थप्पड ! Its not about domestic violence !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2020 - 11:34

थप्पड पाहिला नुकताच प्राईमवर.
मला वाटलेले की एका थपडेवर काय पिक्चर बनणार. मसाला भरला असेल किंवा संथ बनवला असेल.
पण नाही ! मस्त बनवलाय ! एक बिनकामाचा डायलॉग वा प्रसंग नाही. सगळे कॅरेक्टर परफेक्ट उभे केलेत. जे पोहोचवयचेय ते पर्रफेक्ट पोहोचलेय.

एखादा डायलॉग ऐकण्यात मिस झाला की मी लगेच १० सेकंद मागे जाऊन तो पुन्हा ऐकायचो. कारण एकूण एक डायलॉग, एकूण एक बारीक सारीक प्रसंग हा भाष्य करणारा होता.

कोट करायचे म्हटले तर सारेच करावे लागेल. पण कश्याला चित्रपट बघणारयांची मजा कमी करा.
तरी मला आवडलेला एक,
तापसी पन्नूचा नवरा ऑफिसला जायला निघाला असतो, त्याला डबा द्यायला आलेली तापसी त्याच्या शेजारी ऊभी असते. ईतक्यात शेजारील बंगल्यातून दिया मिर्झा आपल्या कारमधून बाहेर प्डते. तसा तापसीचा नवरा बोलतो, "अरे ईसने फिर नयी कार ले ली.. क्या करती है ये?"
"- मेहनत" तापसी पन्नू ऊत्तर देते.

तापसी कदाचित जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नसेल पण तिच्यात एक एक्स फॅक्टर आहे. तिच्या भुमिका बघायला नेहमीच मजा येते. त्या आपसूकच स्त्रीप्रधान होतात.

चित्रपटाचा शेवट विशेष आवडला. फिल्मी करणार नाही याची खात्री होतीच. अश्या चित्रपटात तो करतच नाही. पण त्याचवेळी ऑफबीट चित्रपट आहे तर थोडा बंडखोरीचाच करूया असे न करता सकारात्मक आणि प्रॅक्टीकल केला आहे.

एक थप्पड .. पर वो भी नही मार सकता!.. चित्रपट बघून हे मनावर ठसतेच.
पण चित्रपट संपल्यवर एक प्रश्न आपल्या मनाशी घोळत राहतो. जर त्याने ती थप्पड मारलीच नसती तर....
तर त्यानंतर जी जाणीव तिला होते ती तिला झालीच नसती. आणि अश्या कित्येक गृहीणी असतील ज्यांना ती आजही नसेल.

आपल्याकडे एक सुप्रसिद्ध वाक्यप्रचार आहे. काही नाही रे, तिला सुख बोचते. वरवर सारे काही सुखी संसाराचे चित्र दिसणारया घरातील गृहीणीला नेमके कसले सुख बोचत असते याची अनेक उत्तरे असतील. त्यातले एक ऊत्तर प्रभावीपणे हा चित्रपट देतो. आणि त्यावर ऊत्तरही सुचवतो.

परीक्षण हा माझा प्रांत नाही. कधीतरी मराठी चित्रपटाची जाहिरात म्हणून, कधी स्वप्निल शाहरूख या आवडत्या कलाकारांच्या चित्रपटाचे कौतुक म्हणून, तर कधी अशी एखादी काहीतरी सांगून जाणारी कलाकृती आली तर ती जास्तीत जास्त लोकांनी आवर्जून बघावी म्हणून त्या त्या चित्रपटावर धागा काढतो.

जरूर बघा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यावर विशेष राग दिसतोय तुमचा, माझ्या नावामुळे का? वर देखील एका ठिकाणी ट्रिपल तलाकचा खोडसाळ उल्लेख केलेला दिसतोय..
नवीन Submitted by अलहमदुलिल्लाह on 6 May, 2020 - 00:24

ट्रिपल तलाकचा उल्लेख केलाय कारण तेव्हा त्या गुन्ह्याला शिक्षा देण्यास मायबोलीकरांपैकी काहींनी फारच गोंधळ घातला होता आता थप्पड मारणार्‍याला मोठा गुन्हेगार ठरवताना त्यांची आठवण झाली इतकेच. तसंही जेमतेम दोन आठवडे वय होत असलेल्या आयडीशी माझं काय वैर असणार म्हणा? तुम्हीच गेल्या सहा वर्षांत माझ्याशी वेगवेगळ्य आयडींनी भांडला असाल तर ते मला कसं ठाऊक असणार. तुम्हाला चांगलंच आठवत असणार म्हणा.

बायदवे त्या तलाक प्रकरणात तुमचा आयडी असल्याचे आठवत नाही.

तुमचे प्रतिसाद वाचत आहे पण या पानावरचा प्रतिसाद जास्तच खटकला.

