मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रुझ कंट्रोल ऑन एस्टी
Lol
तो अनिल कपूरबरोबर एमआय केला तेव्हाच टॉम्याला आयडीआ दिली पाहिजे होती. तो उगीच मल्टी लेव्हल पार्कींगमध्ये गाड्या फिरवत बसला.

बसचं चित्र Lol

घोडा ट्रकखालून नेणारा तो हा पण चालतो>>> आता हा कोण?

३-४ दिवसांचे कॅचअप...

सुभा लटकला तर असा दिसेल का? - >>> Lol एसटी बसमागे सुभा म्हंटल्यावर मलाही हेच आठवले

सुभा is the new अमलताश >>> मला सुभा एक कलाकार म्हणून आवडतो त्यामुळे टोटली पटले Happy तो हॉट बिट नसेल हे ठीक आहे (कोमट ला सुपरलोल). पण काशिनाथ घाणेकर चा रोल मस्त केला होता त्याने. वाळवीतही मस्त होता. कट्यारमधेही चांगला वाटला होता.

अ‍ॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण >>> Lol
बायोचं पीक घेतो तो.. >>> Lol

कुणीही साऊथ इंडियन हॉट-बिट वाटत नाही. अरेरावी आणि पेट्रियार्कल वाटतात उलट. >>. टोटली! मराठी बरेच ममव आणि फदे वाटतात कारण कथाही सशक्त नसतात व अभिनयाची कहानी की माँगही. ते मिळाले तर यातलेही अनेक भारी वाटतील. मला लाइक आणि सबस्क्राइब मधला अमेय वाघ चपखल वाटला होता. असे हस्टलर्स मी पाहिले आहेत. देऊळ मधली ग्रामीण कॅरेक्टर्स अस्सल वाटली होती. चेकमेट मधे स्वजोही चांगला वाटला होता. दुनियादारीतला अंकुश चौधरी.

बाय द वे टॉम क्रूझ खुद ओव्हररेटेड आहे. स्टंट्स काय जॅकी चॅनही करतो (तो अजिबात ओरे नाही)

काशिनाथ घाणेकर चा रोल मस्त केला होता त्याने. वाळवीतही मस्त होता. कट्यारमधेही चांगला वाटला होता.
>>>> हो. मलाही आवडतोच तो, पण मग खेळू नये की काय येथे. Happy

अमलताश नंतर सुभा मुळे इथे रणधुमाळी माजली म्हणून
'सुभा is the new अमलताश' म्हटले होते.

'हॉटेबल' ही आहे , नवा शब्द. हॉट होणं शक्य आहे, कारण बाकी अभिनय, संवाद, उच्चार वगैरे पॅकेज तर आहेच वेगवेगळ्या भूमिका करा की झाले. हेल्दी/ कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम होता.

वरचा चेकमेट मी पाहिला नाही, आणि दुनियादारीतला अंकुश चौधरी आठवत नाहीये. पण बाकी पोस्टसाठी अनुमोदन.

बायोचं पीक घेतो तो.. >>> याला हसायचं राहिलं होतं >>> माझंही. Lol
रमड, खास तुझ्यासाठी - जरा हॉटबिट व्हा की राव Wink
संदर्भ - एक डाव धोबीपछाड

अस्मिता Lol प्रेम रतनची आठवण करते आहेस का? का अजून काहीतरी विसरलेय मी? Happy

चेकमेट मधे स्वजोही चांगला वाटला होता >>> स्वजो मला मुंपुमुं१, रणांगण, मोगरा फुलला आणि अगदी मानिनी मधे पण आवडला होता. एका लग्नाची दुसरी गोष्ट मधे सुद्धा. आता जिलबीमधे बरा असेल असं वाटतंय.

दुनियादारीतला अंकुश चौधरी >>> येस. चेकमेट मधे पण चांगला वाटला होता तो.

तसा तर मला सुभा पण बर्‍याच पिक्चर्स मधे चांगला वाटला होता. पण आता बायोपिक अती झाले आहेत त्याचे. रिसेन्टली वाळवी मधे आवडला होता तो. त्या आधी मला सनई चौघडे मधे आवडला होता तो हे नक्की आठवतंय Happy

Happy नाही गं. 'एक डाव धोबीपछाड' मधे मुक्ता बर्वे सुबोध भावेलाच म्हणते तोच संवाद या चर्चेमुळे ट्विस्ट केला होता. नवीन काही नाही.

मला 'पाणी' चित्रपटात सुभाचे काम अजिबात आवडले नाही हे नोंदवायचे राहून गेले वर.

:देवा: मग आता सुभाचे न आवडलेले मूव्ही कुठले उरले? कट्यार - आवडला, बालगंधर्व - आवडला, काघा - आवडला, एडाधोप- ही आवडला. म्हणजे फक्त शिवाजी सिरिज मध्ये कुठे तो असेल तर.. आणि लोकमान्य टिळक आवडला नाही.
नाव बघुनच अशा चित्रपटांच्या वाट्याला जायचं नाही ना! आणि गेलातच तर मग ते मूव्ही आवडले नाही असंच म्हणा. उगा सुभा आवडला नाही म्हणाल आणि तो एस्टीच्या शिडीचा मुका घेऊन धडपडायचा.

सगळेच Lol
एस्टीच्या शिडीचा मुका घेऊन धडपडायचा>>>>>. Lol

तो एस्टीच्या शिडीचा मुका घेऊन धडपडायचा. <<
उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात.
महाराष्ट्रातील एसटी चे हेलकावणे बघता एसटीला रस्त्यावरील उंट म्हणता येईल का.. Lol

Lol धमाल सुरूए.

अ‍ॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण >>> Lol
बायोचं पीक घेतो तो.. >>> Lol

महान! Biggrin

काय दंगा सुरुय जोरात Lol
ऑफ तासाला शाळेत असायचा त्यापेक्षा जास्त दंगा Happy
ST आणि लटकणे वरून मला देखील तात्या विंचू आठवलेला
ओम फट स्वाहा

>> स्टंट्स काय जॅकी चॅनही करतो (तो अजिबात ओरे ...

हा एकमेव अ‍ॅक्टर असा असावा ज्याचे फक्त फॅन क्लब्स असतील, हेटर्स क्लब नसतील..

उंटावरचा शहाणा Lol

तो पिक्चर जर ज्वीगाटो असेल तर उंटावरची शहाना (गोस्वामी) होईल.

सुभा स्वजो ह्या सर्व मंडळी ना माबोचा access द्या कुणीतरी.
वाचलंच पाहिजे त्यांनी.
खरंतर महागुरू असायला हवेत इथे त्यांची बाजू मांडायला. मजा येईल

प्लीज सुभाला अश्या नवीन आयडियाज देऊ नका>>
बायोचं पीक घेतो तो..>>>
ढेरीधर >>
अ‍ॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण>>>

Lol Rofl

उंटावरच्या शहाण्यापेक्षा खरं तर शिडीचा मुका आणि उंटाच्या..
असं रिलेट करायचं होतं.....>>>>>>> श्या, मी शहाण्यासारख लिहिलं. Lol

Pages