Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किंवा "मी तवा" व "तू हिरे"
किंवा "मी तवा" व "तू हिरे" असे दोघांनाही ऑब्जेक्टिफाय केले असावे <<<<
बरोबर आहे कारण ही ची वेलांटी र्हस्व आहे चित्रपटाच्या नावात.
मुंबई पुणे मुंबई १ चांगला
मुंबई पुणे मुंबई १ चांगला होता. तरीही आमच्यावेळी पुण्यातली मुलं अशी नव्हती, असं वाटलं होतं.
मितवा, तू ही रे, फुगे वगैरे बघून जन्म जन्मांतरीचे भोग भोगणाऱ्या मंडळींना दंडवत! किती ती सहनशक्ती!! ))
"मी तवा" व "तू हिरे" >>
"मी तवा" व "तू हिरे" >>
तेच त्या गाण्यात पण आहे - तू हिरे माझा मी तवा
आडनाव हिरे असेल,
आडनाव हिरे असेल,
ही ची वेलांटी र्हस्व आहे
ही ची वेलांटी र्हस्व आहे चित्रपटाच्या नावात. >>> ओह
हे लक्षात नव्हते आले.
तू हिरे माझा मी तवा >>>
हो आठवले. नात्याला काही नाव नसावे वगैरे वगैरे.
"हीरे ते तवा" एवढी अफाट रेंज
"हीरे ते तवा" एवढी अफाट रेंज असल्यावर आणखी कशाला हवे नात्याला नाव?
फुगे - नव्या दोस्तानावरून
फुगे - नव्या दोस्तानावरून घेतला होता (ना?)
मि तवा तू शेगडी - हा जोक आम्ही शाळेत असताना करायचो
हो हो.. फोटो कॉपी.. पण सिनेमा
हो हो.. फोटो कॉपी.. पण सिनेमा पाहिल्यावर मेंदूत ब्लॅक आऊट झाले होते म्हणून बहुतेक कार्बन कॉपी नाव लक्षात राहिले.
भाडिपा "निर्लज्ज यंदा कर्तव्य.. " ने तव्याला वेगळेच परिमाण प्राप्त करून दिले आहे.
मराठी चित्रपटात वयानुरूप रोल
मराठी चित्रपटात वयानुरूप रोल करणारे कुणीच नाही का? (अमेय वाघ सोडून)
सुभाची acting बघावी एक डाव मध्ये. बाकी सिरीयस रोल पण बरे आहेत.
जिलबी बघितला का कुणी? कसा आहे
जिलबी बघितला का कुणी? कसा आहे?
जिलबी चित्रपटाचे परीक्षण
जिलबी चित्रपटाचे परीक्षण चांगले येतं आहेत.
स्वप्नील जोशीचे सुद्धा कौतुक होत आहे.
दुर्दैवाने थिएटर मध्ये जायला सध्या वेळ नाही.
ज्याना असेल त्यानी आवर्जून जा..
आणि पिक्चर खरेच चांगला असेल, आवडला तर परीक्षण आणि चर्चेचा स्वतंत्र धागा काढा.
आजच्या पुरवणीत 'जिलबी' पटकथेत
आजच्या पुरवणीत 'जिलबी' पटकथेत फसलाय असं म्हटलंय.
अच्छा.. मी वृत्तपत्र परीक्षणे
अच्छा.. मी वृत्तपत्र परीक्षणे वाचत नाही. हल्ली काय पेड असते काय प्रामाणिक याची कल्पना नसते. म्हणून सोशल मीडियावरची मते वाचतो आणि त्यातला कल प्रमाण मानतो. तरी अजून फार जणांनी पाहिलेला आणि यावर लिहिलेले नाही. पण मानापमानला घोर अपेक्षाभंग लिहिणारे काही जण जिलबीचे कौतुक करत आहेत.
इलु इलू चित्रपटाच्या ट्रेलर
इलु इलू चित्रपटाच्या ट्रेलर खाली चक्क generative AI accounts चे कित्येक प्रतिसाद आहेत! आणि सर्व सकारात्मक. वाचून बघा लगेच लक्षात येईल.
हो रे! अरे त्यांची नाव पण बघ
सही पकडे
सही पकडे
आज फुलवंती बघेन. काल यु
आज फुलवंती बघेन. काल यु ट्युबवर थोडा पाहीला. नंतर आवाज ही नव्हता आणि रीळ फार बंडल होती. त्यामुळे रेंट किंवा विकत घेउन पाहीन. प्राजक्ताने चांगले काम केलेले आहे. गश्मीरची फक्त पालखी झलक दिसली.
