मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

fotor_2023-2-13_19_46_1.jpg

माबोकरांनो, आपल्या आवडत्या मराठी चित्रपटाचे रसग्रहण लिहिताय ना ??? Happy

मीही काकण विषयी खुप एकल म्हणुन लावला पण ओव्हर इमोशनल पीळ वाटला, उर्मिला उगाच काहितरी नसलेले पोक्त भाव घेवुन्,दु:खी चेहरे करत उसासे सोडते, तरूणपणीचा जितु प्रौढ वाटतो आणी म्हातारपणिचा खोटा.जितेद्र् जोशी आवडलाच नाहिये अस क्वचित होत पण यात मात्र नाहिच पटला. त्यामानाने लहान मुलाच काम बर आहे तरी एकदरित स्टोरी काहि दम नाही.
क्राती रेडकरचा आहे म्हणे मुव्ही.

काल फ्लाईटमध्ये ‘एका पैठणीची गोष्ट‘ पाहिला. पिक्चर ठीक ठीक आहे. सायली संजीव आणि सुव्रत जोशी रोलमध्ये परफेक्ट दिसतात, कामही चांगलं केलंय. मृणाल कुलकर्णी हल्ली आवडत नाहीच पण ह्यात शेवट चांगली दाखवली आहे.

घर बंदूक बिर्याणी एप्रिलमधे येणार आहे. त्यातल्या गुणगुण या गाण्याचं हे तमिळ व्हर्जन रिलीज झाले आहे.
https://www.youtube.com/watch?v=Xew5e8-XFoo

( नागराज मंजुळे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. मुख्य दिग्दर्शक नाही. ही नवीन काय भानगड कळले नाही).

2019 चा डोंबिवली रिटर्न (प्रमुख भूमिका संदीप कुलकर्णी) हा पाहिला.
पूर्वार्ध ठीक आहे; उत्तरार्ध भरकटलेला.
मुळात पूर्वीच्या डोंबिवली फास्टशी याचा काही संबंध नाही. पूर्ण वेगळ्या धर्तीवरची कथा आहे.

एक पापभीरु मध्यमवर्गीय, भाई- दादा आणि राजकारणी यांच्या नादी लागून भराभर श्रीमंत होत जातो आणि अखेरीस त्याचे पूर्ण पतन होते हा सारांश.
हॉटस्टारवर आहे

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी पाहिला.
मोठी पोस्ट झाली होती. पण नेहमीप्रमाणे सिलेक्ट ऑल होऊन सगळे गेले. आता पुन्हा नाही लिहिता यायचे. मायबोलीवर सातत्याने होतंय हे. Sad

आयपीटीव्ही वर आहे वाळवी (टीव्हीला नाही लागलेली वाळवी >>> झी५ वर लागलेल्या वाळवीची क्वालिटी चांगली आहे .... Lol

वृत्ती
https://m.youtube.com/watch?v=y4CBUDfmB5A

जातिव्यवस्थेवरील भेदक भाष्य. शेवटपर्यंत वास्तवदर्शी.
नवे कलाकार असूनही अतिशय उत्कृष्ट कामगिरी
लहान मुलांच्या भूमिकाही उत्तम.

सायकल
भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव आणि ऋषिकेश जोशी.
धमाल, हलकाफुलका, रमणीय कोकण दर्शन. साधा व सुंदर आहे, जरूर बघा. नेटफ्लिक्सवर आहे. मला भलताच आवडला. मी पुन्हा बघेन. लहान मुलांना बघता येईल व आवडेल असा आहे.

वाळवी बघितला. अनेक वर्षांनी इतका जबरदस्त सिनेमा (मराठीतला) बघण्याचा योग आला. मजा आली.
चक्क स्व.जोशी पण सुसह्य वाटला.

बरेच प्रयत्न करून पण "एक निर्णय - स्वतःचा स्वतःसाठी" या नावाचा शिणुमामा पंधरा मिनिटांच्या पुढे सरकला नाही.
मधुरा वेलणकर नुकतीच डॉक्टर, सर्जन झालेली असते. तिला अमेरिकेतले डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी सल्ला मागत असतात. त्यांचा प्रश्न असतो कि " अमूके एक पेशंट आहे, त्याची ओपन हार्ट सर्जरी करू का ?" तर ती म्हणते " डेफिनेटली नॉट " यावर तिचे पप्पा विक्रम गोखले खूष होतात.

दुसरीकडे सुबोध भावे लग्न करतो आणि बायकोला घेऊन कारमधून हनीमूनला निघतो. त्यांची कार कड्यावरच्या गणपतीच्या घाटातून दिसणारा समुद्र पहायला थांबते. तिथे गाणे पण म्हणतात. पण येताना विमानाने परत येतात. तर मग कार कुठे गेली आणि कोकणात कुठली विमानसेवा सुरू झाली या प्रश्नाने मेंदू पोखरून काढला.

