चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रान (乱) (१९८५)

अकिरा कुरोसावा ह्या प्रसिद्ध जॅपनीज दिग्दर्शकाचा रान हा सिनेमा पाहिला. कुरोसावाने बरेचसे सिनेमे कृष्णधवल बनवले. रान हा त्याच्या मोजक्या रंगीत सिनेमांपैकी एक आहे. त्यामुळे कपडे, ध्वज ह्यांचे निळे, पिवळे, लाल, राखाडी रंग, टेकड्यांचे हिरवे रंग, आकाशाचे वेगवेगळे रंग - रंगांचा भरपूर वापर केला आहे आणि ते बघताना खूपच भारी वाटते. त्यामुळे सिनेमा बघायला खूप सुंदर आहे.
images (5)_1.jpegran016.jpg
कथा शेक्सपिअरच्या राजा लियर ह्या नाटकावर आधारित आहे. बागबान, नाट्यसम्राट मधुन ही गोष्ट थोडीथोडकी तरी आपल्यापर्यंत पोहोचली आहेच. पण तरी, स्क्रीन वर रूपांतर जबर झाले आहे. जपान मधला एक मोठा सामंत आपल्या तीन मुलांमध्ये सगळी सत्ता विभागून स्वतः निवृत्त होण्याचे ठरवतो. त्यानंतर होणारा सत्तासंघर्ष सिनेमात दाखवला आहे. रान म्हणजे अंधाधुंद, केऑस. कथा आणि संवाद सुद्धा खूप आवडले.
बघण्यासारखा सिनेमा.

वाळवी पाहताना न खटकलेल्या गोष्टी (स्पॉयलरसहीत)

१. डेंटिस्ट असलेली स्त्री पर्फेक्ट मर्डर कसा करावा याचं प्रशिक्षण एका व्यावसायिकाला देत असते. त्याच्याकडून सराव सुद्धा करून घेत असते. हे ज्ञान बहुतेक क्राईम पॅट्रोल मधून आलेलं असावं.

२. जिचा खून करायचाय तिची मनःस्थिती ठीक नाही. तरीही तिचा आत्महत्या करण्याचा निर्धार "त्या" दिवसापर्यंत टिकून राहील या गृहीतकावर संपूर्ण प्लान बनवलेला असतो.

३. प्लान मधे करायच्या गोष्टींची ट्रायल रोजच्या रोज घेतली जाते. पण डी डे च्या दिवशी अचानक अडचणी उद्भवणार हा प्रेक्षकाला आलेला अंदाज साफ फसतो. म्हणजे अडचणी नाही तर योगायोगांच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा उभ्या राहतात.

४. सुभाला त्याच दिवशी , त्याच वेळेला खून करायचा असतो. खून होताना तो तिथेच हजर असतो.

५. प्लानिंग अगदी परफेक्ट करणारी डेंटीस्ट, प्लान ओमफस झालाय हे ऐकल्यावर, फोन ट्रॅकिंगचा मुद्दा माहिती असतानाही विचार न करता घटनास्थळी येते. सीडीआर ची कल्पना असतानाही दोघे एकमेकांशी घटनास्थळाहूनच बोलतात.

६. गाडीत प्रेत ठेवून सर्वांचे फोन एकाच वेळी एकाच कारमधून प्रवास करतात. आपल्या मिस परफेक्शनिस्ट डेंटीस्टला त्यात काहीच खटकत नाही.

७. गाडीत प्रेत असताना सुट्ट्या पैशांसाठी स्वजो हुज्जत घालून आपला चेहरा त्या पंपवाल्याच्या लक्षात राहील याची व्यवस्था करातो.

८. टोल नाक्यावर तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्विकारावा तशा थाटात आपले क्लिअर फोटोज टोल नाक्याच्या सीसीटीव्हीत येतील अशा बेताने तो मुंडकं बाहेर काढत असतो.

९. टोल नाक्यावर गाडीचा नंबर, फोटो, आतल्या व्यक्तींचे फोटो आलेले असतील याचे आपल्या मिस प्लानिंग कमिशनरयाचे सोयर सुतक नसणे. हीच का ती सुरूवातीच्या काही मिनिटात प्लानच्या एक्झेक्युशन साठी बारीक सारीक डिटेलिंग करणारी ? झेरॉक्स प्रती विसरल्या हे आठवणीने सांगणारी ?

