Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://youtu.be/qiAX4jk8Ixs
https://youtu.be/qiAX4jk8Ixs
विकी वेलिंगकर चित्रपट...
हाफ तिकीट आणि नशीबवान चांगले
हाफ तिकीट आणि नशीबवान चांगले वाटलेले मला. पेईंग घोस्ट एकदा बघू शकतो. पोस्टकार्ड मधली दिलीप प्रभावळकरची गोष्ट हृदयद्रावक आहे. शेवटी राधिका आपटे त्या वाळवंटात काय डान्स करत असते कळले नाही. वेड लागते का तिला.
फुकट पिक्चर ची लिंक इथे देऊ
फुकट पिक्चर ची लिंक इथे देऊ नये असं वाटतं.
कॉपीराईट चा भंग आणि मराठी पिक्चर चा धंदा कमी होणे या कारणास्तव.(आता विकी वेलींगकर मुळात तितका महान चित्रपट नाही हे सत्य आपण क्षणभर बाजूला ठेवू ☺️☺️)
प्राईमवर आहे.
अनु मुद्दा बरोबर आहे.
अनु मुद्दा बरोबर आहे.
आता कुठे धंदा होणार आहे ?
आता कुठे धंदा होणार आहे ?
जुना होऊन गेला
युट्युबवर काल आलेले पिक्चर पण
युट्युबवर काल आलेले पिक्चर पण वाईट प्रिंट सह लिक होतात, आपण काही करू शकत नाही, पुस्तकांच्या पीडीएफ लिक होतात, आपण काही करू शकत नाही.पायरसी मोठं मार्केट आहे.आपण काही करू शकत नाही.
त्यातल्या त्यात या लिंक फॉरवर्ड व प्रसार न करून अजून 100 जणांनी पिक्चर न पाहणे/प्राईम/झी5 न घेणे ही शक्यता आपणा टाळायचा प्रयत्न करु शकतो.आपल्या पुरतं ठरवू शकतो की पायरेटेड वाईट कॉपी न बघता 50 रु मध्ये गुगल मुव्हीज रेंट, प्राईम इत्यादींवर ऑफिशियल चांगली कॉपी बघणे याला प्रेफ्रन्स देता येईल.(पिक्चर अतिशय बोअर वाटला ☺️ आणि तरीही सोनाली व्हाइट टी शर्ट ब्लु जीन्स मध्ये आवडणाऱ्या एखाद्या चाहत्याला पिक्चर आवडेलही.त्या एका चाहत्याने ऑफिशियल कॉपी बघावी यासाठी माझा उगीच प्रवचन मोड.आता थांबते.)
संकर्षन चा खोपा बघितल प्राईम
संकर्षन चा खोपा बघितल प्राईम वर. चित्रपटाची कथा आथवा संदेश मला आवडला. थोडा अजुन चांगला घेता आला असता. पहिला भाग उगाच भरकटवला आहे. दुसरा भाग अजुन वाढवता आला असता. खिल्लरी लातुर मधे झालेला भुकंप यावर हा चित्रपट आहे. त्यात जो संदेश दिला आहे तो मला आवडला. जो केवळ भुकंप हे निमित्त मात्र धरले तर ईतर आपत्तीसांठी पण उपयोगी पडेल. सुरुवातिला खोपा हे नाव का दिले असे वाटते. याचे स्प्ष्टीकरण चित्रपटात विक्रम गोखले फार छान देतात.
'चोरीचा मामला' प्राईम वर
'चोरीचा मामला' प्राईम वर बघितला.. एकदा बघायला चांगला, मधे काही ठिकाणी उगाच खेचतोय असे वाटते... पण करमणूक म्हणून बघायला हरकत नाही..
वेलकम होम (Welcome Home )...
वेलकम होम (Welcome Home )... मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन यांचा हा चित्रपट कुठे पाहता येईल? सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचे दिग्दर्शन आहे.
अनुमती कुठे बघता येईल.
अनुमती कुठे बघता येईल.
इथे...https://einthusan.tv
इथे...
https://einthusan.tv/movie/watch/3991/?lang=marathi
फार रडले होते हा चित्रपट बघून
वेलकम होम अजून ऑनलाईन नाही.
वेलकम होम अजून ऑनलाईन नाही.
धन्यवाद सोनाली पण ती लिंक
धन्यवाद सोनाली पण ती लिंक उघडत नाही. तुमच्या देशात नाही दाखवता येणार असे लिहिले आहे.
प्रवास आलाय प्राईम वर. कुणी
प्रवास आलाय प्राईम वर. कुणी पाहिला का? कसा आहे?
पारंबी सिनेमा बघीतला. चांगला
पारंबी सिनेमा बघीतला. चांगला वाटला.
-दिलीप बिरुटे
पंधरा ऑगस्ट नावाचा सिनेमा
पंधरा ऑगस्ट नावाचा सिनेमा पाहिला. आवडला.
