थप्पड ! Its not about domestic violence !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2020 - 11:34

थप्पड पाहिला नुकताच प्राईमवर.
मला वाटलेले की एका थपडेवर काय पिक्चर बनणार. मसाला भरला असेल किंवा संथ बनवला असेल.
पण नाही ! मस्त बनवलाय ! एक बिनकामाचा डायलॉग वा प्रसंग नाही. सगळे कॅरेक्टर परफेक्ट उभे केलेत. जे पोहोचवयचेय ते पर्रफेक्ट पोहोचलेय.

एखादा डायलॉग ऐकण्यात मिस झाला की मी लगेच १० सेकंद मागे जाऊन तो पुन्हा ऐकायचो. कारण एकूण एक डायलॉग, एकूण एक बारीक सारीक प्रसंग हा भाष्य करणारा होता.

कोट करायचे म्हटले तर सारेच करावे लागेल. पण कश्याला चित्रपट बघणारयांची मजा कमी करा.
तरी मला आवडलेला एक,
तापसी पन्नूचा नवरा ऑफिसला जायला निघाला असतो, त्याला डबा द्यायला आलेली तापसी त्याच्या शेजारी ऊभी असते. ईतक्यात शेजारील बंगल्यातून दिया मिर्झा आपल्या कारमधून बाहेर प्डते. तसा तापसीचा नवरा बोलतो, "अरे ईसने फिर नयी कार ले ली.. क्या करती है ये?"
"- मेहनत" तापसी पन्नू ऊत्तर देते.

तापसी कदाचित जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नसेल पण तिच्यात एक एक्स फॅक्टर आहे. तिच्या भुमिका बघायला नेहमीच मजा येते. त्या आपसूकच स्त्रीप्रधान होतात.

चित्रपटाचा शेवट विशेष आवडला. फिल्मी करणार नाही याची खात्री होतीच. अश्या चित्रपटात तो करतच नाही. पण त्याचवेळी ऑफबीट चित्रपट आहे तर थोडा बंडखोरीचाच करूया असे न करता सकारात्मक आणि प्रॅक्टीकल केला आहे.

एक थप्पड .. पर वो भी नही मार सकता!.. चित्रपट बघून हे मनावर ठसतेच.
पण चित्रपट संपल्यवर एक प्रश्न आपल्या मनाशी घोळत राहतो. जर त्याने ती थप्पड मारलीच नसती तर....
तर त्यानंतर जी जाणीव तिला होते ती तिला झालीच नसती. आणि अश्या कित्येक गृहीणी असतील ज्यांना ती आजही नसेल.

आपल्याकडे एक सुप्रसिद्ध वाक्यप्रचार आहे. काही नाही रे, तिला सुख बोचते. वरवर सारे काही सुखी संसाराचे चित्र दिसणारया घरातील गृहीणीला नेमके कसले सुख बोचत असते याची अनेक उत्तरे असतील. त्यातले एक ऊत्तर प्रभावीपणे हा चित्रपट देतो. आणि त्यावर ऊत्तरही सुचवतो.

परीक्षण हा माझा प्रांत नाही. कधीतरी मराठी चित्रपटाची जाहिरात म्हणून, कधी स्वप्निल शाहरूख या आवडत्या कलाकारांच्या चित्रपटाचे कौतुक म्हणून, तर कधी अशी एखादी काहीतरी सांगून जाणारी कलाकृती आली तर ती जास्तीत जास्त लोकांनी आवर्जून बघावी म्हणून त्या त्या चित्रपटावर धागा काढतो.

जरूर बघा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावाने बहिणीला थप्पड मारली, किंवा उलट, तर संबंध तोडावेत असे तुम्ही म्हणणार काय?.
>>>>
बापाने मुलीला असेही टाकू शकता यात...
प्रत्येक सिच्युएशन्म्ध्ये काय करावे याचे ऊत्तर वेगळे मिळेल..
आणि केस बाय केस ते बदलेल..
पण जे घडलेय ते प्रत्येक केसमध्ये चूकच राहणार..

आणि
संबंध तोडून टाका हा मुळात संदेशच नाहीये. तिला जी जाणीव होते ती जणीव त्याला होताच प्रेम असल्यास पुन्हा संबंध जोडले जातीलच. चित्रपटात ते दाखवलेय आणि म्हणूनच शेवट सकारात्मक वाटला.
तसेच हि जाणीव आधीच असल्यस ही वेळ येणारच नाही..

