मराठीवर अजूनही अन्याय होतोच आहे !

Submitted by केअशु on 25 July, 2020 - 05:13

हिंदी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यामधे खडी बोली सर्वात प्रभावी असल्याने तिचा वापरही सर्वाधिक आहे.विशेषत: दिल्लीसारख्या महानगरात आणि आसपासच्या प्रदेशात.
देवनागरी लिपीत ै या दोन मात्रांचा उच्चार ऐ असा केला जातो.पैलवान , दैव इ.
पण याच दोन मात्रांचा खडी बोलीतला उच्चार मात्र इंग्रजीतल्या ॲ सारखा आहे. यामुळे आपल्याला बँकेच्या नावाच्या पाट्यांवर 'बैंक' असे लिहिलेले दिसते.ते आपणा मराठी लोकांच्या दृष्टीने ब+ऐ+न्+क = बैंक असे असले तरी हिंदी भाषिकांच्या दृष्टीने ते ब+ॲ+न्+क = बँक असेच आहे.

स्मार्टफोनवर मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणार्‍या दैनंदिन वापरातल्या दोन भाषांपैकी हिंदी ही मराठीपेक्षा तुलनेने अधिक वापरली जाते.साहजिकच जी भाषा जास्त वापरली जाईल तिच्याकडे अधिक लक्ष हे कळफलक निर्मात्यांकडून दिले जाणार आणि तसेच घडले देखील.

गुगलपोषित इंडीक हा कळफलक स्मार्टफोनवर वापरताना शब्द सुचवणीत अनेकदा चुकीचे शब्द सुचवले जातात. यातले बहुतांश शब्द ॲ किंवा ऑ हा ध्वनी समाविष्ट असणारे आहेत.म्हणजे ॲप , डॉक्टर याऐवजी अँप , डाँक्टर हे पर्याय सुचवले जातात.ॲ ध्वनी असणारे मराठी शब्द गुगल इंडीकवर सहजपणे लिहीता येत नाहीत. ते सहजपणे का लिहिता येत नाहीत किंवा सुचवणीत का सुचवले जात नाहीत हे आता लक्षात येईल.
इंग्रजीतले ॲ आणि ऑ ध्वनी असलेले शब्द अचूक लिहिता येण्यासाठी मराठी भाषेने ॲ आणि ऑ हे दोन ध्वनी या आधीच स्विकारले आहेत.शिवाय आता शाळेतही बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जात आहे.पण ही माहिती गुगलला त्यांच्या मराठी कळफलकासाठी मदत करणार्‍यांनी दिलीच नसावी असे आता वाटते आहे; किंवा त्यांची मराठी कळफलकासाठी मदत करणारी टीम पुरेशी माहितगार नसावी अशी शंका येते आहे.म्हणजे जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमधली एक असणार्‍या मराठीने इंग्रजीतले जे ध्वनी स्विकारले त्याची खबरबातच गुगलला अद्याप नाहीये.

इंडीक कळफलकातला मराठी भाषा वापरातला हा दोष दूर व्हायला हवा. जे शब्द मराठीत नाहीच आहेत ते सोसावे लागतायत.शिवाय यातून अजून एक संदेश जातो तो म्हणजे मराठीला गृहीत धरलं तरी चालतं; किंवा मराठी ही हिंदीची बोलीभाषा आहे वगैरे.
माझ्या कितीतरी दक्षिण भारतीय मित्रांना मला मराठी ही स्वतंत्र भाषा असल्याचं सांगावं लागलं आहे. त्यांच्या मते देवनागरीत फक्त दोनच भाषा लिहिल्या जातात; हिंदी आणि संस्कृत.
असाच गैरसमज गुगलचा व्हायला नको.
गुगल ट्रान्स्लेटरवरही हीच समस्या आहे.मराठीला गृहीत धरले जाते.

मराठीला गृहीत धरणे यापुढे न थांबल्यास मराठीसाठी स्वतंत्र लिपी बनवावी असा विचार कट्टर मराठीप्रेमींकडून लावून धरला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मायबोलीवर असलेल्या टायपिंग सुविधेमधे ही समस्या नाही.
आत्ताच लक्षात आले की लिनक्स वापरत असलेल्या आयबस मधे ही‌ समस्या आहे.

हो.

>>>मराठीवर अजूनही अन्याय होतोच आहे !<<<<,
असे शीर्षक कशासाठी दिले आहे ? कोण काय अन्याय करतो आहे? ........ येऊ द्यात प्रतिसाद

@प्रभुदेसाई धाग्याचा विषय गुगलने बनवलेल्या एक कळफलकातला दोष जो केवळ मराठीला गृहित धरल्याने किंवा त्यांच्या टीमने सदर कळफलकाबाबत पुरेशी काळजी न घेता बनवलेला कळफलक असा आहे.
मराठीबद्दल गळा काढण्यासाठी हा धागा काढलेला नाही.इतके अवांतर प्रतिसाद खरडण्यापेक्षा गुगल इंडीकच्या या दोषाबद्दल फेसबुक किंवा ट्विटरवरुन जनजागृती केली असतीत तर काही कृतीशील केल्याचे समाधान मिळाले असते तुम्हाला.पण तुम्हाला टाईमपास करायचा असल्याने ते होणे नाही.तस्मात चालू द्या.

<मराठीबद्दल गळा काढण्यासाठी हा धागा काढलेला नाही.>

शीर्षकावरून नेमकं तेच वाटतंय

गुगल इंडिक कीबोर्डमध्येही अ‍ॅ असं टाइप करता येत नाही. ते ए वर अर्धचंद्र असंच येतं.

