कुत्रा अथवा मांजर पाळण्याबद्धल

Submitted by कटप्पा on 15 May, 2020 - 11:24

कोरोना काळात समर आला आहे आणि घरात एक पाळीव प्राणी असावा असे वाटू लागले आहे .
दर वर्षी समर सिक्स फ्लॅग चा सिझन पास घेऊन आरामात निघायचा सध्या तर बच्चे कंपनी ला बाहेर पार्क्स मध्ये घेऊन देखील जाता येत नाही आहे . बॅकयार्ड मध्ये झोका आणि स्लाईड चा आता त्यांना कंटाळा आला आहे .
कुत्रा पाळावा कि मांजर याबाबत निर्णय होत नाही आहे .
घराला फ्रंट आणि बॅकयार्ड आहे काही झाडे आहेत त्यामुळे मांजर मजेत राहील असे वाटत आहे . कुत्र्याला रोज फिरायला घेऊन जाणे गरजेचे असते का? कारण ते कितपत जमेल सांगता येत नाही . लहान मुलांना मांजर किंवा कुत्रा त्रास देईल का ?
घरात घाण कमी कोण करेल ?
किटन किंवा पपी आणणार आहे .
Mewcatrescue कोणी वापरला आहे का ?

धागा विरंगुळा मध्ये नाही आहे - सिरीयस धागा आहे .
आपल्या गाईडन्स चा आभारी आहे .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा यांचा धागा खूप मस्त आहे
आम्ही पण भुभु आणण्यापूर्वी वाचला होता
खूप मदत झाली
आमचं लॅब पपी ओडीन आता 5 महिन्यांचा झालाय

https://www.maayboli.com/node/50262

https://www.maayboli.com/node/12383 हे दोन बाफ बघुन घ्या. माहिती मिळेल. उगीच हौसे खातर घेउ नका कुत्रा मांजर.

ऑस्टीण कुठे आहे? खोताची वाडी का सान पाडा?! पाम बीच रोड

>>फक्त एकच आहे मान्जर कुत्र्याएवढ playful नसत.
असतात की. कदाचित ब्रीडवर आणि स्वभावावर अवलंबून असावे. Happy
मांजरं कुत्र्यांपेक्षा बर्यापैकी लो मेटेनन्स असतात. फिरायला नेलंच पाहिजे असं नसतं. एकतर घरातच बसतील किंवा आपली आपली फिरुन परत येतिल. त्यामुळे आपण बर्यापैकी सुटसुटीत असतो. अर्थात बाहेरगावी गेल्यावर करावी लागेल ती व्यवस्था लागेलच.

मला भारतात चार मांजरे पाळल्याचा अनुभव आहे. पण ते भारतीय ब्रीड (नाव माहित नाही) होते आणि खेळकर होते. दोन भावंड बोके त्यातला एक खूपच खेळाडू आणि दुसरा जरा संथ होता भावाच्या तुलनेत पण दोघांच्या मारामारीत कमी पडायचा नाही.
त्यामानाने इथे अमेरिकेत ज्या लोकांची मांजरं पाहिली आहेत ती संथ, निवांत वाटली. त्यामुळे असं वाटतं की ब्रीड्वर असावे अवलंबून. अर्थात खेळाडू अमेरिकन मांजरांच्या चित्रफिती भरपूर आहेत म्हणा.

>>मला भारतात चार मांजरे पाळल्याचा अनुभव आहे. पण ते भारतीय ब्रीड (नाव माहित नाही) <<
त्याला Indian Domestic Short Hair (DSH) म्हणतात.

आम्हाला खरं तर Bombay Cat पाळायची होती..
टारझनला आणल्यानंतर Bengal Cat बद्दल समजलं..
Nice Breed..

अजुन एक , रेस्क्यु संस्थेकडुन मांजर घ्यावे. त्यांच्याकडे मालक गावाला गेल्यावर घरी भेट देणारी 'पेटकेअर' लोकं माहिती असु शकतात त्यांचा नंबर घ्यावा, म्हणजे खात्रीचे असायची शक्यता जास्त.
दुसरे असे की ती रेस्क्यु संस्था तेथील प्राण्यांना ज्या डॉक्टरकडे नेतात त्यांचा नाव, पत्ता घ्यावा कारण ते डॉक्टर स्वस्त असायची शक्यता खुप जास्त असते. नाहीतर खुप महाग असतात प्राण्यांचे डॉक्टर देखील.
घरी पुर्वी मांजरे होती म्हणुन हे स्वानुभव आहेत.

हाहा थँक्स. काही खास कारण नाही ते मांजरांचे लेख इथे टाकयचे राहूनच गेले. टाकीन पण आता. इथे मांजरप्रेमी लोक बरेच दिसताहेत.

@ कटप्पा
>>लॉन्ग विकेंड चा विचार केला नाही . मांजरीला किंवा पपी ला घरी ठेवून जाता येईल का भरपूर खायला ठेवून?<<

आमच्या टारझनला (आमचा बोका) सुरुवातीला फार तर तीन चार तासंच एकटं ठेवायचो. ते ही क्वचित कारण कोणी नं कोणी घरी असेल असं शेड्युल ठरवायचो.
तो जरा मोठा झाल्यावर इमारतीच्या आवारात एकटा रहायला लागला. (त्याचं हे ही टायमिंग हळूहळू वाढवत नेलं.)
जेव्हा तो बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झाला त्यानंतरही सर्वसाधारणतः सात, आठ तास खाली रहायचा. बारा तासापेक्षा जास्त घरी कोणी नाही असं कधीच झालं नाही.
(हां, आता तो जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंड्सच्या मागे मागे असतो तेव्हा कधी कधी दोन अडीच दिवस घरी येत नाही हा भाग वेगळा. पण आम्ही मात्र घरी त्याची वाट बघत असतो. खाली फेऱ्याही चालू असतातच त्याची आळवणी करायला.)

