गूढ अनुभव आणि त्यांचा झालेला उलगडा

Submitted by मानव पृथ्वीकर on 30 September, 2020 - 07:25

हा विरंगुळा धागा नाही. आणि हा अमानवीय अनुभवांचा धागा नाही.

आपल्याला सुरवातीला गूढ, अनाकलनीय असे वाटलेले, पण त्याचा नंतर आपसूक झालेला अथवा आपण छडा लावून केलेला उलगडा - म्हणजे सापडलेले / शोधलेले शास्त्रीय कारण - अशा अनुभवांबद्दल लिहायचे आहे. अशा उलगड्या अभावी कुणाला ते अमानवीय वाटले असण्याची शक्यता आहे.
अशा अनुभवांची देवाण घेवाण केल्याने कुणाला असे अनुभव येत असतील तर त्या व्यक्तीला त्याचे कारण कदाचित लक्षात येईल अथवा शोधायला दिशा मिळेल, हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे.

कृपया आपले असे अनुभव इथे गंभीरपणे मांडावेत.

एक नमुद करु इच्छीतो की ज्यांना गंभीर अमानवीय अनुभव येतात त्यात तथ्य नाही असा कुठला दावा करण्याचा हेतु नाही. ज्यांना ते येतात ते त्यांच्या दृष्टीने पूर्ण खरे असतात आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे मांडलेले असतात. तेव्हा इतर कुणाचे तसे अनुभव सांगून, त्यामागील कारण मिमांसा करण्याचा प्रयत्न येथे करु नये. मात्र तुमचे स्वत:चे जर तसे काही अनुभव असतील आणि त्यामागील कारण मिमांसा जाणुन घेण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करायची असेल तर करु शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक न उलगडलेलं कोडं

7 8 दिवसापासून माझ्या एक गोष्ट लक्षात आली ज्याच उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला पण सापडले नाही म्हणून आज शेवटी माबो वर टाकतेय.
मला रोज रात्री 12 वाजता जाग येतेय म्हणजे मी गाढ झोपलेली असेल तर एखादं स्वप्न पडते आणि मी दचकून उठते तर 12 वाजले असतात. मी झोपलेली असेल आणि नेमक टॉयलेट ला जायचं म्हणून उठली आणि टाईम पहिला तर बरोबर 12 वाजले असतात.
कधी एखादा मूव्ही पाहत असेल आणि आता झोपायच म्हणून वेळ पहिली तर 12 वाजले असतात. कधी बुक वाचताना झोप लागली आणि अचानक जाग आली तरी 12 च वाजले असतात. कुत्रे भुंकण्याचा आवाज ऐकून जागी झाले तरी 12 वाजताच.
शेवटी मी कंटाळून वॉल वरून वॉच काढून टाकली मग मोबाईल वर टाईम पाहते तरी 12 वाजलेले असतात.
काल थोडा खोकला येत होता तर मी 10 वाजताच औषध वगैरे पिऊन झोपली एकदम स्वप्नात कुणीतरी आपल्याला आवाज दिला असा भास झाला आणि मी दचकून उठली आणि मोबाईल पहिला तर बरोबर 12.00 झाले होते.
मला समजत नाहीये की हा काय प्रकार आहे प्रत्येक वेळी बरोबर 12.00 am ला च मला कशी जाग येत असेल आणि नंतर प्रयत्न करून पण लवकर झोप येत नाही. पहिले मी इतकं नोटीस केलं नव्हत पण 7 8 दिवसापासून माझ्या हे प्रकर्षाने जाणवल तशी मी थोडी अस्वस्थ झाली. यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण नक्की असेल..पण काय ते समजत नाहीये..
आणि कदाचित या सगळ्या प्रकारामुळे मला आता माझ्या रूम मधे खूप negative वाटतं. सारखं रात्री रडू येत. आपल सगळ खराब चालू आहे आपण दुःखी आहे असं सारखं वाटतं राहत जुनं ब्रेकअप वगैरे आठवत आणि अचानक च रात्री खूप रडायला येत. 2 3 महिन्या आधी रूम रीनोवेट केली आहे तरी तिथे अभ्यास पण मनासारखा होत नाही. माझ्या रूम बाहेर एक छोटीसी बाग सुद्धा आहे तिथे छान फुलांची झाड वगैरे आहे सकाळी तिकडचं दार उघडले की तेवढ्या वेळ फ्रेश वाटतं पण ते तेवढ्या पुरतच. संध्याकाळी 6 नंतर अजिबात माझ्या रूम मधे करमत नाही. रूम मधे सुद्धा काही झाड आहेत जसे money plant and jade plant. पसारा अजिबात नसतो. थोडी रोजची कपडे आणि बुक्स. सकाळी उठली की मी स्वतः रोज रूम झाडून पुसून घेते.
मी केलेल्या 4 5 पेंटींग्ज पण रूम मधे लावल्या आहेत त्यात गणपती बाप्पा आणि विठू माऊलीची पण मोठी पेंटिंग आहे. माझी रूम मी नेहमी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते कारण अभ्यास चांगला व्हावा. आधी खूप छान अभ्यास व्हायचा. झोप पण नीट व्हायची. आता 1 महिन्यापासून थोड negative environment झालं. ( दुःखाचं काही कारण नसताना सुद्धा)
काय कारण असावे?
टिपः माझ्या रूम मधली वॉच एकदम व्यवस्थित चालू आहे आणि मोबाईल वर सुद्धा टाईम नीट सेट केलेला आहे तरी कृपया त्यावरून चेष्टा करू नये.

