नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून काय द्यावे ह्यासाठी विविध पर्याय

Submitted by किल्ली on 1 June, 2020 - 12:18

धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/65034

तर मंडळी आमची anniversary आणि ह्यांच्या (म्हणजे आमचे अहो) वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
Gift काय द्यावे ते सुचवा.
दोन occasions असल्याने दोन gifts तयार ठेवावी लागतात. एरवी मी काहीतरी विचार करून जमवते व्यवस्थित पण पुरुष मंडळींना काय द्यावं हा नेहमीच पडणारा प्रश्न आहे.

(बरं विचारायला जावं तर iphone, ipad, ray ban अशी उत्तरे येतात . एवढं माझं बाई budget नाही. )

मुलींना किती काय काय देता येतं ना!

(मलाही फेब्रुवारी महिन्यात २ गिफ्ट्स मिळतात म्हणा1.
It is like जगा आणि जगू द्या)

सध्या वेळ कमी आहे म्हणून पटकन घरी order करता येईल किंवा बनवता येईल असं काहीतरी सुचवा प्लीज Happy

(ह्यापूर्वी पाकीट, घड्याळ, perfume, कपडे,
Goggle वगैरे देऊन झालंय)

महिलावर्गाला कामाला येईल हा धागा..
निदान जास्त पर्याय तरी documented राहतील Happy

प्रतिसादांनुसार काही गोष्टींची यादी इथे देते आहे:

----------------------------------------------------------------------------------
चांगले हेडफोन्स, लंबार सपोर्ट असलेली ऑफिस चेअर, अर्गॉनॉमिक कीबोर्ड आणि माउस, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर,
फॉर्मल टाय ,
योगा मॅट - डंब बेल्स - रेझिस्टंस बँड्स ,
कॉकटेल शेकर आणि कॉकटेल्स बनवण्याठी लागणारी इतर औजारे, कॉकटेल रेस्पीचे पुस्तक, कॉर्डलेस /किंवा कॉर्डेड पावर ड्रिल,
घरगूती टूल्सचा सेट ( हातोडी , नीडल नोझ प्लायर्स, कटिंग प्लायर्स, अडजस्टेबल रेंच ( स्पॅनर म्हणतात बहुतेक भारतात ) अशा गोष्टी ) , ऑफिससाठी किंवा पर्सनल प्रवासाठी बॅकपॅक, छोटेखानी दुर्बीण , रेन जॅकेट , चांगली फोल्डिंग छत्री,
स्वैपाकाची आवड असेल तर चांगल्या प्रतीच्या सुर्‍या,
लेदर बेल्ट, आवडता पर्फ्यूम, हायकिंग / ट्रेकिंग / कॅम्पिंग चे साहित्य , थंड हवेच्या प्रदेशात रहात /प्रवास करत असल्यास लोकरी स्वेटर्/मफलर्/टोपी , ग्लव्ह्स
-------------------------------------------------------------------------------
किंडल/तत्सम काही ॲप असल्यास ऑनलाईन पुस्तक खरेदी
नेटफ्लिक्स चे ३ महिन्याचे सबस्किप्शन
बाळाची डेस्कवर ठेवायला फोटोफ्रेम
हस्तलिखित कविता, थँक्स गिव्हिंग
------------------------------------
SHoes
Perfume, hot cold thermos, water bottle stainless steel , you can engrave your name and baby Rama's name on it, tie , sport shoes,
Surprise dinner
--------------------------------------
वायरलेस हेडफोन, इयरबड ( स्कलकेन्दी वैगरेचे फार महाग नाहित , एअर पोड , फीटबिट , लेदर ऑफिसबॅग, लेदर जेकेट , टी-शर्टस , आदिदास वैगरे जोगर्स पॅन्ट-टी सेट
--------------------------------------------------------
नावासोबत एखादा छानसा फोटो (दोघांचा/एकट्याचा) प्रिंट केलेला कॉफी मग
Tripod Stand for Mobile Phone
Leather Credit Card Holder/Business card/ATM Card holder 24 card Slots
मोबाईल फोन साठी आकर्षक Case
-----------------------------------------------------
Wristwatch, Bluetooth speakers, MP 3 Player,
आराम करणे आवडत असेल तर किंवा बजेट असेल तर ईझी चेअर,
-------------------------------------------------

