https://www.maayboli.com/node/75404 ----> ( भाग १ )
https://www.maayboli.com/node/75434 ----> ( भाग २ )
https://www.maayboli.com/node/75471 -----> ( भाग ३ )
https://www.maayboli.com/node/75498 -----> ( भाग ४ )
https://www.maayboli.com/node/75522 ------> ( भाग ५ )
https://www.maayboli.com/node/75543 -------> ( भाग ६ )
https://www.maayboli.com/node/75574 --------> ( भाग ७ )
अनभिज्ञ
पुरूषोत्तमने तो मेल ओपन केला... नाव वाचून पुरूषोत्तमच्या पायाखालची जमीनच सरकली... मेंदूला मुंग्या आल्या... डोळ्यांसमोर त्या लॅपटॉप च्या उजेडात अंधारी आली... आणि
“आई घातली तू पुरूषोत्तम!!” स्वत:शीच बोलला.
पुरूषोत्तमने लॅपटॉप मध्ये वेळ बघितली ‘4:10’... आणि तो आवरायला तडक बाथरुम मध्ये गेला. ब्रश...प्रात:विधी...अंघोळ... आवरणं वगैरे
केलं.
कुठे निघणार होता पुरूषोत्तम? काय चाललं होत त्याच्या डोक्यात?
आवरून बाहेर आल्यावर पुरूषोत्तमने लॅपटॉप वरच्या मेल च्या विंडो वर नजर फिरवून थरथरत्या हातांनी लॅपटॉप बंद केला...
From :
Saumitra Dani < SaumitraDani411057@gmail.com >
To :
Purushottam Jogalekar < jogalekar.Purushottam@rediffmail.com >
Date: 20 June 2019
Time: 5:30 PM
Sub: विश्वामित्र
आणि ड्रॉव्हर मधली चावी आणि मोबाईल घेऊन तो बाहेर पडला... पहाट उजाडत होती. घरात कुणालाही कल्पना नव्हती पुरूषोत्तम घराबाहेर पडलाय...
पुरूषोत्तमची आई पहाटे पहाटे लवकर उठत असली तरी देखील, ती कधिची आवरुन देवघरात देवाचं करत बसली होती.
इकडे पुरूषोत्तमने गाडी सुरु केली आणि वेगाने कोथरुड मधून बाहेर पडला...
गाडी चालवता चालवता त्याच्या डोक्यातले विचार मेंदूसोबत खेळ खेळत होते. का मारतोय हा खुनी या लोकांना? कोण आहे हा खुनी? काय वाकडं केलय या लोकांनी? का .... ?
आणि याच विचारांत गाडी भरदाव वेगाने धावत होती. तेवढ्यात पुरूषोत्तमचा फोन वाजला...
आँ!! एवढ्या पहाटे? कोण फोन करतय?
पुरूषोत्तमच्या विचारांची तंद्री भंगली आणि शेजारच्या सीटवर हाताने चाचपडत त्याने मोबाईल कसाबसा हातात घेतला. गाडी चालवतच कानाला लावला...
“ पुरूषोत्तम, सो सॉरी अशा वेळी फोन केलाय तुम्हाला मागे बोलले होते ना की निवेदिता ही आर.टी.आय. ची कार्यकर्ती असल्याने ही केस पोलिसांच्या स्पेशल ब्रांच ला हॅन्डओव्हर केलीय आणि त्यांनी सांगितल होतं की हे सिरीअल किलिंगच आहे. पण आता नवी लिड अशी की त्यांनी अजून एक खुलासा केलाय!! हे सिरिअल किलींग ब्राम्हणद्वेषातून झालयं असा त्यांनी निष्कर्ष काढलाय!!”
आश्लेषा कर्णिक बोलतच होती...
“काय?!!!” पुरूषोत्तमचा आश्चर्यवाचक उद्गार...
“पुरूषोत्तम, सो सॉरी या वेळी फोन केलाय!! आम्ही अजुनही मुंबई मध्येच आहोत. भार्गव च्या मावशीकडे...”
आश्लेषा बोलत होती पण... पुरूषोत्तमने फोन कट केला... आणि गाडी चालवण चालूच ठेवलं.
एव्हाना पुरूषोत्तम त्याच्या हिंजवडीच्या ऑफीस च्या वास्तूत आपलं कार्ड फिरवून आला होता. गाडी पार्किंग मधे पार्क केली.
लॅपटॉप उघडला...
पुरूषोत्तमचा धर्माच्या बाबतीत फार काही अभ्यास नव्हता... तरी देखील पुन्हा त्याने जुने मेल्स ओपन केले. आणि थोडीफार माहिती गुगल वर सर्च करून पंधरा मिनीटांत त्याने आश्लेषा कर्णिक ला एक टेक्स्ट मेसेज केला.
TO: आश्लेषा कर्णिक डेकिन
गेल्या काही दिवसांपासून मला काही व्यक्तिंचे सप्तर्षीं च्या नावाचे सब्जेक्ट असलेले मेल्स येत होते. मला रोजच्या व्यापातून याकडे लक्ष देता आलं नाही. आणि आज लक्षात आलय म्हणून एकाचा जीव वाचवायला चाललोय.
