मराठीवर अजूनही अन्याय होतोच आहे !

Submitted by केअशु on 25 July, 2020 - 05:13

हिंदी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यामधे खडी बोली सर्वात प्रभावी असल्याने तिचा वापरही सर्वाधिक आहे.विशेषत: दिल्लीसारख्या महानगरात आणि आसपासच्या प्रदेशात.
देवनागरी लिपीत ै या दोन मात्रांचा उच्चार ऐ असा केला जातो.पैलवान , दैव इ.
पण याच दोन मात्रांचा खडी बोलीतला उच्चार मात्र इंग्रजीतल्या ॲ सारखा आहे. यामुळे आपल्याला बँकेच्या नावाच्या पाट्यांवर 'बैंक' असे लिहिलेले दिसते.ते आपणा मराठी लोकांच्या दृष्टीने ब+ऐ+न्+क = बैंक असे असले तरी हिंदी भाषिकांच्या दृष्टीने ते ब+ॲ+न्+क = बँक असेच आहे.

स्मार्टफोनवर मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणार्‍या दैनंदिन वापरातल्या दोन भाषांपैकी हिंदी ही मराठीपेक्षा तुलनेने अधिक वापरली जाते.साहजिकच जी भाषा जास्त वापरली जाईल तिच्याकडे अधिक लक्ष हे कळफलक निर्मात्यांकडून दिले जाणार आणि तसेच घडले देखील.

गुगलपोषित इंडीक हा कळफलक स्मार्टफोनवर वापरताना शब्द सुचवणीत अनेकदा चुकीचे शब्द सुचवले जातात. यातले बहुतांश शब्द ॲ किंवा ऑ हा ध्वनी समाविष्ट असणारे आहेत.म्हणजे ॲप , डॉक्टर याऐवजी अँप , डाँक्टर हे पर्याय सुचवले जातात.ॲ ध्वनी असणारे मराठी शब्द गुगल इंडीकवर सहजपणे लिहीता येत नाहीत. ते सहजपणे का लिहिता येत नाहीत किंवा सुचवणीत का सुचवले जात नाहीत हे आता लक्षात येईल.
इंग्रजीतले ॲ आणि ऑ ध्वनी असलेले शब्द अचूक लिहिता येण्यासाठी मराठी भाषेने ॲ आणि ऑ हे दोन ध्वनी या आधीच स्विकारले आहेत.शिवाय आता शाळेतही बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जात आहे.पण ही माहिती गुगलला त्यांच्या मराठी कळफलकासाठी मदत करणार्‍यांनी दिलीच नसावी असे आता वाटते आहे; किंवा त्यांची मराठी कळफलकासाठी मदत करणारी टीम पुरेशी माहितगार नसावी अशी शंका येते आहे.म्हणजे जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमधली एक असणार्‍या मराठीने इंग्रजीतले जे ध्वनी स्विकारले त्याची खबरबातच गुगलला अद्याप नाहीये.

इंडीक कळफलकातला मराठी भाषा वापरातला हा दोष दूर व्हायला हवा. जे शब्द मराठीत नाहीच आहेत ते सोसावे लागतायत.शिवाय यातून अजून एक संदेश जातो तो म्हणजे मराठीला गृहीत धरलं तरी चालतं; किंवा मराठी ही हिंदीची बोलीभाषा आहे वगैरे.
माझ्या कितीतरी दक्षिण भारतीय मित्रांना मला मराठी ही स्वतंत्र भाषा असल्याचं सांगावं लागलं आहे. त्यांच्या मते देवनागरीत फक्त दोनच भाषा लिहिल्या जातात; हिंदी आणि संस्कृत.
असाच गैरसमज गुगलचा व्हायला नको.
गुगल ट्रान्स्लेटरवरही हीच समस्या आहे.मराठीला गृहीत धरले जाते.