तिने काय करावे याचे ऊत्तर तिचा नवराच दुसरयाच दिवशी देतो..
जहापे ईमोशन अटॅच है लेकिन कोई वॅल्यु नही है वहा क्यू रहना है...
तिला ती वॅल्यू दिसत नाही आपली म्हणून घर् सोडते.. थप्पड मारली म्हणून नाही.

मी कोणालाच कधीच थप्पड मारणार नाही. पण ते राहू दे बाजूला.
>>>>

याच सोबत थप्पड खाऊ का.. बायकोची.. ती देखील सर्वांसमोर...
हा देखील विचार करून बघायला हवा सर्वांनी.

अजय चव्हाण, कुणालाही टॅग करून आरोप करणे खरेतर मी टाळतो, पण तुमच्या केसमध्ये हे अतिआवश्यक वाटतेय मला तरी. त्या प्रतीक बोराडेचा रिव्ह्यू बघितला अर्धाच, अकारण पूर्ण बघणे अशक्य होते. एकांगी, मूर्ख आणि इतर असतील नसतील त्या सभ्य आणि असभ्य शिव्या देण्यालायकीच्या माणसाचे मत तुम्ही मानता हे तुमच्या कथा आणि जो मुखवटा तुम्ही इथे बाळगून आहात त्याच्या विरोधात जाणारे आहे. त्या विकृत मनोवृत्तीचे समर्थन कोणत्याही प्रकारे तुम्ही करत असाल, तर तुम्हाला आणि तुमच्या इथल्या चाहत्यांना आत्मपरीक्षणाची खूप जास्त गरज आहे. स्त्रीने कायम अन्यायच सहन करावा, नवऱ्याने मारझोड केली तरी गप राहावे असा एकंदर उपदेश देण्याचा आणि तोच खरा मानण्याचा तुमचा आणि त्या बोराडेंचा आवेश आहे. चीड येतेय, पण नवा नवा आयडी आहे थोडे दिवस सांभाळावा लागेल. MCP प्रवृत्ती आहे हि. साळसूदपणे patriarchist समजू नका असा इशारा देऊन मानसिकतेतली घाण लपून राहत नाही. रच्याकने, मुलीच्या नावाचा दुआयडी घेऊन स्वतःच स्वतःची स्तुती करून, नंतर मूळ आयडीने मायबोली सोडणार असल्याची पुडी सोडायची फालतुगिरी करणाऱ्याकडून इतर काय अपेक्षा करावी. तुमच्या काही कथा चांगल्या होत्या. पण आता नजरेतून पार उतरलात.

@ अलहमदुलिल्लाह -

मी काय लिहलयं हे जरा नीट वाचता का?? मी पहिल्याच प्रतिक्रियेत सांगतिलं आहे. सिनेमा मी पाहीला नाही आणि रिव्यू पाहून इच्छा गेली.. ह्याचा अर्थ मी त्याला समर्थन करतो असं होतो का??

मी प्रत्येक स्त्री चा आदर करतो आणि हे इथे कुणीही सांगेल.. मी फक्त इतकचं म्हटलं आहे.. थप्पड ज्या कथेवर बेतला आहे..हा विषय चोथा झाला आहे... आणि मुळात स्त्रियांनी अन्यायच का सहन करावा? त्याने तिला मारलं तिनेही त्याला मारावं म्हणजे समोरच्याही तेच वाटेल जे नायिकेला चारचौघात वाटलं.. हाच सोपा न्याय आहे असं माझं मत आहे. ह्यात "स्त्री" विषयीची माझी घाण मानसिकता दिसते का तुम्हाला.. असो, काविळ झालेलेल्या सगळचं पिवळं दिसतं तशातला हा प्रकार वाटतो..

राहीला माझ्या पर्सनल गोष्टीविषयी तुम्ही अॅडमिनला का विचारात नाही तो स्त्री" आयडी माझा ड्यु आयडी होता आहे की नाही ते? सगळचं क्लिअर होईल मग... मी मायबोली सोडून गेलो होतो .. त्याला कारणं होतं आणि परत यायला त्यालाही कारणंच आहे..जवळचे आहेत हे त्यांना चांगलचं माहीत आहे.. स्वतःची स्तुती करायला मला असले प्रकार करायची अजिबात गरज नाही...लोकांची कौतुक/स्तुस्ती मिळवण्यासाठी देवाच्या कृपेने माझ्याकडे चांगलं टॅलेंट आहे आणि त्याचा उपयोग मला चांगलाच करता येतो..

