थप्पड ! Its not about domestic violence !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2020 - 11:34

थप्पड पाहिला नुकताच प्राईमवर.
मला वाटलेले की एका थपडेवर काय पिक्चर बनणार. मसाला भरला असेल किंवा संथ बनवला असेल.
पण नाही ! मस्त बनवलाय ! एक बिनकामाचा डायलॉग वा प्रसंग नाही. सगळे कॅरेक्टर परफेक्ट उभे केलेत. जे पोहोचवयचेय ते पर्रफेक्ट पोहोचलेय.

एखादा डायलॉग ऐकण्यात मिस झाला की मी लगेच १० सेकंद मागे जाऊन तो पुन्हा ऐकायचो. कारण एकूण एक डायलॉग, एकूण एक बारीक सारीक प्रसंग हा भाष्य करणारा होता.

कोट करायचे म्हटले तर सारेच करावे लागेल. पण कश्याला चित्रपट बघणारयांची मजा कमी करा.
तरी मला आवडलेला एक,
तापसी पन्नूचा नवरा ऑफिसला जायला निघाला असतो, त्याला डबा द्यायला आलेली तापसी त्याच्या शेजारी ऊभी असते. ईतक्यात शेजारील बंगल्यातून दिया मिर्झा आपल्या कारमधून बाहेर प्डते. तसा तापसीचा नवरा बोलतो, "अरे ईसने फिर नयी कार ले ली.. क्या करती है ये?"
"- मेहनत" तापसी पन्नू ऊत्तर देते.

तापसी कदाचित जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नसेल पण तिच्यात एक एक्स फॅक्टर आहे. तिच्या भुमिका बघायला नेहमीच मजा येते. त्या आपसूकच स्त्रीप्रधान होतात.

चित्रपटाचा शेवट विशेष आवडला. फिल्मी करणार नाही याची खात्री होतीच. अश्या चित्रपटात तो करतच नाही. पण त्याचवेळी ऑफबीट चित्रपट आहे तर थोडा बंडखोरीचाच करूया असे न करता सकारात्मक आणि प्रॅक्टीकल केला आहे.

एक थप्पड .. पर वो भी नही मार सकता!.. चित्रपट बघून हे मनावर ठसतेच.
पण चित्रपट संपल्यवर एक प्रश्न आपल्या मनाशी घोळत राहतो. जर त्याने ती थप्पड मारलीच नसती तर....
तर त्यानंतर जी जाणीव तिला होते ती तिला झालीच नसती. आणि अश्या कित्येक गृहीणी असतील ज्यांना ती आजही नसेल.

आपल्याकडे एक सुप्रसिद्ध वाक्यप्रचार आहे. काही नाही रे, तिला सुख बोचते. वरवर सारे काही सुखी संसाराचे चित्र दिसणारया घरातील गृहीणीला नेमके कसले सुख बोचत असते याची अनेक उत्तरे असतील. त्यातले एक ऊत्तर प्रभावीपणे हा चित्रपट देतो. आणि त्यावर ऊत्तरही सुचवतो.

परीक्षण हा माझा प्रांत नाही. कधीतरी मराठी चित्रपटाची जाहिरात म्हणून, कधी स्वप्निल शाहरूख या आवडत्या कलाकारांच्या चित्रपटाचे कौतुक म्हणून, तर कधी अशी एखादी काहीतरी सांगून जाणारी कलाकृती आली तर ती जास्तीत जास्त लोकांनी आवर्जून बघावी म्हणून त्या त्या चित्रपटावर धागा काढतो.

जरूर बघा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तापसी ओव्हररेटेड आहे... माझा पास...
>>>>>
च्रप्स, तापसी बकवास आहे माझा पास असे समजू शकतो. पण ओव्हररेटेडचा अर्थ माझ्यामते बरी आहे पण नावाजतात तितकीही चांगली नाही असा होतो. मग चित्रपटाला पास का करावा?
असो, ती नावडती असेल तरी किमान या कारणासाठी हा चित्रपट चुकवू नका. तिला हवे तर चित्रपट संपल्यावरही नावडतेच राहू द्या Happy

आणि तसेही चित्रपट आधी दिग्दर्शकाचा असतो.. हा तरी नक्कीच.