मराठीला गृहीत धरणे यापुढे न थांबल्यास मराठीसाठी स्वतंत्र लिपी बनवावी असा विचार कट्टर मराठीप्रेमींकडून लावून धरला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

असमत. अगदी असहमत. हा न्यूनगडाचा आविष्कार आहे. मराठीवर कोणी अन्याय करत असेल तर दस्तूर खुद्द आपणच. प्रथम मुलाना इंग्रजी मध्यम शाळेत टाकण्याचा आटापिटा करणेे आधी थांबयला पाहिजे. इंग्रजीवर प्रभुत्व पाहिजे ही गोष्ट निर्विवाद, पण त्याचा हा मार्ग नाही. लिपी बदलली पण शिकणार कोण ? आपल्या मराठीत उत्कृष्ट साहित्य आहे. आपली नाट्य आणि चित्रपट सृष्टी , उच्च पातळीचे आहेत. आपण कुठे कमी पडत असू तर शास्त्रीय लिखाणात . पण आता तीही परिस्थिती बदलत आहे.
एकूण आपण विचार करता तितकी परिस्थिती निराशाजनक नाहीये.

मुद्याचे बोला. त्यांच्या फोनमधे कंपनीने योग्य भाषेला योग्य तो सपोर्ट न देणे हा मुद्दा आहे. डायरेक्ट काय न्युनगंड. म्हणजे जिथे भाषेला योग्य सपोर्ट नसेल तिथे इतर सर्व समस्या सुटेपर्यंत बोलायचेच नाही का? मग कधी बोलायचे? तुम्हाला ते इतर प्रॉब्लेम जास्त महत्वाचे वाटत असतील तर ते सोडवण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय भरीव कार्य केलेत?

केशऊ, फोन सेटींगमधे मराठीचा योग्य तो पर्याय निवडल्यानंतर मला कधीही असा प्र्बॉब्लेम आलेला नाही. सर्व योग्य ते मराठीच शब्द सुचवले जातात. एकदा तुमच्या सेटींगची पडताळणी करुन बघा. गुगल ट्रान्स्लेटरमधे असे अशु शकते. तुमचे ओएस वर्जन व फोन कंपनी कोणती? त्यांच्या सपोर्ट फोरमवर एकदा विचारुन बघा.

हिंदी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यामधे खडी बोली सर्वात प्रभावी असल्याने
>>
खडी बोली सारख्या मुळच्या ख-या भाषा मारुन हिंदी ही बोली भाषा जन्मलेली आहे.

त्यांच्या मते देवनागरीत फक्त दोनच भाषा लिहिल्या जातात; हिंदी आणि संस्कृत.
>>
हिंदीच्या जन्माच्या फार फार आधीपासुन मराठी देवनागरीतही लिहीली जात होती.

मराठीला गृहीत धरणे यापुढे न थांबल्यास मराठीसाठी स्वतंत्र लिपी बनवावी असा विचार कट्टर मराठीप्रेमींकडून लावून धरला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.
>>
मोडी लिपी पुन्हा मुख्य व्यवहारात वापरात आणली पाहिजे व त्यासाठी जनता व सरकार यांचे पाठबळ हवे. हळुहळु काम चालु आहे. इस्रायलचे चांगले उदाहरण आहेच.

धन्यवाद अभिनव.
app असे लिहिल्यावर गुगल इंडीक अँप असा पर्याय सुचवते. अँप असा शब्दच मराठीत नाहीये.

तुम्ही मराठी (India)
Marathi हा कीबोर्ड निवडा.

मराठी आणि इंग्रजी
Google भारतीय कीबोर्ड यात ही त्रुटी आहे.

मायक्रोसॉफ्ट स्विफ्टकी कीबोर्ड हे सॉफ्टवेअर वापरुन बघा.
काही काही फोन कंपन्या त्यांच्या स्वतःच्या पार्टनर कंपनीचे कीबोर्ड सुचवतात. ते जास्त सपोर्टेड असतात. ते वापरुन बघा.
तसेच कीबोर्डच्या सेटींगव्यतिरिक्त इतर ठिकाणी फोन सेटींगमधे जसे की accessibility/system language etc तिथे चुकुन मराठी इंग्लिश व्यतिरिक्त एखादी जास्तीची भाषा निवडलेली नाही याची खात्री करा.

