थप्पड ! Its not about domestic violence !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2020 - 11:34

थप्पड पाहिला नुकताच प्राईमवर.
मला वाटलेले की एका थपडेवर काय पिक्चर बनणार. मसाला भरला असेल किंवा संथ बनवला असेल.
पण नाही ! मस्त बनवलाय ! एक बिनकामाचा डायलॉग वा प्रसंग नाही. सगळे कॅरेक्टर परफेक्ट उभे केलेत. जे पोहोचवयचेय ते पर्रफेक्ट पोहोचलेय.

एखादा डायलॉग ऐकण्यात मिस झाला की मी लगेच १० सेकंद मागे जाऊन तो पुन्हा ऐकायचो. कारण एकूण एक डायलॉग, एकूण एक बारीक सारीक प्रसंग हा भाष्य करणारा होता.

कोट करायचे म्हटले तर सारेच करावे लागेल. पण कश्याला चित्रपट बघणारयांची मजा कमी करा.
तरी मला आवडलेला एक,
तापसी पन्नूचा नवरा ऑफिसला जायला निघाला असतो, त्याला डबा द्यायला आलेली तापसी त्याच्या शेजारी ऊभी असते. ईतक्यात शेजारील बंगल्यातून दिया मिर्झा आपल्या कारमधून बाहेर प्डते. तसा तापसीचा नवरा बोलतो, "अरे ईसने फिर नयी कार ले ली.. क्या करती है ये?"
"- मेहनत" तापसी पन्नू ऊत्तर देते.

तापसी कदाचित जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नसेल पण तिच्यात एक एक्स फॅक्टर आहे. तिच्या भुमिका बघायला नेहमीच मजा येते. त्या आपसूकच स्त्रीप्रधान होतात.

चित्रपटाचा शेवट विशेष आवडला. फिल्मी करणार नाही याची खात्री होतीच. अश्या चित्रपटात तो करतच नाही. पण त्याचवेळी ऑफबीट चित्रपट आहे तर थोडा बंडखोरीचाच करूया असे न करता सकारात्मक आणि प्रॅक्टीकल केला आहे.

एक थप्पड .. पर वो भी नही मार सकता!.. चित्रपट बघून हे मनावर ठसतेच.
पण चित्रपट संपल्यवर एक प्रश्न आपल्या मनाशी घोळत राहतो. जर त्याने ती थप्पड मारलीच नसती तर....
तर त्यानंतर जी जाणीव तिला होते ती तिला झालीच नसती. आणि अश्या कित्येक गृहीणी असतील ज्यांना ती आजही नसेल.

आपल्याकडे एक सुप्रसिद्ध वाक्यप्रचार आहे. काही नाही रे, तिला सुख बोचते. वरवर सारे काही सुखी संसाराचे चित्र दिसणारया घरातील गृहीणीला नेमके कसले सुख बोचत असते याची अनेक उत्तरे असतील. त्यातले एक ऊत्तर प्रभावीपणे हा चित्रपट देतो. आणि त्यावर ऊत्तरही सुचवतो.

परीक्षण हा माझा प्रांत नाही. कधीतरी मराठी चित्रपटाची जाहिरात म्हणून, कधी स्वप्निल शाहरूख या आवडत्या कलाकारांच्या चित्रपटाचे कौतुक म्हणून, तर कधी अशी एखादी काहीतरी सांगून जाणारी कलाकृती आली तर ती जास्तीत जास्त लोकांनी आवर्जून बघावी म्हणून त्या त्या चित्रपटावर धागा काढतो.

जरूर बघा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज बघितला. बघताना एवढी गुंतेन असं वाटलं नव्हतं इतकी चर्चा (स्पॉयलरसकट) वाचल्यावर. पण तरीही गुंतत गेले. त्यातला लोकांनी मनात येईल तेव्हा सगळं मागचं मागे टाकून देणं (वकील बाईने घर सोडणे, अमूने घर सोडणे, अमूच्या नवऱ्याने जॉब सोडणे, लंडन सोडणे, अमूच्या सासूने नवऱ्याविषयी इतकी वर्षे बाळगलेली अढी सोडणे वगैरे) प्रत्यक्ष आयुष्यात इतकं सोपं असतं का हा प्रश्न अनेकदा पडला.

शेवटी तन्वी आझमी आणि तापसीचा पूजा झाल्यानंतर संवाद>> मला पण हा खूप आवडला. त्यात ती म्हणते की, "आपने विक्रम की बिबी को प्यार किया, अम्रुता को नही. " नीट विचार केला तर अनेक बायकांना हा लागू होईल. ~~ + १२३४५६७ जवळजवळ 90% बायकांना लागू होईल आणि त्यांनी अनुभवले ही असेल.

सून आवडते कारण ती आपल्या मुलाची बायको असते म्हणून. मुलाची काळजी घेते, त्याच्या मनासारखे वागते तोवरच. एक व्यक्ती म्हणून तिच्या गुण-दोषांकडे बघण्याचा मोठेपणा किती सासू- सासरे दाखवू शकतात? ~~~ +१२३४५६७८९

नीधप, अमितव, सिमंतिनी.. perfect.. प्रतिसादातल्या प्रत्येक वाक्याला अनुमोदन.