जबो ------------------ अ ---------------1
गोरा ------------------ भा ---------------2
चंओ ------------------ गौ ---------------3
निकुं ------------------ ज ----------------4
पवि ------------------ का ----------------5
तिप ------------------ व -----------------6
सौदा ------------------ वि ----------------7
आणि सेंड बटणावर टच केलं. त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली ‘5:19’
“आज मात्र उशीर होणार नाही!!” पुरूषोत्तमने स्वत:च्याच मनाला ठासून सांगितलं.
मोबाईल आणि लॅपटॉप गाडीतल्या सीटवरच टाकून गाडी लॉक करून वार्याच्या चपळाईने लिफ़्ट मधे घुसण्यासाठी पळाला... पहाट असल्याने कोणाचीही शिफ्ट सुरू नव्हती... आणि नाईट शिफ्ट पलीकडच्या बिल्डिंग मध्येच होती.
पुरूषोत्तम च्या नेहमीच्या वर्किंग फ्लोअर वर लिफ्ट चा दरवाजा उघडला... पुरूषोत्तमने केबीनकडे धाव घेतली...
त्याच्या केबीनकडे नाही... त्याच्या बॉस च्या केबीनकडे...
लॉक फिरवून धाड्कन दार उघडलं!! समोरच दृष्य पाहून पुरूषोत्तमला धडकीच भरली...
बॉस उर्फ सौमित्र दाणि समोर चेअर वर बसले होते...टेबलावर डोकं ठेवल होतं... आणि त्यांच्या अंगातून वाफा येत होत्या... शरीर भाजलं गेल होतं... काळसर पडल होतं... गुलाबी त्वचा दिसत होती...
पुरूषोत्तमला काय करावं ते कळेना ...
मुळात काय करावं हे कळायला काय झालयं हे लक्षात याव लागतं!!
पुरूषोत्तम बॉस च्या जळत्या डोक्यापाशी आला. एक मिनीटभर पाहीलं आणि पुरूषोत्तमच्या डोक्यात काय आलं माहीत नाही पण त्याने टेबलावरचा कॉडलेस उचलला आणि आपल्या स्वत:च्या घरी लॅंडलाईनवर फोन लावला.
पुरूषोत्तमच्या आईने फोन उचलला...
“आ...आ...आई...आई आ...पलं…आपलं गो” पुरूषोत्तमने घाबर्या घुबर्या स्वरात विचारलं...
पुरूषोत्तम घामाने नखशिखांत निथळत होता.
“अरे पुरूषोत्तम, काय झालयं बोल ना रे नीट” आई काळजीच्या स्वरात म्हणाली
आईला त्याचा स्वर लक्षात आला होता.
“आई आपलं गोत्र काय आहे?” पुरूषोत्तमने आपला सारा धीर , सारी शक्ति एकवटून विचारलं.
कानात प्राण आणून तिकडून येणार्या उत्तराची वाट पाहू लागला.
“अत्रि!” आई म्हणाली.
पुढच्याच क्षणाला पुरूषोत्तमच्या शर्टात कॉलर आणि मानेच्या गॅप मधून काहीतरी शिरलं...गुळगुळ जाणवाली आणि... सिवीयर शॉक!! पाठीपासून सगळ्या दिशेला पसरत सारं शरीर जाळणारा शॉक! मेंदूचे विचार थांबवणारा शॉक!! हृदयाची धडधड थांबवणारा शॉक!!
पुरूषोत्तमच्या हातातून फोन टेबलवरच पडला...
पुरूषोत्तमने मागे वळून दोन पावलं पुढे टाकली आणि जमिनीवर कोसळला...
त्याला समोरच्या व्यक्तिचा चेहरा दिसला!
पण ओळखीचा वाटला नाही...
कारण शॉकच तेवढा सिवीयर होता. पुरूषोत्तमच शरीर जळत होतं... शरीराच्या आत देखील वेदनांच वादळ उठल होतं... घोंगावत होतं...
पुरूषोत्तमचा देह जमिनीवर पडला... आणि प्राण शरीरातून निघण्यापूर्वी एक ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो त्याच्या डोळ्यांसमोर आला... स्मृति ब्लॉक करणार्या त्या शॉक च्या वेदनांना चिरून आला...
तोच फोटो जो त्याने ज्ञान प्रबोधिनीत असताना पाचवी च्या वर्गाच्या भिंतीवरून बाहेर आलेल्या पट्टीवर पाहिला होता... आणि लाल लाल अक्षरांमध्ये लिहिलेलं नाव...
“भगिनी निवेदिता”
आणि तोंडातून एकदम हळू आवाजात एक नाव बाहेर पडल.
"निवेदिता"
आणि पुरूषोत्तमचे डोळे उघडे ते उघडेच राहीले.
इकडे टेक्स्ट मेसेज वाचल्यावर आश्लेषा ला काहीच अर्थ लागेना... तिने पुरूषोत्तमला खूप कॉल्स केले... पण फोन गाडीत...
आणि पुरूषोत्तम फोन रिसीव्ह करत नाहीये... काहीतरी गडबड आहे या भावनेतून आश्लेषा न राहवून भल्या सकाळी त्या स्पेशल ब्रांच च्या पोलिसांकडे जाण्यासाठी उठली...
