मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आघात चित्रपट युट्युबवर दिसला. एका फेस्टिव्हलमधे बघितलेला, तेव्हा आवडलेला. पुन्हा बघायचाय. मुक्ता बर्वे, विक्रम गोखले वगैरे तगडी कास्ट आहे

झिम्मा आवडला तर हा देखील आवडेल>>
अशा प्रकारच्या चित्रपटांची लाट येणार आता (अर्धा डझन बायकांची ensemble cast)
फुगडी, भोंडला, भिशी अशी नावं रजिस्टर करायला निर्माते आधीच धावले असणार.
वेल at least मराठी नट्यांना चांगले दिवस येणार

बाईपण आमच्या घरातल्या सर्वच महिलांनी एकत्र पाहिला. त्यात एक संवाद आहे. नवरा बायकोला सांगतो कि "मी तुला घटस्फोट देईन" तर बायको उत्तरते " दे बाबा एकदाचा, म्हणजे मी मोकळी होईन". यावर थेटरात टाळ्या पडतात.
माझी मुलगी म्हणाली "या टाळ्या वाजवणार्‍या सर्व बायकाच असतील" हे निरीक्षण कुणाच्या डोक्यात नव्हतं आलं. Happy

झी वर बेनवाड नावाचा मराठी सिनेमा आहे. भाऊ कदम आणि संदीप पाठक आहे म्हणून लावला. भाऊ एकदम मिसफिट वाटलाच. पण पिक्चर का काढलाय असं झालं. थोडी स्त्री वरून उचलेगिरी केलीय, थोडी हर्‍या नार्‍या झिंदाबादची उचलेगिरी. काही वर्षांपूर्वी अशोक सराफ आणि लक्षाला घेतलं कि चित्रपट आपोआप विनोदी होतो असा निर्मात्यांचा समज असायचा. त्या टाईपचा.
भूताच्या घरात दोघे शिरतात तोपर्यंत पेशन्स संपले. Lol

मी गोदावरी म्हणून एक सिनेमा पाहिला जितेंद्र जोशी चा.

नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळालंय पण मला अजिबातच झेपला नाही.

'बाईपण ' पाहिला आत्ता घरीच...ठीक वाटला...थिएटरला जाऊन बघण्यासारखा नाही वाटला....का कुणास ठाऊक पण हा चित्रपट depressing वाटला मला...यापेक्षा 'पैठणी ' कितीतरी छान होता.

'प्रभात ते सैराट' हा कार्यक्रम बघितला. सादरकर्ते राहुल सोलापूरकर.
अतिशय उत्तम कार्यक्रम आहे. नावावरून कळतंच की मराठी चित्रपटांचा प्रवास दाखवणारा कार्यक्रम आहे. असा कार्यक्रम करणं सोपं नाही. पण कष्ट घेऊन, जुन्या क्लिप्स, फोटो, माहिती गोळा करून, त्याला योग्य निवेदनाची जोड दिली आहे.
गायक आणि नर्तक कलाकार उत्तम आहेत. भक्तिगीतांपासून लावण्यांपर्यंतची सगळी गाणी त्यांनी चांगली सादर केली.
राहुल सोलापूरकरांचं निवेदन उत्तम.
उगाचच सगळ्याच चित्रपटांना 'छान छान' म्हणण्याचा गोडगोडपणा नाही. ज्या ज्या काळात एकाच प्रकारचे सिनेमे आल्यामुळे साचलेपणा आला होता किंवा दर्जा खालावलेला होता, तिथे तिथे तसा उल्लेख आहे.
हा 'सांगीतिक प्रवास' असल्यामुळे काही मर्यादा येतात. काही सिनेमे चांगले असूनही त्यात गाणी नसतील किंवा असूनही फारशी गाजली नसतील असं असू शकतं. अशा चित्रपटांचाही योग्य उल्लेख झाला आहे. उदा. श्वास, डोंबिवली फास्ट, नॉट ओन्ली मि. राऊत इत्यादी.
एक गोष्ट मात्र खूप खटकली. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या जोडीचा उल्लेखच झाला नाही. खरं तर त्यांच्या चित्रपटांचं खूप मोठं योगदान मराठी चित्रपटसृष्टीत आहे. त्यांच्या चित्रपटांचा स्वतंत्र उल्लेख हवाच होता.
त्याचबरोबर स्मिता तळवलकरांच्या चित्रपटांचाही जास्त चांगला आढावा हवा होता. मला वाटतं फक्त 'तू तिथे मी'चा उल्लेख झाला. पण कळत नकळत, चौकट राजा, सवत माझी लाडकी असे इतर अनेक चांगले चांगले आणि वेगळे चित्रपट उल्लेखावाचून राहिले.
अर्थात इतका मोठा आढावा घेताना सगळंच जमणं कठीण आहे हे मान्य. तरीही वरचे दोन मुद्दे खटकले.
पण तेवढं सोडता, एकंदरीत अतिशय चांगला कार्यक्रम बघायला मिळाला!

सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या जोडीचा उल्लेखच झाला नाही.
>>> मलाही माहित नाही हि जोडी.. कोणते चित्रपट दिले आहेत त्यांनी?

च्रप्स,
दोघी, देवराई, वास्तुपुरुष, दहावी फ, अस्तु, कासव इत्यादी अनेक उत्तमोत्तम सिनेमे आहेत त्यांचे.

परवा बाईपण बघितला आणि खरंच आवडला.
काही काही जागा लाऊड घेतल्यात, पण सिनेमॅटिक लिबर्टी असते आणि असायलाच हवी नाहितर चित्रपट मचूळ होऊन जातो.
हे असं कुठं असतय? असं कोण बोलतय वगैरे म्हणणार्‍याचं हसू येतय..कारण असं बोलणार्या, वागणार्या, अबोला धरून राहणार्‍या बहिणी-बहिणी, बहीण-भाऊ अशा जोड्या प्रत्यक्ष माहितीत आहेत Happy

मला ते रीवरजन (?) जे एका गाण्यात दाखवलाय ते विलक्षण आवडलं...भूतकाळात जाऊन (ब्लॅक न व्हाईट) भविष्यातले कॅरॅक्टर जाते आणि जे त्या वेळी करायला हवे होते पण राहून गेलेय, ते करताना दाखवलंय. भारीच !!

खरंच कित्ती कित्ती वेळा असं मनात येतं की मला हे भूतकाळात जाऊन अनडू/डू करता आलं असतं तर....!
आणि ह्या बायकांचाच नाही तर बायका, मुली, मुलगे, नवरे सगळ्यांचाच चित्रपट आहे- कौटुंबिक!

इथे फुल्ल हाऊस फुल होते, आणि सर्व एजग्रूप बायका मुले, पुरुष अगदी सर्व होते. धमाल आली Happy

आज हा बाफ दिसल्यावर इथेही लिहीतो Happy

"घरच्या प्रेशरमुळे" मी अगदी निरिच्छेने "बाईपण भारी देवा" बघायला गेलो. आणि आता मी "टोटल कन्व्हर्ट" आहे. धमाल पिक्चर आहे. वरती लोकांनी जे फ्लॉज वगैरे लिहीले आहेत ते धरूनसुद्धा पिक्चर एन्जॉयेबल आहे. याचा थेट टार्गेट ऑडियन्स पुरूष लोक नाही. सगळीकडे चित्र असेच दिसते की बायकांच्या झुंडीच्या झुंडी जाउन पिक्चर पाहात आहेत. पोस्टर समोर फोटो काढत आहेत - पिक्चर बघताना अनेकदा जाणवते की प्रेक्षकांतून उत्स्फुर्त रिस्पॉन्स मिळतो. बहुतांश बायकांचा पण पुरूषांना बघायला बोअर होणार नाही.

मला वाटले होते ही "झिम्मा"ची पुढची आवृत्ती आहे. पण हा चित्रपट जास्त चांगला आहे. लोकांकडून पडणार्‍या टाळ्या. पब्लिकचा हॉल मधून व थिएटर मधून लौकर पाय न निघणे. पोस्टर समोरची गर्दी - सगळी "हिट" ची लक्षणे आहेत. सैराट ला ते गाणे दोनदा लावत. इथे पोस्टरसमोर इतकी झुंबड होती की नंतर तो पोस्टर त्यांनी थिएटरच्या बाहेर आणून ठेवला आत गर्दी नको म्हणून Happy

हा थिएटर मधेच बघायचा पिक्चर आहे. जरूर पाहा Happy टोटल माहौल आहे.

युट्युबवर पेन्शन नावाचा मराठी सिनेमा पाहिला.

सोनाली कुलकर्णी (सिनिअर) बाकिचे कलाकार सगळे नवीन.

