मराठीत ऑफलाईन टंकलेखन

Submitted by shantanuo on 11 September, 2018 - 09:51

गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते.
https://www.google.com/inputtools/

पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे?
https://bhashaindia.com/downloads.aspx

यात स्पेल चेक / एटो करेक्ट नाही. तशी अपेक्षाही नाही कारण हे फक्त इनपुट टूल आहे. हा मजकूर मी याच टूलाचा वापरा करूंन वर्डमध्ये लिहिला आहे. मजकूर सेव्ह होण्यात काही अडचण (सध्या तरी) आलेली नाही. बरहाच्या आठवणीने अजूनही व्यथित होणार्या मंडळीनी वापरून बघायला हवे असे. ऑफलाईन टंकलेखन कारण्याकरता अजून काय मार्ग आहेत?

Group content visibility: 
Use group defaults

https://bhashaindia.com/downloads.aspx>>>
ह्या प्रकारे उत्तम टन्क्लेखन करता येते, मी वापरले आहे, माझ्य आईने तिचा पुर्न प्रबन्ध ह्यानेच टाईप केला

. बरहाच्या आठवणीने अजूनही व्यथित होणार्या मंडळीनी वापरून बघायला हवे असे. +११११
आधी बरहा वापरत असु, आता नाही मिळत ना ते?

तुम्हाला transliteration tool अपेक्षित आहे ना?

बराहा ७.
त्यानंतरच्या सगळ्या एडिशन्स विकतच्या होत्या माझ्या आठवणीप्रमाणे.

>वेगळा कीबोर्ड शिकायची इच्छा असेल तर अनेक मराठी TTF फाँट्स विनामूल्य उपलब्ध आहेत.

  1. पण ते युनिकोड फाँट नसतील , तर ज्यांच्याकडे ते फॉंट असतील त्यानाच त्यात लिहिलेले वाचता येते.
  2. त्यात वेबसाईट तयार केली तर गुगल मधे शोधून सापडत नाहीत.
  3. मोबाईलवर पाहता येत नाही.
  4. एका नॉन युनिकोड फाँट मधे लिहलेले दुसर्‍या नॉन युनिकोड फाँट मधे बदलता येणे खूप अवघड आहे.

प्रश्न फक्त किबोर्डचा नसून त्यात लिहिलेले कसे साठवले जाते हे ही महत्वाचे आहे.

अजयजी,
ऑफलाईन टंकण्याच्या संदर्भात मी लिहिले होते.
सिमिलर फाँट फॅमिली असेल तर युज्वली चट्कन बदल होतात.
फाँट एम्बेड करून पीडीएफ/प्रेझेंटेशन तयार केल्यास इतरांना वाचता येते.
माझ्या मोबाईलवर यूसीसीडब्लू व मराठी टीटीएफ फाँट वापरून मीच तयार केलेले घड्याळ-वेदर विजेट आहे. Happy तेव्हा हे फाँट्स मोबाईलवर नक्कीच दिसतात.


esses.jpg

अर्थात हे सगळे काँप्रोमाईजेस आहेत.

युनिकोड उत्तम आहे यात वाद नाहीच, पण मग स्वतःचा युनिकोड सपोर्ट अजूनही ऑफिससारख्या लोकांनी का तयार केलेला नाही हे मला तरी न कळणारे कोडे आहे.

.. कदाचित भारतातले साडेबत्त्याण्णव टक्के लोक पायरेटेड सॉफ्टवेअर वापरतात म्हणून असावे Wink

ता.क.
वरची साईट मायक्रोसॉफ्टची आहे असे दिसले. तेव्हा लवकरच अंगचाच इंडिक सपोर्ट येईल असे म्हणायला वाव आहे.

>तेव्हा हे फाँट्स मोबाईलवर नक्कीच दिसतात.
ज्या पद्धतीने अक्षरे दिसत आहेत त्यावरून ते युनिकोड फाँट आहेत हे नक्की. TTF फाँट हे दोन प्रकारचे असतात युनिकोड आणि नॉन युनिकोड. सगळे युनिकोड फाँट, एका फाँट मधून दुसरीकडे टिचकीसरशी बदलता येतात (म्हणूनच त्याना युनीकोड म्हणतात) कारण ते साठवले जाताना सारखेच साठवले जातात.
>युनिकोड सपोर्ट अजूनही ऑफिससारख्या लोकांनी का तयार केलेला नाही हे मला तरी न कळणारे कोडे आहे.
ऑफीस मधे २००० पासून युनिकोड सपोर्ट आहे. म्हणजे युनिकोड फाँट मधे दुसरीकडे कुठेही लिहिलेले (अगदी मायबोली वरचे देखील) ऑफीसमधे copy+paste केले तर दिसते. बराहा चे फाँट युनिकोडच आहेत.