त्याच्या बायकोच्या जागी त्याच्यापेक्शा दोन फुट ऊंच, तगडा ईसम असता तरी प्रतिक्शिप्त क्रिया म्हणून ज्याचे समर्थन चालू आहे ती घडली असती का?>>>>>> exactly!!

जेव्हा कुणिहि A माणूस B माणसावर हात टाकतो ना तेव्हा बरेचदा, अगदी बरेचदा त्याचे कारण दुसरे तिसरे काही नसून " A can do so" हेच असते.

.

प्रतिक्षिप्त क्रियेबद्दल दोन चार शब्द !

जे चुकेल ते कर्रेक्ट करा

मेंदूचे साधारण काम असे चालते. डोळे कान नाक स्पर्श वगैरे ईंद्रियांचा वापर करून डेटा कलेक्ट करा. त्याचे ॲनालिसिस करा. आणि मग आदेश द्या...

प्रतिक्षिप्त क्रिया माझ्या ज्ञानानुसार केव्हा होते, तर जेव्हा मेंदूकडे काही डेटा नसतो किंबहुना तो कलेक्ट करून ॲनालिसिस करायला वेळ नसतो, त्याआधीच रिॲक्ट करणे गरजेचे आहे हे त्याला ठाऊक असते.

अचानक आपल्या अंगावर कोणी काही भिरकावले आणि ते काय आहे हे लक्षात यायच्या आधीच आपण बचावासाठी हात मध्ये आणला - प्रतिक्षिप्त क्रिया.
कोणीतरी आपल्या शेजारी उभे राहून अचानक आपल्याला भाँ केले. आपण दचकून मागे सरकलो, डोळे मिटले. प्रतिक्षिप्त क्रिया. मग घाबरवणारी व्यक्ती पहिलवान असो वा लहान मुल. खरेच मारतोय की हूल देतोय. मेंदूला तो विचार करायला वेळच नसतो. अणि हा डेटा सुद्धा मेंदूकडे नसतो जे तो विश्लेषण करेल. फक्त आपला बचाव करायचा आहे हिच मेंदूत उपजत जाणीव असते.
जसे की चटका लागला. हात मागे घ्या. लगेच. भांडे किती गरम आहे. हात मागे नेताना कोणाला लागेल का? आपटेल का? नो नथिंग ॲनालिसिस ईन ब्रेन...

पण जेव्हा थप्पड मारली जाते. भले रागाच्या भरात का असेना. तेव्हा मेंदूकडे हा डेटा पक्का असतो कि आपण कोणाला थप्पड मारत आहोत आणि त्याला ती मारू शकतो का? म्हणून तर ती एखाद्या पेहेलवानाला मारली गेली नसती. किंवा त्याचे वडिल मागे असते तर त्यांना मारली गेली नसती. कारण मेंदूकडे हा डेटा असतो की मागे कोण ऊभे आहे.
आणि हा डेटा घेतल्याशिवाय मेंदू कडून थप्पडेचे आदेश येणारच नाहीत. म्हणजे कोणी वाद घालताना मागून हात धरला आणि कोण आहे हे न बघताच सरळ थप्पड मारली असे मेंदू होऊ देणार नाही. कारण या केसमध्ये प्रतिक्षिप्त क्रियेसारखे रिॲक्ट व्हायची गरज नाही हे मेंदू जाणतो. आधी डेटा कलेक्ट करायला पुरेसा वेळ आहे हे मेंदूला ठाऊक असते. त्यामुळे तो नेहमीच्या प्रोसेसनेच वागतो. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून ती थप्पड येत नाही. चित्रपटातही अर्थातच ती नव्हती आली.

अजून नाही कळले तर उदाहरण देतो.

वरचेच उदाहरण घ्या
तुम्हाला एखाद्या लहान मुलाने अचानक भाँ केले. तुम्ही मागे सरकता. मग पुढच्याच क्षणाला त्या मुलाला धपाटा मारता.
तुम्हाला एखाद्या वडिलधारी माणसाने भाँ कए. तुम्ही मागे सरकता.
मग पुढच्याच क्षणाला बोलता, "काय नाना, घाबरवलंत मला.."

पहिली मागे जायची प्रतिक्षिप्त क्रिया असते. नो डेटा ॲनालिसिस. दोन्हीकडे सेम असते.
पुढचा एक क्षण मात्र मेंदूला पुरतो की समोरची व्यक्ती कोण आहे आणि त्यानुसार आपली पुढची प्रतिक्रिया ठरते.

