मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजनबी अशोक सराफाला येन केन प्रकारेन इशारे करून ही कळत नसतं Lol
बावळट अभिनय मस्त करायचा अशोक सराफ, आणि बेरकी पण.

अजनबी अशोक सराफाला येन केन प्रकारेन इशारे करून ही कळत नसतं >> एक्झॅक्ट्ली! तो सीन पाहिल्याशिवाय कळणार नाही त्यातली गंमत.

कागर, नेटफ्लिक्स.
पॉलिटिकल, लव स्टोरी.. ठिक आहे.
त्यात रिंकू राजगुरू राणी (सिनेमातलं पात्र) न वाटता आर्चीच वाटत होती बर्याच ठिकाणी..

गाढवाचा प्रसंगही धमाल आहे!>>> +१ नतर अशोक मामा बैराग्याच्या वेषात येतात तेव्हाचाही प्रसन्गही भारी आहे.

तो पुर्ण मुव्हिच धमाल आहे, मामाची आणि रजनाची केमीस्ट्री अफलातुन>>+११११
माझा आणि माझ्या आइचा फेवरिट आहे एक्दम.

घर बंदूक बिर्याणी पाहिला.
तसे फार काही सस्पेन्स नाहीये तरीही spolier असू शकतो इथून पुढे.

आधी आवडलेल्या गोष्टी.

संवाद - चुरचुरीत आणि apt बऱ्याच ठिकाणी
उदा. चिकन बिर्याणी बनवत नाही म्हणल्यावर रागा रागात फुटलेला तो एक नक्षली / डाकू आणि त्याचा अख्खा मोनोलॉग.
काही विनोदाच्या जागा भारीच.
काही प्रसंग एकदम खरेखुरे मातीतले.
उदा. तो मुलगी पाहायला जातो, तिथले घर, तिच्या साडीचा रंग, पोत. तिला तो आवडलाय म्हणून तिचं बापाच्या मागेमागे टूमणे लावणे तरफदारी करणे, बापाचा घर असण्याचा concern वै छान आलंय सर्व
Background music आणि संगीत - छान
हान की बडीव गाणं तर विशेष आवडलं, त्यातली हलगी एकदम कडक, कोरीओग्राफी stylish.
Acting अर्थातच मस्त.
आकाश ठोसर लांब केसात handsome दिसतोय.
नागराज शोभलाय इन्स्पेक्टर म्हणून.
चित्रपट overall मराठीच्या मानाने style, मारामारी चित्रण ह्यात उजवा आहे. हा 4 भाषांत डब झालेला असे वाचून आहे.

उणीवा
नागराज चे नाव वाचून ऐकून ज्या अपेक्षा तयार होतील तितका ग्रेट नाही. कारण दिग्दर्शक वेगळा आहे.
काही काही गोष्टी काहीच्या काही वाटतात.
राजकारणीचा तोरा असतो पण इतका बालिश नसतो.
नागराजची बायको ना आगा पिछा बघता त्याच्यावर ज्या प्रकारे सगळ्यांसमोर वैतागते , कचाकचा बोलते वै

बघा टीपी आहे. सैराट सारख्या अपेक्षा ठेवून नको मात्र.

अरे मी पाहायचा प्रयत्न केला. सुमारे २० मि. जेमतेम पाहिला. पूर्ण डोक्यावरून गेला पिक्चर. अजून पुढे पाहावा काय?

फारएन्ड,
कथा जरा ओढूनताणून आहे असा फील येईल. तुकड्या तुकड्यात मजा येते. बघ की.
नाय आवडला तर एक चिरफाड लेख मिळेल वाचायला. Happy
हल्ली पाहिलेल्या मराठी सिनेमा जसे की गोष्ट एका पैठणीची आणि तत्सम पेक्षा चांगला वाटला मला.

महाराष्ट्र शाहीर

शाहीर साबळेंच्या स्टोरीत इंटरेस्ट आहे म्हणून पहायला सुरुवात केली. शिवाय शाळेत असताना महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिला होता, खूप आवडला होता, तो पण एक धागा आहे.

पण पहिल्या १० मिनिटांतच सिनेमा बोअर झाला. (अर्धाच पाहून झालाय.) तरी अंकुश चौधरी आवडतो म्हणून उर्वरित किल्ला लढवणार आहे.
आपल्याकडे बायोपिक म्हणजे कलाकारांच्या बाह्यरुपावर सगळा फोकस असतो. स्क्रिप्टवर काम करत नाहीत. स्टोरीचे तुकडेतुकडे जोडलेत. ती हिरॉइन तर महान बोअर. शिकवलेला अभिनय सुद्धा करत नाही.