जुन्या गाण्यांची आवड असेल तर सारेगामा इ
टाटा/ रेमंड चे उत्तम परफ्युम्स
क्लीन शेव्हींग करत असतील/ आवड असेल तर पूर्ण शेव्हिंग किट (मॅन्युअल/ पॉवर्ड)
वॉलेट वापरत असेल तर ते
गाड्यांची इ. आवड असेल तर टीम-बिएचपी च्या गुडीज (मग्स, कीचेन, कार स्टिकर्स, टीज, हूडीज इ.)
---------------------------------------------------
Wireless headphones/ airpods
3 in 1 printer
Wireless charger
Travel Bluetooth folding key board

Play station
Movies membership cards
Dart boards
Desktop golf

Quick dry/super dry towel ( हे काहीही वाटेल पण जे नियमित फिरणारे असतात त्यांना फार ऊपयोगी ठरतो)
Bed side pockets ( for headphones/ power bank/ books/eye glasses)
Travel bag organizers/ smart pack travel sets
Neck tie travel roll
Cuff links

Knife set/ Swiss knife
Chef’s portable multi tool
Couch arm table
Smart squeeze stress release ball

Stimulating aromatherapy inhalers

Letters to my daughter set
--------------------------------------------------------------------------

वरील पर्याय सुचवल्याबद्दल आभार Happy

--------------------------------------------------------------

ह्याशिवाय आणखी खास भेटवस्तु काय असु शकतात, ह्यासाठी प्रतिसादात उत्तम माहीती आहे, ती माहीती प्रतिसादातच वाचावी Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताई मला एक लेटेस्ट गिफ्ट आयडिया कळली आहे. इन्स्टा ग्राम वर एक ओतणे म्हणून अकाउंट आहे ते बघा. तो माणूस इन्फ्युज न सेट विकतो .
म्हणजे जिन किंवा व्होडका मध्ये घालायचे अ‍ॅडिशनस त्यात वेग वेगळे फ्लोरल फ्रुटी नोट्स आहेत. लै भारी लागते म्हणे. एक जाम प्यार के नाम

धन्यवाद अमा, तुमची idea cute आहे.
पण आम्ही no alocoholic मंडळी, माळकरी type आहोत.

मानव जी, नवी wagon r नुकतीच घेतली ७महिने झाले.
त्यासाठी kitchen घेऊ शकते Lol

देवकी, anu, जिद्दू:

Nice आयडिया s.

Perfume मागे एकदा दिला होता, अजूनही देता येईल.बघूया
Earplugs आहेत.
वाचन विशेष आवडत नाही त्यांना.

मसाज पार्लर चे कुपन द्या... आणि त्याला एकट्यालाच जाऊ द्या.. यापेक्षा जास्त वाढदिवसाचे हॅप्पी इंडिंग असू शकणार नाही Wink

किल्ली : किचेनऐनजी पेट्रोलच द्या. टाकी भरून दिलीत तर फारच आवडेल ही गिफ्ट. हलकेच घ्या..

तसं आकाश निरीक्षण वगैरे आवडत असेल तर चांगल्या दर्जाची दूर्बिण, उत्तम कॅमेरा वगैरे देता येईल.,

फूट मसाज करण्यासाठी यंत्र(नंतर कब्जा करता येईल ही:ही), आजच पॉप अप पाहिलाय. कारमध्ये बॅक रेस्ट नसेल तर ते, किंवा क्राफ्ट वगैरे आवडत असेल तर Amazon वर छान नमुने आहेत.

दाढीचं सामान ठेवण्यासाठी वापरता येईल असा पाऊच..
लेदरचा असेल तर उत्तम .. फारच अनरोमॅंटिक गिफ्ट आहे पण मी एकदा हे दिलं होतं.

