अनभिज्ञ(८) : अनभिज्ञ

Submitted by प्रगल्भ on 19 July, 2020 - 07:57

https://www.maayboli.com/node/75404 ----> ( भाग १ )

https://www.maayboli.com/node/75434 ----> ( भाग २ )

https://www.maayboli.com/node/75471 -----> ( भाग ३ )

https://www.maayboli.com/node/75498 -----> ( भाग ४ )

https://www.maayboli.com/node/75522 ------> ( भाग ५ )

https://www.maayboli.com/node/75543 -------> ( भाग ६ )

https://www.maayboli.com/node/75574 --------> ( भाग ७ )

अनभिज्ञ

पुरूषोत्तमने तो मेल ओपन केला... नाव वाचून पुरूषोत्तमच्या पायाखालची जमीनच सरकली... मेंदूला मुंग्या आल्या... डोळ्यांसमोर त्या लॅपटॉप च्या उजेडात अंधारी आली... आणि

“आई घातली तू पुरूषोत्तम!!” स्वत:शीच बोलला.

पुरूषोत्तमने लॅपटॉप मध्ये वेळ बघितली ‘4:10’... आणि तो आवरायला तडक बाथरुम मध्ये गेला. ब्रश...प्रात:विधी...अंघोळ... आवरणं वगैरे
केलं.

कुठे निघणार होता पुरूषोत्तम? काय चाललं होत त्याच्या डोक्यात?

आवरून बाहेर आल्यावर पुरूषोत्तमने लॅपटॉप वरच्या मेल च्या विंडो वर नजर फिरवून थरथरत्या हातांनी लॅपटॉप बंद केला...

From :
Saumitra Dani < SaumitraDani411057@gmail.com >

To :
Purushottam Jogalekar < jogalekar.Purushottam@rediffmail.com >

Date: 20 June 2019

Time: 5:30 PM

Sub: विश्वामित्र

आणि ड्रॉव्हर मधली चावी आणि मोबाईल घेऊन तो बाहेर पडला... पहाट उजाडत होती. घरात कुणालाही कल्पना नव्हती पुरूषोत्तम घराबाहेर पडलाय...

पुरूषोत्तमची आई पहाटे पहाटे लवकर उठत असली तरी देखील, ती कधिची आवरुन देवघरात देवाचं करत बसली होती.

इकडे पुरूषोत्तमने गाडी सुरु केली आणि वेगाने कोथरुड मधून बाहेर पडला...

गाडी चालवता चालवता त्याच्या डोक्यातले विचार मेंदूसोबत खेळ खेळत होते. का मारतोय हा खुनी या लोकांना? कोण आहे हा खुनी? काय वाकडं केलय या लोकांनी? का .... ?

आणि याच विचारांत गाडी भरदाव वेगाने धावत होती. तेवढ्यात पुरूषोत्तमचा फोन वाजला...

आँ!! एवढ्या पहाटे? कोण फोन करतय?

पुरूषोत्तमच्या विचारांची तंद्री भंगली आणि शेजारच्या सीटवर हाताने चाचपडत त्याने मोबाईल कसाबसा हातात घेतला. गाडी चालवतच कानाला लावला...

“ पुरूषोत्तम, सो सॉरी अशा वेळी फोन केलाय तुम्हाला मागे बोलले होते ना की निवेदिता ही आर.टी.आय. ची कार्यकर्ती असल्याने ही केस पोलिसांच्या स्पेशल ब्रांच ला हॅन्डओव्हर केलीय आणि त्यांनी सांगितल होतं की हे सिरीअल किलिंगच आहे. पण आता नवी लिड अशी की त्यांनी अजून एक खुलासा केलाय!! हे सिरिअल किलींग ब्राम्हणद्वेषातून झालयं असा त्यांनी निष्कर्ष काढलाय!!”

आश्लेषा कर्णिक बोलतच होती...

“काय?!!!” पुरूषोत्तमचा आश्चर्यवाचक उद्गार...

“पुरूषोत्तम, सो सॉरी या वेळी फोन केलाय!! आम्ही अजुनही मुंबई मध्येच आहोत. भार्गव च्या मावशीकडे...”
आश्लेषा बोलत होती पण... पुरूषोत्तमने फोन कट केला... आणि गाडी चालवण चालूच ठेवलं.