Kruti dev ७१४, ७१६ व ७१७ असे ते .TTF extensionवाले फॉन्टस आहेत.

यात अधिक अभ्यास करायला हवा. मला तरी युनिकोड ट्रू टाईप फॉन्टस असतात हे ठाऊक नव्हते. बघतो. वेळ काढून वाचतो थोडे.

त्यानंतरच्या सगळ्या एडिशन्स विकतच्या होत्या माझ्या आठवणीप्रमाणे.
>>> बरहा ९.२ हे शेवटचं फ्री व्हर्जन होतं. माझ्याकडे आहे.
पण आता ते विंडोज ८.१ मध्ये अधूनमधून वेड्यावेड्यासारखं वागतं. त्यामुळे मी देखील वेगळ्या ऑफलाईन पर्यायाच्या शोधात आहेच. हे भाषाइंडियाचं वापरून बघते.

आपल्या आईने इतका मोठा प्रबंध यात लिहिला याबद्दल अभिनंदन. एक शंका : स्पेल चेक कसा केला?

हे transliteration टूल असल्यामुळे शब्द पूर्ण करून स्पेस देईपर्यंत इंग्रजी अक्षरे दिसत राहतात. त्याची सवय नसल्यामुळे त्रास होतो. Happy

प्रत्येक शब्दासाठी टूलटीप दिसत राहते. त्याचाही त्रास होतो. (कदाचित सवय नसल्यामुळे असेल). दुर्लक्ष करणे हा उपाय आहे. पण ही टीप नको असल्यास थांबवता येते का?

transliteration चा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ऑटो-करेक्ट चालत नाही. उदा. चीकाटीने हा शब्द लिहिला तर तो आपोआप चिकाटीने असा बदलून मिळत नाही. त्यासाठी त्यावर उजवी क्लिक करून पहिला पर्याय निवडावा लागतो. या चित्रात दाखवला आहे तसा.

इतका चांगला पर्याय मोफत उपलब्ध असताना लोकं बराहाच्या पायरेटेड कॉपीसाठी धडपड का करतात? बराहाची नवी / जुनी कोणतीच आवृत्ती मी टेस्ट केलेल्या कोणत्याही संगणकावर नीट चालली नाही.

I have been using pramukhIME for many years. Tiny freestanding exe file. Once opened sits in the system tray. You can switch betn english and marathi using ctrl + (your favorite letter) Also supports all Indian languages. Unlike google input, you can compose nonstandard words easily. Not supported on phone. Thats why this post is in English.
Google it.

मायबोलीवर पोस्ट करण्याआधी पूर्ण लेखाचे स्पेलचेक (व्याकरण्दृष्या चुकीचे शब्द हायलाईट) करण्यासाठी काही टूल आहे का?

मायबोलीची रायटिंग विंडो ऑफलाईनही वापरता येते ना, ती वापरत नाही का ऑफलाईन टंकलेखनासाठी?

हेडरमध्ये दिलेल्या भाषाइंडिया लिंकवरचं टूल वापरून पाहिलं. (Marathi Indic Input 3)
एकूण चांगलं वाटलं, पण त्यात आकडे रोमनच येतात असं दिसलं.
टूलसोबत मिळालेल्या हेल्प-पीडीएफमध्येही आकड्यांबद्दल काहीच लिहिलेलं नाही.

मराठी आकडे लिहिण्यासाठी काय करता?


पण आता ते विंडोज ८.१ मध्ये अधूनमधून वेड्यावेड्यासारखं वागतं.
>>> ओह! मला वाटलं विंडोज ८ /१० वर बराहा ९ चालेल, म्हणून ते शोधत होतो.

Shantanuo , खूप वर्षे वापरले बराहा windows 7 पर्यंत तरी व्यवस्थित चालत होते. असो, आता पर्याय शोधणे आलेच.

