थप्पड ! Its not about domestic violence !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2020 - 11:34

थप्पड पाहिला नुकताच प्राईमवर.
मला वाटलेले की एका थपडेवर काय पिक्चर बनणार. मसाला भरला असेल किंवा संथ बनवला असेल.
पण नाही ! मस्त बनवलाय ! एक बिनकामाचा डायलॉग वा प्रसंग नाही. सगळे कॅरेक्टर परफेक्ट उभे केलेत. जे पोहोचवयचेय ते पर्रफेक्ट पोहोचलेय.

एखादा डायलॉग ऐकण्यात मिस झाला की मी लगेच १० सेकंद मागे जाऊन तो पुन्हा ऐकायचो. कारण एकूण एक डायलॉग, एकूण एक बारीक सारीक प्रसंग हा भाष्य करणारा होता.

कोट करायचे म्हटले तर सारेच करावे लागेल. पण कश्याला चित्रपट बघणारयांची मजा कमी करा.
तरी मला आवडलेला एक,
तापसी पन्नूचा नवरा ऑफिसला जायला निघाला असतो, त्याला डबा द्यायला आलेली तापसी त्याच्या शेजारी ऊभी असते. ईतक्यात शेजारील बंगल्यातून दिया मिर्झा आपल्या कारमधून बाहेर प्डते. तसा तापसीचा नवरा बोलतो, "अरे ईसने फिर नयी कार ले ली.. क्या करती है ये?"
"- मेहनत" तापसी पन्नू ऊत्तर देते.

तापसी कदाचित जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नसेल पण तिच्यात एक एक्स फॅक्टर आहे. तिच्या भुमिका बघायला नेहमीच मजा येते. त्या आपसूकच स्त्रीप्रधान होतात.

चित्रपटाचा शेवट विशेष आवडला. फिल्मी करणार नाही याची खात्री होतीच. अश्या चित्रपटात तो करतच नाही. पण त्याचवेळी ऑफबीट चित्रपट आहे तर थोडा बंडखोरीचाच करूया असे न करता सकारात्मक आणि प्रॅक्टीकल केला आहे.

एक थप्पड .. पर वो भी नही मार सकता!.. चित्रपट बघून हे मनावर ठसतेच.
पण चित्रपट संपल्यवर एक प्रश्न आपल्या मनाशी घोळत राहतो. जर त्याने ती थप्पड मारलीच नसती तर....
तर त्यानंतर जी जाणीव तिला होते ती तिला झालीच नसती. आणि अश्या कित्येक गृहीणी असतील ज्यांना ती आजही नसेल.

आपल्याकडे एक सुप्रसिद्ध वाक्यप्रचार आहे. काही नाही रे, तिला सुख बोचते. वरवर सारे काही सुखी संसाराचे चित्र दिसणारया घरातील गृहीणीला नेमके कसले सुख बोचत असते याची अनेक उत्तरे असतील. त्यातले एक ऊत्तर प्रभावीपणे हा चित्रपट देतो. आणि त्यावर ऊत्तरही सुचवतो.

परीक्षण हा माझा प्रांत नाही. कधीतरी मराठी चित्रपटाची जाहिरात म्हणून, कधी स्वप्निल शाहरूख या आवडत्या कलाकारांच्या चित्रपटाचे कौतुक म्हणून, तर कधी अशी एखादी काहीतरी सांगून जाणारी कलाकृती आली तर ती जास्तीत जास्त लोकांनी आवर्जून बघावी म्हणून त्या त्या चित्रपटावर धागा काढतो.

जरूर बघा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिकाराबद्दल लिहिलेलं नाहीये. सवयीबद्दल (प्रॅक्टीस या शब्दाला इथे नेमका कोणता मराठी शब्द योजायचा?) लिहिलं जातंय. लहानांना मोठ्यांनी मारलेलं लहान स्वीकारतात ही भारतीय प्रॅक्टीस आहे.

पुन्हा मुद्दा तोच आहे की ती याच्या मॅटरमध्ये बळे बळे पडली आणि चुकून फटका खाती झाली. तिथे तिच्याऐवजी आई असती तर, बाप, भाऊ, बहीण, वहिनी यांच्यापैकी कुणी असतं तर हा प्रश्नच निरर्थक आहे. सहसा दोन ग्रोन अप्स्च्या भांडणात (जोवर ते शाब्दिक स्तरावर चालू आहे तोवर) कोणी तिसरा त्या दोघांपैकी एकाच्या अंगचटीला जाऊन भांडणातून खेचून बाहेर काढायचा बावळटपणा करत नाही. इथे ती हे पुन्हा पुन्हा करते. असं कोणीही केलं तरी राग येणारच. हे सारं फार मुद्देसूदपणे वर मी आणि चंपा यांनी समजावलं आहे पण तुम्ही मुद्दाम इरिटेट करण्याकरिता ती बायको आहे आणि बायकोला मारणे हा संस्कार असल्यानेच तो असं करतो हा फालतू मुद्दा पुन्हा पुन्हा रेटत आहात.