१०. प्रेताची विल्हेवाट लावली तरी जर अवशेष सापडले तर त्या रस्त्याच्या टोलवरचे सीसीटूव्ही फुटेज मिळाल्यावर मयताचा नवरा, त्याची डेंटीस्ट, तिचा सायकॉलॉजिस्ट त्याच रात्री त्याच रस्त्याला एकत्र काय करत होते, या प्रश्नाचे उत्तर काय असावे याचा कुणीही विचार केलेला नसणे.

११. जेव्हढी पात्रे म्हणून उत्तरार्धात दिसतात तेव्हढे पुढे रस्त्याला अडचणीत सापडणे, रस्त्यावर पाठलाग करणे, अपघात होणे या योगायोगाच्या दुष्टचक्रात सापडलेले आढळतात. इतर रहदारी नसल्याने पुढे योगायोग ठरणार नाही असा एकही व्यक्ती त्या रस्त्याने जात नाही. ज्यांचे प्राण जात नाही ते कँप फायरसाठी संपूर्ण रस्ता सोडून खड्ड्याचीच जागा निवडतात.

१२. एक डॉक्टर, एक सायकॉलॉजिस्ट आणि एक व्हाईट कॉलर्ड व्यावसायिक मिळून मुंग्या माराव्यात तशी माणसे मारत असतात.

१३. एकूण तीन प्रेतं गाडीत घालून पुन्हा घरी आल्यावर दुपारी कामवाल्या बाईंना काय सांगायचं याचा विचार कुणीच करत नाही.

१४. ज्या अर्थी एव्हढे लुप होल्स सोडले आहेत त्या अर्थी प्रेत सापडल्यावर पोलीस त्यावरून यांच्यापर्यंत पोहोचणार असा अंदाज बांधत असतानाच या सगळ्याला फाट्यावर मारत, बास आता म्हणत मायबोलीवर लेखाचा शेवट गुंडाळावा तसा गुंडाळून त्या शेवटाचा संबंध वाळवीशी जोडला आहे. बसा आता विचार करत हा अ‍ॅडेड अ‍ॅडव्हाण्टेज.

या सर्व गोष्टी न खटकता सिनेमा का एंजॉय करता आला याचे कारण म्हणजे नियमितपणे पाहिलेले साऊथचे सिनेमे + लुटेरे हा चित्रपट. अशा सिनेम्यांमुळेच वाळवीचे महत्व शतपटीने वाटू लागले आणि सिनेमा चक्क आवडला.

एखादी रेष मोठी करायची असेल तर तिच्याशेजारी छोटी रेष आखावी असे महान विचारवंत पीट सँप्रास म्हणून गेला आहे.

नेफ्लिवर रन बघितला. फेबुवरच्या एका सिनेमा ग्रुप वर सजेशन्स मधे होता म्हणून पाहिला. मला तरी काय झेपला नाही.
कोणी बघितला तर विस्कटून सांगा.
स्पॉयलर अलर्टः
एका आईने आपलं स्वतःचं बाळ गेल्यावर हॉस्पिटलम्धून चोरलेल्या दुसर्‍या लहान मुलीला आपलं म्हणून वाढवलं असतं पण तिला पॅरालाईझ करून ठेवलेलं असतं. ती बाहेरही तिला कधी जाऊ देत नसते. ती तशीच पॅरालाईझ रहावी म्हणून तिला कुत्र्याची औषधे देत असते. कसंतरी मुलीला एक दिवस हे कळतं. ती खूप आटापिटा करुन शोध घेण्याचा प्रयत्न करते की आई अशी का वागतेय? पण पुढे मला तरी काही ठोस कारण कळलंच नाही. निव्वळ आईची सायकोगिरी आहे का काय ते.