मी मराठीसाठी काहीही केलेल नाही. आणि गरजही नाही आहे. मराठी मी काही करावे म्हणून थांबलेली नाही.
माझेही बरेच काही अमराठी मित्र आहेत. ते त्यांच्या भाषेचा गुण गौरव गातात. मी त्यांना मराठी भाषा किती समृद्ध आहे हे सांगतो. ह्या संवादातून मला समजले कि तमिळ २००० वर्षे जुनी भाषा आहे.
आता गुगल! . मी गुगल चा आभारी आहे, इनपुट टूल्स ऑफलाईन वापरतो. पण इतरही काही software आहेत. तुम्ही वापरून बघितली आहेत काय ? अगदी आपल्या मराठी तरुणांनी तयार केलेले पॅकेज आहे . त्याची माहिती मला वाटते इथेच मायबोलीवर मिळेल. कोणाला आठवत असेल तर रेफरन्स द्या.
सध्या हजारो मराठी लोक मराठीत लिहित आहेत. मराठी ब्लॉग लेखक आहेत. ते काय करतात? ही माहिती मिळाली तर ? तसेच हा फक्त मराठीचाच प्रश्न आहे का ? तमिळ ,तेलगु , माल्याळी , कन्नड भाषिकांना काही अडचणी येतात का ?
आता मोडी बद्दल. चांगले विचार आहेत. खूप लोकांना नोकर्या मिळतील. मराठीत देवनागरीत लिहिलेले सर्व साहित्य मोडीत लिहायचे प्रचंड काम उरकावे लागेल. मराठीत शिकलेली एक पिढीच्या पिढी बरबाद होईल. होउद्या . पण मराठीसाठी मी काहीतरी केले याचे समाधान मिळेल. आणि मुख्य म्हणजे गुगलला धडा शिकवता येईल.अश्याप्रकारे प्रकारे देवनगरीला मोडीत काढून टाकल्याचा आनंद मिळेल

मी मराठीसाठी काहीही केलेल नाही. आणि गरजही नाही आहे. मराठी मी काही करावे म्हणून थांबलेली नाही.
>>
तसेच हा धागाही तुमच्या नकारात्मक प्रतिसादांविना थांबलेला नाही. धन्यवाद.

ह्या संवादातून मला समजले कि तमिळ २००० वर्षे जुनी भाषा आहे.
>>
त्याच २००० वर्षे जुन्या तामिळ भाषेत तेवढ्याच जुन्या साहित्यात, मराठी भाषा बोलणा-या लोकांचा उल्लेख आहे.

सध्या हजारो मराठी लोक मराठीत लिहित आहेत. मराठी ब्लॉग लेखक आहेत. ते काय करतात? ही माहिती मिळाली तर ? तसेच हा फक्त मराठीचाच प्रश्न आहे का ? तमिळ ,तेलगु , माल्याळी , कन्नड भाषिकांना काही अडचणी येतात का ?
>>
या धाग्याचा विषय काय आहे

मराठीत देवनागरीत लिहिलेले सर्व साहित्य मोडीत लिहायचे प्रचंड काम उरकावे लागेल.
>>
सर्व साहित्य नाही. शालेय अभ्यासक्रम, दुकाने आस्थापनांवरील नावे/कागदपत्रे व शासकीय कागदपत्रे/आदेश एवढेच. यामुळे नवा रोजगार निर्माण होऊन महाराष्ट्रातील मराठी कुटुंबे सधन होतील हा तुमचा मुद्दा बरोबर आहे.

मराठीत शिकलेली एक पिढीच्या पिढी बरबाद होईल. होउद्या
>>
असे इस्त्रायलमधेही झाले असेल मग? त्याचा काही पुरावा/संदर्भ? तुम्ही म्हणताय तसे खरेच इस्त्रायलमधे झाले असेल तर त्याचा अभ्यास करुन आपल्याला सुधारणा करता येतील.

आणि मुख्य म्हणजे गुगलला धडा शिकवता येईल
>>
कुठेही धागाकर्त्याने किंवा एकाही प्रतिसादकर्त्याने कोणत्याही कंपनीविरुद्ध काहिही लिहिलेले नाही व मतही व्यक्त केलेले नाही. हा तुम्ही स्वतःहुन मधेच घुसवलेला नकारात्मक मुद्दा आहे.