बायकोला मार असे संस्कार कोणीही मुलग्यावर करीत नाही की नवर्‍याने मारलं तरी गपगुमान मार खा असं मुलीला शिकवत नाही. तरीही अशा घटना समाजात घडतात. का? तुम्ही नॉनसेन्स वागलात तर तुम्हाला समोरचा ठेवून देतो आणि त्याने ठेवून दिली याला आपला मूर्खपणा कारणीभूत आहे हे पटलं तर थप्पड खाणाराही शांत बसतो ही प्रॅक्टीस आहे. नवरा बायकोचं किंव नात्यातील इतर उतरंडीचं सोडा पण अनेकदा ऑफिसमध्येही बॉस असिस्टंटला एक ठेवून देतो हे घडलेलं मी स्वतः पाहिलं आहे. असिस्टंट का सहन करतो? त्याला माहित असतं आपल्या चुकीमुळे साहेब कावलाय. तो त्याच्या उफाळून आलेल्या रागाचा निचरा एक थप्पड मारुन करतोय. अधिकार आहे का त्याला? मूळीच नाही. पण मग त्याला अधिकार काय आहे आणि तो जर त्याने वापरला तर? दोन दिवस सस्पेंड केलं तर? त्यापेक्षा एक थप्पड खाल्लेली बरी. अनेकदा उलटही होतं. जीएम आणि डायरेक्टर लेवलच्या लोकांना कामगार मंडळींनी सर्वांसमक्ष श्रीमुखात मारण्याचे प्रसंग देखील मी पाहिलेत. यूनियनच्या जोरावर अशा गोष्टी घडतात आणि वरच्या पदावरची मंडळीही हा अपमान सहन करतात. एका झापडीकरिता दरवेळी पोलिस / कोर्ट असले प्रकार परवडत नाहीत.

सार्वजनिक ठिकाणी - बस, ट्रेन, सिनेमा थिएटर - अनेकदा बायका विनयभंगाच्या (खर्‍या / खोट्या) आरोपासह एखाद्या पुरुषाच्या कानाखाली ठेवून देतात. तिथे गर्दी महिलेला सहानुभूती देण्याची शक्यता असते तेव्हा पुरुष माघार घेतो. जगात दररोज किती लोक किती जणांच्या (चूक असो अथवा नसो) थपडा खात असतील याचा सर्व्हे केला तर फार मोठा आकडा भरेल. प्रकरण पुढे किती ताणायचं हे ज्याच्या त्याच्या सेन्सवर अवलंबून आहे.

कुणीच कुणाला मारु नये हे आदर्श म्हणून ठीक आहे. पण मग त्या थपडेऐवजी दरवेळी अधिकृत शिक्षा देणे शक्य आहे का? सध्या कोरोना काळात बाहेर हिंडणार्‍यांना पोलिस दंडूके मारत आहेत आणि तेही त्यांच्या पार्श्वभागावर. शिवाय त्यांचे व्हिडीओ देखील पुन्हा सोशल मीडियावर टाकत आहेत. पोलिसांना हा अधिकार कोर्टाने दिला आहे काय? मग पोलिस असे का करतात? प्रत्येकाला पकडून तुरुंगात डांबणे किंवा आरोपपत्र कोर्टात दाखल करणे प्रॅक्टीकली शक्य आहे का?

बायदवे या कोरोना काळात एका साठीच्या अ‍ॅम्बुलन्सचालकाला पोलिसांनी रुग्णाऐवजी अवैध प्रवासी वाहतूक करत असल्याच्या आरोपावरुन शारिरीक मारहाण केली आणि तीही त्याच्या मुलासमोर. मारहाणीच्या वेदना फारशा नव्हत्या पण अपमानाचा मानसिक धक्का मोठा होता त्या चालकाला. तो हार्ट अटॅक येऊन मेला. त्याचा तरुण मुलगा रडत रडत ही घटना सांगत असल्याचा व्हिडीओ आयबीन लोकमत वाल्यांनी अपलोड केला आहे. तो पाहा. तो बघून संताप येतो. (जर ही घटना सत्य असेल तर) अशा घटनेबद्दल नुसता चित्रपटच नाही बनला पाहिजे तर त्या दोषी पोलिसांना जनतेने रीतसर भर चौकात सर्वांसमक्ष तुडवून तुडवून ठार मारायला हवे. होईल का असे?

हे होत नाही तोवर बळी तो कान पिळी या न्यायाने अशा अनेक थप्पडा मारल्या आणि खाल्ल्या जाणार हे सत्य आहे.

हे होत नाही तोवर बळी तो कान पिळी या न्यायाने अशा अनेक थप्पडा मारल्या आणि खाल्ल्या जाणार हे सत्य आहे.>>>>

लहानांना मोठ्यांनी मारलेलं लहान स्वीकारतात ही भारतीय प्रॅक्टीस आहे.>>>>

पण ते चूक आहे हे तुम्हीही मान्य करताय ना? की तुमच्या मते ते बरोबरच आहे? याचे ऊत्तर मिळाले तर विचार करणे सोप्पे जाईल

एखाद्याचा राग कानाखाली मारून शांत होईल दुसऱ्याचा कदिचित खून करून... मग खून पण योडून देऊ या का?

