कुत्रा अथवा मांजर पाळण्याबद्धल

Submitted by कटप्पा on 15 May, 2020 - 11:24

कोरोना काळात समर आला आहे आणि घरात एक पाळीव प्राणी असावा असे वाटू लागले आहे .
दर वर्षी समर सिक्स फ्लॅग चा सिझन पास घेऊन आरामात निघायचा सध्या तर बच्चे कंपनी ला बाहेर पार्क्स मध्ये घेऊन देखील जाता येत नाही आहे . बॅकयार्ड मध्ये झोका आणि स्लाईड चा आता त्यांना कंटाळा आला आहे .
कुत्रा पाळावा कि मांजर याबाबत निर्णय होत नाही आहे .
घराला फ्रंट आणि बॅकयार्ड आहे काही झाडे आहेत त्यामुळे मांजर मजेत राहील असे वाटत आहे . कुत्र्याला रोज फिरायला घेऊन जाणे गरजेचे असते का? कारण ते कितपत जमेल सांगता येत नाही . लहान मुलांना मांजर किंवा कुत्रा त्रास देईल का ?
घरात घाण कमी कोण करेल ?
किटन किंवा पपी आणणार आहे .
Mewcatrescue कोणी वापरला आहे का ?

धागा विरंगुळा मध्ये नाही आहे - सिरीयस धागा आहे .
आपल्या गाईडन्स चा आभारी आहे .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मुलुंड मध्ये असताना खेकडा पाळला होता त्याची आठवण झाली धागा वाचून. नंतर आर मॉल मध्ये सोडून दिला होता एका कपड्याच्या दुकानात....

आमच्याकडे बोका आहे. काही त्रास नाही. Indoor / Outdoor आहे. जेवायला आणि झोपायला घरी येतो बाकी शी शु सगळ बाहेर करतो. इतर वेळी आत / बाहेर सुरु असत. mood असेल तर खेळतो. प्रेम करतो. फक्त एकच आहे मान्जर कुत्र्याएवढ playful नसत.
खुप मजा येते. फार जीव लावलाय त्याने.

गावाकडे कारवानी कुत्रे होते.. बांधायचं काम नाही की काही नाही. रानडुक्कर, नीलगाय, हरणे आणि माकडं सगळ्यांना पिटाळून लावायचं. आता शहरात आम्ही न पाळलेल्या मांजरींची बाळंतपणे आमच्याच घरात होतात. पिल्ले फार गोंडस.. पण पाळता नाही आलं कधी. मार्जार कुळातल्या नियमानुसार एकदा तर बोक्याने आमच्या संपूर्ण घरात वेगवेगळ्या ठिकाणी ५ पिल्ले मारून टाकलेली. त्यांना उचलून पुरताना खूप रडू आलेलं. मोजून ४ दिवस तर घरात होती ती पिल्ले, पण मांजर नसताना बोक्याने डाव साधला. पाळली नवजती तरी लळा लागतोच. असो. अमेरिका म्हणत आहेत त्या दृष्टीने फारच अवांतर झाले.

परी78 आभारी आहे . मीदेखील बोका पाळावाच असा वि4 करतोय . मांजरीची बाळंतपणे वगैरे जमणार नाही . परत त्या पिल्लाना दुसरी घरे शोधा . बोका बरा .
तुम्ही फिरायला वगैरे जाता तेंव्हा तुमचा बोका कसे म्यानेज करतो ? का त्याला घरात बंद करून जाता ?

2-3 दिवस जातो तेव्हा पुरेस अन्न पाणी ठेवुन जातो. आमच garage door खाली थोडस उघड ठेवतो. तो आत / बाहेर करतो.
जास्त दिवस जायच असेल तर शेजारणीला सान्गतो.
बोका neutered आहे म्हणुन स्वभावाने शान्त आहे.