मला माहिती कम मार्गदर्शन हवय
मी लॅपटॉप वर आय.एम.इ. मराठी टाईपरायटर हे सॉफ्टवेअर वापरतोय.
पण माझ्या काही चुकांमुळे टूल बार वरून ते लँग्वेज बदलायचं सेटींग ऊडलय
आणि आता कुठेही दिसत नाहीये ... लँग्वेज बदलायचा ऑप्शन परत कसा आणावा
अर्जन्सी आहे खूप डिफॉल्ट किबोर्ड जाम त्रासदायक आहे

विंडोज च्या टूलबार वर कस्टमाइज च्या शेजारीच त्या लँग्वेज चेंज करायचा एक बॉक्स होता... तो उडलाय Sad

खरं आहे. गुगल कळफलकाची ही अडचण आहेच. आता इथंही मला अशी अडचण जाणवते.
कॅमेरा, वाङ्मय, हे असे शब्द कसे इथं टंकित करायचे कोणी सांगेल का? मी सगळं लिखाण बाहेर वर्डमध्ये टंकित करून इथं चिकटवत असतो.

आता मराठी माध्यमाची दुरावस्था आहे. शाळाच नाहीत. लोक सटकलेत. गावा-गावात इंग्लिश माध्यमाच्या शाळा. कुत्रं दिसलं तर लहान पोराला भूभू नाही दाखवत, डॉगी दाखवतात.

मी एकदा पायी चाललो होतो. समोर एक मजूर बाई मुलीसोबत जात होती. डोक्यावर सामान भरलेली नायलॉनची पिशवी. पायात स्लीपर सटक-फटक वाजत होती. पोरीच्या केसांनी तेलाचा थेंब कधी पहिलं नसेल. झिंज्याच म्हणाव्यात.
त्या मुलीला एकदम आईला काही दाखवावं वाटलं. तिनं आईचा हात धरला आणि ओरडलीच, “अय मम्म्योव! त्ये पघ ना तिकाल्ड्या गाडीपशी क्यावढा डॉगी ह्ये.
यापेक्षा अस्सल गावराण खणखणीत ‘आयव, त्ये पघ ना तिकाल्ड्या गाडीपशी क्यावढं कुत्रु ह्ये!’ हे खूपच गोड वाटलं असतं.

आई-बापाची हौस आणि मुलांची कुत्तरओढ.

मुलीसाठी मी मराठी मध्यमची शाळा शोधत होतो. एक मिळाली.
मुख्याध्यापक म्हणाले, “स्कूल बस फ्री, पुस्तकं फ्री.”
पुस्तकं भले शासन देत असेल, पण स्कूल बस???
वस्तुस्थिती अशी होती की शाळेसाठी मुलंच मिळत नव्हती. त्यामुळं शाळेची मान्यता टिकवण्यासाठी पुस्तक आणि स्कूल बस याचा खर्च शिक्षक वर्गणी काढून देत होते. अक्षरश: डोळ्यात पाणी आलं.
दुर्दैवानं काही अडचणीमुळं तिथं प्रवेश नाही घेता आला.

कोणत्याही सरकारनं यावर कधी गांभिर्यानं विचार केलेला नाही. पण मराठी टिकवा म्हटलं की इंग्रजीला विरोध असं समजलं जातं. खरं तर आम्ही इंग्रजी (किंवा आणि कोणत्याही भाषेच्या) विरोधात नाही. उलट मुलांना जास्तीत जास्त भाषा याव्यात हा माझा प्रयत्न आहे.

मला वाईट वाटतं की मी जे वाचून घडलो, ज्या वाचनानं मला अतीव आनंद दिला, ते पोरं वाचत नाहीत, आवडत नाही. मी लिहितो ते वाचून त्याचा आनंद माझीच पुढची पिढी घेऊ शकत नाही.

बा.भ., ग्रेस, इंदिरा संत. माडगूळकर किती किती नावं घ्यावीत? ही मंडळी कुठं दिसत नाहीत. फास्टर फेणे, जाड्या-रड्या, कावळा-चिमणी या गोष्टी तर गेल्याच. (बहुधा दुर्गा भागवतांच्या) संथाळी लोककथा, तमिळ लोककथा असे काहीतरी अद्भुत विश्व ही पोरं जगूच शकत नाहीत. जेरोनिमो, हॅरी पॉटर हीच पुस्तकं आता पोरं वाचतात.