शिवाय सुबोध भावेच्या घरातलं वातावरण हे एकदम ब्रिटीश लोकांप्रमाणे मॉडर्न असलं तरी घरातल्या बाया साड्या, अंगभर पंजाबी सूट घालून वावरत असतात, पण त्याची बायको मात्र एकदम शॉर्ट फ्रॉक (सिंगल ) घालून घरात फिरत असते. त्यामुळे जो जे वांच्छिल तो ते लाहो असे वातावरण असावे अशी शंका चाटून गेली. बाकी, सिनेमातली पात्रं बुद्धीजीवी असल्याप्रमाणे वावरतात. प्रेग्नंट असल्याची बातमी देताना कमी शब्दातही भावेला कळते. तो ठोंब्यासारखे अडाणीपण दाखवत नाही, त्यावरून बायकोला लाजून घ्यायचे फूटेज घेता येत नाही. पण भावे सुहास जोशी मातेला ड्रामा करून ही बातमी सांगतो, पण जाऊ बुद्धीजीवी असल्याने लगेच हसते. मराठी शिणुमामाची आधी कन्फ्युजन मग अशोक सराफचे भिवया विस्फारून " म्हणजे मी बाप होणार ?" हे प्रश्न विचारणे या परंपरेला इथे फाटा दिला आहे.
मराठीपणाच्या कक्षा रूदावल्या गेल्या आहेत.

जून बघितला प्लॅनेट मराठी वर.
सिद्धार्थ मेननचं काम खूप आवडलं. किरण करमरकरला छोटा रोल आहे पण त्याचंही काम मस्त.

काही परिस्थितीमुळे इंजिनिअरींग मधे नापास झालेला नील घरी ब्रेक म्हणून परत येतो. टिपिकल विचारसरणीचे आईवडिल, छोट्या शहरात राहवं लागल्याची घुसमट, हॉस्टेलमधे घडलेल्या काही घटनांची जबाबदारी न घेता पळलेला या सगळ्याचा राग, फ्रस्ट्रेशन सतत मैत्रिणीवर, वडिलांवर, समाजावर काढत असतो.
नंतर एक शेजारी नेहा त्याच्या आयुष्यात आल्यावर गोष्टी बदलायला लागतात हळूहळू. मग काही दिवसांच्या मैत्रीनंतर दोघं एकमेकांकडे मन मोकळं करतात काय गोष्टी चुकल्या आपल्या त्यानंतर तो स्वतःला माफ करायला शिकतो, दुसर्‍यांची माफी मागायला शिकतो. कॅप्शन फार छान दिलंय.. हिलिंग इज ब्युटीफुल.

मराठीपणाच्या कक्षा रूदावल्या गेल्या आहेत. >>> रघू आचार्य Lol

चित्रपटाच्या नावाला वेगळी टॅगलाइन असली की तो वैधानिक इशारा समजावा अशा मतापर्यंत आलोय मी याबाबतीत Happy

सायकल
भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव आणि ऋषिकेश जोशी.
धमाल, हलकाफुलका, रमणीय कोकण दर्शन. साधा व सुंदर आहे, जरूर बघा. नेटफ्लिक्सवर आहे. मला भलताच आवडला. मी पुन्हा बघेन. लहान मुलांना बघता येईल व आवडेल असा आहे. +१

मराठी शिणुमामाची आधी कन्फ्युजन मग अशोक सराफचे भिवया विस्फारून " म्हणजे मी बाप होणार ?" हे प्रश्न विचारणे या परंपरेला इथे फाटा दिला आहे.
मराठीपणाच्या कक्षा रूदावल्या गेल्या आहेत. >> अगदी अगदी. कुठल्या तरी सिनेमात रंजना अशोक सराफची बायको आहे. तिला दिवस गेलेत हे ह्या येड्याला नीट कळतच नाही. मग शेजारच्या शारदाबाई त्याला तुमच्या घरात पाहुणा येणार आहे म्हणून बाळाची ॲक्शन करून दाखवतात तर हा म्हणतो, की "शारदाबाई तुम्ही या वयात!!!!"

कुठल्या तरी सिनेमात रंजना अशोक सराफची बायको आहे. तिला दिवस गेलेत हे ह्या येड्याला नीट कळतच नाही. >>> बिनकामाचा नवरा

चित्रपटाच्या नावाला वेगळी टॅगलाइन असली की तो वैधानिक इशारा समजावा >>> Lol
फारएण्ड , असं नाव का दिलंय म्हणूनच सुरू केला होता पहायला Lol

कारचं काय झालं म्हणून थोडा वेळ पहावाच लागेल. आपल्यासारख्यांनी "कारने जाऊन विमानाने परत यायचं धाडस केलं असतं तर आई दारातूनच ओरडली असती " मेल्या, कार कुठेय ? बायकोच्या नादात कार विसरलास होय ? आत्ताच ही लक्षणं ? "
ही फॅमिली एकदम कूल. जणू काही आता सुभाची आई मुख्यमंत्र्यांना फोन लावेल आणि सांगेल, "मुलं येताना कार विसरून आलीत रे बाळा ! बाणेंच्या दोन मुलांपैकी एकाला घेऊन यायला सांगशील का ? नाहीतरी दिवसभर ट्विटच करत असतात"

कुठल्या तरी सिनेमात रंजना अशोक सराफची बायको आहे. तिला दिवस गेलेत हे ह्या येड्याला नीट कळतच नाही. >>> बिनकामाचा नवरा >>>काही बायका शरीरयष्टीने जाड असतात व थोराड दिसतात त्यामुळे त्या प्रेग्नेंट आहेत हे नाही कळत शिवाय अंगाने बारीक असलेल्या अंगचोर बायकांच्या बाबतीत पण तेच। मी माझ्या मैत्रिणीच्या वहिनीबाबत एकदा असा अनुभव घेतला होता चक्क तिला तुमचं पोट असे पृथ्वीसारखे का गोल झालेय असे विचारले होते (मी तेव्हा लहान होते ) हे हे हे हे .....

Pages