परदेसाई, मौन व्रत ह्या जन्मात शक्य नाही,
त्यांना फार आवडले असते माझे शांत असणे Lol
Craps, आता कोरोना काळात कसले आलेय मसाज पार्लर Proud
प्राची, म्हाळसा, mazeman
धन्यवाद
छान ideas

>> इन्स्टा ग्राम वर एक ओतणे म्हणून अकाउंट आहे ते बघा. तो माणूस इन्फ्युज न सेट विकतो .

Lol काहीतरी वेगळं नी इंटरेस्टिंग

मस्त घड्याळ
परफ्यूम
लिनन शर्ट
लेदर बेल्ट
लेदर वॉलेट
सोन्याचे हृदय ( ओम्या ने स्वीटू ला दिले तसे )
सोन्याची अंगठी
लॅपटॉप

>> इन्स्टा ग्राम वर एक ओतणे म्हणून अकाउंट आहे ते बघा. तो माणूस इन्फ्युज न सेट विकतो .
Lol काहीतरी वेगळं नी इंटरेस्टिंग
>>>

वेगळी आयडीया असेल, पण प्लीज मद्य नका देऊ भेट म्हणून ..
सॉरी _/\_
पण अगदीच राहावले नाही म्हणून बोलतोय. संसार उध्वस्त होताना पाहिलेत या अल्कोहोलच्या नादात Sad

नाहीच देणार आहेत त्या Happy

>> धन्यवाद अमा, तुमची idea cute आहे.
>> पण आम्ही no alocoholic मंडळी, माळकरी type आहोत.
>> Submitted by किल्ली on 9 June, 2021 - 13:05

हो मी ते वाचले.
पण धागा बरेच जण वाचतात आणि आयड्या ऊचलतात. त्यामुळे हे कोणीच करू नये अशी ईच्छा आहे.

संसार नाही पण हा धागा दारू पायी उध्वस्त होण्याची निश्चिंती झाली बगुनाना. मागे कुरु आला आणि दुसऱ्या पानात धागा ढगात. इथे तर पाच पत्तुर पानं झाल्यानी. धरा बोटे करा गणित.

शुभ प्रभात : त्यांना पुजा रिचुअल्स ची आवड असेल तर चांदीचे ताम्हन घंटा, नैवेद्याची वाटी उदबत्तीचे घर असा सेट घेता येइल. मॅचिन्ग देव्हारा, वगैरे नेक्स्ट इअर देता येइल. चांदीच्या वस्तू पुढे मुलीला लग्नात देता येतील.

नाहीतर सोन्याचे छान से ब्रेसलेट घेता येइल.

@अमितव Lol

@अमा
मित्र: काय रे, तुझ्या वाढदिवसाला बायकोने काहीतरी मस्त गिफ्ट दिलं असेल ना?
नवरा: घंटा!
Lol

वादि वीकेंडला येत नसेल तर दोघांना रजा टाकून कुठेतरी फिरायला जाता येईल. अर्ध्या दिवसाची एखादी छोटी ट्रिप. मस्त पावसाळी हवा आहे सध्या आपल्याकडे. नवऱ्याला फक्त सुट्टी घ्यायला सांग. बाकीचे सगळे प्लॅन तुला करता येतील. The journey can be your destination! अर्थात माणसांची गर्दी असेल अशा ठिकाणी जाऊ नका. वीकडेला गेलात तर अधिक चांगले.

बरोबर जिज्ञासा.
आता अनलॉक ची पुढची फेज चालू झाल्यावर एमटीडीसी रेझोर्ट सर्व कर्मचारी लसीकरण करून स्वागताला तयार होत आहेत.
आपल्याला सर्व नियम पाळून थोडा चेंज आणि पर्यटन,हॉटेल व्यवसायाला थोडा हातभार लागेल असं काही केल्यास उत्तम.(अर्थात स्वतःची, लहान बाळाची सुरक्षितता सांभाळून)

त्यातल्या त्यात ओपन(कमी गर्दी, मोठे आवार,धरण, नदी,बीच,मोठी जागा) ठिकाणे निवडल्यास धोका कमी.

अरे चांदीच्या घंटेची किण किण किती सुखद असते ऐकायला.