मी इथे चार पाच वर्षापासून लिहतोय.. जेव्हा माझ्या कथांना रिस्पाॅन्स नव्हता तेव्हा हे मी केलं असतं कदाचित लाईमलाईट मिळालं असतं.. आणि लाईमलाईटमध्ये आधीच असताना मला हे सगळं करायची काय गरज आहे?? आणि ते ही माझी बायको माबोवर असताना .. स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घ्यायला इतका तर बिनडोक नक्कीच नाही मी..

असो खरंतरं कुणालाही जस्टीफेकशन द्यायला बांधिल नाहीये. मी पण कधी ना कधी ह्या विषयावर तोंडसुख घेणारे येतील हे मला माहीतच होतं..

घ्या तोंडसुख आणि खुश राहा.. आणि राहीला प्रश्न मनातून उतरण्याचा तर त्यासाठी आधी मनात जागा करावी लागते.. आणि ती मी केली होती.. ह्यातच सगळं आलं...

@ अजय,
ज्या वैयक्तिक टिकेला ऊत्तर देताना तुम्हाला त्रास होतो ती ईग्नोर करत जा. अन्यथा आता तुमच्या या भल्यामोठ्या पोस्टलाही प्रत्युत्तर येईल आणि ते तुमचा त्रागा आणखी वाढवणार...

@ थप्पड
तर थप्पडला थप्पड हे सोल्युशन नाही झाले. जरी एखाद्या केसमध्ये त्यातून समाधान मिळत असले तरी मुळात आपल्याला थप्पड मारायचा अधिकार कोणाला का द्यावा?

तु सुद्धा मला थप्पड मारू शकतो - मी सुद्धा तुला थप्पड मारू शकते
या ऐवजी हे असे हवे ना की,
तु सुद्धा मला थप्पड मारू शकत नाही - मी सुद्धा तुला थप्पड मारू शकत नाही

तु सुद्धा मला थप्पड मारू शकतो - मी सुद्धा तुला थप्पड मारू शकते
या ऐवजी हे असे हवे ना की,
तु सुद्धा मला थप्पड मारू शकत नाही - मी सुद्धा तुला थप्पड मारू शकत नाही>>> बेस्ट

@ अजय, चित्रपट ही फार क्षुल्लक बाब आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला, ज्याच्या विचारसरणीला follow करत आहात, ती घृणास्पद आहे. Victim कार्ड खेळायचं असेल तर खुशाल खेळा. राहिला प्रश्न डुआयडीचा, तर ती संपूर्ण घटनाच fishy म्हणजे संशयास्पद होती. तुम्हाला त्याबद्दल त्रास झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मूळ राग तुमच्यापेक्षा बोराडेवर जास्त होता, पर्यायाने तुमच्यावर निघाला. चित्रपट बघा, चांगला आहे. तुमच्या खऱ्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

हा सीन "इफेक्टीव" व्हावा म्हणून तापसीने शुटिंग दरम्यान सात वेळा थप्पड खाल्ली. ललिता पवारला सिनेमाच्या शॉटमध्ये गरज म्हणून सहकलाकाराने मारलेल्या थपडेमुळे चेहरा / डोळे यात वैगुण्य आले. सुंदर अभिनेत्री नायिकेच्या भुमिकेला कायमची मुकली आणि खलनायिका / चरित्र अभिनेत्री झाली.

या थपडांचं काय करायचं?

इस थप्पड की गुंज...... आधी मी हेच शीर्षक लिहून पोस्ट लिहिलेली. पोस्ट लिहून संपल्यावर ईथे टाकताना शीर्षक बदलले

नक्की बघा चित्रप्ट..

तिला ती वॅल्यू दिसत नाही आपली म्हणून घर् सोडते.. थप्पड मारली म्हणून नाही.>> म्हणजे तिच्या दृष्टीने थप्पड महत्वाची नाही.

या ऐवजी हे असे हवे ना की, तु सुद्धा मला थप्पड मारू शकत नाही - मी सुद्धा तुला थप्पड मारू शकत नाही >> जगामधे उडदामाजी काळेगोरे असतातच आणि असणारच. जसा आय क्यू ५० ते २०० असतो तसा इक्यू ही.

