नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून काय द्यावे ह्यासाठी विविध पर्याय

Submitted by किल्ली on 1 June, 2020 - 12:18

धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/65034

तर मंडळी आमची anniversary आणि ह्यांच्या (म्हणजे आमचे अहो) वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
Gift काय द्यावे ते सुचवा.
दोन occasions असल्याने दोन gifts तयार ठेवावी लागतात. एरवी मी काहीतरी विचार करून जमवते व्यवस्थित पण पुरुष मंडळींना काय द्यावं हा नेहमीच पडणारा प्रश्न आहे.

(बरं विचारायला जावं तर iphone, ipad, ray ban अशी उत्तरे येतात . एवढं माझं बाई budget नाही. )

मुलींना किती काय काय देता येतं ना!

(मलाही फेब्रुवारी महिन्यात २ गिफ्ट्स मिळतात म्हणा1.
It is like जगा आणि जगू द्या)

सध्या वेळ कमी आहे म्हणून पटकन घरी order करता येईल किंवा बनवता येईल असं काहीतरी सुचवा प्लीज Happy

(ह्यापूर्वी पाकीट, घड्याळ, perfume, कपडे,
Goggle वगैरे देऊन झालंय)

महिलावर्गाला कामाला येईल हा धागा..
निदान जास्त पर्याय तरी documented राहतील Happy

प्रतिसादांनुसार काही गोष्टींची यादी इथे देते आहे:

----------------------------------------------------------------------------------
चांगले हेडफोन्स, लंबार सपोर्ट असलेली ऑफिस चेअर, अर्गॉनॉमिक कीबोर्ड आणि माउस, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर,
फॉर्मल टाय ,
योगा मॅट - डंब बेल्स - रेझिस्टंस बँड्स ,
कॉकटेल शेकर आणि कॉकटेल्स बनवण्याठी लागणारी इतर औजारे, कॉकटेल रेस्पीचे पुस्तक, कॉर्डलेस /किंवा कॉर्डेड पावर ड्रिल,
घरगूती टूल्सचा सेट ( हातोडी , नीडल नोझ प्लायर्स, कटिंग प्लायर्स, अडजस्टेबल रेंच ( स्पॅनर म्हणतात बहुतेक भारतात ) अशा गोष्टी ) , ऑफिससाठी किंवा पर्सनल प्रवासाठी बॅकपॅक, छोटेखानी दुर्बीण , रेन जॅकेट , चांगली फोल्डिंग छत्री,
स्वैपाकाची आवड असेल तर चांगल्या प्रतीच्या सुर्‍या,
लेदर बेल्ट, आवडता पर्फ्यूम, हायकिंग / ट्रेकिंग / कॅम्पिंग चे साहित्य , थंड हवेच्या प्रदेशात रहात /प्रवास करत असल्यास लोकरी स्वेटर्/मफलर्/टोपी , ग्लव्ह्स
-------------------------------------------------------------------------------
किंडल/तत्सम काही ॲप असल्यास ऑनलाईन पुस्तक खरेदी
नेटफ्लिक्स चे ३ महिन्याचे सबस्किप्शन
बाळाची डेस्कवर ठेवायला फोटोफ्रेम
हस्तलिखित कविता, थँक्स गिव्हिंग
------------------------------------
SHoes
Perfume, hot cold thermos, water bottle stainless steel , you can engrave your name and baby Rama's name on it, tie , sport shoes,
Surprise dinner
--------------------------------------
वायरलेस हेडफोन, इयरबड ( स्कलकेन्दी वैगरेचे फार महाग नाहित , एअर पोड , फीटबिट , लेदर ऑफिसबॅग, लेदर जेकेट , टी-शर्टस , आदिदास वैगरे जोगर्स पॅन्ट-टी सेट
--------------------------------------------------------
नावासोबत एखादा छानसा फोटो (दोघांचा/एकट्याचा) प्रिंट केलेला कॉफी मग
Tripod Stand for Mobile Phone
Leather Credit Card Holder/Business card/ATM Card holder 24 card Slots
मोबाईल फोन साठी आकर्षक Case
-----------------------------------------------------
Wristwatch, Bluetooth speakers, MP 3 Player,
आराम करणे आवडत असेल तर किंवा बजेट असेल तर ईझी चेअर,
-------------------------------------------------

जुन्या गाण्यांची आवड असेल तर सारेगामा इ
टाटा/ रेमंड चे उत्तम परफ्युम्स
क्लीन शेव्हींग करत असतील/ आवड असेल तर पूर्ण शेव्हिंग किट (मॅन्युअल/ पॉवर्ड)
वॉलेट वापरत असेल तर ते
गाड्यांची इ. आवड असेल तर टीम-बिएचपी च्या गुडीज (मग्स, कीचेन, कार स्टिकर्स, टीज, हूडीज इ.)
---------------------------------------------------
Wireless headphones/ airpods
3 in 1 printer
Wireless charger
Travel Bluetooth folding key board