फेसबुक व पिंट्रेस्ट वर तुमच्या खास स्पेसिफिकेशन च्या गिफ्ट किंवा अनुभव पक्षी मराठीत एक्स्प्रेन्स डिझाइन करून देणारे बरेच आहेत. क्युरेटेड गिफ्ट असा सर्च करा. मला असे करूण द्यायला जाम आव्ड्ते. आता लोणाव ळा खंडाळा कोल्हापुरचा पन्हाळा लै भारी ठिकाणे आहेत. ड्युक्स रिट्रीट रिजॉर्ट व इतरही असतील तिथे स्पेशल कपल्स डिनर ऑर्गनाइज करून देतात. तिथे मस्त पैकी केक व शँपेन प्लॅन करा व त्यांच्या आवडीचा मेनु. ऊओ हाउ रोमांटिक इट विल बी. संध्याकाळचा सूर्यास्ताचा वेळ. जिवलगा बरोबर शँपेन. जीवनातील सोनेरी क्षणांचे साथी.

आणी हे गाणे लावा मन उधाण वार्‍याचे गूज पाव साचे. कधी तू रिम्झिम आणि इतर फेवरिट गाणी.

स्टारी नाइट्स किंवा सन फ्लावर किम्वा पिकासो/ दाली/ दामोन/ मोने च्या चित्रांचे चांगल्या क्वालिटीचे प्रिंट पण देता येइल हे फ्रेम करून घरात राहिल्यास लेकीला पण चित्रकलेची आवड निर्माण होईल. ( हा सर्व विचार मी काल रात्रीतून केला आहे.)

अमा, मस्त क्लासी आयडीया आहेत.
लाँग डिस्टन्स रनिंग आवडत असल्यास मिझुनो स्केचर वगैरे चे जरा हाय रेंज शूज देता येतील.
तुमचे सध्याचे राहते शहर झोन १ मधले असल्यास मॉल मध्ये गेमिंग पार्लर चे ३ तासाचे/ अमुक रकमेचे व्हाऊचर असे पण देता येईल. (मी हे ऑफिस आऊटिंग च्या बजेट मध्ये खेळले होते. मला मजाही आली, पण 'पैश्यांचा बटन दाबून धूर केला' असे काही फिलिंग आले जास्त सवय नसल्याने.पण लोकांनी खूप एंजॉय केले.)

>अरे चांदीच्या घंटेची किण किण किती सुखद असते ऐकायला.
खरंय अमा, पण "घंटा" शब्दावर कोटी करायचा मोह आवरता आला नाही मला. तुम्ही प्लिज मनावर नका घेउ.

तुम्ही प्लिज मनावर नका घेउ.>> मेरेकु क्या फर्क पैंदा. अपुन बेगाना बर्थ डे बेगम दिवानी है. दिल चाहता है मधले ते दोसत कसे केक के लिये हम कुच्छ भी करते है. म्हणतात तसे. मी पण तो संवाद म्हणून पाहिला.

दोघांना रजा टाकून कुठेतरी फिरायला जाता येईल. अर्ध्या दिवसाची एखादी छोटी ट्रिप. मस्त पावसाळी हवा आहे सध्या आपल्याकडे.
>>>>

हे छान आहे. शक्य असल्यास आदल्या संध्याकाळीच / आदल्या रात्रीच स्टे ला जावे. आमच्याकडे शक्य झाल्यास वर्षात कोणाचा तरी बड्डे असा प्लान करतो. तो कोणाचा यावरून नेहमी वाद असतो. कारण प्रत्येकाला आपला बड्डे बाहेर सेलिब्रेट करायची हौस असते. कारण स्पेशल होतो. आणि लक्षात राहतो. त्याच त्याच घरातल्या त्याच एका टेबलावर आणि त्याच बॅकग्राऊंडला केक कापत फोटो काढण्यापेक्षा काहीतरी वेगळे होते. या अप्रूपात मग छोटेसे पण ऊपयुक्त गिफ्टही जास्त आनंद देऊन जाते. म्हणजे एखादे छान ब्राईट रंगाचे टीशर्ट दिले तरी तेच लगेच पिकनिक मूडमध्ये घालताही येते..

Pages