एव्हाना पुरूषोत्तम त्याच्या हिंजवडीच्या ऑफीस च्या वास्तूत आपलं कार्ड फिरवून आला होता. गाडी पार्किंग मधे पार्क केली.

लॅपटॉप उघडला...

पुरूषोत्तमचा धर्माच्या बाबतीत फार काही अभ्यास नव्हता... तरी देखील पुन्हा त्याने जुने मेल्स ओपन केले. आणि थोडीफार माहिती गुगल वर सर्च करून पंधरा मिनीटांत त्याने आश्लेषा कर्णिक ला एक टेक्स्ट मेसेज केला.

TO: आश्लेषा कर्णिक डेकिन

गेल्या काही दिवसांपासून मला काही व्यक्तिंचे सप्तर्षीं च्या नावाचे सब्जेक्ट असलेले मेल्स येत होते. मला रोजच्या व्यापातून याकडे लक्ष देता आलं नाही. आणि आज लक्षात आलय म्हणून एकाचा जीव वाचवायला चाललोय.

जबो ------------------ अ ---------------1
गोरा ------------------ भा ---------------2
चंओ ------------------ गौ ---------------3
निकुं ------------------ ज ----------------4
पवि ------------------ का ----------------5
तिप ------------------ व -----------------6
सौदा ------------------ वि ----------------7

आणि सेंड बटणावर टच केलं. त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली ‘5:19’

“आज मात्र उशीर होणार नाही!!” पुरूषोत्तमने स्वत:च्याच मनाला ठासून सांगितलं.

मोबाईल आणि लॅपटॉप गाडीतल्या सीटवरच टाकून गाडी लॉक करून वार्‍याच्या चपळाईने लिफ़्ट मधे घुसण्यासाठी पळाला... पहाट असल्याने कोणाचीही शिफ्ट सुरू नव्हती... आणि नाईट शिफ्ट पलीकडच्या बिल्डिंग मध्येच होती.

पुरूषोत्तम च्या नेहमीच्या वर्किंग फ्लोअर वर लिफ्ट चा दरवाजा उघडला... पुरूषोत्तमने केबीनकडे धाव घेतली...

त्याच्या केबीनकडे नाही... त्याच्या बॉस च्या केबीनकडे...

लॉक फिरवून धाड्कन दार उघडलं!! समोरच दृष्य पाहून पुरूषोत्तमला धडकीच भरली...

बॉस उर्फ सौमित्र दाणि समोर चेअर वर बसले होते...टेबलावर डोकं ठेवल होतं... आणि त्यांच्या अंगातून वाफा येत होत्या... शरीर भाजलं गेल होतं... काळसर पडल होतं... गुलाबी त्वचा दिसत होती...

पुरूषोत्तमला काय करावं ते कळेना ...

मुळात काय करावं हे कळायला काय झालयं हे लक्षात याव लागतं!!

पुरूषोत्तम बॉस च्या जळत्या डोक्यापाशी आला. एक मिनीटभर पाहीलं आणि पुरूषोत्तमच्या डोक्यात काय आलं माहीत नाही पण त्याने टेबलावरचा कॉडलेस उचलला आणि आपल्या स्वत:च्या घरी लॅंडलाईनवर फोन लावला.

पुरूषोत्तमच्या आईने फोन उचलला...

“आ...आ...आई...आई आ...पलं…आपलं गो” पुरूषोत्तमने घाबर्‍या घुबर्‍या स्वरात विचारलं...

पुरूषोत्तम घामाने नखशिखांत निथळत होता.

“अरे पुरूषोत्तम, काय झालयं बोल ना रे नीट” आई काळजीच्या स्वरात म्हणाली

आईला त्याचा स्वर लक्षात आला होता.

“आई आपलं गोत्र काय आहे?” पुरूषोत्तमने आपला सारा धीर , सारी शक्ति एकवटून विचारलं.
कानात प्राण आणून तिकडून येणार्‍या उत्तराची वाट पाहू लागला.

“अत्रि!” आई म्हणाली.

