मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ अ‍ॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण” - Lol “मराठीत अभिनेते असतात. स्टार्स नाही“ असं एक आर्ग्युमेंट आहे.

मराठीत अभिनेते असतात. स्टार्स नाही“
>>>>
या अश्याच कोल्ह्याला द्राक्षे आंबट विधानांनी घात केला आहे.
हा शो बिझनेस आहे. इथे लूक, स्टाईल, एक्स फॅक्टर, स्क्रीन प्रेझेंस हे अभिनयापेक्षा जास्त मॅटर करते. हे मी इथे आधीही बरेचदा म्हटले आहे. पण जोपर्यंत हे बहुसंख्य मराठी प्रेक्षकांना पटत नाही तोपर्यंत मराठीत कोणी शाहरुख होणार नाही.

सुभा ची तुपारे सुरु होती तेव्हा इथेच बदामांचा पाऊस पडत होता, जशी मालिका पुढे सरकली तशी बदाम येणे बंद झाले.
सवता सुभा ही कोटी अजून आठवतेय.
.
कट्यार मध्ये शोभला होता की तो
आणि सनई चौफडे मध्ये सुद्धा
.
बायोचं पीक घेतो तो..

“ कोल्ह्याला द्राक्षे आंबट ” - बरोबर आहे. हे तुझ्या स्वजो ला पण लागू होतं रे Wink Happy

“ प्लीज सुभाला अश्या नवीन आयडियाज देऊ नका” - Lol

प्लीज सुभाला अश्या नवीन आयडियाज देऊ नका>>
बायोचं पीक घेतो तो..>>>
ढेरीधर >>
अ‍ॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण>>> Biggrin

थँक्स मंजुताई. सापडला मला युट्यूबवर >>> क्रुपया लिन्क देणे, माझा बनवाबनवी नतर ऑलटाइम फेवरेट आहे तो..

क्रुपया लिन्क देणे, माझा बनवाबनवी नतर ऑलटाइम फेवरेट आहे तो.. >>> माझाही. मला यूट्यूबवर सापडला नाहीये एक डाव धोबीपछाड. प्लीज लिंक द्या कोणीतरी.

प्लीज सुभाला अश्या नवीन आयडियाज देऊ नका>>
बायोचं पीक घेतो तो..>>>
ढेरीधर >>
अ‍ॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण>>> :Biggrin:

ढेरीधर Rofl Rofl

सगळेच सौदिंडियन हॉट नाही वाटत. मला तर बरेचसे माहितही नाहीत. पण ओबड धोबड असून रोमँटिक रोल निभावू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या ऍक्टिंगने लूक्सवर मात केलीय असाच होतो ना?
एरवी विजय सेतुपती हा आजूबाजूला वावरणाऱ्या चारचौघांसारखाच दिसतो पण ९६ मध्ये जर तो डोळ्यातून बोलू शकत असेल तर का आवडू नये प्रेक्षकांना? दिग्दर्शकाने प्रेमकहाणी दाखवायची म्हणून त्याला अट्टाहासाने ३० च्या आसपासच्या गटात नाही कोंबलंय.

कलाकारांनी री-इन्व्हेन्ट करत राहावे हे पटलं. त्यासाठी रिस्क घ्यावी लागते. उदा विक्रम तेरे नाम/अपरिचित मध्ये कसा आहे आणि पी एस मध्ये कसा दिसतोय. एकदा बायोपिक हिट झाले की तेच करत राहणे किंवा जुन्या संगीत नाटकांना न विसरलेला प्रेक्षक आहे म्हणून त्यांचे चित्रपट काढणे ही सेफ बेट आहे. बालगंधर्वांची भूमिका करणे ही सुद्धा. (हे म्हणजे ऋषी कपूरने महिला वेष धारण करण्यासारखेच. मुळात गोंडस लूक असेल तर तुम्ही तिथेही सेफच राहणार.)
उपेंद्र लिमयेने जोगवातील भूमिका करणे किंवा अतुल कुलकर्णीने नाच्याची भूमिका करणे ही रिस्क आहे.

बरं एस्टी च्या मागे लटकायचा सीन ऍड केला तर मानापमानाचा रिस्क इंडेक्स वाढेल का?
अशीच रिस्क घ्यायला आवडते म्हणून म्हागृनी गणपतीपुळे प्रवास एशियाडने न करता यंदा रेल्वेने केला म्हणे. लटकले का कसं कल्पना नाही Proud
लटकणे जोक आवडलेला आहे हे वेसांन!

एस्टी च्या मागे लटकण्याबद्दल इतकं बोलताय तुम्ही लोक्स की टॉम्याने वाचलं तर फोमो येऊन पुढच्या एम.आय. मधे तो तसं लटकायचा सीन घालणार नक्की Proud

रमड Proud

रमड Lol

सुभाला सोडा हो प्लीज Lol
स्वजोला काय बोलायचं ते बोला. पुणे मुंबई च्या तीन तीन भागानंतर ही डिझर्व्स !

सुभाने मराठीत निर्माता म्हणून खूप काही केलंय.
तुम्हाला गोळीचे तुकडे करणारा विजयकांत चालतो , मॉडेल रिचा साध्वी झालेली चालते, घोडा ट्रकखालून नेणारा तो हा पण चालतो
तर मग सुभानं काय पाप केलंय ? Wink

आणि विगवाले अमिताभ बच्चन, रजनीकांत, सलमान खान, अक्षय खन्ना, सनी देओल सगळे चालतात तर स्वजो का नको ? Happy

साठी बुद्धी नॉटी >>> Lol एस्टीच्या मागे लटकून असा कितीसा नॉटीपणा करणार बिचारा!

सुभा लटकला तर असा दिसेल का? -

tatya.jpg

Pages