जीमेल व मायबोलीच्या टेक्स्ट विंडोमध्ये मराठी टाईप करण्याची आयडिया ठीक वाटली.
"प्रमुख आयएमई" ची ओळख करून दिल्याबद्दल TT यांचे विशेष आभार. भाषा-इंडिया साईटवरील सॉफ्टवेअरमध्ये जाणवलेल्यापैकी एकही अडचण यात आली नाही. प्रमुख सॉफ्टवेअरमध्ये फक्त एकाच फोनेटिक पद्धतीने टाईप करता येते. भाषा-इंडिया इंस्क्रिप्टसह आणखी १ / २ कीबोर्डचा पर्याय देते तसे प्रमुख देत नाही. टीका करायचीच झाली तर इतक्या एकाच मुद्द्यावर करता येईल. प्रमुखचे ऑनलाईन पॅड मी वापरले होते पण या फील्डमध्ये इतकी वर्षे असूनही प्रमुख आयएमई मला माहीत नव्हते याचे आश्चर्य वाटते.

हायझेनबर्ग यांनी विचारले आहे कीः
"पूर्ण लेखाचे स्पेलचेक करण्यासाठी काही टूल आहे का? “
आहे. पण त्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस सारखाच दिसणारा लिबर ऑफिस इंसटोल करावा लागेल. लिबर ऑफिसच्या रायटरमध्ये टूल्स – एक्स्टेंशन विंडोत ऍड पर्याय निवडून खाली दिलेले ऍप जोडून घ्या.
https://extensions.libreoffice.org/extensions/marathi-spellchecker/1.4

हे फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर असून त्यात खालील गोष्टी आहेत. ही फाईल अनझिप केल्यास सोर्स कोड पाहता येईल तसेच त्यात बदलही करता येतील.

1) synonym
समानार्थी शब्द (उदाः अधिकार शब्दाला सत्ता, प्रभुत्व, पद) सुचविले जातील. *
https://s3.amazonaws.com/gamabhana/libre_office_synonym.png

2) spell-check
इंग्रजी सारखा स्पेलचेकः
https://s3.amazonaws.com/gamabhana/libre_office_spell_check.png

3) auto-correct
यात हजारो शब्द आधीच फीड करून ठेवले आहेत. ते शब्द (उदा. चीक़ाटीने / चिकाटीने) आपोआप सुधारले जातात. त्यासाठी एकूण १८ नियम वापरले आहेत, ते येथे पाहता येतील.
https://code.google.com/archive/p/openoffice-marathi-autocorrect/wikis/r...

4) hyphenation
फॉरमॅट - पॅराग्राफ - टेक्स्ट फ्लो टॅब सिलेक्ट केला तर आवश्यक तेथे हायफन वापरला जाईल. या चित्रात दाखविल्याप्रमाणे
http://gamabhana.s3.amazonaws.com/hyphenation.png

5) auto-text
कॅपिटल T टाईप करून F3 की प्रेस केल्यावर खाली दिलेला मजकूर आपोआप टाईप होतो.
आपण पाठविलेल्या पत्रावर कारवाई करण्यासाठी ते सचिवाकडे पाठविण्यात आले आहे. त्यावर काय कारवाई होत आहे हे आपल्याला लवकरच कळविण्यात येईल.
दुसरीकडून कुठून कॉपी पेस्ट करण्याचा त्रास वाचतो. कॅपिटल T1 टाईप करून F3 दिल्यावर बाराखडी लिहून मिळते.
_____
* समानार्थी शब्द या टूलमध्ये जमा करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. Happy

मायबोलीची रायटिंग विंडो ऑफलाईनही वापरता येते ना, ती वापरत नाही का ऑफलाईन टंकलेखनासाठी?<< माबो रायटिंग विंडो ऑफलाइन वापरता येते?
कशी? प्लीज तपशील द्या.
म्याकबुकाने जीव घेतलाय. माबोइतके सोपे काही नाही ऑनलाइनमधे आणि ऑफलाइनमधे बरहा इतके सोपे काही नाही. बरहा म्याकबुकावर चालत नाही. जे चालते ते वेळखाऊ आणि किचकट आहे. बोटांचे कुचिपुडी+कत्थक आहे म्याकबुकातला देवनागरी क्वेर्टी किबोर्ड म्हणजे.

या ऍपमध्ये समानार्थी शब्द (उदाः अधिकार शब्दाला सत्ता, प्रभुत्व, पद) सुचविले जातात हे आपण पाहिले. आता आपण केटेगरी हा शब्द लिहून स्पेलचेक करू. केटेगरी शब्दाला कॅटेगरी असा शब्द उजव्या क्लिकवर मिळाला. या चित्रात दाखविल्याप्रमाणे.

https://s3.amazonaws.com/gamabhana/category.png

आता कॅटेगरी शब्दाला खाली दिलेले ८ समानार्थी मराठी शब्द दाखविण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्याला या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड बदलायचा आहे.