खरच कोण करत होतं सगळ? का मारलं या लोकांना? पुरूषोत्तमचा खून हा निव्वळ योगायोग की...
हे कसलं अघटीत काळचक्र सुरू होतं... सुरू होतं का संपल होतं... संपल होतं का पुन्हा नव्याने पुरूषोत्तमच्या ‘अत्रि’ पासून सुरू झालं होतं?
काय मिळणार होतं खुन्याला या सप्तर्षींच्या वंशजांना म्हणजेच त्या सप्तर्षींपैकीची ज्यांची गोत्रे होती... त्यांना मारून... बर आता हे इतके दिवस मुंबई मध्ये सुरू होतं... आता पुण्यात सुरू झाल होतं का... आता कुणाला ‘पुरूषोत्तम जोगळेकर’ या नावाने ‘अत्रि’ सब्जेक्ट असलेला मेल गेला असेल का?
नुसते प्रश्नच प्रश्न!! सगळंच ‘अनभिज्ञ’!!
मग ‘अभिज्ञ’ काय होतं?
सध्या तरी मृत्यु!!
आणि ज्या केबीन मधे पुरूषोत्तम आणि त्याचा बॉस या दोघांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत पडले होते... तिथे एक ऑडिओ टेप वाजली...आणि सारखी रिपीट होत होत राहिली...संस्कृत मधून... सुभाषित अथवा श्लोक अथवा कोणत्यातरी स्तोत्राच्या ओळी?
का पाण्डुपत्नी गृहभूषणं किं रामशत्रुः किमगस्त्यजन्म |
कः सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा कुन्तीसुतो रावणकुम्भकर्णः ||
हे नक्की काय होतं?
पाण्डु , पाण्डुपत्नी म्हणजे कुंती, राम , रामाचा शत्रु रावण, अगस्ती, सूर्य, सूर्याचा पुत्र कर्ण.
एवढ्या सगळ्या व्यक्तिंचा काय संबंध?
का .... ‘किमगस्त्यजन्म’
अगस्ती चा जन्म कसा झाला...
अगस्ती?
प...प...प...पण अगस्ती तर...
समाप्त
©प्रगल्भ कुलकर्णी
(19 जुलै 2020)
[ टीप:- हा भाग @प्रभुदेसाई यांच्या सुचनेवरून सर्वांसाठी खुला ठेवत आहे. आधीचे भाग वाचायचे असल्यास ‘कथा/कादंबरी’ या भागात आपण समाविष्ट व्हावे ही विनंती. सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद... मी काही क्लू दिलेले आहेत या भागात... एका अर्थी हा भाग ‘समाप्त’ च आहे. मी माझा शब्द पाळलाय... पाळतो आहे... पाळणार आहे... सर्व वाचकांचे सहृदय आभार...]
... परत तेच...
... परत तेच...
तुम्हाला तेवढंच का दिसत आहे
मी हे देखील बोललोय की मला काहीतरी वेगळं द्यायचं आहे जे वाचक वाचत आहेत.
मला टीकेची भीती नाही हे तुम्हाला माझ्या सही सकट कशावरही लिहून द्यायला तयार आहे .
काय दळभद्री लिहिलंय अस म्हणा एक वेळ मला आवडेल
पण पाठीमागे थट्टा तरी करू नका किमान
कारण तो डाग माझ्या प्रामाणिक लिखाणावर लागलेला असेल!!
@मी चीनामयी
केमिस्ट्रीचा अभ्यास 2
केमिस्ट्रीचा अभ्यास 2 आठवड्यात झाला
अस्ट्रोनॉमी खोल (आणि उंच सुद्धा !) असल्याने अभ्यासायला 3 आठवडे लागतील.
मी तर म्हणतो तवा तापलाच आहे (बिड ऑर नो बिड) तर गीता, बायबल, कुराण वगैरे उरकून घ्या.
हा हा हा
अरेरे! आताही किस पाडतोय तु.
अरेरे! आताही किस पाडतोय तु. जाऊ दे यु नीड टू ग्रो अप.
मागे कोण एक लेखक होता त्याच्या कथेवरपण काही लोकांनी अगदी खालच्या पातळीवर टिका केलेली अगदी लिहूच नका वैगेरे पण त्या लेखकाने परिस्थिती छान हाताळतली होती आणि मुख्य म्हणजे मुद्देसूद लिहलं होतं कुणालाही न दुखवता. तु इथे माझं, मी , माझी कथा, माझे प्रोब्लेमचा पाल्हाळ लावत अगदी काहीही असंबधित बाष्कळ प्रतिसाद देत सुटला आहेस. कथेबद्दलच स्पष्टिकरण अजुनही दिलं नाहीस.
इकडे खुप मातब्बर वाचकमंडळी आहेत आणि इथे अशा सस्पेन्स कथापण खुप आल्यात..तुला माहित नसावं बहुतेक वरून तु वाचकांनाच दाखवून देतोयस की, तुम्हाला शेवट कळला नाहीतर तु डम्ब आहात वैगेरे.
कथा वाचकांना कळली नाही तर ते तुझं अपयश आहे. तुला नीट हिंट देता आल्या नाहीत हे मान्य कर. फक्त मी लिहली आहे..मी कसा हुषार.. हुषार लोकांनाच माझी कथा कळेल अशा भ्रमात राहू नकोस.