माझा पास.. प्रतिक बोराडेचा रिव्यू बघून बघायची इच्छाच राहीली नाही.. आणि काय एवढं रामायण/ महाभारत करायचं त्यात? तुला त्याने मारलं तु ही त्याला मार..संपला विषय..

एक काळ अलका कुबलने गाजवला आता त्याच्याविरूद्ध..तापसी गाजवतेय. दोन्हीकडेच तेच..
फक्त तापसी आपल्या अलका कुबलसारखी मुळूमुळू रडण्यार्यातली नाहीये हाच काय तो फरक..

हा बोराडे कोण ?

तुला त्याने मारलं तु ही त्याला मार..संपला विषय.. >>> इतका सोपा नाहीय तो प्रकार...

प्रतिक बोराडेचा रिव्यू बघून बघायची इच्छाच राहीली नाही..
>>>>

कदाचित हं .. पण ते पुरुषसत्ताक संस्कृतीचे समर्थक असतील. आणि त्यामुळे बहुतांश लोकांना हा चित्रपट बघण्यापासून परावृत्त करत असतील

किंवा कदाचित हं.. या चित्रपटात जे संवाद वा बारीकसारीक प्रसंग दाखवले आहेत ते त्यांना समजले नसावेत.
कारण हा चित्र्पट एका थपडेपुरता नाहीयेच मुळात.. हेच त्यांना समजले नाहीये.

एक काळ अलका कुबलने गाजवला आता त्याच्याविरूद्ध..तापसी गाजवतेय.
>>>>

तापसीची तुलना अलका कुबलशी? स्मिता पाटीलच म्हणायचे होते

हा बोराडे कोण ?>>>
आहे आपला मराठी माणूस..युट्यूबर आहे रिव्यू देतो..
आणि सेक्युलर आणि लिबरल्सविरोधी मोठी मोठी भाषणे पण ठोकतो..

तुला त्याने मारलं तु ही त्याला मार..संपला विषय.. >>> इतका सोपा नाहीय तो प्रकार..>>>

हा विषय चौथा झाला आहे...युट्यूबवर ट्रेलर
आला तेव्हाच कमेंटसमध्ये चाऊन चाऊन चौथा झाला आहे...

विषय चौथा झाला आहे...युट्यूबवर ट्रेलर
आला तेव्हाच कमेंटसमध्ये चाऊन चाऊन चौथा झाला आहे...
>>>

आता पाचवा करूया मग Happy

बाई दवे,
ट्रेलरवरून या विषयाचा चोथा करणारयांना माझा सलाम.

कदाचित हं .. पण ते पुरुषसत्ताक संस्कृतीचे समर्थक असतील. आणि त्यामुळे बहुतांश लोकांना हा चित्रपट बघण्यापासून परावृत्त करत असतील>>>>

नाही अजिबात नाही.. मला नाही पाहावासा नाही वाटला इतकचं...पिंक माझा अजुनही... फेवरेट मूव्ही आहे...त्यात काहीतरी सेन्स होता...

करा पाचवा करा सहावा करा... नो हरकत..

अध्यख महोदय,
हा धागा १०० पार जाण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी नम्र विनंती.
शाहरुख आलेला आहे, स्वप्नील, सई, सगळे आणण्यात यावेत ही नम्र विनंती.

मला नाही पाहावासा नाही वाटला इतकचं...पिंक माझा अजुनही... फेवरेट मूव्ही आहे...त्यात काहीतरी सेन्स होता...
>>>>>

फेव्हरेट मूवीमध्ये "काहीतरी" सेन्स होता Happy

आणि थप्पडमध्ये काहीच सेन्स नाही हे आपल्याला कोण ते वरचे त्यांच्या रिव्यू वरून आणि ट्रेलरखालील चर्चेवरून समजले .. हे मला पटत नाहीये Happy

