डोके शांत झाल्यावर. असे घडले असेल म्हणुन समाधान मानावे लागले असते.

मानव मस्त अनुभव Happy माझे बालपण आठवले. तो काळच तसा होता.

>> झोपेत असतील तर ओरडणा~या व्यक्तीपेक्षा आपणच जास्त ओरडतात

टिपिकल Lol

>> त्या अर्ध्या सेकंदात मला मी झाडाखाली झोपलो आहे, विचित्र प्राणी त्यावर बसलाय आणि तो अचानक माझ्यावर झेप घेतो असे पाच सेकंदाचे स्वप्न पडले. (स्वप्नात वेळेचे गणित वेगळेच असते.).

अगदी अगदी. अस्सेच घडते. धोक्याची जाणीव झाली कि काहीतरी भयंकर स्वप्न पाडून अर्धवट सावध असलेला मेंदू आपल्याला पूर्ण जागे करतो.

वरती ऋन्मेऽऽष यांच्या एका प्रतिसादात, छातीवर हात ठेवून झोपल्याने स्लिप पॅरालिसिस होतो, असा उल्लेख आहे. तत्वत: हे दोन्ही एकच. हा प्रकार मी अनेकदा अनुभवला आहे. ह्रदयावर दडपण आले कि भयंकर स्वप्न पाडून मेंदू आपल्याला पूर्ण जागे करतो. अर्थात छातीवर हात ठेवून झोपल्याचा हा ट्रिगर प्रत्येकाला असे स्वप्न पडेलच असे नाही.

मानव
सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून हसू आले. Lol

बापरे. गूढ अनुभव नाही त. पंण मांजरावरून आठवले.
मांजर घरात शिरून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग न सा पडण्याचा एक अनुभव आहे. टीव्ही कॅबिनेट्वर मुझिक सिस्टमचे स्पीकर्स होते त्यावर चढून ते व्हेंटिलेटर मार्गे बाहेर गेले. तोवर इ कडे तिकडे उड्यांचा सपाटा लावला होता. काय करायचं ते मलाही कळेना.
द्दुसरा अनुभव मानव यांच्यासारखाच. पण मी तेव्हा जागाच होतो. रात्री उशिरा दिवे मालवून टीव्ही पाहत होतो. खिडकी टीव्हीच्या मागे होती. तीतून एक मांजर आत शिरले आणि त्याला आणि मलाही काही कळायच्या आत त्याने माझ्या पोटावर उडी मारली. मात्र ती अलगद होती. मी त्याला झटकले तसे ते बेडखाली गेले. मग दार उघडून बाहेर उभा राहिलो. काही वेळाने ते गेले.

बाकी सगळे अनुभव सुद्धा रोचक आहेत. असे अनुभव आले असता डोके शांत ठेवून त्यामागचे कारण शोधायला तसा विचार करायची सवय आधीपासून

भारी अनुभव सगळ्यांचे. बापरे मानव, अशी उंचावरून मांजर अंगावर पडली असती तर मला तिथेच हार्ट अॅटॅक आला असता Lol
दरम्यान मांजराच्या या अचानक उड्यांने बहीणींचा ओरडण्याचा अजुन एक राउंड झाला >>>> Lol Lol

मानव, तुमचा अनुभव वाचून मांजराचा एक किस्सा मलाही आठवला. Happy गूढ वगैरे नाही. पण गमतीदार.
माझी मोठी बहीण बाळंतपणासाठी माहेरी गावाला आलेली होती. बाळाच्या बारशासाठी जवळचे नातेवाईकही दोन तीन दिवस आलेले होते. थंडीचे दिवस. पहाटे उठून बाबा बाहेरची मोठी चूल पेटवून रसरशीत निखारे मातीच्या शेगडीत घालून बाळंतिणीच्या खोलीत आणून ठेवायचे. त्या दिवशी असेच पहाटे त्यांनी निखारे आणून ठेवले आणि ते नेहमीप्रमाणे बाहेर पूजेसाठी फुलं वगैरे आणायला गेले. खोलीत बहिणीबरोबर मी आणि अजून दोघी आतेबहिणी वगैरे झोपलो होतो. बाबांकडून खोलीचं दार थोडं उघडं राहिलं असावं. त्या फटीतून आमचं मांजर आत शिरलं आणि बहुतेक ते कशामुळे तरी गडबडलं आणि त्याने कुणाच्या तरी अंगावर उडी मारली. जिच्या अंगावर उडी पडली ती किंचाळली. त्यामुळे मांजरही घाबरलं आणि सैरावैरा पळायला लागलं. बहिणीने घाबरून बाळाला घाईघाईने उचललं. मांजर थेट वर चढलं. वर दांडीवर कपडे होते तिथे त्याने उडी मारली आणि त्या साडीसकट ते खाली पडलं. Rofl मग तर आमच्या आरड्याओरड्याला पारावार राहिला नाही. बाहेर जाग्या झालेल्या आई-आजी-आत्या-मावशांना पहिली शंका सापाची आली. त्यामुळे त्यापण गडबडून गेल्या. आमच्यापैकी कुणाला तरी वाटलं की मांजर निखाऱ्यात पडलं. हा आरडाओरडा बाहेर बाबांना ऐकायला गेला आणि त्यांना वाटलं की निखाऱ्यांनी पेट घेतला की काय, म्हणून ते धावतपळत आत आले. असे सगळे विविध कारणांनी हलकल्लोळ करत असताना दरम्यान ते मांजर बाहेर पळून गेलं आणि हळूहळू सगळ्यांना सगळे उलगडे झाले Lol