पुढच्याच क्षणाला पुरूषोत्तमच्या शर्टात कॉलर आणि मानेच्या गॅप मधून काहीतरी शिरलं...गुळगुळ जाणवाली आणि... सिवीयर शॉक!! पाठीपासून सगळ्या दिशेला पसरत सारं शरीर जाळणारा शॉक! मेंदूचे विचार थांबवणारा शॉक!! हृदयाची धडधड थांबवणारा शॉक!!

पुरूषोत्तमच्या हातातून फोन टेबलवरच पडला...

पुरूषोत्तमने मागे वळून दोन पावलं पुढे टाकली आणि जमिनीवर कोसळला...

त्याला समोरच्या व्यक्तिचा चेहरा दिसला!

पण ओळखीचा वाटला नाही...

कारण शॉकच तेवढा सिवीयर होता. पुरूषोत्तमच शरीर जळत होतं... शरीराच्या आत देखील वेदनांच वादळ उठल होतं... घोंगावत होतं...

पुरूषोत्तमचा देह जमिनीवर पडला... आणि प्राण शरीरातून निघण्यापूर्वी एक ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट फोटो त्याच्या डोळ्यांसमोर आला... स्मृति ब्लॉक करणार्‍या त्या शॉक च्या वेदनांना चिरून आला...

तोच फोटो जो त्याने ज्ञान प्रबोधिनीत असताना पाचवी च्या वर्गाच्या भिंतीवरून बाहेर आलेल्या पट्टीवर पाहिला होता... आणि लाल लाल अक्षरांमध्ये लिहिलेलं नाव...

“भगिनी निवेदिता”

आणि तोंडातून एकदम हळू आवाजात एक नाव बाहेर पडल.

"निवेदिता"

आणि पुरूषोत्तमचे डोळे उघडे ते उघडेच राहीले.

इकडे टेक्स्ट मेसेज वाचल्यावर आश्लेषा ला काहीच अर्थ लागेना... तिने पुरूषोत्तमला खूप कॉल्स केले... पण फोन गाडीत...
आणि पुरूषोत्तम फोन रिसीव्ह करत नाहीये... काहीतरी गडबड आहे या भावनेतून आश्लेषा न राहवून भल्या सकाळी त्या स्पेशल ब्रांच च्या पोलिसांकडे जाण्यासाठी उठली...

खरच कोण करत होतं सगळ? का मारलं या लोकांना? पुरूषोत्तमचा खून हा निव्वळ योगायोग की...

हे कसलं अघटीत काळचक्र सुरू होतं... सुरू होतं का संपल होतं... संपल होतं का पुन्हा नव्याने पुरूषोत्तमच्या ‘अत्रि’ पासून सुरू झालं होतं?

काय मिळणार होतं खुन्याला या सप्तर्षींच्या वंशजांना म्हणजेच त्या सप्तर्षींपैकीची ज्यांची गोत्रे होती... त्यांना मारून... बर आता हे इतके दिवस मुंबई मध्ये सुरू होतं... आता पुण्यात सुरू झाल होतं का... आता कुणाला ‘पुरूषोत्तम जोगळेकर’ या नावाने ‘अत्रि’ सब्जेक्ट असलेला मेल गेला असेल का?

नुसते प्रश्नच प्रश्न!! सगळंच ‘अनभिज्ञ’!!

मग ‘अभिज्ञ’ काय होतं?
सध्या तरी मृत्यु!!

आणि ज्या केबीन मधे पुरूषोत्तम आणि त्याचा बॉस या दोघांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत पडले होते... तिथे एक ऑडिओ टेप वाजली...आणि सारखी रिपीट होत होत राहिली...संस्कृत मधून... सुभाषित अथवा श्लोक अथवा कोणत्यातरी स्तोत्राच्या ओळी?

का पाण्डुपत्नी गृहभूषणं किं रामशत्रुः किमगस्त्यजन्म |
कः सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा कुन्तीसुतो रावणकुम्भकर्णः ||

हे नक्की काय होतं?

पाण्डु , पाण्डुपत्नी म्हणजे कुंती, राम , रामाचा शत्रु रावण, अगस्ती, सूर्य, सूर्याचा पुत्र कर्ण.