कॅटेगरी
श्रेणी
वर्ग
विभाग
समूह
गट
संघ
कुल
वंश

lib_with_syn.oxt ही फाईल आपण डाऊनलोड केलेलीच आहे. त्यावर उजवी टिचकी मारून अनझिप करा. त्यासाठी 7 zip हे सॉफ्टवेअर वापरा. आता प्रुफींग टूल हे सोफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या. अनझिप करून ते टूल सुरू करा.

http://proofingtoolgui.org/

प्रुफींग टूल्सच्या "thesaurus" टॅब मधील "open" बटणावर क्लिक करून थिसोरस फाईलचा पाथ द्या (th_mr_IN_v2.dat) .

https://s3.amazonaws.com/gamabhana/thesaurus.png

१) ऍड ऑप्शनचा उपयोग करून कॅटेगरी शब्द व त्याचे ८ समानार्थी शब्द जमा करू.
२) हे झाले की thesaurus tools – clean up symbols and fix invalid space हे ऑप्शन वापरा.
३) त्यानंतर combine (one item per line) हा पर्याय निवडा.

https://s3.amazonaws.com/gamabhana/combine.png

४) show / merge duplicates हा पर्याय निवडून ड्युप्लिकेट मर्ज करून घ्या.
५) save बटनावर क्लिक करून फाईल सेव्ह करा.

६) आपले नवीन सॉफ्टवेअर झिप करायचे आहे.

https://s3.amazonaws.com/gamabhana/zip_rename.png

७) एम एस डॉस वापरुन lib_with_syn.zip ही फाईल lib_with_syn.oxt अशी रिनेम करून घ्या.

https://s3.amazonaws.com/gamabhana/rename.png

आपण हे जे नवीन सॉफ्टवेअर बनविले आहे ते writer च्या tools – extensions – add पद्धतीने इन्स्टॉल करा.

"कॅटेगरी" शब्दाला ८ मराठी शब्दांचा पर्याय synonym ऑप्शनमध्ये दिसला तर आपला हा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणता येईल. माझा प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो. Happy

https://s3.amazonaws.com/gamabhana/success.png

यात “विभाग" शब्द आहेच त्यामुळे तो परत जमा करायची गरज नाही. विभाग शब्दाला इतर ८ शब्दांचा पर्याय (कॅटेगरी या शब्दासकट) आपोआप मिळेल. मराठी शब्दाला इंग्रजी शब्दाचा पर्याय सुचविणे अनेकांना कदाचित पटणार नाही. पण सामान्य लोकांना संगणकावर जलद लेखन करण्यास सहाय्यभूत होणारी सुविधा असे मर्यादित उद्दिष्ट आहे. विभाग शब्दाला कोणी "डिपार्टमेंट” असा शब्द सुचविला तर तो शब्द इतर ८ शब्दांना आपोआप मिळणार आहे.

हे सर्व सुरूवातीला क्लिष्ट वाटले तरी एकदा करून पाहिले की मग सोपे वाटेल. प्रत्येकाने आपल्याला हवे ते शब्द जमा केले की ही फाईल माझ्याकडे पाठवू शकता. मी ती मर्ज करून फायनल व्हर्जन सर्वांसाठी उपलब्ध करून देईन.

हे सॉफ्टवेअर वापरुन सरकारी डिपार्टमेंट / डिटीपीची कामे करणारे किंवा भरपूर लेखन करणारे ब्लॉगर्स / मायबोलीकर स्वतःची डिक्शनरी बनवू शकतील.

१) काही शब्द सरकारी धोरणाप्रमाणे लिहावे लागतात. उदा. खेडवळ हा शब्द ग्रामीण असा लिहावा अशी सरकारची अपेक्षा आहे. असे शब्द आपण या सुविधेद्वारे सुचवू शकतो. "अ‍ॅटो करेक्ट" वापरून ते शब्द आपोआप सुधारता येतीलही पण असे करणे लेखकावर अन्याय केल्यासारखे होईल.

