नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून काय द्यावे ह्यासाठी विविध पर्याय

Submitted by किल्ली on 1 June, 2020 - 12:18

धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/65034

तर मंडळी आमची anniversary आणि ह्यांच्या (म्हणजे आमचे अहो) वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
Gift काय द्यावे ते सुचवा.
दोन occasions असल्याने दोन gifts तयार ठेवावी लागतात. एरवी मी काहीतरी विचार करून जमवते व्यवस्थित पण पुरुष मंडळींना काय द्यावं हा नेहमीच पडणारा प्रश्न आहे.

(बरं विचारायला जावं तर iphone, ipad, ray ban अशी उत्तरे येतात . एवढं माझं बाई budget नाही. )

मुलींना किती काय काय देता येतं ना!

(मलाही फेब्रुवारी महिन्यात २ गिफ्ट्स मिळतात म्हणा1.
It is like जगा आणि जगू द्या)

सध्या वेळ कमी आहे म्हणून पटकन घरी order करता येईल किंवा बनवता येईल असं काहीतरी सुचवा प्लीज Happy

(ह्यापूर्वी पाकीट, घड्याळ, perfume, कपडे,
Goggle वगैरे देऊन झालंय)

महिलावर्गाला कामाला येईल हा धागा..
निदान जास्त पर्याय तरी documented राहतील Happy

प्रतिसादांनुसार काही गोष्टींची यादी इथे देते आहे:

----------------------------------------------------------------------------------
चांगले हेडफोन्स, लंबार सपोर्ट असलेली ऑफिस चेअर, अर्गॉनॉमिक कीबोर्ड आणि माउस, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर,
फॉर्मल टाय ,
योगा मॅट - डंब बेल्स - रेझिस्टंस बँड्स ,
कॉकटेल शेकर आणि कॉकटेल्स बनवण्याठी लागणारी इतर औजारे, कॉकटेल रेस्पीचे पुस्तक, कॉर्डलेस /किंवा कॉर्डेड पावर ड्रिल,
घरगूती टूल्सचा सेट ( हातोडी , नीडल नोझ प्लायर्स, कटिंग प्लायर्स, अडजस्टेबल रेंच ( स्पॅनर म्हणतात बहुतेक भारतात ) अशा गोष्टी ) , ऑफिससाठी किंवा पर्सनल प्रवासाठी बॅकपॅक, छोटेखानी दुर्बीण , रेन जॅकेट , चांगली फोल्डिंग छत्री,
स्वैपाकाची आवड असेल तर चांगल्या प्रतीच्या सुर्‍या,
लेदर बेल्ट, आवडता पर्फ्यूम, हायकिंग / ट्रेकिंग / कॅम्पिंग चे साहित्य , थंड हवेच्या प्रदेशात रहात /प्रवास करत असल्यास लोकरी स्वेटर्/मफलर्/टोपी , ग्लव्ह्स
-------------------------------------------------------------------------------
किंडल/तत्सम काही ॲप असल्यास ऑनलाईन पुस्तक खरेदी
नेटफ्लिक्स चे ३ महिन्याचे सबस्किप्शन
बाळाची डेस्कवर ठेवायला फोटोफ्रेम
हस्तलिखित कविता, थँक्स गिव्हिंग
------------------------------------
SHoes
Perfume, hot cold thermos, water bottle stainless steel , you can engrave your name and baby Rama's name on it, tie , sport shoes,
Surprise dinner
--------------------------------------
वायरलेस हेडफोन, इयरबड ( स्कलकेन्दी वैगरेचे फार महाग नाहित , एअर पोड , फीटबिट , लेदर ऑफिसबॅग, लेदर जेकेट , टी-शर्टस , आदिदास वैगरे जोगर्स पॅन्ट-टी सेट
--------------------------------------------------------
नावासोबत एखादा छानसा फोटो (दोघांचा/एकट्याचा) प्रिंट केलेला कॉफी मग
Tripod Stand for Mobile Phone
Leather Credit Card Holder/Business card/ATM Card holder 24 card Slots
मोबाईल फोन साठी आकर्षक Case
-----------------------------------------------------
Wristwatch, Bluetooth speakers, MP 3 Player,
आराम करणे आवडत असेल तर किंवा बजेट असेल तर ईझी चेअर,
-------------------------------------------------