एवढ्या सगळ्या व्यक्तिंचा काय संबंध?

का .... ‘किमगस्त्यजन्म’

अगस्ती चा जन्म कसा झाला...

अगस्ती?

प...प...प...पण अगस्ती तर...

समाप्त
©प्रगल्भ कुलकर्णी
(19 जुलै 2020)

[ टीप:- हा भाग @प्रभुदेसाई यांच्या सुचनेवरून सर्वांसाठी खुला ठेवत आहे. आधीचे भाग वाचायचे असल्यास ‘कथा/कादंबरी’ या भागात आपण समाविष्ट व्हावे ही विनंती. सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद... मी काही क्लू दिलेले आहेत या भागात... एका अर्थी हा भाग ‘समाप्त’ च आहे. मी माझा शब्द पाळलाय... पाळतो आहे... पाळणार आहे... सर्व वाचकांचे सहृदय आभार...]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नीटसं कळलं नाही खरं तर.
कोण खून करतं? आणि भगिनी निवेदितांंचा काय संबंध?
सात गोत्रांची आयडिया छान आहे. पण पुरुषोत्तमला ईमेल्स का येतात?

कथेचे सर्व भाग वाचले आहेत. कथा चांगली आहे पण शेवट नीट समजला नाही.

का पाण्डुपत्नी गृहभूषणं किं रामशत्रुः किमगस्त्यजन्म |
कः सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा कुन्तीसुतो रावणकुम्भकर्णः ||

हा एक कूटप्रश्न आहे. त्याचा उलगडा असा:
पांडूची पत्नी कोण?
घराचे भूषण काय?
रामाचा शत्रु कोण?
अगस्तीचा जन्म कुठे झाला?
सूर्याचा पुत्र कोण?

आणि शेवटच्या चरणात सर्वाची उत्तरे:
कुंती, सुत, रावण, कुंभ, कर्ण. Happy

पण तरीही याचा संबंध कथेशी कळला नाही. अगस्ती हा काही उपनिषदांमधे सप्तर्षी मानला गेला आहे.

अजून थोडे स्पष्टीकरण द्या जमलं तर म्हणजे कथा जास्त आवडेल Happy

भगिनी निवेदिता हि सिरीअल किलर असते? केवळ ब्राम्हणव्देषामूळे ती सप्तर्षीच्या वंशजाचे खून करते? पण ह्याला पण काही लाॅजिकच नाही.

मोटीव्हच स्पष्ट होत नाही कथेचा आणि ह्या संस्कृत कोड्याच काय संबंध इथे??

काय यार. अपेक्षा ठेऊन वाचत होतो साफ निराशा झाली.

भगिनी निवेदिता हि सिरीअल किलर असते? केवळ ब्राम्हणव्देषामूळे ती सप्तर्षीच्या वंशजाचे खून करते? पण ह्याला पण काही लाॅजिकच नाही.

मोटीव्हच स्पष्ट होत नाही कथेचा आणि ह्या संस्कृत कोड्याच काय संबंध इथे??

काय यार. अपेक्षा ठेऊन वाचत होतो साफ निराशा झाली.>>>>>> ++++११११११११ आता सांग तरी, खरोखर काहीच कळलं नाहीये.कशाचा कशाशी संबंध नाही, असेलच तर तो आम्हाला कळला नाही. शब्द पाळला असं म्हणून गायब होउ नकोस. ह्या सगळ्याची उकल तरी कर.

क्षिप्रा असेल का सीरियल किलर? तिला कथानकात आणलंय आणि बाकी काही काम नाहीए.

ती त्याच्या शाळेत असेल ( ज्ञानप्र बोधिनी को एड आहे ना?) आणि तो तिचा क्रश असेल पण त्याने नक्षत्राशी लग्नन करून तिचं लव्ह क्रश केलं असेल. आताही तिला अजिबात भाव दिला नाही.

पण ह्याला पण काही लाॅजिकच नाही.

मोटीव्हच स्पष्ट होत नाही कथेचा आणि ह्या संस्कृत कोड्याच काय संबंध इथे??