"धन्यवाद सोनाली पण ती लिंक
"धन्यवाद सोनाली पण ती लिंक उघडत नाही. तुमच्या देशात नाही दाखवता येणार असे लिहिले आहे." ---> @ चम्पा टर्बो व्हि पी एन नावाच ऑरेन्ज कलर चा आयकॉन आणि त्यात सश्याच चित्र आसलेला एक अप्लिकेशन आहे प्ले स्टोवर वरून डाउन्लोड करा आणि मग त्या साईट वर जावा
प्रॉक्सि लागते आहे
"फुकट पिक्चर ची लिंक इथे देऊ
"फुकट पिक्चर ची लिंक इथे देऊ नये असं वाटतं." --- > @ मि-अनु बरोबर आहे अगदि
म्हणून मी बॉलिवुड आणि हॉलिवुड च्याच लिंक्स देतो फक्त
मराठि सिने इन्ड्स्ट्री आधिइच रेअरली बिझनेस करते ... बाकि चित्रपट पुणे- मुम्बै सोडून इतर ठिकाणि आठवडा भरच रहातात कसेबसे :०
https://youtu.be/E2WHEDGPiVw
https://youtu.be/E2WHEDGPiVw
'अश्वघोष कलाकृती' निर्मित
'कथापुष्प' - एका लेखकाची, एक कथा.
भाग :- ३१
कथा :- पर्याय
लेखक :- नारायण धारप
कलाकार :- आशिष भोसले, डॉ. प्रणित फरांदे, अशोक प्रधान, अपूर्वा देशमुख.
छायांकन :- शिवानी केकान-भोसले, प्रणाली गायकवाड, प्रेषित फरांदे, अभिषेक प्रधान.
संगीत :- रमाकांत जाधव.
संकलन आणि दिग्दर्शन :- गोपी रविंद्र भोसले.
https://youtu.be/E2WHEDGPiVw
Like l Share l Comment l Subscribe l
#Ashwaghosh_kalakruti
#Kathapushpa
#Marathi_Story
डॉ प्रणित फरांदे , मिरज मेडिकलचे विद्यार्थी
धन्यवाद प्रगल्भ. ते ऍप डालो
धन्यवाद प्रगल्भ. ते ऍप डालो केले आणि त्या लिंकवर चित्रपट दिसूही लागला पण फार आणि सतत अडकतो चित्रपट. माझे इंटरनेट व्यवस्थित आहे कारण बाकी सगळे नीट दिसते. थोडा बघितला आणि सोडून दिला बघायचा.
अनवट हा आदिनाथ व उर्मिला
अनवट हा आदिनाथ व उर्मिला कोठारेचा हॉररपट यु ट्यूबवर पाहिला. छान वाटला. शेवटची कारणमीमांसा पूर्ण नाही तरी बरीच पटली. कोकणातील निसर्ग खूप सुंदर टिप्लाय. आदिनाथ 'डॅमीट' ची आठवण करून देतो

प्राईमवर नवीन मराठी चित्रपट
प्राईमवर नवीन मराठी चित्रपट आले आहेत. प्रवास, एकतीस दिवस आणि ऍरॉन की असाच काहीतरी. एकतीस दिवस आणि आरोन मध्ये शशांक केतकर आहे.
बोक्या सातबंडे बघीतला तुनळीवर
बोक्या सातबंडे बघीतला तुनळीवर. मस्त निरागस निखळ मनोरंजन.
काल तेंडुक्लकलकरांची दोन
काल तेंडुक्लकलकरांची दोन नाटके युट्युबवरती पाहीली-
(१) शांतता कोर्ट चालू आहे
(२) सखाराम बाईंडर
अंगावर येतात.
शांतता कोर्ट मध्येच बेणारे
शांतता कोर्ट मध्येच बेणारे बाई आहेत ना. सखाराम मी सयाजी, सोकूल आणि चिन्मयी सुमित असलेलं बघितलं आहे. वेगळे कलाकार असलेलं सखारामपण आहे बहुतेक तूनळीवर.
सोकूल ची ओव्हरअक्टिंग फार आहे
सोकूल ची ओव्हरअक्टिंग फार आहे त्यात...
Farzand aani fatteshikast he
Farzand aani fatteshikast he cineme kuthe baghta yetil
प्राईमवर 'बापजन्म' कोणी
प्राईमवर 'बापजन्म' कोणी बघायला सांगितला होता ते आठवत नाही. पण त्यांना धन्यवाद.
खुपच आवडला. मध्येच रडू येइल असे वाटले होते पण सिनेमा फार हलकाफुलका ठेवलाय.
शॉर्ट आणि स्वीट. काही गोष्टी 'अ आणि अ' वाटल्या पण ते जाउदे.
मागे सोनी मराठीवर रात्री दोघी
मागे सोनी मराठीवर रात्री दोघी होता, माहिती नव्हतं. मी पिक्चर जास्त बघत नाही, कंटाळा येतो पण मुक्ता आवडते म्हणून बघुया ठरवलं. एक तास होऊन गेलेला त्यामुळे त्यात काय दाखवलं माहिती नाही . मुक्ता bestच, प्रिया फार आवडत नाही, ती ok. कि क पण जाम आवडला आणि त्याच्या charactor बद्दल सहानुभूती वाटली. तो असताना खरं काय ते लेकीला समजायला हवं होतं हे राहून राहून वाटलं. अर्थात कथेचा गाभा वेगळा आहे तरीही कुठेतरी वाटत राहिलंच.
अन्जूताई, प्राईमवर आहे दोघी.
अन्जूताई, प्राईमवर आहे दोघी. मला खूप आवडला. टीव्हीवर पण लागतो असं दिसतंय. इतक्यातच शनिवारी की रविवारी दुपारी लागला होता. तेव्हा परत पाहिला.. गौरी देशपांड्यांच्या कथेवर आधारित आहे. त्यांच्याच दुसऱ्या एका कथेतला संदर्भही (रामचा) बेमालूमपणे या कथेत आणलाय. दोघींचे अभिनय उत्कृष्ट झालेत!
Pages