झुकिनीचे भरित

Submitted by प्राजक्ता on 29 September, 2020 - 17:26
zukiniche bharit
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झुकिनी- २-३
आल-लसुण-मिरची पेस्ट- २ टेबलस्पुन
कोथिबिर-मुठभर धुवुन बारिक चिरुन
शेन्गदाणे-अर्धी मुठ
सुक खोबर किसुन (डेसिकेटेड नको) २-३ चमचे (ऑप्शनल)
फोडणीच साहित्य आणि मिठ

क्रमवार पाककृती: 

झुकिन्या धुवुन पुसुन किचित तेलाचा हात लावुन गॅस वर भाजुन घ्याव्या, कॉइल असेल तरी हाय सेटिन्ग वर भाजता येतात. सगळ्या बाजुने भाजल्या की ताटलित काढुन भाज़की वान्गी सोलतो तशी सोलुन घ्यावी.गरम असतानाच थन्ड पाण्याखाली धरल तर साल पटकन निघुन येते, झुकिनिची साल बारिक असल्याने चुकुन काही ट्रेसेस राहिले तरी चालतय.
आतला गर स्मॅशरने कुस्करुन एकजिव करुन घ्यावा, कढईत तेल तापवुन आधी दाणे घालून तळावे आणी काढुन बाजुला ठेवावे आता हळद-हिन्गाची फोडणी करावि त्यात आल-लसुन-मिरचीची पेस्ट टाकुन परतुन घ्यावी त्यानतर झुकिनिचा गर टाकुन ,चविप्रमाणे मिठ आधी तळलेले दाणे टाकुन परतुन घ्यावे.एक वाफ काढावी त्यावर खोबर आणि कोथिबिर घालुन मिसळुन घ्याव.
भाकरी,पोळि,कावान पराठा पैकी कशाबरोबरही खावे.
09D8044C-C97A-4EEC-BD55-3C2B5EB546C1.jpegF735A4FB-EE87-4466-9B56-197A3807A8CE.jpeg79639B31-0695-4B7B-88B8-F37295AC222E.jpeg

वाढणी/प्रमाण: 
१-२
अधिक टिपा: 

अमेरिकेत मिळणार्‍या वान्ग्यात भारभार बिया असतात, चविलाही यथातथाच असतात त्यावर पर्याय शोधत करुन पाहिलेली क्रुती.
झुकिन्या गोडसर असल्याने पेस्ट मधल्या मिरच्या चान्गल्या तिखट घ्याव्या, झुकिनी बरोबर मिरचीही भाजून घेतली होती पण ही स्टेप ऑप्शनल आहे.
आवडत असेल तर पातिचा कान्दाही घालता येइल

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅन्क्स अस्मिता!
पहिल्यादा केल तेव्हाचा हा फोटो आहे तेव्हा खोबर घातल नव्हत त्यामूले वरच्या फोटोत दिसत नाहिये तसच त्यावेळेस १-२ झुकिन्याचे काप शॅलो फ्राय केले होते त्यातले उरलेले काप पण यात मिसळुन टाकलेत.

मस्त दिसते आहे रेस्पी. Happy
मोडॉन
आम्हाला आपले ते हे चांगले मिळतात इथे, उगा झुकिन्या का भाजायच्या मग?
मोडॉफ
Biggrin

मस्त दिसतंय.

भाकरी, भरीत, लसणीचं तिखट बघून भुक लागली.

झुकीनी इथे मिळते की नाही माहीती नाही.

छान.
होल फुडसच्या वांग्यात बिलकुल बिया नसतात.

शेवटचं ताट फारच झकास..
चव वांग्याच्या भरताच्या आसपास जाते काय?
मी भरताचे वांगे फार हौशेने आणलेले पण कधी आतमधून काळे निघ कधी आळी असे अनुभव आले
वरतून अगदी फ्रेश वाटणाऱ्या वांगेही आतून काळे निघाले.
आता थंडी पडली की बघू कसे मिळतायेत.

चव वांग्याच्या भरताच्या आसपास जाते काय?>> हो म्हणजे अमेरिकेतल्या वान्ग्याशी तुलना केली तर नक्किच चव जास्त चान्गली लागते, भारतात मिळणारी वान्गिच चान्गली असल्याने तुलनाच नको!
अमित होल फुडची वारी मस्ट आहे आता
धन्यवाद सगळ्याना!

अरे वाह, मस्त दिसतय. नक्की करुन बघणार. झुकिनिची भजी केली होती , छान लगली ती अगदी घोसाळ्याच्या भजी सारखी. याची मी मुद डाळ आणि दाण्याचा कुट घालुन दोडक्याच्या भाजी सारखी रस्सा भाजी पण करते. माझ्याकडे कॉईलवाली शेगडी नाही. काचेची आहे पुर्ण. भाकरी -पोळी भाजताना खुप वैताग येतो. आपले बरेच पदार्थ अश्या गॅस वर करता येत नाहीत अथवा केले तरी नीट होत नाहीत.
वांग्यांचेही तसेच , वर लिहल्याप्रमाणे बर्‍याच बिया असतात आणि काहिच चव नसते. त्याचे फार फार तर कुरकुरित काप करते मी. भरितासाठी झुकिनीचा पर्याय चांगला वाटतो आहे.
धन्यवाद पाकृ बद्दल.