जगात दररोज किती लोक किती जणांच्या (चूक असो अथवा नसो) थपडा खात असतील याचा सर्व्हे केला तर फार मोठा आकडा भरेल. प्रकरण पुढे किती ताणायचं हे ज्याच्या त्याच्या सेन्सवर अवलंबून आहे.>>>>>

एखाद्याने ठरवलं मला सहन नाही करायचं तर? त्याला मुर्ख म्हणायचं? सगळे सहन करतात मग तू पण कर म्हणायचं? शंभर लोकं जगले ना कानाखाली खाऊन मग तू पण विसर अपमान आणि जग पुर्वी सारखीच. असंय का?

तुमची आत्मसन्मानाची फुटपट्टी आणि माझी सारखीच असावी का? का असावी?

थप्पड सोडून द्या शिवी दिल्याने पोलिस केस, मारामारी, खून होतात.

बिपिन, तुमच्या पोस्ट्स वाचून मला सखेद आश्चर्य वाटले. सिनेमा पाहिला नाहीये अजून पण ट्रेलर आणि इथल्या परीक्षणावरून एकूण सिनेमा त्या एका प्रसंगाच्या पलीकडे जाऊन नात्यात अपेक्षित असलेल्या मूलभूत समानतेच्या तत्वाविषयी बोलू इच्छितो असे वाटले. आपण मात्र त्या एका थोबाडीत मारण्याच्या प्रसंगाभोवती गोल गोल फिरून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहात. It is completely unwarranted and it is making you take a slippery slope!

मी त्या प्रसंगाचं / कृतीचं समर्थन अजिबात करत नाहीये. पण त्यावेळी ते तितक्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे घडते इतकेच. त्या घटनेवर एक सिनेमा बनविण्याइतके ते जर महत्त्वाचे असेल तर मग वरती पोलिसांच्या मारहाणीची जी उदाहरणे दिली आहेत त्याचे काय?

तुम्ही दीवार सिनेमा पाहिला आहे काय? स्मगलिंग करणे हा गुन्हा आहे आणि पाव चोरी करणे हा देखील गुन्हा आहे. स्मगलरला देखील शशी कपूर गोळी घालतो आणि पाव चोरणार्‍याला देखील.

प्रत्येक गुन्ह्याला तुम्ही एकाच तीव्रतेची शिक्षा देणार काय? बायकोला थप्पड मारणार्‍या नवर्‍याला काय शिक्षा द्यायची हे एकदा आयपीसी मध्ये नमूद करा म्हणजे मग पुन्हा वादविवाद नकोच.

बायदवे, ट्रिपल तलाक देणार्‍या नवर्‍याला शिक्षा (तुरुंगवास) देण्याची तरतूद मोदी सरकारने कायद्याद्वारे केली तेव्हा इथे मायबोलीवरच अनेकांनी टाहो फोडला होता. त्याची आठवण झाली.

पण ट्रेलर आणि इथल्या परीक्षणावरून एकूण सिनेमा त्या एका प्रसंगाच्या पलीकडे जाऊन नात्यात अपेक्षित असलेल्या मूलभूत समानतेच्या तत्वाविषयी बोलू इच्छितो असे वाटले. आपण मात्र त्या एका थोबाडीत मारण्याच्या प्रसंगाभोवती गोल गोल फिरून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहात.
>>>>>>

एक्झॅक्टली जिज्ञासा !

म्हणून शीर्षकातही आहे its not about domestic violence.
वर काही प्रतिसादातही लिहीलेय की थप्पड महत्वाची नाही पण पिक्चरमधील तापसीचाच डायलॉग सांगायचा झाला तर मै ऐसी बन गयी थी के जिसको थप्पड मारा जा सकता है.
ती थप्पड पडायच्या आधीही त्या घरातली तिची वॅल्यू अशीच होती. थपडेनंतर ती जाणवली.
थप्पड रागात येते. पण हिला थप्पड मारली तर चालू शकते हि भावना थंडपणे ठाण मांडून बसली असते.

आणि ती स्वताही काही रागाच्या भरात घट्स्फोटाचा निर्णय घेत नाही. तर त्यानंतर नवरयाचे आणि सासरच्यांचे तिला गृहीत धरणे यातून तिची जाणीव बळावत जाते. हा प्रवासही छान दखवला आहे चित्रपटात. दिया मिर्झासोबतचे प्रसंग आणि संवादही छान आहेत ईथले.

बायकोला थप्पड मारणार्‍या नवर्‍याला काय शिक्षा द्यायची हे एकदा आयपीसी मध्ये नमूद करा म्हणजे मग पुन्हा वादविवाद नकोच.>>>>>

तो गुन्हा आहेच ना ?.... Under domestic violence मग शिक्षा पण त्याप्रमाणेच व्हावी.

बिपिन, अहो सिनेमा त्या प्रतिक्षिप्त क्रियेबद्दल आहे असं जे तुम्हाला वाटतंय ना ते तसं नाहीये. गुन्हा वगैरे फार पुढच्या गोष्टी आहेत.
समजा, थोबाडीत मारण्याऐवजी तो तिचा वाढदिवस विसरला असता तर? It is sort of the last straw. It could have been anything inconsequential and still the relationship would have collapsed. पण थोबाडीत मारणं हे प्रतिकात्मक आहे - एखाद्याला शुद्धीवर आणण्यासाठी मारतो तशी.

