Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेपर चिकन एन्ड कोणी समजावेल
पेपर चिकन एन्ड कोणी समजावेल का प्लिज
कशावर आहे पेपर चिकन?
कशावर आहे पेपर चिकन?
शेमारो
शेमारो
इथं थोडी स्टोरी वाचू शकता...
इथं थोडी स्टोरी वाचू शकता... एन्ड मात्र दिला नाहीय.. तो एन्ड थोडा डुबियस आहे... इनसेप्शन सारखा...
https://www.glamsham.com/ott/web-review/pepper-chicken-movie-review
टण्या तिकडे पुस्तक बीबीवरूनः
टण्या तिकडे पुस्तक बीबीवरूनः
हिलीबिली एलिजी (नेफि) कालच लावणार होतो पण आयत्या वेळेस बदलला. हुलू वर "इन्फेमस" म्हणून एक पाहिला. पिक्चर काही खास नाही पण त्या लीड अॅक्ट्रेसचे काम चांगले आहे.
आताच TV वर धनक पाहिला. .
आताच TV वर धनक पाहिला. . पूर्ण नाही बघितला पण जेवढा बघितला तेवढा खूप खूप आवडला.. दोन्ही लहान भावंडांनी फार सुंदर अभिनय केला आहे, खरे तर अभिनय नाही, भूमिका जगले आहेत दोघे..
धनक सुंदर आहे घरच्या
धनक सुंदर आहे घरच्या मुलांसोबत आवर्जून बघावा !
Hillbilly Elegy - नेटफ्लिक्स
Hillbilly Elegy - नेटफ्लिक्स वर पाहिला. या चित्रपटावर टीकात्मक लेख आलेले आहेत. मी मूळ पुस्तक वाचलेले नाही. रॉन हॉवर्ड या दिग्दर्शकाचा असल्याने उत्सुकता होतीच (ए ब्युटिफुल माइन्ड, सिण्डरेला मॅन, द विंची कोड वगैरे).
पण मला पिक्चर आवडला. रात्री उशीरा सुरू करून सुद्धा पूर्ण एंगेजिंग होता. नक्कीच रेकमेण्ड करेन.
अनेकदा असे होते की एखाद्या ठिकाणच्या व्यक्तींचे कॅरिकेचर केले जाते. त्या समाजाबद्दल, त्या लोकांबद्दल वरवर ऐकलेल्यांना ते आवडते कारण त्यांच्या डोक्यातील ढोबळ कल्पनांसारखेच ते असते. पण जे त्या समाजाचा भाग होते/आहेत त्यांना ते उथळ चित्रण वाटते. या चित्रपटाबद्दल तसेच झालेले दिसते.
हा चित्रपट "ट्रम्प कंट्री" तील लोकांचे योग्य चित्रण करतो की नाही वगैरे वाद बाजूला ठेवू. पण एकूण बाहेरील जगाशी फटकून असलेले, आर्थिक तंगी, अशिक्षितपणा, वाईट सवयी, व्यसने व एकूणच शिक्षणाबद्दल अनास्था असलेल्या कुटुंबांमधून जी मुले पुढे येउ पाहतात त्यांना यशस्वी होण्याकरता जी आव्हाने अगदी पदोपदी पेलावी लागतात त्याचे यात खूप चांगले चित्रण आहे. हे चित्रण "हिल्बिलीज" चे असू शकते, एखाद्या आफ्रिकन अमेरिकन कम्युनिटीज मधले असू शकते, किंवा भारतातील गावाबाहेरील वस्तीतील असू शकते. आणि "चांगले चित्रण' आहे कारण त्याच कम्युनिटीमधल्या, त्याच कुटुंबातील लोकांनी ते व्हिशस सर्कल तोडायचा प्रयत्न केलेला इथे दिसतो. यातील मुख्य कॅरेक्टर जे डी व्हान्स "जेडी" हा माझ्या दृष्टीने यातला हीरो नाही. त्याची आजी, आई आणि बहीण हे आहेत. जरूर पाहा.
Watching hillbilly elegy.