सुरुवातीचे भाग वाचूनच अंदाज
सुरुवातीचे भाग वाचूनच अंदाज आला होता....बरं झालं ही कथा वाचली नाही
अन ते 'हा हा हा हा' तर डोक्यात जातं...इथे स्माईली आहेत त्यासाठी!
@ऋणील
@ऋणील
अत्रि च्या दोन सूचना प्लीज नजरेखालून जाऊ द्यात
दुसऱ्यांना निर्बुद्ध म्हणायला
माझं कर्तृत्व नाही आलाय उजेडात
याची जाण आहे मला...
कॅनडा वासी ऐकावे जरा
स्ट्री िििििििििििििििििििििििििििििििििििििििि
केमिस्ट्री याचा अभ्यास दोन आठवड्यात झाला याचा अर्थ
जे सात खून झाले त्यांना ज्या प्रकारे मारण्यात आलंय त्या विष द्रव्यांची माहिती आणि जाण करून घ्यायला दोन आठवडे लागलेत. काश आपण पूर्ण वाचलं असत...
दुर्दैव!!
@विनिता
स्माईली मला लॅपटॉप वरून टाकता येत नाहीत .
एखाद्याला समजून आणि सांभाळून घ्यायची वृत्ती नष्ट झालीय का काय काय माहित या जगात १९९७ नंतर
मागे एक लेखिका आल्या होत्या.
मागे एक लेखिका आल्या होत्या. आजकाल दिसत नाही फारशा. अशुध्द लेखनात हातखंडा होता त्यांचा. कोणी जर चुक दाखवली तर सरळ धोपटुन काढायच्या त्या.
वाचक आपला बहुमुल्य वेळ घालवुन कथा वाचतात, प्रतिसाद देतात हेच समजत नव्हतं त्यांना.
तात्पर्य: वाचकांच्या सूचनांचा राग मानु नये.
एखाद्याला समजून आणि सांभाळून
एखाद्याला समजून आणि सांभाळून घ्यायची वृत्ती नष्ट झालीय का काय काय माहित या जगात १९९७ नंतर>>> हे जे प्रतिसाद दिसतायत ना तुम्हाला, तो समजून आणि सांभाळून घेण्याचाच प्रकार आहे. पूर्णपणे निग्लेक्ट केलं गेलेलं कितीतरी लिखाण दिसेल तुम्हाला माबोवर. तुमच्यात सुधारणा व्हावी म्हणून लोकं स्वत:चा वेळ घालवुन चार चांगल्या गोष्टी सांगु पाहतायत. पण तुम्ही स्वत:चीच टिमकी वाजवत बसण्यात धन्यता मानताय. आणि मुळात जे टीका करतायत त्यांनीच आधी प्रोत्साहन दिलेलं आहे तुम्हाला हे विसरु नका.
इथे कौतुक आणि टीका/थट्टा सरळ तोंडावरच होते, मागून नाही.
I am sorry
I am sorry
क्षमस्व!
शाळेत १० च्या परीक्षेत लिहिलेल्या निबंधा नंतर मी अत्ता काहीतरी चांगलं वाटेल अस लिहायचा प्रयत्न करत होतो.
"लिहीत रहा" - "लिहीत गेलो"
कळलच नाही आपण अपयशी ठरलो आहोत.
धन्यवाद सर्व वाचकांना. तुम्हाला काहीतरी विचित्र अस वाचावं लागलं...
https://youtu.be/idtILLow7Ww
समोरून येणारा प्रत्येक जण म्हणत असेल
तू चुकीच्या वाटेवर चालला आहेस
तर भले ती वाट योग्य असेल पण
त्या वाटेवरून चालणारा चुकीचाच असतो
मी चुकलो
आता यापुढे जे काही लिहावं वाटेल ते माझ्या डायरीत च लिहीन कवितांसरख ...
वीरू धन्यवाद
राग नाही करायचाय मला कोणत्याही गोष्टीचा पण बास आता कळलं मला...
मी इथे फक्त गझल शिकायला आलो होतो.
ते बाजूलाच राहून गेलं
@भरत धन्यवाद त्या links
बद्दल ...
वैभव जोशी माझा देव,
त्याचा इंटरव्ह्यू बघितला
तो आला म्हणून मी ही आलो
पण तो कोणत्या वेळी आला होता...
तो नोकरी करत असताना २००८ साली आला होता.
त्याच एक वाक्य अजुनही मला आठवतंय
"मी मायबोली वर माझा आय डी तयार केला आणि दोन तीन
दिवसां नंतर घाबरत घाबरतच एक कविता पोस्ट केली"
जिथे देवालाच घाबरत घाबरत पोस्ट करावं लागलं
तिथे त्याच्या भक्ताने निर्भिड असं काहीतरी लिहिणे योग्य नाही
आणि त्यावरून बाकीच्यांशी वाद घालणे ही योग्य नाही.
सॉरी वैभव !!
मी चुकलोय हेच सत्य आहे.
आता तर इथे देवही नाहीये
काही लेखन खुणा शिल्लक आहेत त्याच्या
मग भक्ताने देखील इथे राहणं योग्य नाही.
