अनभिज्ञ(८) : अनभिज्ञ

Submitted by प्रगल्भ on 19 July, 2020 - 07:57

https://www.maayboli.com/node/75404 ----> ( भाग १ )

https://www.maayboli.com/node/75434 ----> ( भाग २ )

https://www.maayboli.com/node/75471 -----> ( भाग ३ )

https://www.maayboli.com/node/75498 -----> ( भाग ४ )

https://www.maayboli.com/node/75522 ------> ( भाग ५ )

https://www.maayboli.com/node/75543 -------> ( भाग ६ )

https://www.maayboli.com/node/75574 --------> ( भाग ७ )

अनभिज्ञ

पुरूषोत्तमने तो मेल ओपन केला... नाव वाचून पुरूषोत्तमच्या पायाखालची जमीनच सरकली... मेंदूला मुंग्या आल्या... डोळ्यांसमोर त्या लॅपटॉप च्या उजेडात अंधारी आली... आणि

“आई घातली तू पुरूषोत्तम!!” स्वत:शीच बोलला.

पुरूषोत्तमने लॅपटॉप मध्ये वेळ बघितली ‘4:10’... आणि तो आवरायला तडक बाथरुम मध्ये गेला. ब्रश...प्रात:विधी...अंघोळ... आवरणं वगैरे
केलं.

कुठे निघणार होता पुरूषोत्तम? काय चाललं होत त्याच्या डोक्यात?

आवरून बाहेर आल्यावर पुरूषोत्तमने लॅपटॉप वरच्या मेल च्या विंडो वर नजर फिरवून थरथरत्या हातांनी लॅपटॉप बंद केला...

From :
Saumitra Dani < SaumitraDani411057@gmail.com >

To :
Purushottam Jogalekar < jogalekar.Purushottam@rediffmail.com >

Date: 20 June 2019

Time: 5:30 PM

Sub: विश्वामित्र

आणि ड्रॉव्हर मधली चावी आणि मोबाईल घेऊन तो बाहेर पडला... पहाट उजाडत होती. घरात कुणालाही कल्पना नव्हती पुरूषोत्तम घराबाहेर पडलाय...

पुरूषोत्तमची आई पहाटे पहाटे लवकर उठत असली तरी देखील, ती कधिची आवरुन देवघरात देवाचं करत बसली होती.

इकडे पुरूषोत्तमने गाडी सुरु केली आणि वेगाने कोथरुड मधून बाहेर पडला...

गाडी चालवता चालवता त्याच्या डोक्यातले विचार मेंदूसोबत खेळ खेळत होते. का मारतोय हा खुनी या लोकांना? कोण आहे हा खुनी? काय वाकडं केलय या लोकांनी? का .... ?

आणि याच विचारांत गाडी भरदाव वेगाने धावत होती. तेवढ्यात पुरूषोत्तमचा फोन वाजला...

आँ!! एवढ्या पहाटे? कोण फोन करतय?

पुरूषोत्तमच्या विचारांची तंद्री भंगली आणि शेजारच्या सीटवर हाताने चाचपडत त्याने मोबाईल कसाबसा हातात घेतला. गाडी चालवतच कानाला लावला...

“ पुरूषोत्तम, सो सॉरी अशा वेळी फोन केलाय तुम्हाला मागे बोलले होते ना की निवेदिता ही आर.टी.आय. ची कार्यकर्ती असल्याने ही केस पोलिसांच्या स्पेशल ब्रांच ला हॅन्डओव्हर केलीय आणि त्यांनी सांगितल होतं की हे सिरीअल किलिंगच आहे. पण आता नवी लिड अशी की त्यांनी अजून एक खुलासा केलाय!! हे सिरिअल किलींग ब्राम्हणद्वेषातून झालयं असा त्यांनी निष्कर्ष काढलाय!!”

आश्लेषा कर्णिक बोलतच होती...

“काय?!!!” पुरूषोत्तमचा आश्चर्यवाचक उद्गार...