हपा, अमित - हे भन्नाट
हपा, अमित
- हे भन्नाट फाइंडिंग आहे. अशा प्रत्येक प्रतिक्रियेमधे अजून काही गोष्टी कॉमन आहेत. चित्रपटाच्या नावाचे स्पेलिंग एकाच पद्धतीने लिहीलेले ("Iluilu"). शेवटी एक गुलाबी इमोजी. वाक्यात कोठेतरी गंडलेले व्याकरण
पाहीला फुलवंती. आवडला.
पाहीला फुलवंती. आवडला. गश्मीर आहे देखणा पण त्याचे पात्र मस्त आहे. वेदांतसूर्य शास्त्री ही व्यक्तीरेखा भन्नाट आहे. प्राजक्ता गोड आहे आणि अभिनय छान केलेला आहे. कथा तर बाबासाहेब पुरंदरे यांची त्यामुळे प्रश्नच नाही.
खाली चक्क generative AI
खाली चक्क generative AI accounts चे कित्येक प्रतिसाद आहेत! आणि सर्व सकारात्मक. वाचून बघा लगेच लक्षात येईल.>>>>>>>>
हे भन्नाट फाइंडिंग आहे. >>>>>>> +++१११ .... नाकातु च्या खाली पण एआयचे च कमेंट असणार गोड गोड. . बघायला पाहिजे तिकडे जाऊन
नाकातु च्या खाली पण एआयचे च
नाकातु च्या खाली पण एआयचे च कमेंट असणार गोड गोड. . बघायला पाहिजे तिकडे जाऊन Wink
>>>>>>
मी काल की परवा सिनेमागल्ली फेसबूक ग्रूपवर नाव काय तुझे ची पोस्ट पाहिली होती. त्या खाली खरेच एकूण एक कॉमेंट चांगली होती.
ही त्याची लिंक
https://www.facebook.com/share/p/18A8LVpdrN/
त्या खाली खरेच एकूण एक कॉमेंट
त्या खाली खरेच एकूण एक कॉमेंट चांगली होती.
>> हो. सगळ्या री ओढून चान चान म्हणणाऱ्या कमेंट्स.
हे लोक सिलेक्टीवली ठरवून एखाद्याला प्रमोट करतात की Admin गुपचूप निगेटिव्ह कमेंट डिलीट करतात माहिती नाही. पण गल्ली वाल्यांनी ठरवलं तर ते या शॉर्ट फिल्मची मिनिटामिनिटाला पिसे काढून घेऊ शकतात. (उगीचच म्हणून नाही.. यात बरेच फ्लॉज आहेतच की) तरीही एकामागोमाग एक चांगल्या कमेंट्स is too good to be true !!
त्या खाली खरेच एकूण एक कॉमेंट
त्या खाली खरेच एकूण एक कॉमेंट चांगली होती.>>>
मध्ये मी एका न्युसन्स व्हॅल्यूवाल्या तरूण राजकारण्याच्या मुलाखतीच्या कमेंटमध्ये हा प्रकार बघितला होता. नावात/ईमेलमध्ये काही तरी रँडम कॅरॅक्टर्स व नंबर असले की हमखास पॉझिटीव्ह कमेंट. आणि खरी नावं असली की साधक बाधक कमेंटस्
हे लोक सिलेक्टीवली ठरवून
हे लोक सिलेक्टीवली ठरवून एखाद्याला प्रमोट करतात की Admin गुपचूप निगेटिव्ह कमेंट डिलीट करतात माहिती नाही
>>>>>
ज्या लोकांचा आपसात संबंध नाही ते ठरवून कसे करतील? आणि एडमिन काही उडवू लागला तर गोंधळ नाही का होणार?
या मागचा पॅटर्न समजून घ्यायचा प्रयत्न कर. एकदा एका टोकाच्या ठराविक प्रतिक्रियांचा ट्रेंड सेट झाला की तोच बरेचदा कंटिन्यू राहतो.
आपल्या मताच्या विरुद्ध आलेले मत अप्रामाणिक असते असे नसते. ती स्विकारता यायला हवी कारण हे काही इलेक्शन नाही की बहुमताचा विजय असो.. इथे ही दोन्ही मते प्रामाणिक आहेत आणि मला तरी दोन्हीत तथ्य वाटते.