कालाय तस्मै नम:

>>>मराठीवर अजूनही अन्याय होतोच आहे !<<<<,
असे शीर्षक कशासाठी दिले आहे ? कोण काय अन्याय करतो आहे?
>>>कुठेही धागाकर्त्याने किंवा एकाही प्रतिसादकर्त्याने कोणत्याही कंपनीविरुद्ध काहिही लिहिलेले नाही व मतही व्यक्त केलेले नाही. हा तुम्ही स्वतःहुन मधेच घुसवलेला नकारात्मक मुद्दा आहे.<,<,<
>>>>गुगलपोषित इंडीक हा कळफलक-------गुगल ट्रान्स्लेटरवरही हीच समस्या आहे.मराठीला गृहीत धरले जाते.<<<<,
हा पूर्ण परिच्छेद काय सांगतो ?
>>>मराठीला गृहीत धरणे यापुढे न थांबल्यास मराठीसाठी स्वतंत्र लिपी बनवावी असा विचार कट्टर मराठीप्रेमींकडून लावून धरला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.,<<<<
हा ढोस कुणाला दिला आहे ?
>>>>असे इस्त्रायलमधेही झाले असेल मग? त्याचा काही पुरावा/संदर्भ? तुम्ही म्हणताय तसे खरेच इस्त्रायलमधे झाले असेल तर त्याचा अभ्यास करुन आपल्याला सुधारणा करता येतील.<<<,
मी इस्त्रायलचा उच्चारही केलेला नाही. ते तुमचे तुम्ही बघा.
>.>>>सर्व साहित्य नाही. शालेय अभ्यासक्रम, दुकाने आस्थापनांवरील नावे/कागदपत्रे व शासकीय कागदपत्रे/आदेश एवढेच<,<<<<
गेल्या कित्येक पिढ्यांवर आपल्या कृपादयाळू सरकारने अनेक प्रयोग केलेे.म्हणजे उदा. इंग्रजी आठवीपासून मग पुन्हा पाचवी पासून. आता मराठीत किम्बहुना सगळ्या विषयांत १००% गुण द्यायची पद्धत सुरु केली. परीक्षा पद्धत बदलली. कुणालाही नापास करायचे नाही इत्यादी.तसा हाही एक प्रयोग होऊन जाउद्या.
>>>>>तसेच हा धागाही तुमच्या नकारात्मक प्रतिसादांविना थांबलेला नाही.<<<<<
हे उगाचच बरका. मी कुठे धागा अडवून धरला आहे?
धागा चालू द्या .पळू द्या अखंड चालू द्या.
सध्या दिवस असे आले आहेत कि थोडा जरी विरोधी आवाज काढला तरी ----
जाऊ द्या
येऊ द्या प्रतिसाद !
Let the thousands of pratisad bloom!

@ च्रप्स
ते ऍप्प असं येतं.
'अ‍ॅप' असं हवं आहे.
बाहेर वर्डमध्ये टंकित करुन चिकटवलं तर अॅप असं होतं आहे.

काय करावं?

डिमांड तसा सप्लाय !
किबोर्ड बनवताना मराठी भाषेचा विचार कमी
गूगल सर्चवर मराठी रिजल्ट कमी
विकीपिडियामध्ये मराठीत माहिती कमी
मराठी चित्रपटांना थिएटर कमी
मराठी कलाकारांचे मानधन कमी
मराठी लेखकांचे पोटापाण्यापुरते कमवायचे वांधे

नाही म्हणायला मराठी मालिका छान टीआरपी खेचतात
पण काही मराठी बुद्धीजिवी माणसे नाक मुरडत त्यांचेही पाय खेचतात ...!

ईति लेखनसीमा !

नवीन Submitted by अरिष्टनेमि on 25 July, 2020 - 21:18
>>
+१ सहमत.

जंगल बुक बघताना, जेव्हा बाला तो ब स्नेक, तो ब टायगर अशी वाक्ये ऐकु आली तेव्हा आनंदी चित्रपटातही एक दु:खद भावना वाटली.

कुत्र्यासोबत पोपटही नामशेष झालेत. त्या ऐवजी, बाला सी पॅर्रट असे ऐकु येते.

कंपनीच्या एखाद्या उत्पादनावर मत व्यक्त करणे, रिव्यु देणे किंवा तक्रार करणे म्हणजे त्या कंपनीविरुद्ध बोलणे असे होत नाही.
याविषयावर आणखी बोलण्यात रस नाही. धन्यवाद.

