ज्वारीच्या भाकरीचा गोपाळकाला

Submitted by प्रमोद् ताम्बे on 14 September, 2020 - 04:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आदल्या रात्री चार भाकरी ,दोन वाट्या ताक किंवा एक वाटी दही ,एक चमचा मीठ आणि तीन चार चमचे साखर ,एक चमचा आंब्याचं लोणचं ,चार मोथे चमचे तेल, जिरं आणि एक दीड चमचा हिंग , चविनुसार मिठ , बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

एका पसरट भांड्यात भाकरीची भरड काढून त्यात दोन वाट्या ताक किंवा एक वाटी दही एक वाटी पाणी घालून, थोडं घुसळून यात घालावं. एक वाटी दूध घालावं.
एक चमचा मीठ आणि तीन चार चमचे साखर घालावी.
हे प्रमाण ताक किंवा दही किती आंबट आहे त्यावर अवलंबून आहे. टेस्ट करून पहावं.
यात एक चमचा आंब्याचं लोणचं घालावं.
छोट्या फोडणीच्या भांड्यात चार मोठे चमचे तेल गरम करून त्यात भरपूर जिरं आणि एक दीड चमचा हिंग घालून फोडणी करावी. गॅस बंद करून फोडणीत तीन चमचे मिरचीचे लोणचे घालावे. मस्त घमघमाट सुटतो. मिरची तळली गेली की ही फोडणी भाकरीच्या काल्यावर पसरावी आणि परत सगळं एकजीव करून घ्यावे. कढीपत्ता आवडत असेल तर घालावा, आणखी सुंदर चव येते.
दहा मिनिटे झाकून ठेवावे.
तोपर्यंत काला फुगला तर गरजेनुसार परत थोडे ताक आणि दूध घालून सारखं करून घ्यावे.
शेवटी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून , हा काला सर्व्ह करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

-

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्लर्प! मस्त आमच्या कडे ह्यात अजून एकच अॅडिशन असते, कच्चा कांदा बारीक चिरून घालायचा.
जेवढं जास्त मुरतं तेवढं यम्मी लागतं. भाकरी करताना दोन भाकरी जास्तीच करते मी काल्यासाठी.

माझ्या सासरचे यालाच रामकाला म्हणतात. Wink
अशीच फोडणी करून आणि वरून कच्चा कांदा घालून मस्त लागतो हा काला.

कुठलाही हाताने कालवलेला लगदा आवडत नसल्याने माझा पास....!!! >>>> सेम हिअर . मला वाटलेलं मी एकटीच नावडत्या गटात आहे की काय.

मला हाताने कालवलेलयाचा प्रॉब्लेम नाही .. तो काला आवडत नाही. दही पोहे खाणाऱ्या लोकांकडे मी आश्चर्याने बघते.
नुसती फोडणीची भाकरी खूप आवडते.

येस varnita Same here.
कुठलाच काला आवडत नाही.....

कालवण्याबद्दल आहे तर आमरस / भाकरी थापणे एवढे लांब जाण्याची गरज नाही: कणिक, भाकरीचे पीठ कालवणे.
अर्थात ग्लोव्ह्ज घालूनही स्वयंपाक करता येईल.
ग्लोव्ह्जची सवय लागायला वेळ लागू शकतो, पण लागते सवय.

वरच्या प्रतिसादातून असे सूचित होतय का की हाताने केलेला काला आवडत नाही?
तर ते तसे नव्हते. काला करायला आवडत नाही असं नाही. पण जे प्रोडक्ट तयार होतं ते खायला कसंतरी वाटतं. पण आमरस, दडपे पोहे हे आवडतं. पण ताकपोहे, दूधभाकरी , ताकभाकरी, इव्हन पोह्यात तर्री ह्याची टेस्ट आवडत नाही.

Yes Happy varnita exactly.
मला पोळी भाकरी पण वर्णात कुस्करून खायला आवडत नाही..कुणाची पहायलाही आवडत नाही....जाऊदे...एव्हढे काही नाही..प्रत्येकाची अपनी अपनी पसंद....