याच सोबत थप्पड खाऊ का.. बायकोची.. ती देखील सर्वांसमोर...
हा देखील विचार करून बघायला हवा सर्वांनी. >> काय करता अस तुम्ही. Happy
माझ्या बाबतीत तरी ही शक्यता अजिबात नाही. (अस मला वाटतय Happy )

In pink the whole movie run around the message “No means no” while in thappad the message is “ You cant take me granted”. Some people like these kind of flicks some dont. I wonder why people are fighting about this?

काय करता अस तुम्ही. Happy
माझ्या बाबतीत तरी ही शक्यता अजिबात नाही. (अस मला वाटतय Happy )

>>>>

देअर यु आर..
तिने असे काय केलेले जे थप्पड खाल्ली?

तिने असे काय केलेले जे थप्पड खाल्ली?
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2020 - 16:37

चोंबडेपणा. नवर्‍याचं दुसर्‍याशी शाब्दिक भांडण चालू असताना ही चारवेळा त्याला हाताला धरून खेचते. तेव्हा अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे शेवटच्या वेळी त्याचा हात चालतो. इट जस्ट हॅपन्स... त्या घटनेवर अख्खा सिनेमा बनवण्याइतकी ती महत्त्वाची गोष्ट नाहीच मूळी.

ती महत्त्वाची गोष्ट नाहीच मूळी. >>> बापरे .. चित्रपट पाहूनही तुम्हाला कळले नाही... नशीबवान आहात..
..
काही न पटणारे घोळ आणि संथपणा आहे चित्रपटात ...
...
तापसीच्या भावाची भूमिका करणारा तरूण (अंकूर राठी) हा मी निर्माता असलेल्या (१०० द ट्रिब्ञुट) हा लघुचित्रपटाचा नायक होता...
https://www.youtube.com/watch?v=7r3iB5qXtII&t=4s
...
भारतात जाऊन चित्रपट सृष्टीत स्थीरावतोय... त्याला शुभेच्छा...

. तेव्हा अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे शेवटच्या वेळी त्याचा हात चालतो.
>>>>>

एक्झॅक्टली !
प्रतिक्षिप्त क्रिया...
ही केव्हा होतेय माहीतेय. जेव्हा त्या व्यक्तीला गृहीत धरले जाते. कि तिला आपण थप्पड मारू शकतो.
जर त्याच्या आईने हात खेचला असता तर त्याने प्रतिक्षिप्त क्रियेला अनुसरून झटकला असता.
बायको होती. उचलला हात..
कि आईवर वा बापावर ऊचलला असता हात तरी त्या प्रतिक्षिप्त क्रियेचे समर्थन केले असते आपण?

नुकतीच फोर मोर शॉट्स बघितली त्यातही अंकुर राठी होता. मेड इन हेवन मध्ये तो बघितल्याचं आठवत नाही मला. तापसीचा नवरा दाखवलाय त्यालाही मेड इन हेवन मध्ये बघितलंय. नीना गुप्ताचा मुलगा असतो, त्याचा "प्योर लाईक घी?" हा डायलॉग आठवतो. वेब्सिरीजमुळे बरेच नवीन चेहरे दिसत आहेत.
बीपीन चंद्र यांचा मुद्दा मला पटतो. ती बायको असते म्हणून तो नाही मारत, ती त्याला बोलू देत नसते म्हणून मारतो. तिच्या जागी दुसरा कोणी असता तरी मारलेच असते. त्याचा भाऊ, सहकारी आणि मेव्हणा त्याला एकदा सांगून सोडून देतात पण ही त्याला सतत हाताला धरून खेचत असते. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया असते, बाकी काही नाही. तीही त्याला जिथल्या तिथे एक ठेवून त्याची उतरवू शकली असती पण नाही. माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलं नाही असं म्हणून त्याला आणखी उकसवते. तोही एकदाही माफी मागत नाही, ते सोडून बाकी सगळं बोलतो. थोडक्यात दोघेही सारखेच सटक असतात.
त्याची आई किंवा वडील मध्ये पडले असते तर समोरचा स्वतःहुन निघून गेला असता. सगळे अडवणारे त्याच्या वयाचे असतात म्हणूनच तो सगळ्यांना उडवून लावतो पण ही भारी चिकटपणा करते.

