मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकी वेलिंगकर यूट्यूबवर पहायला घेतला आणि एक स्वप्न सिक्वेन्स कमीतकमी तीनवेळा डिटेलवारी बघण्याचा पेशन्स नसल्याने बंद केला!
सोकु आवडते म्हणून तेवढा तरी बघितला गेला.

पाहिला नसल्यास “रेगे“ पहा. त्यात ते अवधूतचं “शिटी वाजली“ गाणं आहे. ते गाणं सोडलं तर जाम टेंस वातावरण आहे. एन्कांउंटरवर आहे.

रेगे मध्ये खूप अंधार आहे पूर्ण चित्रपटभर. बरेच दिवस झाले बघून पण एवढा काही खास वाटला नव्हता.

लपाछ्पी तुनळी वर पाहिला. पुजाचे काम छानच आहे पण कळले नाही की ते मुलाना का मारत असतात.
पुजा शेवटी त्याना सर्व का सांगते? आणि ते तिला जाउ का देतात? ते कळले नाही. इतक्या बायकाना त्याने मारले असते पण तिला तो जाउ देतो.
ती अनाथ असते आणि मागे कोणी नाही तरी ते काले नाही.

वळू ओके आहे.अतुल कुलकर्णी चांगले काम करतो.
पण वळू ला एक पिक्चर लांबीची कथा नाही.आताच्या शॉर्ट फिल्म्स च्या ट्रेंड मध्ये वळू बनला असता तर 20 मिनिटांची शॉर्ट फिल्म म्हणून बनला असता.
माझं बऱ्याच मराठी पिक्चर बद्दल असं होतंय सध्या.हौसेनं थेटरात बघायला जावं आणि शेवट गुंडाळलेला वाटतो.
त्यातल्या त्यात सविता दामोदर परांजपे चा शेवट आवडला.
फास्टर फेणे पूर्ण पिक्चर खूप आवडला.
जुन्यात थिएटरमध्ये नटरंग खूप आवडला होता.नटरंग ची कथा आणि गाणी दोन्ही स्क्रीनवर पाहून शहारा येतो.
तो सई चा पिकनिक नावाचा पिक्चर पाहायला हौसेने आई ला नेलं होतं.फार म्हणजे फार वैताग आला.त्यात हिंदी गाणी पण होती.
तो अश्लील उद्योग पिक्चर काहीतरी स्टोरी चालू होईल याची वाट बघत संपला.काहीही चालू होतं.शेवटी 'क्या कहना चाहते हो' झालं इतके विषय एकमेकांत मिसळून मध्येच अर्धे सोडले होते.अक्षरशः शिव्या देत बाहेर पडले प्रेक्षक.
विकी वेलिंगकर प्रचंड रिपीटेटिव्ह झाला.
मी आता मराठी ट्रेलर बघून पिक्चर ची तिकिटं मुळीच काढणार नाहीये.इथे किमान 5 वेगवेगळ्या व्यक्तींची मतं वाचून मगच तिकीट काढेन.

काल you tube वर 'सायकल ' पाहिला.. अगदी छोटा आहे पण खूप छान आहे... शेवटी छान संदेश देतो... नक्की पहावा असा आहे चित्रपट..

मुक्ता बर्वेचा चित्रपट म्हणुन बंदीशाळा बघितला. नाही आवडला. मध्यंतरी बराच रिकामा वेळ असल्याने काही मराठी चित्रपट बघितले त्या पैकि काही न बघितलेले बरे असे - पुष्कर जोग चा ती आणी ती, गर्ल्स, बसस्टॉप, गुरु पोर्णिमा,लग्न मुबारक, एबि आणी सीडी,ट्रिपल सीट, वन वे तिकीट,भिकारी,रणांगण, ऐक,निळकंठ मास्तर,नऊ महिने नऊ दिवस, हाफ तिकट, नशीबवान काही तर अर्धवट सोडून दिले बघायचे.
बघावे असे चित्रपट उर्मिला चा अनवट, सावट,स्माईल प्लिज,

'पिंपळ'. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे.

दिलीप प्रभावळकर, प्रिया बापट, किशोर कदम
अभिनय, कथा, दिग्दर्शन सगळं उत्तम. फक्त शेवट गंडलेला आहे.
'पोस्टकार्ड' दिग्दर्शक परत गजेंद्र अहिरे.
एका थीमवर तीन कथा आहेत 'गंध' सारख्या.
बऱ्या आहेत. फार खास नाही. शेवटची पूर्ण बघितली नाही (कारण adult scenes आले आणि मुलंही बघत होती)
पण सगळ्यांचे अभिनय अफाट झालेत. गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुबोध भावे.

वपु काळेंच्या बदली स्टोरीचा सिनेमा आहे तो , दामले , एकबोटे भूत

पण मूळ लेखन काढून नको ते संवाद वाढवल्याने मूळ संहितेची मजा त्यात नाही

पेइंग घोस्ट https://youtu.be/EKauIXqmLm4

बदली https://youtu.be/Z4bWAwb-FmE

Murder mestri, Narobachi Vadi, Taryanche bet , Tumbaad (Marathi), झी Talkies
७२ मैल, एक प्रवास, (Colors Marathi) -
Sorry ! हे मराtheeत टाईप करेपर्यन्त १/२ दिवस उलटला Happy
Vicky Velankar is based on 'Happy Death day 2U' and not an original kalpana Happy

not an original kalpana - हा चित्रपट कुठे बघायला मिळेल?

Pages