चेन्नईला दोसा खाण्याची पद्धत म्हणजे ताटात डोसा घेऊन त्यावर सांबार ओतून कुस्करून खाणे. तो प्रकार मला पहावला नाही.

इडली पण तशीच खातात तिथे. एकेका ठिकाणची पद्धत!

हा भाकरीचा काला आवडला. करून बघितला पाहिजे. मलाही अगदी बारीक चुरा करण्याऐवजी जरा जाडसर तुकडे आवडतील बहुतेक.

आंबरस नको हो ..आमरस म्हणा.>>टायपो होता, चष्मा नव्हता घातला ना. अजून चष्म्याची सवय व्हायचीय.
इडली पण तशीच खातात तिथे. एकेका ठिकाणची पद्धत! >> इथे सांगलीत त्याला गुंटूर इडली म्हणतात. इडलीवर बचकभर सांबार ओतून देतात . नाही आवडली मला.
आंबटगोड , आपल्यासारखे गटात न बसणारे अल्पसंख्याक दिसतायत. Happy :

वर्णिता सहजच विचारतेय
कुस्करून खाताना पाहवत पण नसेल तर लहान मुलांना कसं भरवता मी तर मुलीला अगदी मऊ लगदा करून भरवते चपातीचा वरणात/दुधात.

अगं मला बघवतं की , मोठी माणसं लगदासदृश खातात तेव्हा आश्चर्य वाटतं, खरं खूप जण खातात , घरातच आहेत .
मुलाला मी मिक्सरमधून फिरवून द्यायचे दूध गूळ पोळी , वरण भात कालवून घ्यायचे पण भरवायचे चमच्याने , तो त्यामुळे आता दहावीत गेलाय तरी वरणभात चमच्याने खातो , मसालेभात पण. खरं तर ते माझ्यामुळेच . ज्याला हा इतिहास माहीत नसतो त्यानं पहिल्यांदा बघितलं की म्हणतो हा मागच्या जन्मी अमेरिकेत होता काय

अगं सेम... माझे पण असंच झालंय त्यामुळे मुलगा चमच्याशिवाय खात नाही आणि मुलगी चमच्याने अजिबात खात नाही. Happy

मी आज करणार आहे.. काल रात्रीची ज्वारीची एक भाकरी ठेवली आहे करायला.. पण माझ्याकडे मिरचीचं लोणचे नाही आहे..काय करू ? बाळ कैरी, आंब्याचे, करमालाचे, लिंबाचे, अंबाडीचे आणि मिक्स भाजीचे हि लोणची आहेत..(लोणची आईने बनवली आहेत, मिरची गरम पडेल म्हणून ती नाही बनवत ) हा आता आठवले माझ्याकडे ताकातली मिरची आहे..

पृथ्वीच्या पाठीवर असा एकही खानदेशी नसेल, ज्याने आयुष्यात एकदाही हाताने काला करुन खाल्ला नाही.
प्रांतानुसार खाण्याच्या पद्धती बदलत असल्याकरणाने कित्येक जणांना ते विचित्र वाटु शकेल, जस की पाणीपुरी काटे- चमच्याने खाणार्‍याला बघताना वाटेल तसं. (थोडासा बदल केलाय...)

जेम्स बॉण्ड अगदी खरंय. मी रोज कुस्करा करूनच भाजी, पोळी, भाकरी खाते.कुस्करा त्यावर कच्च तेल आणि थोडं मीठ जगात भारी लागत.अगदी रेस्टॉरंटमध्येही मटण भाकरी कुस्करूनच. अस ताटात भाकरी कुस्करताना कोल्हापूरच्या ओपाल आणि सातारच्या मानसवाल्यांनी ती मोठी खोलगट मोठी डिश असते न ती दिली होती.
कुस्करा छान दिसतोय, बाजरीच्या भाकरीचा करते मी मायनस फोडणी.

Pages