काळाच्या ओघात धागे विरून जातील...
लुप्त होतील...
मग कशाला हा अट्टाहास लिहिण्याचा...
आता मात्र खरंच पूर्णचंद्र !
नको ते अभिज्ञ वगैरे...
काय आहे त्यात... अनभिज्ञ सारखा कचरा वाचून आधीच त्रास झालाय... गुड बाय...
जाता जाता एक विनंती
नवीन कुणी मायबोली वर लेखन करायला आल्यास
त्याच्या प्रत्येक शब्दाचा शब्दश: अर्थ घेऊ नये कृपया.
काय इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे हे
काय इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे हे
एवढे सगळे लिहीण्यात वेळ घालवण्यापेक्षा कथेचा खुलासा केला असतात, तर वाचक पण खूष झाले असते. त्यांचा वेळ वाया घालवलात.
नकाच लिहू इथे, असं अर्धवट टाकून जाण्यापेक्षा!
एक से बढकर एक प्रकार चालतात
एक से बढकर एक प्रकार चालतात माबो वर!
वाचलो मी आधी प्रतिसाद
वाचलो मी आधी प्रतिसाद वाचल्यामुळे. आजच वाचायला सुरुवात करणार होतो . हहाहाहा
दुष्ट दुष्ट लोक आहेत इथे....
प्रतिसाद पे प्रतिसाद. .
VB, प्रतिसाद खरचं भारी देतात
VB, खरचं भारी प्रतिसाद देतात लेखक महाशय
प्रतिसादांची वाढती (आणि
प्रतिसादांची वाढती (आणि वाढवून घेतलेली) संख्या पाहुन ह्या गुण विशेषानुसार आता फक्त कोण ड्यू कोणाचा ड्यू ची हुतुतु रंगली की झालीच सेंच्युरी
------------
वेटिंग फॉर अभिज्ञ
@विनीता.झक्कास तुम्हाला
@विनीता.झक्कास तुम्हाला तुमच्या अकादमी करता नाव हवं होत ना?
"जयतीर्थ" बघा कस वाटतय...
एक फिलॉसॉफर होता!
तुमचा तो धागा नाही सापडला म्हणून इकडे...
बेटा जहाँ आई चेमिस्ट्री वहा
बेटा जहाँ आई केमिस्ट्री वहा आया एक्ससेप्शन
जितू भैया सांगून गेलेत.
सुरुवातीचे भाग वाचूनच अंदाज
सुरुवातीचे भाग वाचूनच अंदाज आला होता....बरं झालं ही कथा वाचली नाही Happy
अन ते 'हा हा हा हा' तर डोक्यात जातं...इथे स्माईली आहेत त्यासाठी!
Submitted by विनिता.झक्कास on 24 July, 2020 - 03:46
>>> तुमचे पहिले वाक्य - बरे झाले कथा वाचली नाही तुम्ही फक्त लेखकाला वाईट वाटावे म्हणून लिहिली आहे.... तुमची इच्छा - पण खरंच गरज होती का?
लेट्स बी काईन्ड टु इच अदर प्लिज...
नवीन माणसाला स्मायली कशा द्यायच्या माहित नसते... मलाही बरेच दिवस लागले समजायला..
लेखक - हा धागा बघा - स्मायली कशा द्यायच्या ते...
https://www.maayboli.com/node/1818
@च्रप्स हा! हा! हा!
@च्रप्स हा! हा! हा!
एक मनापासून सांगतो
मी किती जरी चिडलो , धुसफुसलो, भांडलो तरी मला मायबोली च अकाउंट डिअक्टीवेट करता येत नाही हे जितकं खर आहे
तितकच हे ही खरय की मी जास्त काळ मायबोली पासून लांब राहू शकत नाहि हा हा हा
मी स्वतः ला कितिही बदलवल तरी ते " हा हा हा " मला बन्द नाही करता येणार
कॅज्युल चाट ची जुनी सवय आहे
मी किती जरी चिडलो , धुसफुसलो,
मी किती जरी चिडलो , धुसफुसलो, भांडलो तरी मला मायबोली च अकाउंट डिअक्टीवेट करता येत नाही हे जितकं खर आहे
>>> ते कोणालाही स्वतःहून डी activate करता येत नाही...
एक लक्षात घ्या- इस मायबोलीपे इन्सान आता अपनी मर्जी से है... लेकिन जाता सिर्फ और सिर्फ ऍडमिन/ वेमा कि मर्जी से....
@च्रप्स
@च्रप्स
प्रयत्न करतो सुखाने ( शांततेने ) नांदायचा हा! हा! हा!
धन्यवाद ते डीअॅक्टिव्हेट च ग्यान दिल्याबद्दल
किबोर्ड ने दगा दिलाय नाहीतर ग्यान मराठीत लिहीनार्च होतो
च्रप्स, पहीले काही भाग मी
च्रप्स, पहीले काही भाग मी वाचलेत, रिपीटेशन पाहून मी तसा प्रतिसाद दिला होताच, त्यावर लेखक महाशयांनी 'हे अजून काही भाग असेल.' असेच उत्तर दिले होते,. मला ते रिपिटेशन वाचायची इच्छा नव्हती, तेव्हडा वेळ पण नव्हता.