Submitted by अतरंगी on 5 May, 2020 - 17:58
>>>>

अतरंगी आत्नसन्मानाच्या फूटपट्टीचा छान मुद्दा +७८६

चित्रपटात दाख्वलेली तिची कामवाली अशीच आपली आत्नसन्मानाची वेगळी फूटपट्टी घेऊन चालवून घेत जगत असते.

आपली लास्ट लाईन
<<<<थप्पड सोडून द्या शिवी दिल्याने पोलिस केस, मारामारी, खून होतात>>>>>
हे बहुतांश अविचाराने वा रागाच्या भरात प्रत्युत्तर दिल्याने होते. त्या थपडेवर रिॲक्शन दिल्याने होते.

या केसमध्ये ती तसे बिलकुल वागत नाही. यात ती थप्पड का मारली गेली त्यामागच्या कारणास्तव वेगळी होते. तिला गृहीत धरले जाणे, तिला त्या घरातली स्वत:ची वॅल्यू कळते तेव्हा वेगळी होते. म्हणूनच ते समर्थनीय वाटते.

ती थप्पड पडायच्या आधीही त्या घरातली तिची वॅल्यू अशीच होती. थपडेनंतर ती जाणवली. >>
exactly.
बीपीनचंद्र हा मुद्दा कळला की प्रत्यक्षात मारलेली थप्पड गौण वाटेल. चित्रपटाचं शीर्षक थप्पड आहे पण थप्पड ही केवळ तिला परिस्थितीची जाणीव करून देण्यास कारणीभूत ठरते.

जिज्ञासा आणि ऋन्मेष मी तुमच्या मुद्द्यांशी सहमत आहेच. पण सिनेमा हे नीट मांडू शकत नाहीये हेच माझं मत आहे.

थप्पड हा छळाचा (टॉर्चर) एक प्रकार आहे. मानसिक त्रास देणे, टोमणे मारणे, एखाद्याची अक्कल काढणे, घाण बोलणे, चारित्र्याबद्दल विवादास्पद बोलणे हे व असे असंख्य छळाचे प्रकार आहेत पण त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही.

याउलट अनेकदा थप्पड हा छळाच्या विरोधात नोंदवला जाणारा संतापाचा उद्रेक आहे. कोणी तुम्हाला सतत बडबड करुन जेरीस आणत असेल, एखादं लहान मूल तुम्ही लॅपटॉपवर काम करत असताना तिथे मोठ्या आवाजात पिपाणी वाजवत असेल (फक्त उदाहरणाकरिता दिलं आहे) आणि तुमच्याकडे समजावण्याइतका वेळ नसेल तर तुम्ही तत्क्षणी एखादी शिवी देता / आवाज चढवून बोलता / किंवा ठेवून देता, समोरचा दुखावला आहे हे तुम्हालाही कळते पण आता हातातले काम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे ज्याला दुखावले आहे त्याची समजूत नंतर काढता येईल असा तुम्ही विचार करता.

आता सर्वांनी तुम्ही मारलेली थप्पड / चढवलेला आवाज / दिलेली शिवी दिसते पण तुमचे झालेले टॉर्चर दिसत नाही हीच खंत आहे.

सिनेमात नायिकेला तिच डिव्हॅल्यूएशन झालेलं थप्पड न खाताही ( तो प्रसंग न टाकता ) समजलं असतं तर जास्त प्रभावी सिनेमा बनला असता. शिवाय तापसीलाही सातवेळा प्रत्यक्षात कानाखाली खावी लागली नसती. मी या प्रसंगाच्या चित्रपटात असण्याचाच निषेध करतोय म्हणजे पर्यायाने इथल्या कुठल्याही प्रतिसादकापेक्षा जास्त मी थप्पड मारण्याच्या कृतीचा निषेध करतोय.

आणखी एक, सिनेमातील किंवा एकूणच वास्तवातील पात्रांची मांडणी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करणे चूकीचे आहे. प्रत्येक भूमिका ही ग्रे शेड आहे, फक्त डार्कनेस / ब्राईटनेस कमी जास्त आहे इतकेच.

कांचन अधिकारी यांचा मानिनी हा सिनेमा पाहा. त्यात (गिरीजा ओक) नायिकेचा नवरा (मनोज बिडवै) चुकतोय हे दाखवलेले आहे पण त्याच्या चुकांनाही त्याची काही बाजू आहे हे दाखवले आहे. म्हणूनच तो जेव्हा नायिकेच्या मित्राला (स्वप्नील जोशीला) बेदम चोपतो तेव्हाही स्वप्नील त्या मारहाणीचा बाऊ करत नाही की बदला घ्यायची भाषा वापरत नाही.

नायिकेच्या नवर्‍याचा शेवटच्या काही मिनिटांत एक मोठा संवाद आहे त्यात त्याचा अहंकार दिसून येत असला तरी तो जे काही बोलतो त्यात बरंचसं (कॉर्पोरेट जगातले ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, पुरुष म्हणून जगण्यातले ताणतणाव, त्यामुळे स्वभावात चिकटणार्‍या दुष्प्रवृत्ती, संगतीमुळे येणारी व्यसनाधीनता, बाहेरखालीपणा इत्यादी) प्रॅक्टीकली करेक्ट असंच आहे.

एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो.... ही कथा प्रत्येक दोन सिनेमामधे एकाची असते... ती मस्त चालते बाजारात...
आता ' थप्पड' वर सिनेमा आला, तर अमुक वर का नको, तमुक वर का नको , असले प्रश्न विचारून जगातला कोणताही विषय तिथे टाकता येईल...
... आणि कुठल्याही सिनेमा , नाटकाची कथा एका वाक्यात करून 'त्यात काय?' असे विचारणे ही सोप्पे असते नाही का?

>>नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 5 May, 2020 - 10:11<<
सगळ्या पोस्टशी सहमत. एखाद्या टॉक्झिक रिलेशन्शीप मधुन बाहेर पडण्याकरता कुणालाहि थप्पड ची गरज किंवा वाट का बघावी लागते? इथल्या चर्चेवरुन या चित्रपटात थप्पडचं महत्व एव्हढं एक्झॅजरेट केलं असेल तर ते माझ्यामते चित्रपटाचं अपयश आहे...

{{{ आता ' थप्पड' वर सिनेमा आला, तर अमुक वर का नको, तमुक वर का नको , असले प्रश्न विचारून जगातला कोणताही विषय तिथे टाकता येईल... }}}

सिनेमा काढण्याचा अधिकार कुणालाही आहे, कुठल्याही विषयावर काढायला आहे. अगदी बद्धकोष्ठ या विषयावर देखील काढू शकता.

जॅकीश्रॉफ सारख्या अभिनेत्याला घेऊन हा https://www.youtube.com/watch?v=s6i_xAsRcVY&list=PLzt0vbU4fscCgM3RxvtmvP... चित्रपटदेखील काढू शकता.

अमिताभला घेऊन बूम सारखा सिनेमाही काढू शकता. सेन्सॉर परवानगी देतंय तोवर काहीच अडचण नाही.

पंण जेव्हा तुम्ही सोशल साईटवर अमूक एक सिनेमा पाहणं किती महत्त्वाचं आहे याची भलामण करणार्‍या पोस्ट्स लिहाल तेव्हा विरुद्ध बाजूने लिहिणार्‍यालाही तसं लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे याचं भान ठेवा. त्याला सिनेमा कळला नाही असं एका वाक्यात लिहून त्याच्या आकलनशक्तीची वासलात लावू नका.

सगळ्या पोस्टशी सहमत. एखाद्या टॉक्झिक रिलेशन्शीप मधुन बाहेर पडण्याकरता कुणालाहि थप्पड ची गरज किंवा वाट का बघावी लागते? इथल्या चर्चेवरुन या चित्रपटात थप्पडचं महत्व एव्हढं एक्झॅजरेट केलं असेल तर ते माझ्यामते चित्रपटाचं अपयश आहे...
Submitted by राज on 5 May, 2020 - 19:53

धन्यवाद राज.

याला अजून एक अँगल आहे तो म्हणजे स्टारडमचा आणि त्याचा फायदा घेऊन दिग्दर्शकाला आपला अजेंडा राबविण्याचा.

इथे तापसी पन्नू स्टार आहे तर तिची भूमिका प्रत्येक चित्रपटात प्रभावी राहतेय सिनेमाच्या फायद्याकरिता. यात ती थप्पड खाऊन सहानुभूती गोळा करतेय तर मागच्या एका सिनेमात तर ती (बदला) खून करण्याचंही समर्थन करतेय असं असूनही तिची भूमिकाच प्रभावी करण्याचा प्रयत्न दिसत होता.

ऋन्मेषचा धागा असल्याने मुद्दाम शाहरुखचा उल्लेख करतोय. सुपरस्टार असल्याने बाजीगरमध्ये तो खलनायिकेच्या मुलीचा आणि दोन साक्षीदारांचा खून करतो त्यामागे त्याच्यावर झालेला अन्याय दाखवून त्याची भूमिका ग्लोरिफाय केली गेली होती. याउलट काजोलवर प्रेम करणार्‍या पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका दुय्यम व कमी प्रभावशाली राहील याची पुरेपुर काळजी घेतली गेली होती.

दिलवाले दुल्हनिया मध्ये रात्री उशिरा बीयरकरिता खोटे बोलून दुकान उघडायला लावणारा, नायिकेच्या अंगावरचे कपडे फाडणारा, तिचं लग्न ठरलंय हे माहित असताना तिच्या होणार्‍या पतीला आधी संकटात पाडून मग त्या संकटातून सोडवून खोटे बिझनेस प्रपोझलचे अमिष दाखवून त्याचा मित्र बनून त्याच्या घरात घुसून मग नायिकेला आपलीशी करणारा शाहरुखही प्रेक्षकांना खटकला नाही कारण दिग्दर्शकाला स्वतःच्या चष्म्यातून तसे दाखवायचे होते ते त्याने दाखविले आणि प्रेक्षकांनी गपगुमान स्वीकारले. सिनेमा वीस वर्षे सलग थेटरला चालला.

आता प्रेक्षकांना बायकोला थोबाडीत मारणारा नवरा खलनायक वाटतोय कारण दिग्दर्शक तसे दाखवायचा प्रयत्न करतोय पण ती मांडणी तर्कशुद्ध आहे का याचा प्रेक्षकांनी स्वतःच्या बुद्धीने विचार करावा. दिग्दर्शकाने मांडलंय ते आहे तसं स्वीकारु नये असं माझं मत आहे.