फार अपेक्षा नव्हत्या सिनेमाकडून, तरी टोटल विरस झाला माझा.
शाहीर साबळेंची तेव्हा गाजलेली गाणी परत ऐकायला जरा मजा आली तेवढंच.

महाराष्ट्र शाहीर पाहिला मी देखील.
वरच्या प्रतिसादासारखेच माझंही मत.
एकसंघ छान फ्लो नाही वाटला.
वयस्कर शाहीर मेकअप थोडाफार जमलाय.
जुनी जुनी गाणी ऐकताना छान वाटले.
त्यांच्या आयुष्यात इतके चढउतार आलेले माहित नव्हते, ते कळाले.
त्या काळात त्यांची पत्नी काळाच्या पूढे होती हे जाणवले.
त्यांच वेगळं होणं हे तितकंसं नीट आलं नाही चित्रपटात असे वाटले. हिरोईन ने देखील वजन कमी केले पाहिजे होते. अंकुश खूपच बारीक झालाय.
हिरोईन म्हणजे सना शिंदे केदार शिंचेचीच मुलगी.
केदार शिंदे नावाच्या अपेक्षेप्रमाणे चित्रपट नाहीच वाटला.

दोन दिवसांपुर्वी 'तेन्डल्या' पाहिला.. निनांत सुंदर चित्रपट.. साल ९०-९५ च्या आसपासचा खुपच छान दाखवला आहे. सर्वच मुलांचा अभिनय अप्रतिम ! हलकाफुलका .. थोडा विनोदी पण बरोबरीने डोळ्यात पाणी आणणारा !
अज्याबात सोडु नका .. नक्की बघा .. चिल्यापिल्यांना देखिल खुप आवडेल खात्री!

घर बंदूक बिर्याणी पाहिला. >> मधे मधे मस्त चुरचुरित आहे पण भयंकर लांबलेला आहे नि कथा, अ‍ॅक्टींग वगैरे मधे प्रचंड हिसके बसवणारा वाटला. मंजुळेचा साउठी हिरो टाईप्स (मला हे सगळे स्पूफ म्हणून केलय असे वाटते) मजा आणतो.

घबंबी पाहताना वाटलेलं >> झी स्टुडीओ ने हेमंत अवताडेंना संधी दिली. त्यात नागराज मंजुळेला अभिनय करतो का विचारलं असावं म्हणजे हुषारीने अवताडेंनी भिंतीला पाडलेली भोकं बुजवता येतील. पण ती बुजवता बुजवता मंजुळेंनाच नव्याने भिंती बांधाव्या लागल्या असाव्यात. मग चला, तुमचं ही नाव घालू, फक्त क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून असा तोडगा काढला असावा. झी ने मंजुळेला दोनदा हात दिला असल्याने गत्यंतरच नव्हतं.

काल अतुल कुलकर्णी, दीपा परब, मुक्ता बर्वेचा चकवा चित्रपट बघितला, छान वाटला. अजून असे गूढ चित्रपट आहेत का मराठी?

चकवामधलं रहस्य त्या मानाने फुसकं आहे ना पण? मी खूप वर्षांपूर्वी बघितलाय.
सावरखेड एक गाव चांगला आहे रहस्यमय.

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आज थिएटरमध्ये बघितला. आवडला! दिग्दर्शक केदार शिंदे.
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर या सहा बहिणी मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात अशी कथा आहे. टिपिकल कथा वाटली तरी टिपिकल प्रकारे दाखवलेली नाही. मुख्य म्हणजे ओक्साबोक्शी गदगदून येण्याचे संवाद आणि प्रसंग शक्यतो नाहीत. सगळ्यांची कामं छान झाली आहेत.
दीपा परबला खूप दिवसांनी पाहिलं. छान दिसली आहे, कामही मस्तच केलं आहे.

बाईपण भारी देवा बद्दल बरेच ऐकू येत आहे. शनिवार रविवार सुद्धा ऑफिस नसते तर बघायला जाता आले असते. झिम्मा आवडला तर हा देखील आवडेल असे बघणार्‍यांकडून समजले आहे.

"एकुलती एक" पाहिला. आवडला. हे पहा टाइम्स ऑफ इंडिया
The Times of India gave the film three out of five stars and wrote that "The overall performances of actors, the script speaking of children growing in broken homes, and some very touching moments make this watchable
चकवा मला सावरखेडा पेक्षा आवडला.

Pages