बॉडी क्लॉक सेट झाली आहे तुमची. मला देखील हा त्रास (खरेतर फायदाच म्हणावा लागेल) आहे सध्या. म्हणजे रात्री कितीही उशिरा झोपलो तरी बरोबर ६ वाजता जाग येतेच. अगदी २ मिनिटासाठी का होईना पण जग येते. हे झाले झोपेचे. पण जागेपणीही म्हणजे पुस्तक वाचताना/ चित्रपट पाहताना सुद्धा घड्याळ सेट होत असावे का हा खरा प्रश्न आहे. मला तरी "वाटते" कि ठीक १२ वाजता घड्याळ बघायचे आहे अशी सूचना तुम्ही तुमच्या सुप्त मनाला दिली असावी.

पण सुरवातीला माझ्या ही गोष्ट मनात आणि डोक्यात पण नव्हती म्हणजे माझ्या लक्षात सुद्धा येत नव्हती मग मी सूचना कशी देणार माझ्या मेंदूला. आता 7 8 दिवस झाले माझ्या हे एकदम लक्षात आलंय.

एकंदरीत मला रात्री कधीही कशासाठी आणि कशावरून ही जाग आली तरी ती वेळ बरोबर रात्री 12.00 am हीच असते. आणि नंतर खूप वेळ मला झोप येत नाही..आणि त्यावेळी एकदम खूप उदास वाटायला लागत. कदाचित रात्री माणूस जास्त भावनिक होऊन विचार करत असेल म्हणून उदास वाटतं.

मला पण हार्मोनल इम्बॅलन्स मूळे बरोबर सकाळी ४ वाजता जाग यायची.. योगा करायला लागल्यापासून मस्त गाढ झोप लागत्ते ती सकाळी ७.०० पर्यंत..

अमृताक्षर, मला वाटतं हे थोडं मनात फिट झालंय की 12 लाच जाग येते.
कुठेतरी अंतर्मनात हे फिट होत आणि तसे घडते, कारण मी पूर्वी म्हणलं झोपताना की अमुक वाजता जाग यायला पाहिजे की बरोबर त्याच्या आसपास जाग हमखास येतेच .
गेले आठवडाभर माझं पण एक झालं की रात्री 3, साडे तीन ला हटकून जाग येते मग परत झोप अजिबात लागत नाही. नेहमी जाग अडीच च्या सुमारास यायची मग परत अर्ध्या तासाने लागायची. सलग दोन रातरी 3, साडे तिनला आली की उठून बाथरूमला जाऊन यायचं , परत झोप लागेपर्यंत 4 वाजायचे की डोक्यात यायचं आता लगेच उठायचंय कारण मुलाचा क्लास 5 ला असतो. पावनेपाचला आता गजर होईलच आणि झोप उडायची. मग हे इतकं फिट झालं की आठवडा झाला तरी असच चालू आहे.

मला तहान पण बरोबर 12.00 वाजताच लागते >>अगदी सेम, तहान , बाथरूम , कुत्र्याचं ओरडणं बरोबबर 3 ,साडे तीन माझ्या बाबतीत. कळतंय पण वळत नाहीय माझ्या मनाला.

तहान , बाथरूम , कुत्र्याचं ओरडणं बरोबबर 3 ,साडे तीन माझ्या बाबतीत. कळतंय पण वळत नाहीय माझ्या मनाला. >>>> सेम पिंच... माझंही सध्या असंच होतय. बरोबर ३, साडे तीनला जागा येतेच.

अजिंक्यराव म्हणतात त्याप्रमाणे काही कारणाने बॉडी क्लॉक सेट झाली असावी. जाग येत असताना मग आजूबाजूला जे काही घडत असेल (आवाज, थंडी, गर्मी वगैरे), शरीरात काही घडत असेल (तहान, बाथरूम, काही दुखणे वगैरे) त्यामुळे जाग आली असे वाटत असावे, ही एक शक्यता.