“पुरूषोत्तम, सो सॉरी या वेळी फोन केलाय!! आम्ही अजुनही मुंबई मध्येच आहोत. भार्गव च्या मावशीकडे...”
आश्लेषा बोलत होती पण... पुरूषोत्तमने फोन कट केला... आणि गाडी चालवण चालूच ठेवलं.

एव्हाना पुरूषोत्तम त्याच्या हिंजवडीच्या ऑफीस च्या वास्तूत आपलं कार्ड फिरवून आला होता. गाडी पार्किंग मधे पार्क केली.

लॅपटॉप उघडला...

पुरूषोत्तमचा धर्माच्या बाबतीत फार काही अभ्यास नव्हता... तरी देखील पुन्हा त्याने जुने मेल्स ओपन केले. आणि थोडीफार माहिती गुगल वर सर्च करून पंधरा मिनीटांत त्याने आश्लेषा कर्णिक ला एक टेक्स्ट मेसेज केला.

TO: आश्लेषा कर्णिक डेकिन

गेल्या काही दिवसांपासून मला काही व्यक्तिंचे सप्तर्षीं च्या नावाचे सब्जेक्ट असलेले मेल्स येत होते. मला रोजच्या व्यापातून याकडे लक्ष देता आलं नाही. आणि आज लक्षात आलय म्हणून एकाचा जीव वाचवायला चाललोय.

जबो ------------------ अ ---------------1
गोरा ------------------ भा ---------------2
चंओ ------------------ गौ ---------------3
निकुं ------------------ ज ----------------4
पवि ------------------ का ----------------5
तिप ------------------ व -----------------6
सौदा ------------------ वि ----------------7

आणि सेंड बटणावर टच केलं. त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली ‘5:19’

“आज मात्र उशीर होणार नाही!!” पुरूषोत्तमने स्वत:च्याच मनाला ठासून सांगितलं.

मोबाईल आणि लॅपटॉप गाडीतल्या सीटवरच टाकून गाडी लॉक करून वार्‍याच्या चपळाईने लिफ़्ट मधे घुसण्यासाठी पळाला... पहाट असल्याने कोणाचीही शिफ्ट सुरू नव्हती... आणि नाईट शिफ्ट पलीकडच्या बिल्डिंग मध्येच होती.

पुरूषोत्तम च्या नेहमीच्या वर्किंग फ्लोअर वर लिफ्ट चा दरवाजा उघडला... पुरूषोत्तमने केबीनकडे धाव घेतली...

त्याच्या केबीनकडे नाही... त्याच्या बॉस च्या केबीनकडे...

लॉक फिरवून धाड्कन दार उघडलं!! समोरच दृष्य पाहून पुरूषोत्तमला धडकीच भरली...

बॉस उर्फ सौमित्र दाणि समोर चेअर वर बसले होते...टेबलावर डोकं ठेवल होतं... आणि त्यांच्या अंगातून वाफा येत होत्या... शरीर भाजलं गेल होतं... काळसर पडल होतं... गुलाबी त्वचा दिसत होती...

पुरूषोत्तमला काय करावं ते कळेना ...

मुळात काय करावं हे कळायला काय झालयं हे लक्षात याव लागतं!!

पुरूषोत्तम बॉस च्या जळत्या डोक्यापाशी आला. एक मिनीटभर पाहीलं आणि पुरूषोत्तमच्या डोक्यात काय आलं माहीत नाही पण त्याने टेबलावरचा कॉडलेस उचलला आणि आपल्या स्वत:च्या घरी लॅंडलाईनवर फोन लावला.

पुरूषोत्तमच्या आईने फोन उचलला...

“आ...आ...आई...आई आ...पलं…आपलं गो” पुरूषोत्तमने घाबर्‍या घुबर्‍या स्वरात विचारलं...

पुरूषोत्तम घामाने नखशिखांत निथळत होता.

“अरे पुरूषोत्तम, काय झालयं बोल ना रे नीट” आई काळजीच्या स्वरात म्हणाली

आईला त्याचा स्वर लक्षात आला होता.