अवांतर - तुम्ही चोथा या शब्दाला चौथा म्हणालात म्हणून मी पाचवा असा विनोद केला.
तरी नशीब अशी चूक माझी झाली नाही. अन्यथा दहा लोकांच्या वीस चिरफाड पोस्ट त्यावरच असत्या Happy

रुन्मेष तुम्ही फार छान परीक्षण करता, हा चित्रपट बघायचा आहे,
प्रतीक बोरोडे चे reviews अतिशय एकांगी आणि agenda driven असतात

बघायचा आहे अजून. ज्या दिवशी prime वर आला त्या दिवशी tweeter वर ट्रेंड करत होता, नुकताच रिलीज झाल्यासारखा.
बाकी ऋन्मेऽऽष दुर्लक्ष करायला शिकलास ते एक बरं!

https://youtu.be/aZ8LYwCj6Jg

ही घ्या लिंक..त्याने जे ज्ञान पाजाळलं आहे ना..ते बघून माझी इच्छा गेली.. बघा तुम्ही.. कळेलच..मी का असं म्हणतोय ते..

टायपो एरर..दुसरं काय.. त्याबद्दल क्षमस्व आहोत..

ज्या दिवशी prime वर आला त्या दिवशी tweeter वर ट्रेंड करत होता, नुकताच रिलीज झाल्यासारखा.
>>>
माझ्या बायकोने तव्यावरची गरम पोळी ताटात घ्यावी तसे आल्याआल्या बघून संपवला.
मी पाहिल्यावर तिला सुचवायला गेलो तेव्हा मला हे समजले.
आणि असे बरेच जणांनी केलेय. कारण सोशलसाईटवर आज चर्चाही वाचण्यात आली

अजय लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद
असा रिव्यू बघून कोणाचीही पिक्चर बघायची ईच्छा मरू शकते.
अत्यंत रटाळ. माझी आता चार दिवस युट्यूबवर जायची ईच्छा मरून जाईल असे वाटतेय. सुरुवातीचे पाल्हाळ अनाकलनीय होते. पण त्यातून त्याचा आकस समजला. आणि आता थप्पडवर बोलूया म्हणत कथानकाचे पाल्हाळ लावत बसला. याला परीक्षण म्हणावे का? पुर्ण बघायलाही झाले नाही.. मी पिक्चर आधीच पाहिला असल्याने त्यात काय दाखवायचे होते ते त्या वीराला समजलेच नाही हे स्पष्ट होताच सोडले बघायचे

आहे आपला मराठी माणूस..युट्यूबर आहे रिव्यू देतो..
आणि सेक्युलर आणि लिबरल्सविरोधी मोठी मोठी भाषणे पण ठोकतो..
>>> अर्रर्रर्र नको मग...

आणि सेक्युलर आणि लिबरल्सविरोधी मोठी मोठी भाषणे पण ठोकतो..
>>>
ओह तरीच. सुरुवातीला तेच पाल्हाळ लावले. मग दिग्दर्शकाचे कुठलेतरी ट्विट प्रकरण उकरून काढले. पुढे काय रिव्यू बघावा.. तिथेच मला कळायला हवे होते की एकांगी असणार..

मी हॉलमध्ये पाहिला मला वाटतं फर्स्ट डे ...20 च्यावर पब्लिक नव्हतं... मलाही खूप आवडला... मेलोड्रामा नाही हे विशेष! त्यात आलेल्या प्रत्येक स्त्री ची एक कहाणी आहे... तापसी चे आईवडील फार आवडले.. तिच्या आईबद्दल लिहायचे आहे नंतर लिहीते... परत प्राईमवर पाहीन

हो लिहा. ती छान अभिनेत्री आहे. रत्ना पारेख
तापसीचा बाप चांगल्या विचारांचा दाखवला आहे. पण जो स्टॅन्ड मुलीबाबत घेतो तो त्याला बायकोबाबत घ्यायचे सुचत नाही. किंवा तो विचार पतीच्या भुमिकेत असताना त्याच्या मनात येत नाही.
यावरून मला एक जाणवले की आपण भले चांगले असू आणि समानतेचा विचार करणारे असू तरीही काही बाबींत चुकीचे होतेय आणि ते कर्रेक्ट करायला हवे हेच मुळात लक्षात येत नसले तर त्या चांगले असण्याचाही फायदा नाही होत.
आपल्या घरात असे काही होतेय का, काही गृहीत धरले जातेय का याचे आत्मपरीक्ष्ण मला पुन्हा करावेसे वाटले

