त्रास होतो... त्रास नुसता (विडंबन)
सर्व माबोकरांची माफी मागून वैभवच्या मोठ्ठ्या वृतातल्या उच्च गझलेचे हे विडंबन
अताशा काव्य इथले वाचण्यातच वेळ जातो... त्रास होतो... त्रास नुसता
अखेरी हेच जाणवते पुरे आहे... जुन्या कविता, कविंचा भास नुसता
तुझा थरकाप नाही होत का पाहून तंट्यांची अशी बेफाम संख्या
मला तर कोणत्याही बाफ़वर जाताच दिसतो द्वेष अन दु:स्वास नुसता
तुम्ही कित्येक कविता पाडल्या पण वाचले नाहीच मी त्यांना कधीही
कशाला घ्या शिताचीही परीक्षा जर भयंकर येत आहे वास नुसता
अशाने काय होते की लिहावे, ना लिहावे स्पष्ट काही कळत नाही
कुणी ग्रूपामधे म्हणते, कुणी म्हणतेय ग्रुपमध्ये... कसा *बकवास नुसता
कधीचा पारल्यावरती **दबा धरुनीच बसलेलो बघाया खाद्यजत्रा
अरे खादाड अक्कांनो तुम्ही नैवैद्य म्हणुनी खा... खिमा फर्मास नुसता
असे होते, असे होतेच बाबांनो असे वेडेच करते मायबोली
असे तोंडात येते ’धन्स’ अन जगण्यात मा.बो. चा नशीला ध्यास नुसता
तुझे काही खरे नाही... ’मिल्या’ आता तरी थांबव असे वाह्यात चाळे
तुलाबी खायला लागेल बर्फी उंबराची... व्हायचा उपवास नुसता
* बकवास हा शब्द पोर्तुगिज भाषेतून मराठीत आला असून त्याच्या लिंगनिश्चिती बाबत कुठलेही नियम फ. क्ष. दामले ह्यांच्या व्याकरण विषयक पुस्तकात सापडले नाहीत...
आमच्या ’शुद्धेली’ गावातल्या शोनुल्या गल्लितल्या चाफेकर वाड्यातले लोक हा शब्द पुल्लिंगीच चालवतात
** द चा ’ड’ करू नये. अर्थ बदलू शकतो
*** www.jutamaro.com
***
www.jutamaro.com
जबरी
जबरी एकदम.
कुजबुज वार्षिकाची पुरवणी का ही?
** द चा ’ड’
** द चा ’ड’ करू नये. अर्थ बदलू शकतो >>> मिल्या लय भारी
मिल्या, जय
मिल्या, जय हो! यकदम फर्मास!
जबरी
जबरी मिल्या...
त.टी. पण भारी एकदम..
जबरी! द चा
जबरी!
द चा ’ड’ करू नये. अर्थ बदलू शकतो >>
फ. क्ष.
फ. क्ष. दामले >> फुलफॉर्म काय बरं?
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
द चा ’ड’
द चा ’ड’ करू नये
भन्नाट रे! ही कुजबूज ची काव्यपुरवणीच वाटते.
उच्च!
उच्च!
तुलाबी खायला लागेल बर्फी उंबराची>>>
द चा ’ड’ करू नये>>>
फ. क्ष. दामले, शोनुल्या, चाफेकर>>
पार्ल्यात
पार्ल्यात द चा ड धरुन बसला असतास तर फायदा झाला असता
अता राहिला 'तोडलंस' 'फोडलंस' प्रतिक्रियांचा त्रास नुसता!
मिल्या.
मिल्या.
नाही दाबू
नाही दाबू शकत !!
~ प्रकाश ~
धन्य आहेस
धन्य आहेस बाबा!
मस्तच .
मस्तच . काव्य कुजबूज.
तुम्ही
तुम्ही कित्येक कविता पाडल्या पण वाचले नाहीच मी त्यांना कधीही
कशाला घ्या शिताचीही परीक्षा जर भयंकर येत आहे वास नुसता
मिल्या वेड आहेस तू ड चा डा करुन वाचु नये
...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...
(No subject)
तटीसकट
तटीसकट भन्नाट !
***
Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin
(No subject)
मिल्यादा
मिल्यादा
द चा ड >>>
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
(No subject)
भन्नाट
भन्नाट आहे....
त.टी अफलातून ....
मिल्या
मिल्या झकास रे.. !
~~~~~~~~~
अशाने काय
अशाने काय होते की लिहावे, ना लिहावे स्पष्ट काही कळत नाही
कुणी ग्रूपामधे म्हणते, कुणी म्हणतेय ग्रुपमध्ये... कसा *बकवास नुसता
>>>>
फ.क्ष.दामले!
'त्रास' झालंय विडंबन!
सही... --------------
सही...
--------------
नंदिनी
--------------
मस्त...
मस्त...
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...
जबरी!
जबरी!
मिल्या.. कड
मिल्या..
कडक...
हुच्च...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
एक नंबर त.
एक नंबर
त. टी
सही मिल्या
सही मिल्या :d
जबरी. लय
जबरी. लय मज्जा आली.
Pages