गुगलला हा दोष कळवता येईल का? कसा?

गुगल इंडीक वर मराठीचे दोन कळफलक आहेत.त्यातल्या एका कळफलकावर ही समस्या येते आहे.
ऍप असा शब्दच नाहीये.
@BLACKCAT बोलीभाषेतले शब्द कोणीच मागत नाहीये.पण प्रमाण मराठीने स्विकारलेले शब्द तरी मिळावेत ना सुचवणीत?
डाँक्टर , अँप हे मराठीतल्या कोणत्या बोलीत वापरले जाणारे शब्द आहेत?

गुगल इंडिक कीबोर्डमध्येही अ‍ॅ असं टाइप करता येत नाही.
>>>>>>>

होतं की
माझे होतेय
सेटींग चेक करा लोकहो काही वेगळी ठेवली असल्यास

"ऍप असा शब्दच नाहीये" ------> अगदी बरोबर अॅप असा शब्द आहे.
आणि applications == अनुप्रयोग
Applications = app
आता अनुप्रयोग ला छोटा शब्द तुम्हीच शोधा आणि ठेवा बुवा
डिक्शनरी मध्ये दाखवत आहे.

Blackcat, इंडिक कीबोर्ड (मराठी) वापरून अ‍ॅप लिहीता आलं. मायबोलीच्या अ‍ॅप वर सुद्धा E-p असं लिहीता येतंय.

आपण माझे नाव घेऊन प्रतिसाद दिल्याने लिहावे लागत आहे
१ सर्व प्रथम लेखाचे शीर्षक बदलता येत असेल तर पहा. " गुगल कळ फलकातील त्रुटी" आपली मर्जी.
२ काही वाचकांनी गुगल इंडिका वर फीड बॅक दिला आहे. तो तपासला का ? माझ्याकडे जो कि बोर्ड आहे त्यावर सर्व काही आहे .
3 शेवटी मोडी . त्यामुळे काय फायदा होणार आहे ? हेही स्पष्ट कराल तर बरे होईल .
ह्यावर आपण पॉइंट बाय पॉइंट उत्तरे दिलीत तर प्रश्नच सुटला.

मोबाईल वरून गूगल इंडिक कीबोर्ड आणि जीबोर्ड हे दोन्ही वापरुन पाहिले.
ॲ काही टायपवता आले नाहि बॉ .

गूगल इंडिक कीबोर्ड वर पूर्णविराम (.) नाहीये दंड (।) आहे !

माझ्या फोनवर गुगल इंडिक मराठी कळफलकावर च्नँ सुद्धा आहे. असा कुठला शब्द आहे ज्यात हे जोडाक्षर वापरले आहे?

बरोबर. .माझ्या फोनमध्ये नुसता मराठी आणि हा गुगलवाला मराठी +इंग्रजी कीबोर्ड असे दोन्ही आहेत. मी मराठी कीबोर्ड वापरतो. तो गुगलचा आहे की आणखी कोणाचा ते माहीत नाही. तो गुगल मराठी + इंग्रजी कीबोर्डापेक्षा चांगला आहे.

'अ‍ॅप' अस लिहीता येतय लॅपटॉप वरून
मी लॅपटॉप वरून टाईप करण्यासाठी
आय.एम.ई. व 5.0 हे सॉफ्टवेअर वापरतो
त्याच अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन मिळाल तर बघा

अ‍ॅप टाईप करायला फक्त 'शिफ्ट A' दाबायचं आहे Happy

अन्याय असे नाही मात्र वर लेखात लिहिल्याप्रमाणे गृहीत धरणे, दुर्लक्षित करणे होत आहे. मोबाईलवरून एखादा पॅरा लिहून पहा किती अडचणी आहेत ते. गुगलवर आधी मराठीत सर्च केले की मराठी साईट इत्यदी रिझल्ट दिसायचे. आता पहिली दहा पाने हिंदीच असते. देवनागरी जणू केवळ हिंदीची लिपी आहे असाच विचार दिसतो.

अंतरजालावर मराठीकडे लक्ष देणारे किंवा ती वापरणारे लोक कमी असावेत बहुधा.
जसे टाइप केले तसे पहिला पर्याय म्हणून उमटत नाही. टी (ती) हे नेहमीचेच. शिकतही नाही लवकर. शिवाय कंस, चिहणे ( चिह्ने) हवी असतील तर इंग्रजी abc वर उडी मारावी लागते.

गूगलच्या दोन्ही कीबोर्ड्सना हुसकाऊन लावले फोनातून. आत्तापर्यंतच्या प्रत्येक मोबाईलमधे वापरलेलं प्रमुख कीबोर्ड ॲपच बरं. आकारानं लहान,काहीही माहिती साठवत नाही आणि मुख्य म्हणजे मराठीत कुठलंही अक्षर टायपवता येतं.

>>तो गुगल मराठी + इंग्रजी कीबोर्डापेक्षा चांगला आहे.>>
@भरत. कोणता कीबोर्ड आहे ते जरा शोधून द्या की इथं. वापरून बघता येईल.

>>
‘Users of Marathi, Telugu more digitally engaged than Hindi’
ह्याचा अर्थ असा करता येईल का की मराठी भाषा वापरकर्ते हे हिंदी भाषा वापरकर्त्यांपेक्षा संख्येने जास्त आहेत?

याचा अर्थ असा करता येईल का , की भारतातल्या ११ कोटी ग्राहकांच्या भाषेला योग्य सपोर्ट नाही दिला तरी चालतो?

Pages