माहुरच्या जंगलात छोटेसे देवस्थान आहे तिथे गेलो होतो. त्या देवस्थानावर काही साधू राहतात, त्यांनी माकड पाळले होते. फक्त गळ्यात एक कॉलर सारखा भगवा रुमाल होता त्याच्या. बोनेट मकाकू किंवा मराठीत लालगांड्या. नाव पण होतं त्याचं, लालू! त्या साधूंची बरीच मदत करायचं ते लाला. रिकाम्या थाळ्या, वाट्या बारीक बारीक वस्तू उचलून आणणं, राखण करणं असली कामे ते करे. मजा वाटायची पाहून. आम्ही गेलो तेव्हा तर स्वारी तिथल्या एका साधुकडून लाड करवून घेत होती! तेव्हापासून माकड पाळायची इच्छा निर्माण झाली होती, ती आजवर.

पण एकंदरच पाळीव प्राणी म्हणजे घरातला एक सदस्यच वाढवणे, शहरात असली हिम्मत माझ्याकडून तरी होणार नाही.

@कटप्पा
I know a lady who is giving away her kittens. Born on Saturday. You are in Austin. You can drive and get it in 2 months
If you are serious about this. They are super cute and healthy. You have to spay and neuter any pet usually .Keeping up with all the immunization is our responsibility anyways! Please remember this is a 10+ year commitment.
Take care Happy

फक्त असा विचार करा कि घरात नविन बाळ येणार आहे आणि त्याला बोलता येत नाही. आणि आता तुम्ही त्याचे आई बाबा आहात. जर तुम्हाला ते शक्य आहे अस वाटल तरच प्राणी घरात आणा.
माझ्या बहिणी़कडे दिड वर्षापुर्वी पिल्लु(फीमेल) आणल. सुरुवातीला बरेच हाल झाले तिचे संभाळताना आणि आताही मोठी जबाबदारी आहे. पण तिच्याशिवाय बहिणीच्या फॅमिली ला आणि आम्हालाही अजिब्बात करमत नाही. पण इट्स लाईक , तिसरे बाळ घरात आले आहे. माहित नाही कस ते पण इतके अ‍ॅटॅच होवून जातो आपण.

ससा पाळणे उत्तम. ते जीव नाही लावत.>>>>इथे खूपच हसले,
>>>>

आदू हे काही गमतीशीर वाटले म्हणून हसलात की यासारखा किंवा याविरुद्ध काही अनुभव आहे म्हणून हसलात.

माझ्या सासुरवाडीला पाळलेले ससे. वरच्या घरात सासरची माणसं राहायची. खालच्या घरात भावाने ससे पाळलेले. मी कधी जायचो खालच्या घरात गप्पा मारायला तेव्हा त्यांच्याशी मुलाकात व्हायची. माझ्या मेहुण्याच्या अंगांखांद्यावर फिरायचे. पण जसे झाडावर फिरावे तसेच फिरायचे. ना प्रेमाने चाटणे, ना डोळ्यात डोळे घालून बघणे, कधी रस्त्यात भेटले असते तर त्याला बघून ओळखीचे हसलेही नसते. आणि जरा खुट्ट झाले की त्यांच्या पिंजरयात पसार. स्वत:च्या जीवाला ईतके जपणारे जीव कसे दुसरयाला जीव लावणार.

त्यात माझा त्यांच्यावर चिक्कार राग. कारण मेहुण्याच्या अपेक्षा मी त्यांना माझ्याही अंगाखांद्यावर खेळवावे. अरे मी झाड आहे का वारूळ? कसली मजा त्यांना अंगावर फिरवण्यात. पण त्याचा सोयीने मी घाबरतो असा अर्थ काढून मला चिडवले जायचे.

आणि नंतर जेव्हा मला पोरगी झाली. छान नाजूक गोरीपान झाली. तर म्हणे बाळंतपणात माझ्या बायकोच्या दृष्टीस ते ससे पडत असल्याने हे असे झाले. म्हणजे मी येडा ...

आदिश्री - इकडे मिळत आहे किटन . फोस्टर केयर आहे इथे एक .
कोरोना नसता नक्की antonio ला आलो असतो .
तिकडे येऊन रिव्हर वॉल्क करून एक वर्ष झाले आता . ओरिजिनल टेक्स मेक्स खायला नेहमी येतो आम्ही तिकडे .

Good ,all the best. कुत्रे असो की मांजर तुमची मुले खूप एन्जॉय करतील. इथे फोटो टाकायला विसरू नका. आणि इकडे आलात की कळवा भेटू Happy

कुत्रे असलेल्या घरात कायम एक प्राणि सन्ग्रहालया (येतो तसा) सारखा वास येत असतो. पावसाळ्यात जरा जास्तच. तो चालेल का तुम्हाला?