@ अभि_नव
तुम्ही माझ्या प्रश्नांना बगल देऊन दुसरेच काही तरी लिहित आहात.
माझेच चुकले. माझे काही ही म्हणणे नाही. तुमचे मुद्दे अगदी अगदी अगदी बरोबर आहेत. मीच एक मूर्ख आहे. आता माझी अजून लाज काढू नका. फक्त तो मोडीचा मुद्दा. सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा एवढीच ह्या पामराची विनंती.
माझे काही मराठी मित्र इस्रायल मध्येे रहायला गेले आहेत. त्यांना विचारून सांगतो . ते सर्व मिळून एक मराठी मासिक चालवतात एवढे मला माहित आहे.

प्रतिसाद काढला

मला कोणिच मदत नाही केलि
शेवटी गुगल केलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केला
हा! हा! हा! हा!

@अरिष्टनेमि तेवढा संदेश बघाल का प्लीज दुपारीच पाठवला होता
@धागामालक माफ करा अवांतर बोललो.

कोणतीही भाषा , आणि तीचे महत्व कमी - जास्त होण्यासाठी त्या भाषेच्या प्रदेशातील लोकच कारण ठरतात .
उत्तरेकडील लोकांनी हिंदी ला फारच लवकर आपलस केलं पण दक्षिण भारताने आपली बोलीभाषाच शिरोधार्थ मानली
आणि आज याचा परिणाम तामील भाषा ही सिंगापुर ची दोन किंवा तीन नंबरची बोली भाषा (ऑफिशीअल ही ) ठरवली गेली आहे.
मराठी भाषेला अत्युच्च दर्जा मिळवून द्यायचा असेल तर प्रादेशिक लोकांनी प्रयत्न करायला हवेत!!

या बाबतीत माझ्या पालकांनी मला ज्ञान प्रबोधिनी च्या विद्याहोमात स्वाहा म्हणून वाहिलं आणि मी मराठी राहीलो.

कायच्या क़ाय आहे हे

उद्या गोल्ड माइन वाले तमिली चित्रपट हिन्दीतच डब करतात , मराठीवर अन्याय करतात , असेही कुणी म्हणेल,

खुद्द मराठीच्याच 30-40 बोली भाषा आहेत व त्याना स्वतन्त्र नावेही आहेत, सगळी नावे अन शब्द समोरच्याने घालून द्यावेत अशि अपेक्षा ठेवून कसे चालेल ?

मोडी लिपी पुन्हा मुख्य व्यवहारात वापरात आणली पाहिजे व त्यासाठी जनता व सरकार यांचे पाठबळ हवे.>> +१. असं व्हावं असं मनापासून वाटतं पण दुर्दैवानं ते शक्य नाही असं दिसत आहे.

किबोर्ड बनवताना मराठी भाषेचा विचार कमी
गूगल सर्चवर मराठी रिजल्ट कमी>>+१. त्यातल्या त्यात प्राईम इत्यादींवर चित्रपट, सिरीयल सोबत मराठी सबटायटल पाहून जरा बरं वाटावं अशी परिस्थिती आहे. (दर्जा पाहून गार पडायला होते पण तो वेगळा विषय आहे Proud )

ऍप , बॅट , सॅक , दॅट , फॅट , गॅप , हॅट , जॅम , कॅट .. डॉक्टर , पॉट , टॉप , नॉट .. गुगल इंडिक किबोर्ड आहे की व्यवस्थित

@radhanisha
'ॲप' लिहायला अडचण जाणवते आहे.
'ऍप' हा शब्द चुकीचा आहे. यातल्या 'ऍ' चा उच्चार कसा करणार?

सावरकरांच्या नंतर मराठी ची भाषा शुद्धी कोणी करू शकेल अस मला फारस वाटत नाही आता...

कुणाला मराठी टायपिंग मध्ये त्रास होत असेल तर
गुगल चा Indic keyboard वापरावा
कोणीतरी त्या अॅप चा आयकॉन फोटो टाकता का.
मला लॅपटॉप वरून इमेज फाईल्स टाकता येत नाहीत.
nobinobita1857@gmail.com नाहीतर इथे एक मेल करा मी टायपिंग चा प्रॉब्लेम सोडवून देईन.
Indic keyboard वापर खूप सोप्पा आहे इथल्या डिफॉल्ट कीबोर्ड पेक्षा!!

Pages