Play station
Movies membership cards
Dart boards
Desktop golf

Quick dry/super dry towel ( हे काहीही वाटेल पण जे नियमित फिरणारे असतात त्यांना फार ऊपयोगी ठरतो)
Bed side pockets ( for headphones/ power bank/ books/eye glasses)
Travel bag organizers/ smart pack travel sets
Neck tie travel roll
Cuff links

Knife set/ Swiss knife
Chef’s portable multi tool
Couch arm table
Smart squeeze stress release ball

Stimulating aromatherapy inhalers

Letters to my daughter set
--------------------------------------------------------------------------

वरील पर्याय सुचवल्याबद्दल आभार Happy

--------------------------------------------------------------

ह्याशिवाय आणखी खास भेटवस्तु काय असु शकतात, ह्यासाठी प्रतिसादात उत्तम माहीती आहे, ती माहीती प्रतिसादातच वाचावी Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली एक प्रश्न आहे.
धागा १ जूनला काढला आहे आणि लिहिले आहे वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
मग वाढदिवस जुलै महिन्यात आहे की ऑगस्ट
जर बाई चान्स ऑगस्ट असेल तर अश्या वीर पुरुषासाठी काय गिफ्ट सुचवावे. एखादी तलवारच शोभावी. सोबत हिरेजडित मुकुट Happy

Claymango म्हणून आहे बघ इंस्टाग्राम वर
त्यातल्या वस्तु आवडतात का बघ. मि नवर्याला बड्डे ला दिले त्यातले 2 ब्रोच

ते चालताना स्टेप मोजायच वेअरेबल गॅजेट असत ते द्या. (मला नाव पण माहित नाही). किंवा चालायचे छान बूट, योगा मॅट (पुस्तकाबरोबर) ,नाहीतर ट्रॅक सूट घेउन द्या. त्यांच्या आवडत्या क्रिकेटरवर लिहिलेले पुस्तक किंवा जुन्यांपैकी नेविल कार्डस चे आणि अगदीच काही नाही तर शिरिष कणेकरचे. आवडेल त्यांना.

नाहीतर बेस्ट म्हणजे कामाला लावा ना. वन डिश मिल चे रेसिपी बुक देउन. Happy

ह्या आख्या धाग्याचे आमच्या घरी जाहीर वाचन करायचा विचार आहे. Happy

आख्या धाग्याचे आमच्या घरी जाहीर वाचन करायचा विचार आहे. >>>>>> Lol

माझा पण वाढदिवस जुलै मधे असतो. बायकोला लिंक पाठवावी म्हणतोय.....

धाग्यावर माझे दोन पैसे...

Wireless headphones/ airpods
3 in 1 printer
Wireless charger
Travel Bluetooth folding key board

Play station
Movies membership cards
Dart boards
Desktop golf

Quick dry/super dry towel ( हे काहीही वाटेल पण जे नियमित फिरणारे असतात त्यांना फार ऊपयोगी ठरतो)
Bed side pockets ( for headphones/ power bank/ books/eye glasses)
Travel bag organizers/ smart pack travel sets
Neck tie travel roll
Cuff links

Knife set/ Swiss knife
Chef’s portable multi tool
Couch arm table
Smart squeeze stress release ball

Stimulating aromatherapy inhalers

Letters to my daughter set

नवऱ्याच्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायचा इतका का विचार करावा लागतो?
जुलै मध्ये माझ्या नवऱ्याचा पण आहे वाढदिवस, तोही लग्नानंतर पहिलाच, सो मी तरी त्याच्या वाढदिवशी माझ्यासाठी नवीन लॅपटॉप मागितला आहे, अन त्याने अर्थात तो द्यायचे कबुलही केलेय☺️

ह्यावर्षी तरी मी त्याच्या वाढदिवसाला FD करायची ठरवले होते, पण आता व्याजदर खूपच कमी आहे सो पर्याय शोधतेय

जुलैत माझ्या नवर्‍याचाही बड्डे आहे पण २५ वर्षांत आम्हाला हे नीट कळलेले आहे की ज्याची वस्तू त्याने निवडली तर पुढ ची निराशा, मग पैसे फुकट गेल्याची हळहळ, मग धुसफूस टळते Wink

जुलै मध्ये माझ्या नवऱ्याचा पण आहे वाढदिवस, तोही लग्नानंतर पहिलाच, सो मी तरी त्याच्या वाढदिवशी माझ्यासाठी नवीन लॅपटॉप मागितला आहे, अन त्याने अर्थात तो द्यायचे कबुलही केलेय
—>>> वाढदिवस त्याचा. गिफ्ट तुम्हाला? ओह.. पहिला वाढदिवस आहे होय लग्नानंतरचा. तरीच Happy
वेट अनादर इयर .

