झब्बू - तुझी माझी जोडी जमली रे - (लाल-हिरवा)

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 19:36

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज झब्बू दिला तरी चालणार आहे ना

हे मी खाली सोसायटीत लावलेलं आंब्याचं झाड. आता पाच फुटापेक्षावर गेलंय.

IMG_20190421_064130445.jpg

स्वरुप, rr फोटो मस्तच.

रायवळ आंब्याचं कोयाडं.

IMG_20200827_124148.jpg

सही फोटो rr

कोकणातली आमच्या घरची गणपतीबाप्पाची मांडवी, काहीजण माटी, माटवी, मंडपी असंही म्हणतात. बरेच रंग आहेत पण लाल हिरवा जास्त आहे.

IMG_20200827_133108.jpg

PhotoPictureResizer_200828_175357110_crop_2298x2395-919x958.jpg

चामटा...घराच्या पायरीवर कोपर्यात.

बाब्बो खेकडा. लालसर गुलाबी रंगाचा पहिल्यांदाच बघितला. चामटा म्हणतात त्याला माहिती नव्हतं. खेकड्याला चिंबोरी म्हणतात ते माहितेय.

अन्जू, अगदी अंगठ्याएवढा असतो हा खेकडा. काळ्या कातळावर जे छोटे छोटे खड्डे असतात त्यात आढळतात हे. गवताचं लांब पातं त्या खड्ड्यात टाकायचं की त्याला खायला बाहेर येतो हा चामटा. बादवे चामटा हे आपलं गावठी नाव.
इकडे रत्नागिरीत खेकड्याला कुर्ली, किर्वी अशीही नावं आहेत. ते खातात, हा चामटा खात नाहीत.

एक मिरची पुर्ण लाल
एक पुर्ण हिरवी
तर एक मिरची अर्धी लाल अर्धी हिरवी

फोटोत फोकस गंडला आहे तो तेवढा सांभाळून घ्या ही विनंती
IMG_20200829_085016.jpg

भन्नाट फोटो एकेक.

चिन्मयी कुर्ल्या म्हणजे खेकडा प्रकार होय, माहीतीच नव्हतं.

@ संयोजक...

हा नवीन रंग जुन्याच झब्बूमधे चूकुन काढला गेलाय का..?

आणि शिर्षकात इंद्रधनुषी रंगाचं नांवही नाहीये...

कृपया माहिती अवगत कराल का..?

Pages