रामायण आणि महाभारत देखील आहे तसं बुद्धीवादी लोक स्वीकारत नाही. रावण, दुर्योधन, अश्वत्थामा आणि कर्ण यांना नायक मानणार्‍या कादंबर्‍या उगाच निघालेल्या नाहीत.

बिपीन जी... एका थप्पड वर काढलेला निश्कर्ष पाहून तुम्हाला सिनेमा कळला नसावा असे वाटले ते मी लिहीले..
त्याबद्दल तुम्हाला 'क्षमस्व' म्हणून झाले आहे...
तुम्ही मात्र, माझ्या लिखाणात 'फोर मोर..' चा उल्लेख नसताना , माझे तीर्थरूप असल्यागत माझी अभिरूची कशी आहे यावर भाष्य केले आहे.
आणि मी निर्माता आहे, असे लिहील्याने तुम्हाला काही कारणाने मिरच्या लागल्या तेही सांगीतलं आहे.
....
बाकी, तुम्ही ज्या पध्दतीने 'तुमचेच बरोबर, आणि बाकीचे चूक' हे सिध्द करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करता आहात, त्यावरुन माझ्या पुरता निश्कर्ष मी काढला आहे.... अभिरूची वगैरे नंतर बघू...
तेव्हा, तुम्ही माझा विषय सोडा... तुमचे चालू द्या...
(बध्दकोष्टवर पिकू येऊन गेलेला आहे... कदाचित विसरला असाल... मी तो बघितलेला नाही, म्हणजे परत अभिरूची वगैरेचा प्रश्न नको... )

{{{ बध्दकोष्टवर पिकू येऊन गेलेला आहे... कदाचित विसरला असाल }}}

माहितीये. म्हणूनच तसं उद्विग्नपणे लिहिलंय लिहिलंय की कोणी उठून कुठल्याही विषयावर चित्रपट काढतो आणि काढू शकतो त्याला अधिकार आहेच.

{{{ बिपीन जी... एका थप्पड वर काढलेला निश्कर्ष पाहून तुम्हाला सिनेमा कळला नसावा असे वाटले ते मी लिहीले..
त्याबद्दल तुम्हाला 'क्षमस्व' म्हणून झाले आहे... }}}

{{{ ती महत्त्वाची गोष्ट नाहीच मूळी. >>> बापरे .. चित्रपट पाहूनही तुम्हाला कळले नाही... नशीबवान आहात.. }}}

हे तुमचं मूळ वाक्य होतं आणि तुमचं क्षमस्व म्हणून झालंय ते वेगळ्याच कारणाकरिता...

{{{ मी निर्माता असल्याचे लिहिल्याने तुमचा अपमान झाला क्षमस्व.. }}}

माझ्या आकलनशक्तीबद्दल एकतर्फी निष्कर्ष काढल्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त केलेली नव्हती.

{{{ तेव्हा, तुम्ही माझा विषय सोडा... तुमचे चालू द्या... }}}

तुम्ही माझ्या आकलनशक्तीबद्दल बिनधास्त कॉमेंट करण्याचा जन्मसिद्ध अधिकार बाळगून असाल बहुदा.

सुपरस्टार असल्याने बाजीगरमध्ये तो खलनायिकेच्या मुलीचा आणि दोन साक्षीदारांचा खून करतो त्यामागे त्याच्यावर झालेला अन्याय दाखवून त्याची भूमिका ग्लोरिफाय केली गेली होतहोत
>>> ऑब्जेक्शन सर... बाजीगर आला तेंव्हा तो सुपरस्टार नव्हता... तो चित्रपट त्याचा पहिला मोठा हिट आहे.

बापरे .. चित्रपट पाहूनही तुम्हाला कळले नाही... नशीबवान आहात <<< या बद्दलच क्षमस्व....
तुमच्या आकलन शक्तीला सलाम..
...
फक्त तिसर्‍याच पोष्टशी (चंपा यांच्या) , तेव्हा ती आकलन शक्ती जाग्यावर असावी असे जाणवले नाही..
आणि एकादा अभिनेत्याला 'पु. वा. शु' दिल्यावर 'मी कसा मोठ्ठा' हे सांगण्याची गरज नाही.
अमिताभ बच्चन यानी दोनशे सिनेमा केले, म्हणुन मी 'एका सिनेमात होतो' म्हटलं की त्यांच्या अपमान होत नाही..
मी दोन 'लघूपटांचा' निर्माता आहे, आणि माझ्या सगळ्या कलाकारांना मनापासून शुभेच्छा देतो..

{{{ बापरे .. चित्रपट पाहूनही तुम्हाला कळले नाही... नशीबवान आहात <<< या बद्दलच क्षमस्व.... }}}

ही तुमची सर्वात आधी मला उद्देशून टाकलेली पोस्ट होती जी मला अपमानास्पद वाटली व ज्याकरिता तुम्ही आता दिलगिरी व्यक्त केली आहे.

धन्यवाद.

{{{ फक्त तिसर्‍याच पोष्टशी (चंपा यांच्या) , तेव्हा ती आकलन शक्ती जाग्यावर असावी असे जाणवले नाही.. }}}

फोर मोअर शॉट्स चा उल्लेख तुमच्या पोस्टमध्ये नव्हता हे आता पाहिले आधी तसे वाटलेले. पण तरीही मी तुमच्या अभिरुचीबद्दल तेव्हाही कॉमेंट केलेली नव्हती. तुम्ही हवे तर माझी ती पोस्ट पुन्हा वाचा पण तरीही दिलगिरी व्यक्त करतो.