एका खेडेगावातल्या गरीब घरातल्या सासू, सून (सोकुल) आणी नातवाची गोष्ट. मुख्यत्वे सासूच्या पेन्शनवर (जे तिचा नवरा सैन्यात असल्याने त्याच्यानंतर मिळत असतं) त्यांचं कसंबसं भागत असतं आणि सून छोटीमोठी घरकामं करून हातभार लावत असते. मुलाला शिकून खूप मोठं करायची स्वप्नं दोघी बघत असतात. सासू सुना दोघींचं नातं छान आहे. सून मायेने सासूची काळजी घेत असते. आजीलाही या दोघांचं आपल्या मागे कसं होईल ही चिंता असते.
अशातच या अंथरूणाला खिळलेल्या आजीची तब्ब्येत खालावत जाते हळूहळू आणि एक दिवस तिचा मृत्यू होतो. तिला मिळणार्‍या पेंशनवर बरंच काही अवलंबून असतं. त्या महिन्याची पेन्शन यायची बाकी असते नेमकी त्याआधीच आजी मरण पावते मग ते मिळवण्यासाठी केलेली खटपट, थोडी लबाडी, लपवाछपवी हे सगळं म्हणजे हा सिनेमा. हे सगळं चुकीचं आहे हे कळत असूनही त्यांची परिस्थिती बघून काही भाष्य करावंसं वाटत नाही. एकदम साधी सरळ निरागस गोष्ट.

मला आवडलं ते गावातलं एकदम टिपीकल वातावरण, काळजी घेणारे ,सतत विचारपूस करणारे शेजारी, तिथली शाळा, मास्तर पोरं, तिथली छोटी मोठी प्रेमप्रकरणं. सोनाली कुलकर्णीचं खेडवळ मराठी ठीक आहे पण काम खूप छान केलंय तिने. त्या लहान मुलाचाही अभिनय मस्त.

अंजली थँक्स धन्यवाद.
>>हा थिएटर मधेच बघायचा पिक्चर आहे. जरूर पाहा Happy टोटल माहौल आहे.
थँक्स. फ्रिमाँटमध्ये लागला आहे, बघेन तिकडनं हलायच्या आत.

मी पण बघितला बाईपण.. आवडला मला.
पण एक गोष्ट खटकली. बहिणींमधे प्रॉब्लेम्स आहेत ठिक आहे पण त्या एकमेका>पासुन ईतक्या लांब असतात की एक्मेकींच्या आयुष्यात काय चाललं आहे हे त्यांना माहीत नसतं. अगदी सुकन्या च्या घरी जातांना तिचं आडनाव काय हे सुध्धा. कितीही ईशुज असलेत तरी त्या पिढीतील बायका नक्कीच एकत्र येत असणार.
जया चा नवरा ईतका प्रेमळ असतो तर त्याचे तिच्या बहीणींशी पन चांगले ईक्वेशन दाखवायला हवं होत. काही बहीणी तर मुलीच्या वयाच्या असणार..

मला तर त्या ६ जणी मॉलमध्ये ६ ओळखीच्या बायका भेटाव्यात तशा वाटल्या. का ही ही संबंध नाही एकमेकींशी आणि काही देणंघेणंही नाही एकमेकींशी.

जया चा नवरा ईतका प्रेमळ असतो तर त्याचे तिच्या बहीणींशी पन चांगले ईक्वेशन दाखवायला हवं होत. काही बहीणी तर मुलीच्या वयाच्या असणार..
>>> दाखवलंय ना. मेव्हणीसाठी हौसेने पावभाजीची सामान आणणारा नवरा.

मी पण पाहिला बाई पण ..मला वाटलं नव्हत आवडेल म्हणून जावं असं पण वाटत नव्हतं पण गेले आणि आवडला.
बाकी गोष्ट वगैरे छान नाहीच आहे, बहिणींच वैर, त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम आणि तीन तासात जादूची कांडी फिरवून सगळं गोड गोड असा सरधोपट मार्ग आहे. त्या साठी मग खूप न पटणाऱ्या गोष्टी ही दाखवल्या आहेत.

बोलू नये पण त्या सगळ्याच जणी फारच स्थूल दिसतात जे की सिनेमाच्या दृष्टीने निगेटिव्ह ठरू शकत होतं पण त्यांनी सगळ्यांनी अभिनय खूप छान केला आहे. मराठी चित्रपटात सहसा न आढळणारी गोष्ट म्हणजे त्या सगळयांचे कपडे, ते फारच छान आहेत आणि प्रत्येकीला खूप कपडे दिले आहेत , आज एक उद्या एक एवढेच नाहीयेत.
त्यामुळे कथा सामान्य असून ही कंटाळा आला नाही अजिबात.

Pages