सरकारी समितीने शिफारीस केलेले शब्द असे आहेतः

धेडगुजरी : संमिश्र वा संकरित
चांभारचौकशी : नसत्या चौकशा
खेडवळ : ग्रामीण, खेडूत
बाटगा : धर्मांतरीत
खेळखंडोबा : विचका

२) काही इंग्रजी शब्दांना चांगले मराठी शब्द उपलब्ध असून वापरले जात नाहीत. असे शब्ददेखील या सुविधेद्वारे (राईट क्लिकवर) उपलब्ध करून देता येतील. (उदा. कॅटेगरी - श्रेणी)

३) काही चुकीचे शब्द भाषेत इतके रुळले आहेत की ते स्पेल चेक डिक्शनरीत घ्यावेच लागतात. अशा शब्दांना शुद्ध शब्द पर्याय म्हणून न दाखविता समानार्थी म्हणून दाखविता येतील.

४) नुसते पर्यायी शब्द नव्हे तर एकाच कॅटेगरीतले शब्द देखील यात उपलब्ध करून देता येतील. उदाहरण म्हणून मी शेळी, मेंढी, गाढव असे शब्द घेतले आहेत.

१) काही शब्द सरकारी धोरणाप्रमाणे लिहावे लागतात. उदा. खेडवळ हा शब्द ग्रामीण असा लिहावा अशी सरकारची अपेक्षा आहे. असे शब्द आपण या सुविधेद्वारे सुचवू शकतो. "अ‍ॅटो करेक्ट" वापरून ते शब्द आपोआप सुधारता येतीलही पण असे करणे लेखकावर अन्याय केल्यासारखे होईल.
<<
क्क्काय??

काय संबंध? हे शब्द असे "कुठे" लिहायला हवेत असे अपेक्षित आहे? च्याय्ला आदिवासींना वनवासी म्हणून चू बनवायचे धंदे आहेत हे.

अशा सरकारच्या कमरेत लाथ घातली पाहिजे.

सरकारी धोरणाप्रमाणे शब्द? Rofl च्याय्ला! बिग ब्रदर वॉचिंग यू ची हद्द झाली की!!

***

तळ टीप : "कमरेत" हा शब्द "सरकारी धोरणानुसार" लिहिला आहे. लाथ जिथे घालायची तो योग्य अवयव सूज्ञ मायबोलीकरांना ठाऊक आहेच.

लायबर ऑफिस सही वाटते आहे... धन्यवाद शंतनू... वेळ मिळाला की चेक करून बघतोच. ह्याने पूर्ण लेखाची स्पेलचेक होत असेल तर मोठीच सोय होईल.

माबो रायटिंग विंडो ऑफलाइन वापरता येते? कशी? प्लीज तपशील द्या. >> ऑनलाईन असतांना रायटिंग विंडो ऊघडायची आणि ते ब्राऊझर पेज क्लोज न करता कायम ओपन ठेवायचे. ऑफलाईन असतांना त्याच ब्राऊझर पेज मध्ये लिहित रहायचे आणि लिहिलेले वर्ड मध्ये वगैरे सेव करत जायचे. Proud
(तुम्ही ऑफलाईन जातांना लॅपटॉप पावर ऑफ करत असाल तर मग तो पुन्हा ऑन केल्यावर ब्राऊझर ऊघडण्यापुरते वायफाय, हॉट स्पॉट लागेल. एकदा ओप्न केलेल्या विंडो मध्ये नुसते टाईप करत राहण्यासाठी ईंटरनेट कनेक्शन लागत नाही).

२३ जानेवारी २०१० ची म. टा. मधील ही बातमी पहा...
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articl...

त्यावरील चर्चा ऑलरेडी झाली आहे. इथे त्याचे विषयांतर होईल.
http://mr.upakram.org/node/2272

मला जुना विषय उकरायचा नव्हता. तर सरकारला हवे असल्यास असे शब्द समानार्थी म्हणून या डिक्शनरीत जमा करण्याच्या मताशी मी सहमत आहे.

प्रमुख आयएमई या टूलची ओळख झाल्यावर मी भाषा इंडिया काढून टाकले. त्यामुळे त्यात नंबर टाईप होत होते किंवा कसे ते मला सांगता येणार नाही. पण प्रमुख मध्ये १, २, ३, ... ९, ० व्यवस्थित टाईप होत आहेत.

https://www.vishalon.net/pramukhime/windows

प्रमुख आयएमई न वापरण्याचे विशेष कारण?

माझ्या संगणकामध्ये 'Google IME Tool' install आहे. पूर्वी हे download करता येत होते, गेल्या काही महिन्यांपासून हे download साठी उपलब्ध नाही. या 'Google IME Tool' मुळे offline मराठी टंकलेखन (टायपिंग) करता येते तेसुद्धा फोनेटिक पद्धतीने. म्हणजे 'namaskar' असे लिहिल्यावर 'नमस्कार' असा शब्द येतो.