{{{ मी दोन 'लघूपटांचा' निर्माता आहे, आणि माझ्या सगळ्या कलाकारांना मनापासून शुभेच्छा देतो.. }}}

मी एक दुकानदार आहे. माझ्या किंवा इतर कोणत्याही व्यवसायबंधूंच्या दुकानातला माल "आवडला नाही" असे मत मांडणार्‍या ग्राहकाला मी "तुला या मालातले काही कळले नाही नशिबवान आहेस" असे म्हणतो.

सलाम अशा दुकानदाराच्या प्रवृत्तीला.

असो. व्यक्तिगत वादविवाद बाजूला ठेवून कमिंग टू द पॉईंट -

दिग्दर्शक एक कथा आपल्यापुढे सादर करतो. त्या कथेतला एखादा भाग भिंगातून मोठा करुन दाखवावा तसा हायलाईट करतो. आपला फोकस त्यावर ठेवतो. त्यानंतर त्याच्या नजरेतून त्या भागावर सकारात्मक / नकारात्मक भाष्य करतो आणि प्रेक्षकही चवीने वर्णन करत राहतात की तो प्रसंग / घटना / पात्र कसे वाईट / चांगले आहेत.

थप्पड चित्रपटातली थप्पड प्रेक्षकाला खुपते आणि ती मारणारा नायक टीकेला पात्र ठरतो. त्याचवेळी त्याच काळात आलेल्या कबीर सिंग सिनेमातला नायक हा नायिका सोडून इतर सर्व न्यू जॉइनिंग स्टूडंट्सचे रॅगींग करतो हे टीकापात्र ठरत नाही कारण दिग्दर्शक ती बाब हायलाईट करत नाही. त्याच्या दृष्टीने ती एक कॅज्यूअल घटना असते.

त्या एका थोबाडीत मारण्याच्या प्रसंगाभोवती गोल गोल फिरून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहात. It is completely unwarranted and it is making you take a slippery slope! >>>>> + १००

कोण म्हणतं कबीर सिंगचा मूर्खपणा/ हलकटपणा टीकेला पात्र ठरत नाही? बकवास डोक्यात जाणार मूव्ही होता तो.

बिपीनजी,

तुमचे सगळे मुद्दे मला "राधेसुता, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म" याच प्रकारचे वाटत आहेत.

कबीर चित्रपटाच्या धाग्यावर की चित्रपटाच्या धाग्यावर कबीर या पात्राच्या वागण्यावर टीका झाल्याचे आठवत आहे.

ईथे कबीर चित्रपटाचा मुद्दा अस्थायी आहे.

याच पानावर पहिल्या प्रतिसादात तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत ते तुमच्यामते बळी तो कान पिळी या न्यायाचे दाखले देणारे आहेत. मला त्या सर्व उदाहरणांमधे पॉवर अ‍ॅब्युज दिसत आहे.

१०० मधले ९९ लोक कानाखाली बसल्यावर तो कोणत्याही कारणाने अपमान गिळून पुढे जात असतील पण जर एकाने ठरवलं की मला हा अपमान सहन करायचा नाही आणि मला कायद्यानेच जे काही करायचे आहे ते करायचे आहे/ मला अशा व्यक्ती सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, असे म्हणत असेल तर तो चूक कसा? ९९ लोकांनी जे केलं तेच त्या व्यक्तीने पण करावे असं का? ते पण समोरच्या व्यक्तीने सरळ सरळ भारतीय कायद्याने दंडनीय अपराध केलेला असताना ?

कोण म्हणतं कबीर सिंगचा मूर्खपणा/ हलकटपणा टीकेला पात्र ठरत नाही? बकवास डोक्यात जाणार मूव्ही होता तो.

Exactly पण त्यावर फारशी टीका आढळली नाही. शिवाय शेकडो कोटी गल्ला जमवला म्हणे. इतक्या मोठ्या संख्येने पब्लिकला आवडला म्हणजे त्याच्यावर टीका केली तर तोही सिनेमा मला कळला नाही असं लिहायला निर्माते मंडळी पुढे सरसावणार.

काय इगो कुरवाळत बसले आहात तुम्ही लोक? ज्यांनी भरपूर मोठे दिवे लावलेत तेसुद्धा एवढं भांडत बसणार नाहीत! अधजल गगरी छलकत जाय...
सवय म्हणा, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणा की अजून काही.. नवऱ्याने बायकोला मारणे कोणत्याही प्रकारे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या बायकोची कीव येते मला. Male chauvinist डुकरांची लक्षणे सगळी. साधा विचार करा, त्या पत्नीच्या जागी लहान बहीण असती तर खरंच अशी प्रतिक्षिप्त क्रिया घडली असती का? चित्रपट पाहिलेला नाही, पण इथल्या चर्चेवरून कोणत्यातरी शाब्दिक भांडणात पत्नी पतीला आवरत असताना हा प्रसंग घडतो, थप्पड मारण्याआधी पती त्याच्या पत्नीला समजावतो का? काही बोलतो का जेणेकरून ती माघारी वळेल?