त्याची आई किंवा वडील मध्ये पडले असते तर समोरचा स्वतःहुन निघून गेला असता. सगळे अडवणारे त्याच्या वयाचे असतात म्हणूनच तो सगळ्यांना उडवून लावतो पण ही भारी चिकटपणा करते.
Submitted by चंपा on 4 May, 2020 - 19:00

धन्यवाद.

ऋन्मेष उत्तर मिळालं का तुमच्या प्रश्नाचं?

ती महत्त्वाची गोष्ट नाहीच मूळी. >>> बापरे .. चित्रपट पाहूनही तुम्हाला कळले नाही... नशीबवान आहात..

दुसर्‍याच्या आकलनशक्तीला जोखण्याचा बालिशपणा आवडला नाही परदेसाई. बाकी तुम्ही फोर मोर शॉट्स पाहता / पाहिलीय म्हणजे तुमच्या अभिरुची आणि आकलनशक्तीबद्दल मी तरी इथे काही कॉमेंट करणार नाही.

{{{ तापसीच्या भावाची भूमिका करणारा तरूण (अंकूर राठी) हा मी निर्माता असलेल्या (१०० द ट्रिब्ञुट) हा लघुचित्रपटाचा नायक होता... }}}

स्वतः निर्माता असल्याची ठळकपणे इथे बढाई मारण्याचं कारण कळलं नाही. गेल्या चाळीस वर्षांत मी किती मालिकांत व नाटकांत अभिनय केला आहे आणि किती नाटकांचा मी लेखक व दिग्दर्शक आहे हे तुम्ही माझं नाव गुगल सर्च करुन पाहिलं तर सहज कळेल पण मला ते इथे लिहायची हौस नाही.

मी निर्माता असल्याचे लिहिल्याने तुमचा अपमान झाला क्षमस्व..
फोर मोर शॉट्स मी पाहिला हे तुमचे तुम्हीच ठरवले, आणि मी पाहिल्याने माझी अभिरूची तुम्हाला आवडली नाही, याबद्दलही क्षमस्व....

ऋन्मेष उत्तर मिळालं का तुमच्या प्रश्नाचं?
>>>

हो मिळाले ना...

आईला थप्पड मारली नसती. तसे संस्कारच असतात.

बायकोला मारू शकतो. तसे संस्कारच नसतात.

अंकुर राठी>> ओह हा होता का परदेसाई तुमच्या सिनेमात?! लक्षात नव्हते आले आधी.
इथले प्रतिसाद आवडले Happy

अरे वा परदेसाई तुम्ही बॉलिवूड चित्रपट बनवता का ... एक नंबर...
आम्ही बघितला आहे का एखादा... नावे सांगा ना तुमच्या चित्रपटांची...

च्रप्स... मी एक दोन लघूचित्रपट बनवले आहेत, पण पुन्हा असे इथे लिहू नका.. त्या ह्यांना ते आवडत नाही.... मी आत्ताच त्याना सॉरी म्हणुन आलोय..
कृपया असे करून रोष ओढवून घेऊ नका... Wink

आईला थप्पड मारली नसती. तसे संस्कारच असतात.

बायकोला मारू शकतो. तसे संस्कारच नसतात.
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2020 - 20:47

चंपा यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचा. वयाबद्दल स्पष्ट लिहिलंय. लहान बहीण / भावाला देखील थप्पड मारली जातेच कारणपरत्वे. पत्नी वयाने सहसा लहान / समवयस्क असते.

हा.. आता कदाचित इमॅन्यूएअल मॅक्रोन त्याच्या बायकोला मारु शकणार नाही आणि त्यानेच बायकोच्या हातची खाल्ली असेलही. ती त्याच्यापेक्षा २५ वर्षांनी मोठी आहे आणि कधी काळी त्याची शाळेतली शिक्षिकाही होती.

ओके वय मॅटर करते.
नशीब आया बायडिफॉल्ट वयाने मोठ्या असतात. वाचल्या बिचारया मुलांची थप्पड खाण्यापासून Happy

बरं हे ओळखीच्या वा अनोळखी कुठल्याही लहान वयाच्या व्यक्तीला मारू शकतो का?

मोठ्या भावाची बायको वयाने छोट्या भावापेक्षाही लहान असेल तर तो तिला मारू शकतो का?

सासू सासरे सुनेला वा जावयाला मारू शकतात का?
कि हा अधिकार फक्त नवरयाबायकोमध्येच असतो?

Pages