काय यार. अपेक्षा ठेऊन वाचत होतो साफ निराशा झाली.>>>>>> ++++११११११११ आता सांग तरी, खरोखर काहीच कळलं नाहीये.कशाचा कशाशी संबंध नाही, असेलच तर तो आम्हाला कळला नाही. शब्द पाळला असं म्हणून गायब होउ नकोस. ह्या सगळ्याची उकल तरी कर.
+1

काही कळले नाही.. कथा उत्कंठावर्धक होती या भागापर्यंत.. पण शेवटच्या भागाने पार निराशा केली.. असो. हामाबुदो असेल.. पुलेशु.. Happy

कथेच्या शीर्षकाप्रमाणे वाचकांना अनभिज्ञ ठेवून शब्द पाळला आहेस का ? Happy

शेवटच्या भागातलं ते संस्कृत कोडंच आवडलं Happy खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं ते आता परत वाचायला आणि त्याची उकल करायला मजा आली!..बाकी कथेशी काही संबंध नसला (बहुतेक) तरी Happy

डोक्यावरुन गेली. कशाचा सम्बन्ध कशाशी आहे ते अजिबातच स्पष्ट नाही आहे. सगळेच भाग सलग पुन्हा वाचुन झाले तरी लिन्क लागत नाही आहे. पुलेशु.

इतक्या उत्सुकतेने वाचत होती पण शेवटचा भाग पारच बाऊन्सर गेला आहे. थोडाही डोक्यात शिरला नाही. प्लीज एक्स्प्लेन.

सगळे अनभिज्ञ आहेत..त्यामुळे कथेचे नाव समर्पक आहे Happy

या भागात काही क्लु दिले आहेत >>> शोधून पाहिले पण मलातरी एकही क्ल्यु गावला नाही Happy
काही अंदाज -
निवेदिता म्हणजे नायकाला मरणापूर्वी स्वतःची मुलगी आठवते, जे साहाजिक आहे पण मग मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येण्याऐवजी भगीनी निवेदिता का डोळ्यासमोर याव्यात?
ऑडिओ टेप कोणी लावलेली असते?
ज्या अकाऊंटवरून इमेल येत असतात ते त्या व्यक्तींचे खरे अकाऊंट असतात की काल्पनीक?
ते कोडं का आहे हे एक कोडंच आहे Happy

नुसते प्रश्नच प्रश्न!! सगळंच ‘अनभिज्ञ’!!>>> +११११११११

>>>>ते ब्राम्हणद्वेष वगैरे वाचून तर पार विचका झाला. या कथेवर विडंबन लिहायचा मोह होतोय आता.. ! <<<<< १ इंफिनिटीपर्यंत
अगदी अगदी
पाटील साहेब, जाउदे आता.

ते ब्राम्हणद्वेष वगैरे वाचून तर पार विचका झाला. या कथेवर विडंबन लिहायचा मोह होतोय आता.. !>>

आणि हे ब्राह्मण्द्वेषातून आहे हे पोलिसांना कसं कळलं? ते गोत्राचे इमेल्स तर नायकाला येत होते आणि त्याने ते पोलिसांना सांगितले नव्हते. का फक्त मरणारे आडनावांवरून ब्राह्मण आहेत हीच एक लिंक आहे म्हणून ब्राह्मणद्वेष हे मोटिव्ह? Sad

अगस्तीबद्दल इतकचं माहित आहे की, त्यांचा जन्म घड्यातून झाला होता. कौरवांचा झाला होता तसा. हेच काय ते वेगळेपण.

एनीवेय धागा वर काढण्यात काही अर्थ नाही. मायबोलीवर लेखकांना कळत नकळत त्रास होत असेल किंवा मुद्दाम दिला जात असेल म्हणूनच लेखक गायब होत असतील आणि आपल्या लेखक महाशयांनाही बुल्लींग केल गेलं ( असं त्याचंच म्हणण आहे) म्हणून ते मायबोली सोडून गेले.

कसा येडा बनविले असा बेकार शेवट म्हणजे दुर्वासाचा एपिसोड. म्हणुन तुम्हाला म्हटले होते की गोष्ट
चांगली आहे पण शेवट दुर्वास करु नका.
कोड्याचे उत्तर कोड्यातच मिळते.

Pages