ही शॉर्ट फिल्म लॉजिकचे निकष लावता गंडली आहेच पण त्याचवेळी बहुतांश प्रेक्षकांना इमोशनली बांधून देखील ठेवते. त्या सिनेमा ग्रूप वर एखाद्याला हिच्या बद्दल लिहावेसे वाटणे आणि त्याखाली चांगले प्रतिसाद येणे हे या शॉर्ट फिल्मचे यश आहेच, पण न आवडणाऱ्यानी देखील कंटाळून बंद न करणे यातही यश आहे. कारण सोशल मीडियावर इतके कंटेंट आहे की लोकं काही रुचले नाही तर फार थांबत नाहीत.
त्या खाली खरेच एकूण एक कॉमेंट
त्या खाली खरेच एकूण एक कॉमेंट चांगली होती.>>>
मध्ये मी एका न्युसन्स व्हॅल्यूवाल्या तरूण राजकारण्याच्या मुलाखतीच्या कमेंटमध्ये
>>>>>>
हे मी सिनेमागल्ली फेसबुक ग्रुप बद्दल बोलत आहे.. इथे असे शक्य नाही. जसे मायबोलीवर हे शक्य नाही. म्हणजे एका ठराविक मताच्या प्रतिक्रिया ठेवायच्या आणि दुसऱ्या उडवायचा. तसेही कॉमेंट देणारे जे आहेत त्यांचे फेसबूक प्रोफाईल चेक करू शकता. तुम्ही म्हणता ती केस इथे नाहीये. या जगात ही शॉर्ट फिल्म आवडलेले लोकं प्रत्यक्षात आहेत आणि मोठ्या संख्येने आहेत
मी जनरल स्टेटमेंट केले. त्या
मी जनरल स्टेटमेंट केले. त्या मुव्हीसाठी नाही. आजकाल कमेंटस्, लाईक, सहस्राईबचे पॅकेजेस विकतात.
ओके माझेमन, माझी कॉमेंट कोट
ओके माझेमन, माझी कॉमेंट कोट केली जी जनरल नसून त्या पर्टीक्युलर फिल्मबद्दल होती म्हणून म्हटले.
बाकी पेड रिव्ह्यू हा प्रकार आधीपासून आहेच. लोकं ते ओळखून आहेत म्हणून त्यांना फसवायला आणखी नवनवीन प्रकार येत आहेत. म्हणून मी एखादा पिक्चर बघावा की नाही याचा निर्णय घ्यायला कधी वृत्तपत्रातले रिव्ह्यू सुद्धा वाचत नाही. पब्लिक ओपिनियन बघूनच ठरवतो. आणि ते देखील एकाच संकेत स्थळावरचे नाही तर वेगवेगळ्या जागीचे वाचतो. म्हणजे कुठल्या एका पॅटर्नला फसत नाही.
ज्या लोकांचा आपसात संबंध नाही
ज्या लोकांचा आपसात संबंध नाही ते ठरवून कसे करतील?
>> मागे शाहीर साबळे यांच्या सिनेमाविषयी सिनेमागलीवर असे झाले होते त्यावेळेला अनेकांनी तक्रार केली होती. लोकांच्या निगेटिव्ह रिव्ह्यूच्या पोस्ट तर अप्रूव सुद्धा झाल्या नव्हत्या.
अच्छा याची कल्पना नव्हती.
अच्छा याची कल्पना नव्हती.
मी तर शाहरुखचे भरमसाठ कौतुक करतो तिथे आणि होते अप्रूव्ह.. लोकांना अप्रूप सुद्धा वाटते आणि कौतुकसोहळ्यात सामील होतात.
ते असो,
एखाद्या बायोपिक किंवा अजेंडा पिक्चर बाबात असे होऊ शकते की लेखच मान्य न होणे.
पण लोकांनी एका परीक्षणाखाली चित्रपट आवडला नाही अशी कॉमेंट लिहिली आणि ती उडवली असे होणार नाही.
तसेच चित्रपट आवडला असे लिहिणारे सुद्धा रोबट नाही तर ज्यांना मत, आवड आणि भावना आहेत अशी माणसेच आहेत.
मागे शाहीर साबळे यांच्या
मागे शाहीर साबळे यांच्या सिनेमाविषयी सिनेमागलीवर असे झाले होते त्यावेळेला अनेकांनी तक्रार केली होती. लोकांच्या निगेटिव्ह रिव्ह्यूच्या पोस्ट तर अप्रूव सुद्धा झाल्या नव्हत्या.>>> +१
Pages