रात्री १२ वाजताच नेमक्या घटना घडत आहेत म्हणून खंत का करून घेता? निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा असा विचार करा की येनकेन प्रकारेण तुमची अंतर्मन तुम्हाला नव्या दिवसाच्या सुरवातीलाच जागं करतं. अशावेळी उद्याचा दिवस कसा जाईल, काय काय अभ्यास करावा, काही प्लॅनिंग करायचं आहे का? असा आनंददायी विचार करून पुन्हा झोपी जा. स्वतःला काही पॉझिटिव्ह सुचना देता आल्या तर त्या द्या. विश्वास असेल तर देवाचं नाव घ्या की आजचा दिवस यशदायी होवो. बघा मग, तुम्हाला १२ वाजल्याची सुचना मिळाल्याचा आनंदच होईल.

जाग आली की घड्याळ/मोबाईल बघूच नका Happy परत झोपी जाण्याचा प्रयत्न करा.
पूर्वी एकदा माबोवर कुणीतरी लिहिलं होतं की खूप वेळा असं होतं की मोबाईलवर घड्याळ पाहिलं की नेमके पूर्ण तास झालेले असतात. रात्री असं नाही, दिवसासुद्धा. म्हणजे बरोब्बर ३.००, बरोब्बर ६.०० असे. त्यावर मी लिहिलं होतं की माझंपण असं होतं बऱ्याच वेळा, पण त्याचं कारण असं असावं की घड्याळातल्या अशा 'खास' वेळा आपल्या जास्त लक्षात राहतात. आपण ६.४३, २.१३ अशा वेळाही पाहतो, पण त्याची नोंद आपण खास अशी ठेवत नाही.

सध्या माझ्या आयुष्यात असे एक नाटकिय प्रकार घडत् आहेत.म्हणजे ज्या कामाला जातोय ते होत नाही,विघ्न येतात.परवा एका कामाला गेलो तर गाडी पंक्चर,मग पुढे प्रचंड ट्राफिक,पोलिसाने अडवले कारण सीटबेल्ट नव्हता,१० ला पोचायचे होते तिथे पण १२.३० वाजले व काम झाले नाही.येताना मात्र काहीच प्रॉब्लेम नाही,नो ट्राफिक नो पोलिस ३तासात घरी आलोही .कुणीतरी जाणून बुजून माझी कामं होऊ देत नाही असा अनुभव सतत येत आहे.काय असावे हे?

मलाही काही दिवसांपूर्वी हा त्रास व्हायचा नन्तर लक्षात आले घड्याळाचा सेल संपलाय. सेल बदलल्यावर वेगवेगळ्या वेळा दिसू लागल्या.

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून हे नॉर्मल आहे अस वाटतं आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलेले उपाय नक्की करून पाहीन आणि या गोष्टीला positive घेईल.
सगळ्यांचे आभार.

केशव तुलसी, घडणाऱ्या घटना या निव्वळ योगायोग आहेत. तुम्ही ज्या मानसिक तणावातून / अवस्थेतून जात आहेत त्यामुळे तुम्हाला हे मुद्दाम कोणी करतय वगैरे विचार येत आहेत. मीच का, माझ्यासोबतच का, नेमकं याच वेळी का वगैरे वाटणे हे खूप कॉमन आहे.

तुमच्या बाबत घडणारी "अगदी नेमकी त्याच वेळेस जाग येणे" हे मात्र विशेषच आहे Happy पण रात्री नियमितपणे साधारणपणे ठराविक वेळेच्या आसपास जाग येणे हे विविध प्रकारची anxiety disorder असू शकते. काही दिवसांनी आपोआप कमी नाही आले तर यावर वैद्यकीय उपचार सुद्धा आहेत जे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतील. टाईम्स ऑफ इंडिया मधले हे खालील सदर फारच रोचक आहे. कोणत्या वेळी जाग येते व त्याचे अर्थ काय असू शकतात:

https://timesofindia.com/life-style/health-fitness/photo-stories/heres-w...

अतुल मला वाटले तुम्ही उपलब्ध असणाऱ्या उपचारांची माहिती देणारा दुवा दिलाय, पण तो सरळ एका औषधाचा दुवा आहे. माझ्या मते असे सरळ सुचवणे योग्य नाही.

>> औषधाचा दुवा आहे. माझ्या मते असे सरळ सुचवणे योग्य नाही.

सहमत आहे, खरे तर हे माझ्याही मनात आले होते. पण anxiety उपचारासाठी उदाहरण म्हणून मी त्या औषधचा दुवा दिला होता कारण तसेही ते प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही. तरीही आता मी तो दुवा काढून टाकला आहे.

आता नववैज्ञानिक तुटुन पडणार. >> सामो, एवढे म्हणेन की ही पोस्ट धाग्याच्या विषयाशी विसंगत आहे.
इथे कुणाला शास्त्रीय कारण मिमांसा जाणुन घ्यायच्या दृष्टीने आपले अनुभव मांडणे आणि त्या अनुशंगाने प्रतिसाद, चर्चा अपेक्षित आहे.

Pages