त्रास होतो... त्रास नुसता (विडंबन)

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

सर्व माबोकरांची माफी मागून वैभवच्या मोठ्ठ्या वृतातल्या उच्च गझलेचे हे विडंबन

अताशा काव्य इथले वाचण्यातच वेळ जातो... त्रास होतो... त्रास नुसता
अखेरी हेच जाणवते पुरे आहे... जुन्या कविता, कविंचा भास नुसता

तुझा थरकाप नाही होत का पाहून तंट्यांची अशी बेफाम संख्या
मला तर कोणत्याही बाफ़वर जाताच दिसतो द्वेष अन दु:स्वास नुसता

तुम्ही कित्येक कविता पाडल्या पण वाचले नाहीच मी त्यांना कधीही
कशाला घ्या शिताचीही परीक्षा जर भयंकर येत आहे वास नुसता

अशाने काय होते की लिहावे, ना लिहावे स्पष्ट काही कळत नाही
कुणी ग्रूपामधे म्हणते, कुणी म्हणतेय ग्रुपमध्ये... कसा *बकवास नुसता

कधीचा पारल्यावरती **दबा धरुनीच बसलेलो बघाया खाद्यजत्रा
अरे खादाड अक्कांनो तुम्ही नैवैद्य म्हणुनी खा... खिमा फर्मास नुसता

असे होते, असे होतेच बाबांनो असे वेडेच करते मायबोली
असे तोंडात येते ’धन्स’ अन जगण्यात मा.बो. चा नशीला ध्यास नुसता

तुझे काही खरे नाही... ’मिल्या’ आता तरी थांबव असे वाह्यात चाळे
तुलाबी खायला लागेल बर्फी उंबराची... व्हायचा उपवास नुसता

* बकवास हा शब्द पोर्तुगिज भाषेतून मराठीत आला असून त्याच्या लिंगनिश्चिती बाबत कुठलेही नियम फ. क्ष. दामले ह्यांच्या व्याकरण विषयक पुस्तकात सापडले नाहीत...
आमच्या ’शुद्धेली’ गावातल्या शोनुल्या गल्लितल्या चाफेकर वाड्यातले लोक हा शब्द पुल्लिंगीच चालवतात

** द चा ’ड’ करू नये. अर्थ बदलू शकतो

प्रकार: 

मिल्या, मस्तच रे.... Lol
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

वा बहुत खुब Happy

*********************

प्रतिकार आणि प्रतिहल्ला यात फरक असतो! Biggrin स्वसंरक्षणार्थ असतो तो प्रतिकार अन् दुसर्‍याला स्वरक्षणाची संधी देतो तो प्रतिहल्ला! Wink

मिल्या,:हाहा:.. महान आहे विडंबन Happy

**दबा, फ. क्ष. दामले Lol
मिल्या, साष्टांग रे.. Proud
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

दादा तुम्ही सुद्धा???? Lol हा तुझाच प्रांत आहे... होमग्राउंड Happy मस्तच

सही रे मिल्या.. लगे रहो... Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

मिल्या.. मस्तच.. विडंबन आणि तटी दोन्ही... rofl.gif

मिल्या जबरी रे.. महान ! Happy

लय भारी जमलंय हे !! Rofl
फ.क्ष. दामले , "’शुद्धेली’ गावातल्या शोनुल्या गल्लितल्या चाफेकर वाड्यातले लोक "तर हाईट आहे सगळ्यावर !!
प्रचंड हसले!

www.bhagyashree.co.cc

खल्लास रे! विडंबन आणि त.टी. दोन्ही ह. ह. पु. वा. Happy
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

मिल्या, धम्माल लिहिलंयस रे एकदम Rofl

अरे देवा... मिल्या, बेफाम लिहिलयस, रे.

फारच भारी रे मिल्या. Rofl

________________
बोझ होता जो ग़मों का तो उठा भी लेते
ज़िंदगी बोझ बनी हो तो उठाएं कैसे
-----------------------------

टू मच !!!!!

परागकण

Pages