आपल्या घरात असे काही होतेय का, काही गृहीत धरले जातेय का याचे आत्मपरीक्ष्ण मला पुन्हा करावेसे वाटले>>>>+१

चित्रपट आवडलाच. आवर्जुन पहावा.

तापसीचा बाप चांगल्या विचारांचा दाखवला आहे. पण जो स्टॅन्ड मुलीबाबत घेतो तो त्याला बायकोबाबत घ्यायचे सुचत नाही. किंवा तो विचार पतीच्या भुमिकेत असताना त्याच्या मनात येत नाही.>>>>>

यावर त्याचा आणि तिच्या आईचा संवाद आहे चित्रपटात. तो विचारतो की मी कधी मारलं का तुला? तुला कधी तुझं मन मार असं म्हणालो का ?

त्यावर ती माझ्या आईने मला हेच शिकवले तिच्या आईने तिला तेच शिकवले असे काहीसे ऊत्तर देते.

कालच पाहिला. चांगलाय. तापसीचे आई वडील आवडले‌.

तापसीचा बाप चांगल्या विचारांचा दाखवला आहे. पण जो स्टॅन्ड मुलीबाबत घेतो तो त्याला बायकोबाबत घ्यायचे सुचत नाही. किंवा तो विचार पतीच्या भुमिकेत असताना त्याच्या मनात येत नाही >>>≥>>>. येस कारण तो एका मुलीचा बाप असतो आणि आई वडील झाल्यावर माणूस बदलतो विचार बदलतात. हे सहज साहजिक आहे. आपण आपल्या बायकोला कधी मारहाण केली नाही एवढंच तो नवरा म्हणून बघतो आणि तो त्याच्या जागी बरोबर असतो. म्हणून हे आई वडील रीयालिस्टीक वाटले.
चित्रपट आहे चांगला पण डिव्होर्स नंतर तापसी आपल्या भविष्याची तरतूद करताना कुठेच दिसत नाही ते पण एवढी मोठी येऊ घातलेली जबाबदारी असताना हे खटकले. किंवा ते होईलच पुढे असं आपण समजून घ्यायचं बहुतेक.

अत्यंत भुक्कड विषय आहे. उगाचच राईचा पर्वत असे माझे मत आहे.

मी कोणालाच कधीच थप्पड मारणार नाही. पण ते राहू दे बाजूला.

भावाने बहिणीला थप्पड मारली, किंवा उलट, तर संबंध तोडावेत असे तुम्ही म्हणणार काय?.

त्यावर ती माझ्या आईने मला हेच शिकवले तिच्या आईने तिला तेच शिकवले असे काहीसे ऊत्तर देते.
>>>>

आणि त्यानंतर ती बोलते की तुम्हाला माझी आवड माहीत असून तुम्ही का पुढाकार घेतला नाही. तिथे तो निरुत्तर होतो. आणि अखेरच्या दृश्यात मग बहुधा तिची आवड पुरवताना दाखवला आहे.

मंजूताई येस्स,
२५ वर्षांचा काळ मोठा आहे. पण तिच्या वडिलांना याची जाणीवही मधल्या काळात होत नाही. तर तेव्हा होते जेव्हा त्यांच्या मुलीशी अनफेअर घडते आणि तिच्या आईशी याबाबत चर्चा होते.
जर ती थप्पड नसती त्यांच्या मुलीला बसली तर त्यांच्यातही कधी हे संभाषण झाले नसते आणि आपणही काही चुकलेलो हे कधी त्यांना कळलेच नसते.
नो वन ईज पर्रफेक्ट. पण प्रय्त्न नेहमी त्या दिशेने असावा. आणि आयुष्यभराचा प्रवास असतो हा...

Pages