Watching hillbilly elegy. Halfway through. Excellent movie. Thanks for the reco.
Finished, wow! Can’t recommend enough!
त्यातला एक कोट मला फार आवड्ला
त्यातला एक कोट मला फार आवड्ला
"... where we come from is who we are, but we choose every day who we become"
नेटफ्लिक्स वर मेकिन्ग ऑफ लगान
नेटफ्लिक्स वर मेकिन्ग ऑफ लगान ची डॉक्युमेन्टरी बघितली, मुव्हीपेक्षा बरिच जास्त मनोरन्जक आहे, आमिर, आशुतोष गोवारिकर, एरवी फारशी कधीही न दिसलेली पण यात खुप अॅक्टिव्हली सहभागी असलेली आमिरची पहिली बायको रिना, बारिक-बुरिक किरण राव सगळे खुप यन्ग दिसतायत, मेकपचे थर न चढवलेले लोक आणी लगानचे सग्ळे कलाकार, भुज सारख्या ठिकाणी गावच बान्धण्यापासुन ते हजारोचा जमाव जमवताना येतानाच्या अडचणी , प्रचन्ड उन्हाने आजारी पडणारे कलाकार विषेश करुन ब्रीटिश... मस्ट वॉच आहे डॉक्युमेटरी.
पण एकूण बाहेरील जगाशी फटकून
पण एकूण बाहेरील जगाशी फटकून असलेले, आर्थिक तंगी, अशिक्षितपणा, वाईट सवयी, व्यसने व एकूणच शिक्षणाबद्दल अनास्था असलेल्या कुटुंबांमधून जी मुले पुढे येउ पाहतात त्यांना यशस्वी होण्याकरता जी आव्हाने अगदी पदोपदी पेलावी लागतात
>>>
किंडलवर एक पुस्तक पाहिलं आहे - Educated (Tara Westover). त्यातली लेखिकेची घरची पार्श्वभूमी साधारण अशाच प्रकारची आहे - बाहेरील जगाशी फटकून असलेले, आधुनिक जगातल्या सर्व गोष्टी नाकारणारे, इ.
हे या धाग्यावर जरा अवांतर झालं.
ऑस्कर ला गेलेला जलाईकटु
ऑस्कर ला गेलेला जलाईकटु बघायला घेतला
बराचसा वळू सारखाच वाटलं
पण दाक्षिणात्य भडकपणा आहेच
विजय सेतूपतीचा का?
विजय सेतूपतीचा का?
टिपीकल तामिळ सिनेमा आहे..पण त्यातील तामिळ गाणी श्रवणीय आहेत.
कि
2019 चा मल्याळम जलीकट्टू?
व्हेंटीलेटर शेवटी पाहिला
व्हेंटीलेटर शेवटी पाहिला एकदाचा. खरंच छान आहे.
फक्त जितेंद्रला बाराला एक मिनिट राहिले असताना त्याच्या जन्माबद्दलची जी कथा सांगितली जाते, ती त्याला तोपर्यंत कधीच, कोणीच (अगदी त्याच्या आईनेही नाही) सांगितली नव्हती हे जरा आश्चर्यकारक वाटलं. पण बाकी मस्त, एकेक नमुने भारी घेतलेत.
हिलबिलि एलजी हा टिपिकल
हिलबिलि एलजी हा टिपिकल सिंडरेला स्टोरी, अमेरिकन ड्रीम इ. टाइप चित्रपट आहे; अगदि क्लिशे वाटेल असा. या विषयावर आधी अनेक याहुनहि सुंदर चित्रपट (आक्टोबर स्काय, कोल मायनर्स डॉटर इ.) आलेले आहेत. ते जरुर बघा...
ग्लेन क्लोजचा ब्रिल्यंट पर्फॉर्मंस हि या चित्रपटाची जमेची बाजू...
2019 चा मल्याळम जलीकट्टू>>>
2019 चा मल्याळम जलीकट्टू>>>
हाच
दोन आहेत मुव्ही माहिती नव्हतं
ऑस्कर ला गेलाय तो कुठला?