जुलैत माझ्या नवर्‍याचाही बड्डे आहे पण २५ वर्षांत आम्हाला हे नीट कळलेले आहे की ज्याची वस्तू त्याने निवडली तर पुढ ची निराशा, मग पैसे फुकट गेल्याची हळहळ, मग धुसफूस टळते Wink
या करिताच मी आधिच्या प्रतिसादात लिहिले आहे की नवर्याला काय घ्यायचे आहे आणि तो ते घ्यायचे टाळतो आहे ते शोधायचे आणि तेच गिफ्ट करायचे. मी वर लिहिले होते एकदा बारा गिफ्ट दिले होते ते , आत्ता सगळे आठवत नाहीत. जे आठवतात त्यात पैशाचे पाकीट, घड्याळ, पारकरचा पेन, यु डी व्ही चा परफ्युम ( हा माझ्या आवडिचा झाला आहे आता.),हॉटेलात छानसे डिनर, लॅपटॉप एवढेच आठवते आहे.

>>छत्री द्या. मग एकाच छत्रीत भिजत भिजत गर्म चहा प्या वर प्यार हुवा इकरार हुवा अब बेटी भी हुई हे गाणे म्हणा. माझ्यात्रफे गोड होमवर्क.
Rofl

एकंदरित जुलै मधले बरेच नवरे दिसताहेत वाढदिवसवाले. छान Wink

ज्याची वस्तू त्याने निवडली तर पुढ ची निराशा, मग पैसे फुकट गेल्याची हळहळ, मग धुसफूस टळते Wink
—>>>> हॉऊ सो बोरिंग . गिफ्ट द्यायची मजाच गेली मग तर.
हे म्हणजे हे घे पैसे काय घ्यायचे ते घे टाईप झाले.
सरप्राईझ एलिमेंट मिसिंग !

हे म्हणजे हे घे पैसे काय घ्यायचे ते घे टाईप झाले.
सरप्राईझ एलिमेंट मिसिंग !

>> काहींना सरप्राईजेस आवडत नाहीत. "एवढेच पैसे खर्च करणार होतास / होतीस तर याच्याऐवजी हे अमुक अमुक घ्यायचे ना.." असं आमच्या दोघांचं बरेचदा झालंय. त्यामुळे विचारून / सांगून दिलं तरी तितकाच (क्वचित जास्तच) आनंद होतो.

आता वर्षाअखेरीस येणाऱ्या ऍनिव्हर्सरी साठी त्याला काय गिफ्ट हवंय ते त्याने आधीच सांगून ठेवलंय. आणि मला या वाढदिवसाला काय गिफ्ट हवंय ते मी मागच्याच वाढदिवसाला सांगून ठेवलंय Proud

नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून काय द्यावे ह्यासाठी विविध पर्याय ==>
ह्या धाग्याबद्दल तुमचे आभार अभिंन्दन ...... वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!

मलाही सरप्राईज एलिमेंट पेक्षा आधी विचारून घेऊन मग दिलेली भेट जास्त पटते. स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेस, अत्तरं, सेंट्स इ. बाबतीत तर नक्कीच.
एखादा टीशर्ट, शर्ट, कॅजुअल वेअर, इतर वस्तू इ. बाबतीत मेको चलताय

योकु बायकोला पण सांगून टाकलं का? आमच्याकडे यंदा चक्क त्याच्या येऊ घातलेल्या बड्डेला "इन्स्टापॉट" घेऊया का म्हणून नवर्‍यानेच कुरापत काढलीय. सगळं त्या करोना वर्क फ्रॉम होममुळे Wink
त्यामुळे मी घाबरून दुसरं काहीतरी घेतलंय तुला सरप्राइज म्हणून. एक वर्ष तरी मला संधी दे असं म्हटलंय. आता हा धागा परत वाचायला लागेल.. जास्त लक्ष देऊन Lol

Mi mazya birthday la mobilech magun ghete ..pan after 3 years..n madhlya 2 years madhe..titan raga..or 2 gram gold ase ghete....baki chotya mothya gift tar astatch..

ह्यांना गाणी ऐकायला आवडतात .
मी ठरवलं, छान bluetooth headphones द्यावे, ती नाहीयेत घरी
(४.१ स्पीकर आहे, bluetooth स्पीकर आहे, फक्त टीव्ही राहिलाय, तो नाहीये)

काल रात्री headphones चं ठरवलं आणि आज सकाळी मला म्हणतात कसे, मी bluetooth headphones मागवलेत, ते आज येणारेत, मी जास्त वेळ झोपणारे, पार्सल्वाला फोन आला तर त्याला सेकुरीटी जवळ द्यायल सांग Proud
Lol

झालं कल्याण,
आता पुन्हा ही यादी वाचते आणि बघ्ते काय देता येइल Happy Biggrin

गाणे आवडतात ना.
आवडत्या प्रकारातली गाणी पेन ड्राईव्ह मधे खच्चून भरून देऊन टाकायची, नाहीतर गाण्यांचे ऑनलाईन सबस्क्रीप्शन.

गाण्यांचं collection जबरदस्त आहे त्यांचं, hard disk मध्ये व्यवस्थित sort करून save केलेली आहेत, 1857 पासून ..

T shirt jeans हे नेहमीचे यशस्वी वीर kart मध्ये टाकून1 ठेवलेत.

Shoes ,jacket बघत आहे, जे आवडलं ते घेऊ शकते

PHotos print करून आणते, त्याचं काही handmade ग्रीटिंग वगैरे बनवता येतं का ते पाहते

Pages