“आई आपलं गोत्र काय आहे?” पुरूषोत्तमने आपला सारा धीर , सारी शक्ति एकवटून विचारलं.
कानात प्राण आणून तिकडून येणार्‍या उत्तराची वाट पाहू लागला.

“अत्रि!” आई म्हणाली.

पुढच्याच क्षणाला पुरूषोत्तमच्या शर्टात कॉलर आणि मानेच्या गॅप मधून काहीतरी शिरलं...गुळगुळ जाणवाली आणि... सिवीयर शॉक!! पाठीपासून सगळ्या दिशेला पसरत सारं शरीर जाळणारा शॉक! मेंदूचे विचार थांबवणारा शॉक!! हृदयाची धडधड थांबवणारा शॉक!!

पुरूषोत्तमच्या हातातून फोन टेबलवरच पडला...

पुरूषोत्तमने मागे वळून दोन पावलं पुढे टाकली आणि जमिनीवर कोसळला...

त्याला समोरच्या व्यक्तिचा चेहरा दिसला!

पण ओळखीचा वाटला नाही...

कारण शॉकच तेवढा सिवीयर होता. पुरूषोत्तमच शरीर जळत होतं... शरीराच्या आत देखील वेदनांच वादळ उठल होतं... घोंगावत होतं...

पुरूषोत्तमचा देह जमिनीवर पडला... आणि प्राण शरीरातून निघण्यापूर्वी एक ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट फोटो त्याच्या डोळ्यांसमोर आला... स्मृति ब्लॉक करणार्‍या त्या शॉक च्या वेदनांना चिरून आला...

तोच फोटो जो त्याने ज्ञान प्रबोधिनीत असताना पाचवी च्या वर्गाच्या भिंतीवरून बाहेर आलेल्या पट्टीवर पाहिला होता... आणि लाल लाल अक्षरांमध्ये लिहिलेलं नाव...

“भगिनी निवेदिता”

आणि तोंडातून एकदम हळू आवाजात एक नाव बाहेर पडल.

"निवेदिता"

आणि पुरूषोत्तमचे डोळे उघडे ते उघडेच राहीले.

इकडे टेक्स्ट मेसेज वाचल्यावर आश्लेषा ला काहीच अर्थ लागेना... तिने पुरूषोत्तमला खूप कॉल्स केले... पण फोन गाडीत...
आणि पुरूषोत्तम फोन रिसीव्ह करत नाहीये... काहीतरी गडबड आहे या भावनेतून आश्लेषा न राहवून भल्या सकाळी त्या स्पेशल ब्रांच च्या पोलिसांकडे जाण्यासाठी उठली...

खरच कोण करत होतं सगळ? का मारलं या लोकांना? पुरूषोत्तमचा खून हा निव्वळ योगायोग की...

हे कसलं अघटीत काळचक्र सुरू होतं... सुरू होतं का संपल होतं... संपल होतं का पुन्हा नव्याने पुरूषोत्तमच्या ‘अत्रि’ पासून सुरू झालं होतं?

काय मिळणार होतं खुन्याला या सप्तर्षींच्या वंशजांना म्हणजेच त्या सप्तर्षींपैकीची ज्यांची गोत्रे होती... त्यांना मारून... बर आता हे इतके दिवस मुंबई मध्ये सुरू होतं... आता पुण्यात सुरू झाल होतं का... आता कुणाला ‘पुरूषोत्तम जोगळेकर’ या नावाने ‘अत्रि’ सब्जेक्ट असलेला मेल गेला असेल का?

नुसते प्रश्नच प्रश्न!! सगळंच ‘अनभिज्ञ’!!

मग ‘अभिज्ञ’ काय होतं?
सध्या तरी मृत्यु!!