अशा सिनेम्यांमुळेच वाळवीचे महत्व शतपटीने वाटू लागले आणि सिनेमा चक्क आवडला.>>> हे लिहिले ते बरे केले नैतर तुम्हाला जॉनर कसा कळत नाही यावर सरांनी पोस्ट लिहिली असती
Happy

तो मूळचा 2016 चा आहे सामो पिक्चर बहुतेक. मलाही तोच प्रश्न पडला होता की नाना सध्या इतके तरुण दिसणार नाहीत. सर्व व्हिज्युअल फील मस्त आहे.

झीवरती नानाचा 'तडका' सिनेमा पाहीला
>>
मुलगी पाहायला जातो अन् वडा टेस्ट केल्यावर राजेश शर्मा ला घेऊन येतो ते महान आहे...
बाकी मूळ प्लॉट उगाच खेचला आहे असं वाटतं

शेवटी जरा अ आणि अ आहे, पण व्हिज्युअल मस्त वाटतात गोव्याची.तुकाराम आणि मुरली शर्मा आणि इरावती चं मैत्री नातं मस्त घेतलंय.बाकी तापसी चं पात्र उगीच आहे.
मला चित्रपट बघून 20 वर्षं मागे गेल्याचा फील आला, सिर्फ तुम मध्ये गाडी सुटता सुटता प्रिया गिल संजय कपूर ला स्वेटर वर च्या दिव्या वरून ओळखते तसं(ते स्वेटर अति हॉरीबल आहे.मी संजय कपूर असते तर असं स्वेटर वापरायला लागण्यापूर्वी नातं तोडलं असतं Happy )
सीन चा संदर्भ
https://youtu.be/ZEtuDqbL9PI

आदिपुरुषचा एक रिव्यू
Cherry blossoms in Sri Lanka, Hanuman speaking Bombaiya, the mythical Sone Ki Lanka looking darkly Gothic, Raavan looking like a Bollywood dude... this is not modernisation. This is a travesty.

संवादलेखक कोण आहे ते पहा !
( चोप्रा च्या महाभारत चे संवार राही मासूम रझा यांनी लिहिले होते)

फिल्म में एक सीन है, जिसमें रावण का बेटा हनुमान की पूछ जलाता है. वो कहता है, “जली न..जिसकी जलती है..” इस पर बजरंगबली का किरदार कहता है, “कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की.”

"Teri bua ka bageecha hai jo hawa khane aa gaya?"

हनुमान बंबईया हिंदी बोलला तर काय बिघडलं? नवा अवतार/ इनकार्नेशन टाईप केलं असेल तर चांगलंच आहे की. ते संस्कृतोत्त्भव संवाद ऐकून पार डोकं फिरतं. ताताश्री आणि मम्मीश्री!
शेरलॉक स्मार्टफोन वापरुन नव्या अवतारात चालतो तर आमच्या हनुमानाने काय घोडं मारलंय! Lol

भेडीया पाहिला.धमाल पिक्चर आहे.खूप मेसेज विनोदातून दिलेत.वरुण धवन, पांडा, वरुण धवन चा कझिन(स्त्री मध्ये ज्याला भुताने नेलं होतं तो) आणि चाउमिन सर्वांचा अभिनय आवडला.क्रिटि सेनॉन शो पीस आहे पण तिनेही जितका वाव मिळाला त्यात चांगलं काम केलंय.

बघू ना ?

आचार्य Happy वाळवीबद्दल १४ पैकी बहुतांश निरीक्षणे बरोबर आहेत. २-३ सोडून द्या सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून किंवा कॅरेक्टरायझेशन म्हणून.

पिक्चर बघताना अगदी इतके नाही तरी काही सीन मधे ती प्रसिद्ध "लिबर्टी" घेत आहेत हे जाणवत होते. पण एकूण पिक्चरचा वेग व लोकांचा अभिनय, "हिच्याकरता बायकोला मारलं याने" सारखे संवाद - यामुळे मला पिक्चर बघताना खूप मजा आली.

पण कथेचा बेसच मुळी अननुभवी लोकांनी भलत्याच उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला गेल्यामुळे झालेला गोंधळ हा आहे - ते स्वतःला कितीही स्मार्ट समजत असले तरी खूनबीन करून पचवण्याची कुवत त्यांच्यात मुळातच नाहीये. ते दहा ट्रिव्हिअल मुद्द्यांचा विचार करतात आणि दोन मोठ्ठे धोके त्यांच्या लक्षातच येत नाहीत. सगळी विनोदनिर्मिती जी काही आहे ती याभोवतीच आहे ना!