2019 चा मल्याळम जलीकट्टू>>>>
2019 चा मल्याळम जलीकट्टू>>>>
हाच आहे ऑस्करला गेलेला..
तो दुसरा म्हणजे करूप्पन तामिळ सिनेमा पण मुख्य विषय जलीकट्टू च आहे..
हा मग इतका खास वाटला नाही
हा मग इतका खास वाटला नाही
कंटाळून।बंद केला, परत एकदा नेटाने पहिला पाहिजे
हा मग इतका खास वाटला नाही
हा मग इतका खास वाटला नाही
कंटाळून।बंद केला, परत एकदा नेटाने पहिला पाहिजे
Submitted by आशुचँप on 28 November, 2020 - 22:48
अशाच सिनेमांना ऑस्कर मिळतो म्हणूनच पाठवला असणार. आता तर ऑस्करमध्येही रिझर्वेशन सिस्टीम सुरु होणार आहे म्हणे - अमूक इतके कृष्णवर्णीय हवे पडद्यावर आणि पडद्यामागेही तरच सिनेमाला एंट्री अस्ल.
(सॉरी फॉर अवांतर)
कंटाळून।बंद केला, परत एकदा
कंटाळून।बंद केला, परत एकदा नेटाने पहिला पाहिजे >>> ऑस्कर वाल्या बर्याच चित्रपटांबद्दल हे आवर्जून सांगावे लागत नाही
जलीकट्टू ची कथा बघता ती
जलीकट्टू ची कथा बघता ती पूर्णपणे रूपक म्हणून असणार असे वाटतेय. ट्रेलर बघितला व विकीवर वाचले. पात्रांच्या तोंडचे मूळचे संवाद इंग्रजीत लिहून येणार आणि आपण वरच्या दृश्यावर एक डोळा ठेऊन वाचणार या भानगडीत निम्मा आशय निघून जाणार आणि फक्त एक कथा म्हणून चित्रपट आपल्याला कळणार.
वळूसारखाच वाटतोय ह्या मताशी सहमत.
The Impossible - नेटफ्लिक्स.
The Impossible - नेटफ्लिक्स. फुल रेको. जरूर पाहा. जबरी आहे. २००४ साली ख्रिसमस च्या सुट्टीत थायलंडला गेलेल्या व सुनामी मधे सापडलेल्या कुटुंबाची कथा आहे. पिक्चर चांगलाच आहे, पण किमान "लुकास" चे काम केलेल्या मुलाच्या कामाकरता बघावा इतके चांगले काम आहे.
याबद्दल आणखी कुतूहल निर्माण झाल्याने सर्च केले. ती माहिती आत्ता इथे देत नाही. आधी पिक्चर बघा आणि मग शोधा.
Black box - Amazon prime.
Black box - Amazon prime. चांगला सुस्पेन्स थ्रिलर आहे...
8 thottakkal बघितला. संपूर्ण
8 thottakkal बघितला. संपूर्ण सिनेमात नायकाच्या तोंडावरचा भाव बदलत नाही पण बघण्यासारखा आहे सिनेमा.
The Impossible - नावावरून
The Impossible - नावावरून आठवलं नसतं, पण पुढच्या वर्णनावरून पाहिला असल्याचं आठवलं. छान आहे सिनेमा. मुलाचं कामही खरंच खूप सुंदर आहे.
Black box - Amazon prime.
Black box - Amazon prime. चांगला सुस्पेन्स थ्रिलर आहे... >>> बीभस्त नाहीये ना. नसेल तर बघायचा विचार करेन.
अंजु . चांगला आहे.. लहान
अंजु . चांगला आहे.. लहान मुलांसोबत देखील बघू शकता...
नेटफ्लिक्स वर - गिन्नी वेड्स
नेटफ्लिक्स वर - गिन्नी वेड्स सन्नी... अति ताणलेला घिसापिटा शेवट सोडला तर बराच सुसह्य आहे.
पण यात एक गाणे ऐकले -- सेम तसेच गाणे नवीन येणार्या इंदू की जवानी मध्ये पण आहे असे कसे?
कुठले गाणे
कुठले गाणे
Pages