Android मध्ये जसे install केलेल्या app ची apk extractor वापरून पुन्हा apk file बनवता येते तसेच Windows मध्ये install केलेल्या software ची पुन्हा exe file बनवायचा पर्याय असल्यास सांगावा, मग मी माझ्याकडे install असलेल्या Google IME Tool ची exe बनवून पाठवेन.
Google IME Tool.jpg

ऑनलाईन असतांना रायटिंग विंडो ऊघडायची आणि ते ब्राऊझर पेज क्लोज न करता कायम ओपन ठेवायचे. ऑफलाईन असतांना त्याच ब्राऊझर पेज मध्ये लिहित रहायचे>>>

म्हणजे तसे टंकन करेपर्यंत नेट वापर चालूच राहतो ना ? मग ते ऑ फ लाईन कसे ?

भाषा इंडिया मध्ये मराठी आकडे काढण्यासाठी सेटिंग मध्ये जाऊन मराठी कीबोर्ड जोडून घ्यावा लागतो. पण हा आकडेवाला कीबोर्ड इंस्क्रिप्ट आहे. आपण फोनेटिक वापरुन टाईप करत असाल तर केवळ नंबरांसाठी आपल्याला कीबोर्ड बदलावा लागेल. Happy फोनेटिक मध्ये फक्त इंग्रजी आकडेच काढता येतात (ते आपण पाहिलेच आहे @ललिता-प्रीति).

म्हणजे तसे टंकन करेपर्यंत नेट वापर चालूच राहतो ना ?>> नाही
मग ते ऑ फ लाईन कसे ? >> नाही. तुम्ही ब्राऊझरमध्ये ओपन केलेले माबो पेज ईंटरनेट बंद केले (थोडक्यात ऑफलाईन गेलात तरी) ओपनच राहते. पेज ओपन राहण्यासाठी ईंटरनेटची गरज नाही.
तुम्ही जो पर्यंत पेज रिफ्रेश करत नाहीत, किंवा पेजवरचे बटन दाबत नाहीत तोवर ईंटरनेट कनेक्शन नसतांनाही पेज ओपन राहते आणि तुम्ही विंडो मध्ये मराठी टाईप करु शकता.

विक्षिप्त्_मुलगा
Google IME Tool डाऊनलोड साठी पुन्हा ऊपलब्ध झाल्यास ईथे कळवाल का? मीही लक्ष ठेवतोच.

ऑफलाईन असताना चुकून पेज

ऑफलाईन असताना चुकून पेज रिफ्रेश झाले तर लेखन सुविधा आणि त्यात टाईप केलेला मजकूर असे दोन्ही जातील. त्यापेक्षा मायबोलीचे कोणतेही पान (रायटिंग विंडो असलेले) सेव्ह करून घ्या. राईट क्लिकवर (save as – webpage, complete)
Google IME Tool डाऊनलोड साठी पुन्हा उपलब्ध होईल असे वाटत नाही. बराह पुन्हा मोफत मिळेल अशीही आशा नाही. मायबोलीचे पान सेव्ह करून ऑफलाईन वापरणे हा काही खरा उपाय नव्हे. नवीन पर्याय शोधून त्यांच्याशी जुळवून घेणे हेच योग्य आहे.

१) भाषा इंडिया

https://bhashaindia.com/downloads.aspx

२) प्रमुख

https://www.vishalon.net/pramukhime/windows

३) लिबर ऑफिस – आपण जर विंडोज एक्क्सपी अथवा एखादी जुनी वर्जन वापरत असाल तर जुने लिबर ऑफिस टाकावे लागेल (५.०)

https://www.libreoffice.org/download/download/

https://downloadarchive.documentfoundation.org/libreoffice/old/5.0.6.3/win/

४) स्पेल चेक/ ऍटो करेक्ट

https://extensions.libreoffice.org/extensions/marathi-spellchecker/1.4

५) समानार्थी शब्द जमा करणे

http://proofingtoolgui.org/

६) फाईल झिप / अनझिप करणे

https://www.7-zip.org/download.html

विक्षिप्त्_मुलगा
Google IME Tool डाऊनलोड साठी पुन्हा ऊपलब्ध झाल्यास ईथे कळवाल का? मीही लक्ष ठेवतोच.
Submitted by हायझेनबर्ग on 14 September, 2018 - 22:51

नक्कीच! मी तर तेव्हढ्यासाठी PC format मारणे टाळतो आहे.