जुन्या गाण्यांची आवड असेल तर सारेगामा इ
टाटा/ रेमंड चे उत्तम परफ्युम्स
क्लीन शेव्हींग करत असतील/ आवड असेल तर पूर्ण शेव्हिंग किट (मॅन्युअल/ पॉवर्ड)
वॉलेट वापरत असेल तर ते
गाड्यांची इ. आवड असेल तर टीम-बिएचपी च्या गुडीज (मग्स, कीचेन, कार स्टिकर्स, टीज, हूडीज इ.)
---------------------------------------------------
Wireless headphones/ airpods
3 in 1 printer
Wireless charger
Travel Bluetooth folding key board

Play station
Movies membership cards
Dart boards
Desktop golf

Quick dry/super dry towel ( हे काहीही वाटेल पण जे नियमित फिरणारे असतात त्यांना फार ऊपयोगी ठरतो)
Bed side pockets ( for headphones/ power bank/ books/eye glasses)
Travel bag organizers/ smart pack travel sets
Neck tie travel roll
Cuff links

Knife set/ Swiss knife
Chef’s portable multi tool
Couch arm table
Smart squeeze stress release ball

Stimulating aromatherapy inhalers

Letters to my daughter set
--------------------------------------------------------------------------

वरील पर्याय सुचवल्याबद्दल आभार Happy

--------------------------------------------------------------

ह्याशिवाय आणखी खास भेटवस्तु काय असु शकतात, ह्यासाठी प्रतिसादात उत्तम माहीती आहे, ती माहीती प्रतिसादातच वाचावी Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कटप्पा, मला अतिशयोक्ती मध्ये बोलायची सवय आहे ,
1857 मधली गाणी खरंच कशी असतील आम्हा गरीबाकडे?

वरती मी अशमयुगातली क्रिकेट match लिहीलंय Lol

वाचतेय हा धागा. अधिकमासाचं म्हणून जावयाला सिन्थेसायझर दिलं होतं त्याला गाण्याची आवड आहे म्हणून सरप्राईजच होतं ते खूप आवडलं त्याला आता लाॅकडाऊनमध्ये छान उपयोग झाला. तर असं काही वाद्य देता येईल बाळावरही संगीताचे संस्कार होतील.

Update:
बोलता बोलता समजलं की running shoes घेणार आहेत हे.. म्हटलं माझ्या फोनची स्क्रीन मोठी आहे, ह्यात पहा आणि select करून ठेवा.. त्यांनी तसे केले आणि मग मी नंतर लक्ष divert केलं Happy
आज ते order केले, नुसतेच shoes कसं देणार म्हणून कपडे सुद्धा घेऊन टाकले Happy

बाकी फोटो प्रिंट करायचा विचार होता पण ते शक्य दिसत नाहीये, बघू

काहींना सरप्राईजेस आवडत नाहीत. "एवढेच पैसे खर्च करणार होतास / होतीस तर याच्याऐवजी हे अमुक अमुक घ्यायचे ना.." असं आमच्या दोघांचं बरेचदा झालंय
>>>>>

+७८६
एकदा मला माझ्या बायकोने पाच शर्ट आणि तीन टीशर्ट एकदमच दिले. ते सुद्धा सारेच ब्रांडेड. कारण मी बराच काळ शॉपिंग केली नव्हती. तिला वाटले मी टणाटण आनंदाने उड्या मारेल. पण मी १२० अंशात ऊलटी रिॲक्शन दिली. कारण माझा वर्षभराचा कोटा तिने एकाच दमात आपल्याच पसंतीने पुर्ण केला होता. म्हणजेच आता वर्षभर मला माझ्या आवडीचे काही घेता येणार नव्हते. त्यात मी चिडल्यावर तिनेही फिलींगची कदर नाही वगैरे भावनिक अस्त्रे बाहेर काढली आणि थोडे रडून घेतले.. उगाचच माझ्या वाझ्धदिवसासारख्या चांगल्या दिवशी गिफ्टवरून आमच्यात वादावादी झाली जी टाळता येणे सहज शक्य होते.

गंमत म्हणजे तरीही ती सरप्राईज म्हणून आजही कपडे घड्याळ पाकीट गॉगल असे काही ना नाही देतच असते. पण मी पुन्हा पुन्हा तेच वाद नको म्हणून टाळतो. आणि आपल्याअच खिशातले पैसे गेले म्हणून तिच्या आड जात थोडे कपाळाला हात मारून रडून घेतो.

