मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढेरीधर >> Biggrin
टॉम्या चा फोमो>> Biggrin
बायो चं पीक>> Biggrin
एक डाव मध्ये मुक्ता आणि पुष्कर श्रोत्री चे एक्स्प्रेशन्स एक नंबर आहेत.
साऊथ चे नट एकाच रगड्यातून काढल्यासारखे वाटतात. विक्रम सोडल्यास बहुतेक सगळे एक तर ते हिरोईन चे काका किंवा भाऊ वाटतात.
सुभा मला आळशी वाटतो. नट होण्यासाठी सगळे गुण आहेत पण तेच तेच करत रहातो. मध्ये तो अगडबंब का काही सिनेमा काढला होता. भयंकर होता तो! तो सुद्धा दुसरा भाग होता, म्हणजे नाविन्य काहीच नाही.
मध्यंतरी स्वजो - सुभा जोडीचा फुगे नावाचा सिनेमा आला होता. ट्रेलर वरूनच अत्यंत आचरट वाटला!

मी मितवा बघितला आहे >>> Lol मी पण. >>> मी पण.

याच्यावर ज्यांना कोणाला हसायचे आहे त्यांनी हसून झाल्यावर पुढचे वाक्य वाचा. त्या पिक्चरमधे मितवाची फोड मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या अशी आहे.

तू ही रे सुद्धा पाहिला आहे बहुधा. त्याची अशी काही फोड बिड आहे का माहीत नाही.

फुगे आवडलेला असे स्मरते. आता स्टोरी आ ठवत नाही.

मितवाची फोड मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या अशी आहे >> :दया: हे असं आमी लय हुषार अ‍ॅटिट्युडनेच मराठी पिक्चर मार खातो.
पुढचं वाक्य 'तू ही रे' वाचुन आता काय फोड खायला लागत्येय टेंशन आलेलं. फोड नाही सांगितलंस ते बरं केलंस. Proud
आता मला फोड चे इतके श्लेष सुचताहेत की व्हॉट्सॅपच फॉरवर्डच लिहावं झालंय.
डायरेक फॉरवर्डच लिहायचं Lol

फुगे प्रचंड आचरटच आहे. मी पाहिलाय. काही काही भोग भोगल्याशिवाय सुटका नसते>> Biggrin
मितवा ची गाणी चांगली आहेत.
सुभा - स्वजो च्या मानाने प्रसाद ओक बरा वाटतो. काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो ( किंबहुना काहीतरी तरी करतो). गेला बाजार मोठमोठ्याने हसायच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या नजरेसमोर असतो.

Rmd तू हे तिन्ही चित्रपट पाहिलेस चांगलीच गोष्ट आहे आम्हाला dedicated चिरफाड हवीये.
तू ही रे पासून सुरु कर
.
फा तुम्ही मितवा घ्या

Rmd तू हे तिन्ही चित्रपट पाहिलेस चांगलीच गोष्ट आहे आम्हाला dedicated चिरफाड हवीये. >>> दया करा या गरीबावर! Lol परत पहायला लागतील त्यासाठी ते मला.

आता मला फोड चे इतके श्लेष सुचताहेत की व्हॉट्सॅपच फॉरवर्डच लिहावं झालंय.>>>>> ते श्लेष कितीही क्लेशदायक असले तरी नक्की लिहा अमितव Lol
इथे नाहीतर काकाफॉ वर चर्चा करू

फुगे प्रचंड आचरटच आहे. मी पाहिलाय. काही काही भोग भोगल्याशिवाय सुटका नसते>>>>>> फार भोग भोगलेस पोरी. मोठ्या धीराची आहेस. Lol

मला आवडतो फार स्वप्निल जोशी.
पण मी नाही कधी त्याच्या गंडलेल्या चित्रपटांच्या नादाला लागतं.
प्यार अपनी जगह और धंदा अपनी जगाह.

तू ही रे आणि प्यारवाली लव्हस्टोरी पण पाहिला आहे
>>> पुर्वजन्मीचे भोग असावेत.

पुणे मुंबईचा पहिला भाग आवडला होता. दुसरा जरा खेचल्यासारखा वाटला म्हणजे मुक्ताची भुमिका चांगली लिहीली होती. स्वजोची भुमिका जरा गंडली होती. आणि प्रशांत दामलेला गाता येतं म्हणजे सगळ्याच भुमिकात गायला पाहिजे असं का वाटावं ते समजत नाही. पण असो.

फुगे प्रचंड आचरटच आहे. मी पाहिलाय. काही काही भोग भोगल्याशिवाय सुटका नसते>>> मी पण भोगलेत ते भोग.
मी आणी आइने एकत्र बघितला होता, घरिच! आइ एरवी मराठी मुव्हिजला सुट देत असते पण हा बघुन तीही जाम उखडली होती.
पुणे-मुबै-पुणे वन टाइम वॉच

संधी मिळाल्यास कर्मवीरायण हा चित्रपट नक्की बघा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं बायोपिक आहे. इतर अनेक चरित्रपटांपेक्षा बराच उजवा आहे.

तू ही रे, फुगे, प्यारवाली लव स्टोरी च्या रांगेत चिन्मयची कर्मवीरायण पोस्ट आल्याने तो आचरट नाही समजायला वेळच लागला. तो म्हणजे.. तो आहे. Proud

कार्बन कॉपी >>> हा कुठला पिक्चर आहे? मी फोटोकॉपी पाहिलाय पर्ण पेठेचा Sad सांगितलं ना... भोग असतात!

लाल इश्क >>> पाहिलाय. ओके होता. त्यातलं गाणं आवडतं मला.

संधी मिळाल्यास कर्मवीरायण हा चित्रपट नक्की बघा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं बायोपिक आहे. इतर अनेक चरित्रपटांपेक्षा बराच उजवा आहे. >>> धन्यवाद रेकोबद्दल. होपफुली इथे स्ट्रिमिंगवर येईल लौकर. "इतर अनेक चरित्रपटांपेक्षा उजवा" करता सुभाने त्यांचा रोल केलेला नसेल, तर that's a start Happy

रमड, लाल इश्क "ओके होता"? हे तू वाचले असशीलच पण पुन्हा वाच Wink
https://www.maayboli.com/node/78303

मोठ्या धीराची आहेस >>> हे मी पुन्हा चंद्रकांत गोखलेच्या आवाजात वाचले. हाच सीन माबोवर पूर्वी येउन गेलेला आहे कोठेतरी Happy

तू ही रे सुद्धा पाहिला आहे बहुधा. त्याची अशी काही फोड बिड आहे का माहीत नाही >>

तू ही रे - हिंदी - अर्थ = फक्त तूच रे
तू ही रे - मराठी - अर्थ = तू सुद्धा रे

आता या परिप्रेक्षातून त्याकडे बघा

हे तू वाचले असशीलच पण पुन्हा वाच >>> पुन्हा वाचून पुन्हा हसून आले.
लाल इश्क ओके म्हणाले कारण एक तर मला स्वजो आवडतो Wink आणि प्यारवाली लव्हस्टोरी किंवा फुगे या त्याच्या चित्रपटांपेक्षा तो ओके होता इतकंच. आवडला वगैरे नाही.

तू ही रे - हिंदी - अर्थ = (भोग) फक्त तूच रे
तू ही रे - मराठी - अर्थ = तू सुद्धा (भोग) रे

आता या परिप्रेक्षातून त्याकडे बघा Lol

"मी तवा" व "तू हिरे">>>>>> Lol

Pages