१०० मधले ९९ लोक कानाखाली बसल्यावर तो कोणत्याही कारणाने अपमान गिळून पुढे जात असतील पण जर एकाने ठरवलं की मला हा अपमान सहन करायचा नाही आणि मला कायद्यानेच जे काही करायचे आहे ते करायचे आहे/ मला अशा व्यक्ती सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, असे म्हणत असेल तर तो चूक कसा? ९९ लोकांनी जे केलं तेच त्या व्यक्तीने पण करावे असं का? ते पण समोरच्या व्यक्तीने सरळ सरळ भारतीय कायद्याने दंडनीय अपराध केलेला असताना ?
नवीन Submitted by अतरंगी on 5 May, 2020 - 23:51

तुम्ही माझे आधीचे प्रतिसाद वाचले तर याचं उत्तर तिथेच मिळेल पण तरीही पुन्हा प्रयत्न करतो.

वन बाय वन -

थप्पड खाणार्‍या व्यक्तिची चूक आहे म्हणजे त्याने काही तरी नुकसान केलंय / छळ केलाय / खोडी काढलीय / मेंटली डिस्टर्ब केलंय समोकेलंयला म्हणून थोबाडीत खायला लागलीय ही केस असेल तर - वरचं बॉस असिस्टंटचं किंवा कोरोना क्षेत्रात फिरणारे आणि त्यांना मारणारे पोलिस यांचं उदाहरण वाचा.

समजा थप्पड खाणारा चूक नसतानाही थप्पड खातोय अशी केस असेल तर मात्र - त्याने ठरवलं की मला हा अपमान सहन करायचा नाही आणि मला कायद्यानेच जे काही करायचे आहे ते करायचे आहे/ मला अशा व्यक्ती सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, असे म्हणत असेल तर तो चूक कसा? तो चूक ठरणार नाही. पण प्रॅ क्टी क ली तो काय करु शकेल? एक थप्पड मारण्याच्या केसमध्ये पोलिस नेमकं काय करतील? आधी तर आपल्या देशात बलात्कार आणि खून करणार्‍यांचेही किती तरी खटले पेंडींग आहेत. सिद्ध होईपर्यंत कोणालाही गुन्हेगार म्हणता येत नाही. हैद्राबाद स्टाईल एन्काऊंटर करणं फारच दूर. आता या केस मध्ये थप्पड खाणार्‍याला स्वत:देखील समोरच्याला एक थप्पड मारायला हवी किंवा मग गांधी स्टाईल दुसरा गाल पुढे करायला हवा. येनकेन प्रकारेण मॅटर वाढल्याशिवाय पोलिस लक्ष घालणार नाही. त्यामुळे कायद्याचा मार्ग प्रॅक्टीकली अशक्य किंवा शक्य करायचा म्हंटला तरी फॉलो अप बराच घ्यावा लागू शकल्याने वेळखाऊ आणि अवघड. "मला अशा व्यक्ती सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत" हा स्टँड तो नक्की घेऊ शकतो, पण त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने त्याला खात्री करुन दिली पाहिजे की प्रकरणात तो खरोखरच निर्दोष होता.

या सिनेमाच्या केसमध्ये थप्पड खाणारी नायिका त्या प्रसंगात तरी तितकी निर्दोष दिसत नाही. का ते आधीच लिहिलंय. यापेक्षा जास्त प्रतिवाद करण्याजोगा मुद्दा मला सिनेमाच्या समर्थकांकडे दिसत नाहीये.

, थप्पड मारण्याआधी पती त्याच्या पत्नीला समजावतो का? काही बोलतो का जेणेकरून ती माघारी वळेल?
नवीन Submitted by अलहमदुलिल्लाह on 6 May, 2020 - 00:02

एखाद्याला जनावराची उपमा देण्याआधी आणि नात्यातल्या स्त्रियांचा उल्लेख करत वैयक्तिक कॉमेंट करण्याआधी सिनेमा पाहा. थप्पडेचं इन जनरल समर्थन केलेलं नाहीये पण त्या सीनमध्ये तो तिला मध्ये पडण्यापासून अनेकदा रोखतो आणि मगच हात उचलतो असे दाखविले आहे.

वैयक्तिक कॉमेंट करण्याआधी सिनेमा पाहा. >> मी हायपोथेटिकल प्रश्न विचारला होता, तुम्ही तुमच्या बहिणीला मारलं असं म्हटलेलं नाही. रच्याकने, माझ्यावर विशेष राग दिसतोय तुमचा, माझ्या नावामुळे का? वर देखील एका ठिकाणी ट्रिपल तलाकचा खोडसाळ उल्लेख केलेला दिसतोय..

{{{ मी हायपोथेटिकल प्रश्न विचारला होता, तुम्ही तुमच्या बहिणीला मारलं असं म्हटलेलं नाही.
नवीन Submitted by अलहमदुलिल्लाह on 6 May, 2020 - 00:21 }}}

{{{ नवऱ्याने बायकोला मारणे कोणत्याही प्रकारे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या बायकोची कीव येते मला. Male chauvinist डुकरांची लक्षणे सगळी. }}}

ही पर्सनल कॉमेंटच आहे.

Pages