आणि इन्शुरन्सही घेतलेला बरा. सुट्टीवर गेलात की काही लोक रोज एकदा(दोनदा) घरी येऊन त्यांच्याशी खेळतात, लिटरबॉक्स साफ करतात, पाणी भरुन ठेवतात वगैरे. एका वेळेस यायचे २०-२५$ घेतात, त्यानुसार १ की २ वेळा बोलवायचे ते ठरवता येईल. व ती व्यक्ती घरी येणार म्हणजे तो विश्वास हवा. २-३ दिवसच बाहेर गेलात तर ठीक पण त्याहुन जास्त गेलात तर सोय केलेली बरी.
बॅकयार्डमधे सोडायचे तर तिथे बॉबकॅट वगैरे मोठे प्राणी, मोठे पक्षी जे चोचीने इजा करु शकतील असे काही नाही ना पहावे. आमच्या गावात तसे घडले आहे. मांजरे मेली, पक्षानी डोक्यावर चोचीने मारल्याने. Sad
अ‍ॅलर्जी न देणारी, केस न गळणारी वा कमी गळणारी मिळत असतील तर त्याला प्राधान्य द्यावे.
अन्न पण असेच शोधावे ज्याने केस जास्त गळणार नाहीत.

मला नेहमीच कुत्रा आवडलाय तेव्हा कुत्राच पाळा.

मी आजवर कुत्राच पाळलाय, अमेरीका, भारत देशात सुद्धा.
भावनिक , आर्थिक, आणि मानसिक तयारी असेल तर बेस्ट आहे.
मांजरी मला सेल्फिश वाटल्यात आणि वाटतात.
गोल्डन रीट्रिवर आणि जर्मन शेफर्ड बेस्ट. ह्यांचा अनुभव बेस्ट आहे.
देसी गावरान हॉन्ड जमात ( कारवान) मस्त असते , आजी गावी पाळायची. टेहळणी मस्त करतात पण शहरात रमत नाहीत.

ह्याच जमातीचा अनुभव आहे.

मांजरीची न्युजस्न्स वॅल्यु ज्यास्त आहे माझ्या मते. गावी आजीकडे १५/२० होत्या, मला तर सर्वच बेक्कार वाटत. ...
घर नसेल तर, प्राणी ठेवणे म्हणजे निव्वळ छळ आहे प्राण्यांचा. फिरायला भरपूर जागा असणे उत्तम. म्हणून मी सुद्धा मोठे घर घेतले आणि टेरेस असलेली जागा तेव्हाच पाळलेय व पाळतेय.
( अ. मा. म.)

@हॅपी,
तुम्ही थोडेफार पाप्रा च्या बाबतीत जाणकार आहात असे वाटत आहे म्हणुन तुम्हाला गृहीत धरुन एक विनंती : कुत्र्याच्या वेगवेगळ्या ब्रीडबद्दल थोडफार डिटेलमधे लिहाल का? त्यांची खाण्यापिण्याची काळजी वगैरे बाबत? मला काही वर्षानंतर अर्थात सेटल झाल्यावर लॅब किंवा गोल्डन रिट्रीवर पाळायची इच्छा आहे.. वेगळा धागा काढुन लिहीलंत तर उत्तम!

नव्याने सुरुवात करणाऱ्या आणि त्यात फ्लॅट निवासी लोकांना सोईचा आणि सोप्पा प्रकार म्हणजे लॅब. प्रोफेशनल अप्रोच ठेवणार तर सर्टिफाइड फीमेल घेणे उत्तम. पण त्याआधी एक खात्री करा - हाऊसिंग सोसायटीत ह्याबाबत ऑब्जेक्शन घेणारी मंडळी असतील तर कुत्रा पाळण्याच्या फंदात पडू नए.

Manya s I have written two BB with general information on dogs I have brought them up you can see in maayboliwar navin section

@हॅप्पी, थँक्स! फिमेल लॅबचा थोडाफार अनुभव आहे.. जेनी नाव होत तिच.. खुप लळा लागलेला तिचा.. Happy

@अमा, थँक्स.. नक्की चेक करते..

Pages