शेवटचा भाग वाचूया म्हटले, तर तो अजूनच कन्फ्यूजींग! बरं नाही कळले वाचकांना तर लेखक उलगडा करतात. मायबोलीवर हे बघितले आहे.
पण उलगडा कराण्याऐवजी त्यांनी जो काही इमोशनल ड्रामा केला, तो खरंच गरजेचा होता का?
मी नेहमीच नवीन लेखकांना प्रोत्साहन दिले आहे. पण इथे त्याची गरज नव्हती, तर लेखकाला कोणीतरी आवरायचीच गरज होती.
मला नाही वाटत, मी काही चुकीचा प्रतिसाद दिलाय.
नवीन माणसाला स्मायली कशा द्यायच्या माहित नसते >> त्यांना माहीत नव्हते असे नाही, लॅपीवरुन देता येत नाहीत असे ते म्हणालेत.
प्रगल्भ, नाव सुचवल्याबद्द्ल धन्यवाद __/\__
@विनिता.झक्कास उलगडा हा
@विनिता.झक्कास उलगडा हा संपल्यावर करतात.... मी सांगितलय ना अभिज्ञ लिहीणार आहे त्यात होईल सगळं...
आणी जर इतकच आवरायच असेल तर दुसर्यांनी सुद्धा प्रयत्न केले असते... पण दे हॅव शोन पेशन्स इव्हन अफ्टर आय सेड...
इमोशन ड्रामा करायची गरज असेल नसेल नाही माहित
मी त्या वेळी जे आतून वाटल ते बोललो... मला खरच वाटल होत डी-अॅक्टीव्हेट करावं!
पण ती सुविधा नाहीये मी खुप शोधलं काल
तुम्ही मान्य करता की 'असूर' काहीच कळली नाही.
मग, काहीच न कळलेली 'असूर' पचू शकते
तर काहीच न कळलेली 'अनभिज्ञ' का नाही?????
इव्हन 'असूर' ने दुसरा सीजन
इव्हन 'असूर' ने दुसरा सीजन डिक्लेअर केलेला नाहीये ऑफिशीअलि
पण मी बोललोय अभिज्ञ सप्टेंबर मध्ये रिलीज होईल इथे माबो वर !!
"रिपीटेशन पाहून मी तसा
"रिपीटेशन पाहून मी तसा प्रतिसाद दिला होताच, त्यावर लेखक महाशयांनी 'हे अजून काही भाग असेल." ----> ऑफिस ते घर हे रिपीट व्हायच राजमान्य!!
पण रोज उठून वेगळ्या ऑफिस ला जाणारा मनुष्य माझ्या दृष्टीस नाही पडला अजून

कमेट्स मधे आलेल्या सुचनांवरून नंतरच्या भागात बदलवणयाचा प्रयत्न केला!!.... की नाही!!
रिपीट होतं म्हणल्यावर क्षिप्रा आणी पुरू दोन अजून कलिग्स सोबत लोणावळ्याला गेले की नाही
मी आधी हे मान्य करतो की
मी आधी हे मान्य करतो की पहिल्या प्रयत्नाच्या मानानं लिहिलंय छान. पण लेखन पटलं नाही.
खरं तर अनभिज्ञच्या पहिल्या भागाच्या सुरूवातीला दिलेल्या सूचना वाचल्यानंतर पुढं वाचायची इच्छाच झाली नाही.
(सुचना 1: लेखकाचा पहिलाच प्रयत्न आहे...कथा/कादंबरी लेखन म्हणून...अवास्तव अपेक्षा कृपया ठेवू नयेत. टायपिंग मिस्टेक्स आढळल्यास माफ करणे...लॅपटॉप कारणीभूत...)
(सूचना2: यातील व्यक्तिंचा शोध घेण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये आणि यातील इमेल्स वर कोणतेही संंदेश पाठवण्याचा फालतू प्रयत्न करू नये!!)
हे वाचल्यावर वाटलं ‘मी असा फालतूपणा केला तर काय?’ त्यापेक्षा वाचूच नये असा विचार केला.
पण आज आठव्या भागावर ८० प्रतिसाद पाहिले आणि मी पण सारे भाग वाचले.
त्या दोन सूचनांचा परत उल्लेख लेखकानं प्रतिसादात केला आहे. हसू आलं खरं तर. ईमेल पाठवून फालतूपणा नाही केला याबद्दल माबोकरांचा अभिमान पण वाटला.
मुख्य म्हणजे लिखाण हे स्वान्त सुखाय असलेलं बरं. जे मनात आलं ते लिहून मोकळं व्हायचं. नंतर मनाला पटलं तर इतरांसाठी खुलं करावं. मग येणा-या ब-या-वाईट प्रतिक्रियांचे धनी आपण. तिथं चिडचिड / अनाठायी अपेक्षा काय कामाच्या?
‘त्या’ दोन सूचना आणि लेखकाच्या ब-याच प्रतिक्रिया अगदी अंगावर येतात. सारे ‘तानसेन’ नसले तरी ‘कानसेन’ असू शकतात.
ज्या स्पष्टपणे तुम्ही लेखक म्हणून आम्हाला सूचना देता, त्याच स्पष्टपणे (आणि सूचना क्र. १ चं उल्लंघन करून) न पटलेल्या गोष्टी सांगतोय.