बरोबर आहे स्वाती पण थोडा न्युआन्स आहे. मोलकरणीला काय उत्तर द्यायचे, किंवा अशा अचानक होणार्‍या बदलांना कसे तोंड द्यायचे याला त्यांच्याकडे उत्तर नसते - हा तू म्हणतेस तसा भाग झाला.

पण सुभाही खुनाच्या उद्देशाने त्याच वेळेस तेथे पोहोचणे - हे कथेत इतके "पिव्होटल" असणे हे म्हणजे फार मोठ्या योगायोगावर सगळे बेतले आहे. हे जरा "प्राण अनेक वर्षांनी आपल्या जुन्या घरी येतो त्याच वेळेस विनोद खन्नाही अनेक वर्षांनी तेथे काहीतरी आठवण आल्यासारखा येतो" च्या वळणावर आहे Happy

लोल हो.

Lol
प्राणनी जे केलं ते मजबुरीने केलं. देवानंद असू द्या, विनोद खन्ना असू द्या. चांगले कपडे घालून आपल्याच घरी भेटलं म्हणजे हळदीकुंकू असेलच असं नाही. सदिच्छा भेटही असू शकते.

"Biggest Little Farm" ही एक सुंदर डॉक्युमेण्टरी २-३ फ्लाइट्स मधे मजल-दरमजल करत पाहिली. ती या फार्मवर आधारित आहे असे वाचले. शहरात राहणार्‍या एका कपलने एका माळरानावर जमीन विकत घेउन तेथे फार्म उभे केले. त्यांना आलेल्या अनुभवांवर ही फिल्म आहे. इथे फार्म म्हणजे विविध फळझाडे, अंड्यांचा उद्योग व बरेच प्राणी तेथे आणून त्यासंबंधातील जोडधंदे वगैरे बरेच काय काय आहे. खूप इंटरेस्टिम्ग आहे पाहायला.

मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे त्यांना फार्म मधल्या चॅलेंजेसवर फार्म मधेच उत्तरे सापडतात तो भाग. जरूर पाहा.

१४ ही पॉईंट्स शेवट ----- असा असणार हे डोक्यात ठेवुनच ignore केली असणार Happy

Biggest Little Farm << हे कुठे बघायचे?

Biggest Little Farm << हे कुठे बघायचे? >>> अजून कोठे स्ट्रिमिंग वर आलेली दिसत नाही. मी डेल्टा फ्लाइट मधे पाहिली.

अजून कोठे स्ट्रिमिंग वर आलेली दिसत नाही. मी डेल्टा फ्लाइट मधे पाहिली. >> डेल्टा फ्लाइट वगैरे वाचून मला उगाचच 'ह्या एकदा, मजा दाखवतो' वगैरे आठवले Wink

काल नेटफ्लिक्सवर नजर अंदाज पाहिला. छान आहे सिनेमा. कुमुद मिश्रा, दिव्या दत्ता, अभिषेक बॅनर्जी, रागेश्वरी सचदेवा - सगळ्यांची कामं मस्त झाली आहेत.

ओम राउतचा आदिपुरुष वाइट ट्रोल होतोय
हे मारुतिचे डॉयलॉग्ज :
जो हमारी मां बहनोंको हाथ लगायेंगे हम उनकी आलंका लगा देंगे
कपडा तेरे बाप का तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बापकी
रावणाचे डॉयलॉग्ज :तेरी बुवाका बगीचा है क्या जो हवा खाने चला आया ?
मेरे एक सपोलेने तुम्हारे शेषनागको लंबा कर दिया , अभीतो पुरा पिटारा भरा है
Rofl
हनुमानाचा जोकर केलाय म्हणे !
हा रिव्ह्यु बघाच, एक सेकन्द पण मिस करु नका, फुल्टु पैसा वसुल..धमाल !
https://youtu.be/NGsw0wqgWTY

Pages