दह्यातली भाकरी

Submitted by अल्पना on 23 February, 2012 - 08:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ ज्वारीच्या शिळ्या भाकर्‍या, वाटीभर दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, चमचाभर दाण्याचे कुट, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, फोडणीसाठी तेल, जीरे, हिंग.

क्रमवार पाककृती: 

शिळ्या ज्वारीच्या भाकर्‍यां अगदी बारिक कुस्करुन घ्या. मिक्सरमधून बारिक केल्या तरी चालेल. एका भांड्यात कुस्करलेली भाकरी, दही, बारिक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर आणि दाण्याचं कुट एकत्र करा. त्यावर हिंग-जिर्‍याची फोडणी घाला.

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

एरवी फोडणीच्या पोळीसारखीच फो.ची भा. पण करतात. पण फोडणीची भाकरी बरीच कोरडी लागते म्हणून तोतरा बसू शकतो. म्हणून मग आई अश्या पद्धतीने भाकरीचा कुस्करा बनवते.
यात गाजर, बीट कीसून आणि कच्चे मटाराचे कोवळे दाणे घालून बदल करता येतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई कधी घालत नाही, पण इथे बर्‍याच जणांनी लिहिलंय की यात कच्चा कांदा घालून छान लागतं. मी पण घालेन पुढच्यावेळी.

मनासारखी ज्वारीची भाकरी मेली जमत नाही कधी. Happy
अल्पनाच्या सगळ्या पाकृ माझ्या लक्षात आहेत सखुबत्ता, अमृतसरी छोले- टोटल हिट.

मस्त पाकृ Happy
मी रोज सकाळी नाष्ट्याला घरच्या ज्वारीची गरम गरम भाकरी खाते. पण त्याची किंमत तुम्हा सगळ्यांच्या पोष्टी वाचुन कळाली Wink

मस्त!! आम्च्याकडे ह्याला भकरीचा काला म्हणतात. कच्चा कांदा खुप छान लागतो.ह्यात. एखादी सांडगी मिरची घातली तर अजुन झकास.

वॉव !! आज एकदम नॉस्टेल्जिक करणार्‍या रेसिपी येतायत. आधी वांग्याची (लग्नातली) भाजी आता हा भाकरीचा काला. यात कच्चा कांदा मस्तच लागतो. लहानपणी ११ वाजताच जेवण करुन शाळेत जायचो आम्ही. तेव्हा भाकरीला नाक मुरडणारे आम्ही ५ वाजता हा काला आवडीने खायचो. हा काला, उकड, दडपे पोहे, शेवयांचा उपमा, दहीपोहे , ... श्या काय मस्त् दिवस होते.

आईगं सही. यालाच आमच्यात "गोपाळ काला" म्हणतात. आज्जी करायची.
गरवी गुजरात च्या फ्रोझन बाजरीच्या भाकरी मिळतात. तेच आणून दुधाची तहान ताकावर भागवावी झालं.

छान रेसिपी आहे अल्पना. आमच्याकडे पण काला म्हणतात. बारीक कच्चा कांदा अणि सांडगी मिरची हवीच. Happy

छान.. दह्यानी खरच कोरडे पणा जाईल आणि रुचकर पण होईल... नक्की करुन पाहिन..

आता सगळे इतके कौतुक करताहेत आणि इथे ना पीठ ना भाकरी करता येतात. :| हा हा हा....

खुपच छान लागते अशी भाकरी. फक्त दा. कुटाएइवजी आमच्याकडे कच्चा कांदा घालतात. आणि फोडणी जीरे मोहरी बरोबर तळणीची मीरची घालतात. हे एक पोटभरीचे पुण्रांन्न होते. शिवाय भाकरी जाड झाल,फुगली नाही तरी कही बिघदत नाही.फ्क्त भाकरी आद्ल्या दिवशीची आसावी. दही सायीचे घातल्यास अजुनच चव छान लागते.

आमच्याकडेही ह्याला कालाच म्हणतात. ताज्या भाकरीचाही काला छान लागतो. आमच्याकडे दही भाकरी मीठ आणि कढवलेली चटणी घालतात.

तोंडाला इतक पाणी सुटल ना Happy मीही विकांताला करुन पहाणारच आहे.

अरे व्वा, मस्त.

आम्ही जिर, मिर्ची, कढीपत्ता आणि लसुण फोडणीत घालतो, आणि मग त्यात ताक घालतो. थोडी उकळी आली की मग त्यात भाकरीचा चुरा घालतो.

मग वरुन कोथींबीर ---
छान रुपड दिसत आणि लगेच गट्ट्म होत Wink

Pages