विषांबद्दल माहिती कमी पडली. नुसती वेगवेगळ्या विषांची नावं कथेत टाकून उपयोग नाही.
न्यायवैद्यक शास्त्र हा खूप गहन विषय आहे. थोडं ते पाहायला हवं.
विषबाधा झाल्यानंतर एकाही व्यक्तीनं औषधोपचार घेतला नाही. का बरं?
गुन्ह्यांचा तपास असा करत नाहीत. हसू आलं वाचून. इतक्या बाल्यावस्थेत नाही आहे हो आपलं पोलिस खातं.
एवढे खून होईपर्यंत नायकाला समजू नये हे अफाटच. ज्या पद्धतीनं इमेल्स येत होत्या त्याचा विचार केला तर २ किंवा फार फार तर ३ मेल्स खूप झाल्या समजण्यासाठी.
सौमित्र दाणींचा खून होईल असं वाटल्यावर तो संदिग्ध मेसेज पाठवतो आश्लेषा कर्णिकला. पोलिसांना किंवा सौमित्र दाणींनाच का फोन करत नाही?
‘हे सिरिअल किलींग ब्राम्हणद्वेषातून झालंय’ हे पहाटे पाच वाजता पोलिस आश्लेषा कर्णिकला सांगतात?
शेवटचे खून तर अगदीच पटले नाहीत बुवा. असे कसे जळाले?
असो. खूप चिरफाड होते आहे असं वाटतंय.
पटलं तर घ्या बुवा.
"पोलिसांना किंवा सौमित्र
"पोलिसांना किंवा सौमित्र दाणींनाच का फोन करत नाही?" ---> बॉस ला फोन नाही केला गेला ओके हो ही चुकच झाली , अत्ता आल लक्शात , धन्यवाद सर!!.... बॉस ला फिजीकली स्पॉट वर भेटूनच वाचवायच असेल... ( सारवासारव हा! हा! हा! .... पटलं तर घ्या
)
पोलिस स्टेशन बंद असतील असं वाटल पुरु ला आणि क्षिप्रा - पुरू च ही संभाषण अर्धवट झालेलं दाखवण्यात आलेल आहे ... कार चालवत असल्यामुळे
सगळी वापरण्यात आलेली विषद्रव्ये अतिशय जहाल होती आणी ज्या ज्या लोकांवर वापरण्यात आली ती सगळी 'लोन' होती ठराविक काळ/दिवदिवसांसाठी
ट्रीटमेंट घ्यायला स्लो पॉइजन नव्हतं माफी असावी
बाकीच सगळ पटलय... अभिग्य मधे प्रयत्न करतो कमी तक्रारी येतील

धन्यवाद मनापासून
अरिष्ट्नेमी आपण माबो चे वन ऑफ द सिनीअर मेंबर...
खूप छान वाटतयं
यापुढे माझी उत्तरे अंगावर न येण्याचा प्रयत्न करेन !!
@मी_चीन्मयी तुमचं देखील पटल
@मी_चीन्मयी तुमचं देखील पटल , माबो वरची पुर्णपणे निग्लेक्टेड लिखाणकामे सापडली , वाचली काल आणि आज सकाळी
धन्यवाद त्यासाठी
उलट उत्तरे न देता , स्वतःची टिमकी न वाजवता पुढील लिखाणकामे व्हावीत ही देवाला प्रार्थना!
मी करेन प्रयत्न ...
उलगडा हा संपल्यावर करतात....
उलगडा हा संपल्यावर करतात.... मी सांगितलय ना अभिज्ञ लिहीणार आहे त्यात होईल सगळं... >> मग हे ह्या कथेच्या सुरुवातीलाच सांगायचे होते. ही मालीका तर संपलीच ना?
आणी जर इतकच आवरायच असेल तर दुसर्यांनी सुद्धा प्रयत्न केले असते... पण दे हॅव शोन पेशन्स इव्हन अफ्टर आय सेड... >> बरेच जणांनी तुम्हाम्ला चाम्गले सल्ले दिलेत, त्यालाच आवरणे म्हणतात
तुम्ही मान्य करता की 'असूर' काहीच कळली नाही.
मग, काहीच न कळलेली 'असूर' पचू शकते >> मी पचवलीये असे मी कुठे म्हटलेय?...आणि कृपया दुसर्या धाग्यावरचे प्रतिसाद तिसर्या धाग्यावर आणू नका.