आणि ज्या केबीन मधे पुरूषोत्तम आणि त्याचा बॉस या दोघांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत पडले होते... तिथे एक ऑडिओ टेप वाजली...आणि सारखी रिपीट होत होत राहिली...संस्कृत मधून... सुभाषित अथवा श्लोक अथवा कोणत्यातरी स्तोत्राच्या ओळी?

का पाण्डुपत्नी गृहभूषणं किं रामशत्रुः किमगस्त्यजन्म |
कः सूर्यपुत्रो विपरीत पृच्छा कुन्तीसुतो रावणकुम्भकर्णः ||

हे नक्की काय होतं?

पाण्डु , पाण्डुपत्नी म्हणजे कुंती, राम , रामाचा शत्रु रावण, अगस्ती, सूर्य, सूर्याचा पुत्र कर्ण.

एवढ्या सगळ्या व्यक्तिंचा काय संबंध?

का .... ‘किमगस्त्यजन्म’

अगस्ती चा जन्म कसा झाला...

अगस्ती?

प...प...प...पण अगस्ती तर...

समाप्त
©प्रगल्भ कुलकर्णी
(19 जुलै 2020)

[ टीप:- हा भाग @प्रभुदेसाई यांच्या सुचनेवरून सर्वांसाठी खुला ठेवत आहे. आधीचे भाग वाचायचे असल्यास ‘कथा/कादंबरी’ या भागात आपण समाविष्ट व्हावे ही विनंती. सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद... मी काही क्लू दिलेले आहेत या भागात... एका अर्थी हा भाग ‘समाप्त’ च आहे. मी माझा शब्द पाळलाय... पाळतो आहे... पाळणार आहे... सर्व वाचकांचे सहृदय आभार...]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चवथ्या पाचव्या भागापासून वाचायला लागलो,
लिंक लागावी म्हणून मागे जाऊन पहिला भाग शोधला आणि परत सगळे भाग सलग वाचले,
दुसऱ्या कोणत्याही BB वरचे प्रतिसाद वाचले नाहीयेत, त्यामुळे खालील निरीक्षणे केवळ याच एका कथे बद्दल आहेत.

1) पहिल्या भागापासून प्रत्येक भागात काहीच घडत नव्हते, फक्त शेवटी एक खून व्हायचा, दुर्दैवाने शेवटच्या भागात सुद्धा फक्त खुनच झाला आणि सिरीज संपली. अगदी केहेना क्या चाहते हो फीलिंग आले.

2) गोष्टीत प्रचंड डिटेलिंग केलेलं दिसतंय , हे चांगले की वाईट या बद्दल काही बोलणार नाही, पण इतके प्रचंड डिटेलिंग कथानकावरचा फोकस घालवते, थ्रिलर, रहस्यमय कथेत ते जास्त खटकते, आलेले डिटेल्स कथा पुढे नेणारे असले पाहिजेत, केवळ शब्द संख्या वाढावी म्हणून वर्णन असू नये असे वाटते

3) विश्वसनीय कथा होण्यासाठी पात्रांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले पाहिजे जसे या भागात आश्लेषा त्याला सकाळी 5 530 ला फोन करतेय , नवीन लीड मिळाला म्हणून, ही माहिती तिला पोलिसांकडून मिळलीये, तिने माहिती मिळाल्या मिळाल्या फोन केला असे म्हंटले तर पोलीस तिला हि माहिती सकाळी 5 च्या सुमारास देणार नाहीत, आणि जर तिला काल रात्री ही माहिती मिळाली असेल तर ती मुद्दाम अश्या ऑड वेळेला फोन का करते? सस्पेन्स, थ्रिलर मध्ये या छोट्या छोट्या गोष्टींना महत्व असते ते पुढे क्लु म्हणून वापरले जाऊ शकतात म्हणून वाचक लक्षात ठेवतात, आणि म्हणून चटकन खुपतात.

असो, तुमच्याकडे लिखाणाची हातोटी आहे, स्पीड चांगला आहे, पुढच्या प्रयत्नात नक्की चांगली कथा लिहू शकाल.

ऑल द बेस्ट.

Pages