मानव, वावे भारी किस्से. असाच एक आमच्यासोबत झालेला. नवऱ्याची कझिन्स आणी आम्ही असे 15/16 जण एका रिसॉर्टवर गेलेलो. एकत्र धमाल करायची म्हणून सगळे एकाच डॉर्मीटरीत राहीलो. रात्री जवळपास चार वाजता झोपलो. काही जण बंक बेड्सवर झोपले आणी आम्ही काही, मधोमध जमिनीवर गाद्या घालून झोपलो. सगळी निजानीज झाली, लाईट्स ऑफ होते. आणी अचानकच माझ्या बाजूला झोपलेली नणंद मोठमोठ्याने ओरडायला लागली. मला जाग येऊन डोळे उघडतच़ होते कि मला समोर दिसले कोणीतरी बंक बेडवरून उडी मारली आणी मग तर दोन तीन जण ओरडू लागले. आता सगळेच उठले, लाईट लावले......आणी सगळा उलगडा झाला.
त्या हॉलच्या भिंत आणी छतामध्ये थोडा गैप होता तिकडे घूस दिसलेली. नणंदेच्या तेच डोक्यात कि झोपल्यावर ती आली तर. तिच्या आणी माझ्या मध्ये माझी छोटी मुलगी होती. झोपेत मुलीचा हात की पाय नणंदेच्यया अंगावर पडला, तिला वाटले घूस आली म्हणून ती ओरडायला लागली. समोर बंक बेडवर दिर झोपलेला त्याला वाटले त्याच्या लहान मुलीला तर काही झाले नाहीना.सो गडबडीत त्याने उडीच मारली . त्याची बायको वारं लागत नाही म्हणून त्या बंक बेडच्या खाली गादी घालून झोपलेली. दिराला हे माहीत नाही. त्यामुळे उडी मारल्यावर तो किंचाळला. पायाशी धप्फकन काहीतरी पडले म्हणून जाऊ किंचाळायला लागली.....
हुश्श करून सगळे परत झोपायला गेले. पण ते एक दोन मिनीट फार भितीदायक होते. नविन जागा, बाहेर पाऊस पडत होता...अचानक सुरू झालेले ओरडणे, किंचाळणे.

मला खिडकीच्या काचेवर हात दिसला.>>>>>>>>>>>>> हा कोणाचा ? मांजराचा? Happy

आई हे झोपेत असतील तर ओरडणा~या व्यक्तीपेक्षा आपणच जास्त ओरडतात. >>>>>>>>>>> तुफानच हसले Lol

मानव, शंका दूर झाली ते बरं झालं Happy

वावे, सगळा गोंधळ ईमॅजिन करुन जाम ह्सले Lol
निलाक्षी, त्यावेळी काही कळत नाही हे खरे! Lol

मालगुडी डेजवरून आठवले. हिंदीच्या पाठ्यपुस्तकात की त्या प्रबोध वगैरे परिक्षा असतात त्यात कुठेतरी एक मांजराचा धडा होता. रोज सैपाकघरातून चोरी करणाऱ्या मांजरिला एके दिवशी घरातली सून काहीतरी फेकून मारते, वर्मी मार बसून मांजर कोसळते आणि एकच गजहब उठतो. किती मोठे पाप, आता काशियात्रा करावी लागणार वगैरे सगळ्या गोष्टीवर भांडणे उर्फ चर्चा होते आणि मंडळी एकमेकांच्या उरावर बसणार तेवढ्यात कोणीतरी सांगते की मांजर तर कधीच उठून पळून गेले.

एकमेकांच्या उरावर बसणार तेवढ्यात कोणीतरी सांगते की मांजर तर कधीच उठून पळून गेले. >> ती सगळी मंडळी पंचनाम्यात गुंतलेली पाहून त्या प्रसंगाची नायिका आपल्या चारही पायांवर तिथून केव्हाच चालती झालेली होती!

Pages