आणी तसे ही हा तुम्हांला माझा शेवटचा प्रतिसाद...तुमच्याकडेच खूप वेळ असेल, माझ्याकडे नाहीये __/\__
माझ्यासारखी हायबरनेशन मध्ये
माझ्यासारखी हायबरनेशन मध्ये गेलेली व्यक्तिमत्वे पुन्हा ऍक्टिव्हेट करण्याचं घोर पाप तुम्ही केलंय. ८८ प्रतिसाद पाहून कथा वाचली. अर्थात सुरुवातीचे काही भाग वाचून कथेचा एकंदर आवाका एक चिमणी आली, दाणा घेऊन उडून गेली टाईप असल्याने, आणि त्यावरचे लेखकाचे उद्दाम/ उर्मट प्रतिसाद वाचल्याने पुढचे काही वाचायचे सोडून दिले होते. पण ह्या धाग्यावर इतकं काय चाललंय बघून पुन्हा पूर्ण कथा वाचून स्वतःचा वेळ वाया घालवला. डिटॉक्स म्हणून कौतुक शिरोडकर, कवठीचाफा, बेफिकीर, विशाल कुलकर्णीचे उत्खनन करून (https://www.maayboli.com/node/55370) त्यान्ना वाचावे लागले. आता मुद्देसूद:
१. सर्वप्रथम कथा: वर लिहिल्याप्रमाणे कथेचा "एकंदर आवाका एक चिमणी आली, दाणा घेऊन उडून गेली" इतकाच आहे. तुम्ही विनिता झक्कास यांना दिलेल्या उत्तरात जे व्हेरिएशन म्हणत आहात, ते फार तर "दोन चिमण्या आल्या आणि दाणा घेऊन उडून गेल्या" इतकेच आहे. माझ्या अंदाजाने एक तर तुमच्या डोक्यातच कथा तयार नव्हती, लिहायचं म्हणून लिहीत गेलात आणि वाचकांचा हिरमोड केलात. नसेल जमत तर तस सांगून (writers ब्लॉक म्हणतात त्याला) ब्रेक घ्यायला हरकत नव्हती,
२. कातडीबचाव धोरणातून अनेक वाचकांना तुम्ही दुखावलेत. शिवाय जे थोडे लोक प्रामाणिक प्रतिसाद देतात त्यांना देखील तुम्ही उर्मट प्रत्युत्तरे केलीत. बोनेट मकाकू म्हणतं माझीच लाल हि म्हण तुम्हाला चपखल बसते.
३. अभ्यास खूप खूप कमी पडला कथेच्या मानाने. तशी लेखनासाठी किती मेहनत घेता तुम्ही ते तुमच्या कवी अनिल/ ग्रेस धाग्यांवरून लक्षात आलं होतं. बरं वर अरिष्टनेमीनी तुम्हाला तसं सांगितलं तर तुम्ही त्यांनाही अतिशय उद्दाम प्रतिसाद <<ट्रीटमेंट घ्यायला स्लो पॉइजन नव्हतं माफी असावी>> दिलात. विकिपीडिया वाचून लेख पाडण्याइतका आत्मविश्वास येतो कुठून? आणि कवी अनिल धाग्यावर तर कहर! टोटल वकिली पलटी? चुकलं तर ते मान्य करण्यात कोणताही कमीपणा नाही. हि गोष्ट जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येईल तेवढे लवकर सुधारणा कराल अशी अपेक्षा.
४. लिखाणाची हातोटी आहे तुमच्याकडे. उद्दामपणा आणि बॉनेट मकाकू धोरण कमी केलंत तर तुमचाच फायदा आहे. आणि हो, नुसतं ताई दादा म्हणून भागत नाही. प्रतिसाद देताना/ लिहिताना इतरांचा उल्लेख करण्याचा एक अलिखित संकेत आहे. जमले तर तो पाळण्याचा प्रयत्न करा. उगाच सलगीत घुसणारी लोकं सर्वांना आवडत नाहीत, आणि आवडलं नाही असं सांगायलाही त्यांना संकोच वाटतो.
५. प्रत्येक प्रतिसादाला स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा वर ठेवण्याचे कौशल्य आता कालबाह्य झालेले आहे. लोकांना कळत नाही असे नाही. एकाखाली एक स्वतःच प्रतिसाद देण्याऐवजी एकाच प्रतिसादातून तुम्ही तुमचा उर्मटपणा आणि बॉ.म. धोरण व्यवस्थित राबवू शकता. २४ जुलै पासून सलग २० च्यवर प्रतिसाद आहेत तुमचे एकाखाली एक! स्टोरेज लिमिटमुळे मायबोलीवरचे जुने लेखन उडवावे लागलेले आहे (बहुतेक) त्यात असली तद्दन फालतुगिरी करून अजून जागा खाऊ नका.
जाता जाता
जाता जाता
अनभिज्ञ(८) : अनभिज्ञ या कथेच्या शेवटी " समाप्त" असे लिहिले आहे.
कदाचित चूक झाली असावी त्यांची
का पाण्डुपत्नी गृहभूषणं किं रामशत्रुः किमगस्त्यजन्म |
कः सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा कुन्तीसुतो रावणकुम्भकर्णः ||
हे नक्की काय होतं?
पाण्डु , पाण्डुपत्नी म्हणजे कुंती, राम , रामाचा शत्रु रावण, अगस्ती, सूर्य, सूर्याचा पुत्र कर्ण.
एवढ्या सगळ्या व्यक्तिंचा काय संबंध?
का .... ‘किमगस्त्यजन्म’
अगस्ती चा जन्म कसा झाला...
अगस्ती?
प...प...प...पण अगस्ती तर...
समाप्त
>>>एवढ्या सगळ्या व्यक्तिंचा काय संबंध?<<,<
खरच कशाचा कशाशी काय संबंध?
>>>> हे नक्की काय होतं?<<<<<
खरच हे नक्की काय होतं?
Pages