तर यात त्या मुलाला दिलेला धपाटा हि प्रतिक्षिप्त क्रिया नसून त्याने भाँ केल्यावर मागे सरकणे हि प्रतिक्षिप्त क्रिया होय Happy

आज सिनेमा पाहिला. फारच सुरेख घेतलं आहे सगळं. तापसीच्या नवऱ्याचं काम पण आवडलं. तो आजिबात व्हिलन दाखवला नाहीये. एका पितृसत्ताक गर्भश्रीमंत घरात जिथे मोठ्यांना वाकून नमस्कार करण्याची सवय लावली जाते पण त्या पलीकडे काहीही कौटुंबिक वा सामाजिक जाणीवा विकसित केल्या जात नाहीत, ज्याचे आई वडील एका बोगस दिखाऊ नात्यात आहेत अशा एका entitled, my way or the highway वृत्ती असलेल्या मुलाचा रोल त्याने छान निभावला आहे. त्याचा राग येत नाही. एखाद्या मोबाईल न चालवता येणाऱ्या व्यक्तीने मोबाईल हाताळण्याचा प्रयत्न करावा तसे तो चुकीची बटनं दाबत राहतो. त्याच्या सगळ्याच कल्पना जाणीवा इतक्या उथळ आहेत. त्याला प्रेम म्हणजे काय हेच माहीत नाही असं वाटतं!
त्याच्या दुर्दैवाने त्याच्या आजूबाजूला एक मूर्ख सहकारी कम मित्र, एक बिनडोक वकील आणि मोडकळीस आलेलं कुटुंब असे सारे जण दाखवले आहेत. बेस्ट पार्ट म्हणजे दिग्दर्शक या साऱ्या घटकांवर मस्त शालजोडीतले हाणतो!
अमू खूपच लकी आहे! She comes from a loving family and her family does not support her blindly yet she knows she has unconditional support of her parents. एक तर तिला स्वतःला नीट जाणीव आहे नेमकं काय चुकलंय, कुठे चुकलंय आणि आता तिला यातून काय हवंय याची. आणि ती जाणीव खूप आधीपासून तिच्या वडिलांनी तिच्यात रूजवली आहे. त्यामुळे ती दुसर्‍या दिवशी बॅग भरून चालती होत नाही. तिला लीगल नोटीस येते म्हणून ती वकिलाकडे जाते. आपण प्रेग्नंट आहोत हे कळल्यावर देखिल तिच्या निर्णयात फरक पडत नाही. तापसीने कामही छान केले आहे.
बाकी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या पॅरलली सुरू असतात त्या आणि त्यातले कलाकार सर्वांचीच कामं उत्तम. एकही शॉट, प्रसंग उगीच वाटला नाही. त्यातल्या त्यात मला अमुच्या वकिल बाईच्या नवऱ्याचं काम नक्की काय आहे ते फारसं कळलं नाही. तो पण वकिलच असतो बहुतेक पण मग तो जास्त प्रसिद्ध का असतो (on what merit) म्हणून तो इतका माज करत असतो हे काही फार कळलं नाही.

वकील बाईचा नवरा वकील नसतो तर सासरा प्रसिद्ध वकील असतो. नवराही खूप यशस्वी असतो आणि त्याच्या ओळखीमुळे तिला अशी केस मिळते जी तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून देते. नवऱ्याच्या दृष्टीने तिचं स्वतःचं यात काही कर्तृत्व नसतं. वकील बाई नेहमी अशीच बोलते की यात तिने ही विशेष लकब दाखवली आहे ते कळले नाही. मी तिला यात पहिल्यांदा बघितले. कामवाली सुनीता खूप आवडली. तिची जी कामं प्राईमवर सांगितली आहेत त्यातलं मी काहीच बघितलेलं नाही पण मी तिला कशात तरी बघितलंय. जबरदस्त अभिनेत्री आहे ती.

ईतके दिवस हा मेलोड्रामा असेल म्हणून टाळत होते , गेल्या आठवड्यात बघितला शेवटी.
फार आवडला असं नाही प्ण चांगला आहे .
थप्पड हा फक्त trigger point आहे . . त्यादिवशी सासू तिला म्हणते , घरी ईतके पाहूणे आले आहेत , खाली चल , असं बर दिसत नाही , आणि दूसर्यादिवशीही एका शब्दाने विचारत नाही , कोणाच्याही मनात हा विचार येत नाही की तो चुकीच वागला , नवर्याला आपण हे रागाच्या भरात वागलो हे कळतं पण चुकीचं वागलं हे कळत नाही . आता ती त्याच्यावर प्रेम करू शकत नाही
या सगळ्याचा तिला राग आहे , वाईट वाटतं आणि हेच तिच्या दूर होण्याच कारण आहे . अगर जोडके रखना पड रहा है , तो ईसका मतलब वो टूटा हुआ है असं तिला वाटतं .
ती वकिल "आर्या" मध्ये बघितलेली . बोलण्याची स्टाईल अशीच आहे , हस्की .
मला स्वाती आवडली .
दिया मिर्झा ला जास्त सीन्स नाही आहेत . ती थोडक्यात पण महत्वाचे बोलते Happy
विक्रम तिच्या घरी येतो तिची साक्ष मागायला , तेव्हा त्याला एका वाक्यातच टोला हाणते .

Pages