मॉरल - सरप्राईज गिफ्ट लहान मुलांना द्यावेत. किंवा नेहमीच्या गिफ्ट बजेटपेक्षा फार कमी किमतीच्या द्याव्यात.

Nice gifts and a wonderful surprise for your hubby. Many happy returns of the day. Every man looks great in a white Zodiac shirt I feel. It's an old brand but good.

१००.
साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपृण.

आवडले असेल गिफ्ट अशी आशा करू.
बरेच वेळा 'मला ते विशेष आवडलं नव्हतं, फक्त कार्ट मध्ये टाकून दुसऱ्या साईट वरून काही घेणार होतो' असंही होतं.
पुरुष मुळातच सहनशील असतात(एक जनरलाईज्ड स्वीपिंग स्टेटमेंट) त्यामुळे स्वतःला फारसं न आवडलेलं घड्याळ, टीशर्ट ते कधीकधी घालण्याचा संभव असतो(आईने हौसेने आणि प्रेमाने शिवून घेतलेला गुलाबी वर पांढऱ्या चेक्स चा शर्ट 7 वर्षं 2 आठवड्यातून एक दिवस जुना होईपर्यंत वापरून टाकल्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे)
एकंदर सरप्राईज हा जरा उलटणारा प्रकार आहे. बहुतेक वेळा 'ठिके प्रेमाने घेतलंस, पण मला विचारलं असतंस तर याच पैश्यात दुसरं काही घेतलं असतं' असं होतं.बायकांची प्रतिक्रिया अजून जास्त तीव्र असते (हे काय घेतलंस, सुंदर आहे पण नॉट माय टाईप, असं काही मी घालते का कधी वगैरे)
आम्ही एकमेकांना नीट विचारून, वस्तू फायनल करायला सांगून अगदी शेवटच्या पेमेंट स्टेप ला दुसऱ्या ने पैसे भरणे असंच गिफ्टिंग करतो.

अजून त्यांच्या हातात gift पडलं नाहीये..
वाढदिवस जुलै मध्ये आहे तर ह्या आठवड्यात देईन म्हणजे size वगैरे कमीजास्त असेल तर बदलून घेता येईन

एक app सापडलं त्यावरून लेकीचे आणि तिच्या बाबांचे फोटो print करायची order दिली आहे, ते आले की greetinग किंवा decor काहीतरी करेन

बाळाची फोटोफ्रेम बनवायचं मनात बसलंय माझ्या ...
चांगला फोटो काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत Happy तिच्या मनावर आहे न ते, वेळ लागेल Happy

त्यांना almost कळलंय मी gift order केलंय ते

माझं घराबाहेर पडणं बंद , त्यांचंही wfh, मी बडबडी Proud
कसं लपवणार

त्यांना almost कळलंय मी gift order केलंय ते

माझं घराबाहेर पडणं बंद , त्यांचंही wfh, मी बडबडी Proud
कसं लपवणार>>>>>किती क्युट किल्ले

मस्त.. किल्ली.
छान गिफ्ट. तुमच्या अहोंना वाढदिवसाच्या आणि तुम्हा दोघांना anniversaryच्या शुभेच्छा इन अ‍ॅडवान्स.>>>>>+1

Thanks

नवर्‍यल गिफ्ट >>

मुले असतील तर त्यन्च्या सहीत ९ दिवस माहेरि जावे .

माहेरुन सतत फोन करु नये , व्हिडिओ कॉल तर मुळीच करु नये .

ह्यावेळेस birthday च्या वेळेस same situation आहे मागच्या वर्षी सारखी. फरक हाच की celebration चा खास mood नाहीये. मन अस्वस्थ आहे.
पण तरीही gift घेणार आहे.
असं काहीतरी सुचवा की ज्याने ह्या उदास मनःस्थिती मधून बाहेर पडण्यास मदत होईल.
बाहेर जाऊन खरेदी शक्य नाही, घरच्या घरी मला जमेल असं काही बनवणे किंवा order करणे

चांगला परफ्युम भेट देऊ शकता. खुश होऊन जाईल तो (मी तरी होतो मला मिळाल्यावर). बजेट आणि त्याची यातली आवडनिवड कळल्यास त्यानुसार सुचवु शकतो चांगले पर्याय.

Pages