सर्वांचे आभार . या धाग्यामुळे काही जणांना नक्कीच फायदा झाला . बाकीच्या धाग्यांवरून अपडेट्स मिळत आहेत आणि खरंच आनंद होतोय कि लोक पेटस घ्यायला सुरु करत आहेत .

धागा सार्थकी लागला |

आम्ही खूप विचार करुन ३ वर्षांपुर्वी लॅबर्याडुडल घेतला ( ह्या प्रकारात काही अत्यंत क्युट दिसतात तर काही आजिबात नाही बघुन घ्यावा ). मला स्वतःला कुत्र्याचा एक ठराविक प्रकारचा वास घरभर असलेला आवडत नाही. त्याचे केस घरभर नको. ट्रेन करायला सोप ब्रिड हव ( कारण आम्हाला काहीच अनुभव नाही)
फ्रेंडली हवा अश्या सगळ्या कल्पनेत बसणारा कुत्रा हवा होता. लॅब खरतर आवडीच कुत्र पण त्याला फिरायला न्यावच लागत आणि केस गळतात ह्या कारणासाठी राहील.
labradoodle मिनी मिडियम साईझचा कुत्रा घेतला. ( ह्या प्रकारात मिनी, मिडीयम, लार्ज साईझ येतात )बाहेर मस्त ३-४ तासाच्या वॉक वर पण येतो किंवा कधी पाऊस वैगरे असताना घरातच खेळवलं तर चालतय. कुत्रा लार्ज साईझ असेल तर रोज बाहेर फिरवावच लागत. तसच एकदम मिनि टॉय कुत्रा असेल तर तो १/२ तास चालतो पुढे त्याला कडेवर घेऊन चालाव लागत कारण खूप दमतात ते छोटे जीव. (आम्हाला दोन्ही शक्य नाही म्हणून मिडीयम घेतला).
भारतात जाताना किंवा ट्रिपला जाताना एका घरगुती सिटर कडे ठेवतो. बाकी तो ४-६ तास रोज घरी एकटा असतो.
मांजरापेक्षा कुत्रा खूप जिव लावतो असं माझ मत.

लोक्स या विकेंडला आमच्याकडे २ किटन्स चे आगमन झालेले आहे.
गेले बरेच दिवस मुलं आणी नवरा सतत अ‍ॅनिमल शेल्टर आणि पेटफाईंडर.कॉम वर शोधत होते पण काहीच म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. मुलं खूप नाराज होत होती. रोज उठलं की तेच. शेवटी कंटाळून नवर्‍याने क्रेगलिस्टवर जाहिरात दिली किटन्स पाहिजे म्हणून आणी ताबडतोब एकाचा रिप्लाय आला. त्या माणसाकडे ऑल्रेडी २ कुत्रे, कोंबड्या असं काय काय होतं त्यामुळे त्याला ही पिल्लं द्यायची होती. ही २ वेगवेगळ्या आईची पिल्ले आहेत. २ महिन्यांची साधारण. आता मुलं तर एवढी खुष झाली आहेत. ती पिल्लं पण फारच खेळकर आणी गोंड्स आहेत. फोटो नंतर अपलोड करते.

20200605_074000.jpg
हे आमचं नविन बाळ! Happy नाव माउई. कॅवेलियर आणि कॉटन मिक्स आहे.

नाव माउई. कॅवेलियर आणि कॉटन मिक्स आहे.नाव माउई. >> किती गोड . मी पळवून नेणार. ह्याचे ट्विटर अकाउंट काढा ना. आम्ही फॉलो करू तिथे.
फोटो व्हिडीओ टाकता येतात.

हे आमचे दोन पिल्लू
नावाबद्दल अजून काही ठरत नाहीये. Happy ज्याच्याकडून घेतले त्याने एकाचे मंकी नाव ठेवलेय एकाला नावच नाहीये. एक बॉय आहे आणी एक गर्ल. मंकी नाव एवढं काही आम्हाला आवडलं नाही. मुलांनी ओरिओ, किट कॅट, टॉम, जेरी, सिंबा नाला जे आवडेल ते म्हणतायत सध्या तरी Happy
E40EC0A9-E29A-466B-A791-12F1B28EEEC5.jpeg4B4F866A-09A3-4D0C-B645-25433C2F481E.jpeg

नाही त्या माणसाकडे होती ना तो म्हटला हे दोघं खूप बाँडेड आहेत. सतत एकत्र असतात. मुलगी एकदम सेंटी झाली की मग एकालाच कसं आणणार दुसर्‍याला वाईट वाटेल म्हणून दोन्ही आणली. Happy तसं नवर्‍याकडे लहानपणी २ मांजरे होती. माझ्यासाठी हा अनुभव पूर्ण्पणे नवीन आहे.

Pages