बॉस असिस्टंटचं किंवा कोरोना क्षेत्रात फिरणारे आणि त्यांना मारणारे पोलिस यांचं उदाहरण वाचा.>>>>

बाॅस असिस्टंटचं ऊदाहरण आजिबातच नाही पटलं. काहीच संबंध नाही बाॅसने अंगाला हात लावायचा.

पोलिसांचं ऊदाहरण वेगळं आहे. Apple to oranges.

नायिका त्या प्रसंगात तरी तितकी निर्दोष दिसत नाही. >>>>>

तिचा दोष निर्दोष हा मुद्दाच नाही. तो ईथे सबजेक्टीव्ह धरून चालू.

काहीही झालं तरी त्याला मारण्याचा अधिकार नाही. तो दंडनीय अपराध आहे.

त्यामुळे कायद्याचा मार्ग प्रॅक्टीकली अशक्य किंवा शक्य करायचा म्हंटला तरी फॉलो अप बराच घ्यावा लागू शकल्याने वेळखाऊ आणि अवघड. >>>>>

म्हणून काय झालं? निकाल लागायला ऊशीर लागतो म्हणून अपराध घडलेला असताना गुन्हा नोंदवायचा नाही? हक्क असताना, गुन्हा घडलेला असताना न्याय मागायला जायचं नाही?

त्याच्या बायकोच्या जागी त्याच्यापेक्शा दोन फुट ऊंच, तगडा ईसम असता तरी प्रतिक्शिप्त क्रिया म्हणून ज्याचे समर्थन चालू आहे ती घडली असती का?

{{{ बाॅस असिस्टंटचं ऊदाहरण आजिबातच नाही पटलं. काहीच संबंध नाही बाॅसने अंगाला हात लावायचा. }}}

नाहीचे ना तो अधिकार. मीदेखील त्या कॉमेंटमध्ये तेच लिहिलंय, पण तरीही असिस्टंट का गप्प बसतो तेही लिहिलंय.

{{{ काहीही झालं तरी त्याला मारण्याचा अधिकार नाही. तो दंडनीय अपराध आहे. }}}

हे पण मान्य केलंय.

{{{ निकाल लागायला ऊशीर लागतो म्हणून अपराध घडलेला असताना गुन्हा नोंदवायचा नाही? हक्क असताना, गुन्हा घडलेला असताना न्याय मागायला जायचं नाही?
Submitted by अतरंगी on 6 May, 2020 - 00:32 }}}

नक्कीच जाऊ शकता. तुमच्या आयुष्यात तुम्ही कशाला किती प्रायॉरिटीज् देता त्यावर ते अवलंबून आहे. एक खटला पाच वर्षे चालला तर ..... आपला किती वेळ गेला आणि त्या वेळेत नायिका ज्या वयाची दाखवलीय त्या वयाची व्यक्ती यूपिएससी सारखी परीक्षा पास होऊन किती उत्तम करीअर घडवू शकते. मग हिशेब करा एखादी व्यक्ती काय करेल? स्वतःचं करीअर बनवेल की कोर्ट कचेर्‍या करत बसेल. हे एक रँडम उदाहरण दिलं कारण मध्यंतरी शादी मे जरूर आना सिनेमा पाहिला होता लग्नात नवरी पळून गेल्यावर आर्थिक फटका बसलेला आणि संपूर्ण खानदानाचा अपमान झालेला नायक बदला घेताना हाच मार्ग अवलंबतो असं दाखवलं होतं.

इतरही अनेक मार्ग. सक्सेस इज द बेस्ट रिवेंज हे वाचलं असेलच म्हणा.

त्याच्या बायकोच्या जागी त्याच्यापेक्शा दोन फुट ऊंच, तगडा ईसम असता तरी प्रतिक्शिप्त क्रिया म्हणून ज्याचे समर्थन चालू आहे ती घडली असती का?
नवीन Submitted by अतरंगी on 6 May, 2020 - 00:36

इंटरेस्टींग आपल्याला थप्पड बसू नये इतकीच काळजी घ्यायची असेल तर बाईने आपल्या पेक्षा दोन फूट बुटका काटकूळा माणूस नवरा म्हणून निवडावा काय? हा थोडा ऋन्मेष स्टाईल प्रतिसाद झाला.

पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर अजुनही काही असू शकते. जर बायकोच्या जागी परका इसम जर असता तर कदाचित त्याला एक झापड न मारता त्याला होणार्‍या इजेची पर्वाच केली नसती. तो जर शारिरीक ताकदी कमी / बरोबरीचा असता तर कितीही वेळ मारामारी लांबली असती. किंवा तुम्ही म्हणता तसा तगडा इसम असता तर खिशातलं रिव्हॉल्वर काढून त्याच्यावर रोखलं असतं किंवा ते नसतं तर तिथे असलेली खुर्ची किंवा कुठलीही वस्तू त्याच्या टाळक्यात घातली असती. किंवा तत्क्षणी काही करता आलं नसतं तर तात्पुरती माघार घेऊन नंतर त्याच्यावर गुंड / साथीदार यांच्या हॉकी स्टीकने हल्ला केला असता. काहीही दाखवलं जाऊ शकतं. अगदी काहीही. ही माझी कल्पना नाही. या किंवा अशा अनेक घटना यापूर्वी कितीतरी चित्रपटांमध्ये दाखवल्या गेल्या आहेत. पंजाब बिहार उप्रदेश आणि आता महाराष्ट्रातही घडतात. पूर्ववैमनस्यातून खून, भांडणात मध्ये पडणार्‍यावर तात्काळ किंवा मागाहून हल्ला अशा बातम्या वारंवार पेपरात वाचायला मिळतात.

उलट बायको ही आपली आहे म्हणून तिला मारण्यात इंटरेस्ट नसून तत्क्षणी गप्प करण्यात इंटरस्स्ट असल्याने तिला केवळ थप्पड मारण्यात येते. परक्या माणसाची काय पर्वा केली जाते का?

तिच्या जागी दुसरा कोणी असता तर हे जर तरच्या प्रश्नांना अर्थ नाही. चित्रपटात जे घडताना दाखवलंय त्या प्रसंगावरुन पुढचा कथेचा डोलारा तकलादू वाटतो इतकंच मत आहे. दिग्दर्शकाने त्याच्या चष्म्यातून जे दाखवलंय ते पटत नाही.

पण तरीही असिस्टंट का गप्प बसतो तेही लिहिलंय.>>>>

तुम्ही जे गप्प बसतात त्यांचे ऊदाहरण देत आहात आणि मी परत हेच विचारतो आहे की एखाद्याने ठरवलं मला अन्याय सहन करायचा नाहीच तर? काही करत असतील तर सगळ्यांनी तेच करायचं का?

नक्कीच जाऊ शकता. >>>>

नायिकेने तेच केले आहे. विषय तिथेच संपतो.

हे केलं तर ते झालं असतं, तिने असं का केलं तसं का नाही केलं वगैरे मुद्दे गौण आहेत.

तोही सिनेमा मला कळला नाही असं लिहायला निर्माते मंडळी पुढे सरसावणार <<< अजून आहे का? 'जलने वाले जला करे'... दुसरे काय?

तिच्या जागी दुसरा कोणी असता तर हे जर तरच्या प्रश्नांना अर्थ नाही. चित्रपटात जे घडताना दाखवलंय त्या प्रसंगावरुन पुढचा कथेचा डोलारा तकलादू वाटतो इतकंच मत आहे. दिग्दर्शकाने त्याच्या चष्म्यातून जे दाखवलंय ते पटत नाही.>>>>>>

माझ्या प्रश्नाचा रोख पुरुषी अहंगंड आणि शाररीक क्शमतेचे वर्चस्व दाखवण्याकडे होता.

आपल्याला थप्पड बसू नये इतकीच काळजी घ्यायची असेल तर बाईने आपल्या पेक्षा दोन फूट बुटका काटकूळा माणूस नवरा म्हणून निवडावा काय?>>>>
हे अगदीच काहीच्या काही.....

आईला थप्पड मारली नसती. तसे संस्कारच असतात.
बायकोला मारू शकतो. तसे संस्कारच नसतात.
<<
मॅरीड लाइफ बद्दल तापसीचं एक वाक्य आहे “जाने अन्जानेमे शायद मैने अपने आपको ऐसा बनने दिया जिसे थप्पड मारी जा सकती है“
दॅट सेज इट ऑल !
नवर्याला वाटतय त्याची ऑफिसमधे व्हॅल्यु नाही/रिस्पेक्ट नाही म्हणून त्याची बायकोपुढे चिडचिड -बडबड चालली आहे, त्याला क्विट करावस वाटतय.. त्याचवेळी तिनेही थप्पड खाल्ली आहे, संसारात तिची व्हॅल्यु काय याचं आत्मपरिक्षण करायची तिचीही हीच वेळ असते !
तिचा नवरा व्हिलन नाही पण छोट्या छोट्या प्रसंगातून त्याची एम्सीपी वृत्ति व्यवस्थित दाखवलीये .
उत्तम सादर केलेत सगळ्यांची स्टेट ऑफ माइंड्स !

>>तापसी ओव्हररेटेड आहे.<<
आय काइंडा अग्री विथ च्रप्स ऑन थिस. कुठलाहि प्रसंग/सीन असुदे, तिच्या चेहर्‍यावर कायम तेच प्रश्नचिन्ह असल्याचे भाव असतात...

बिपीन: नवऱ्याने बायकोला मारणे कोणत्याही प्रकारे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या बायकोची कीव येते मला. Male chauvinist डुकरांची लक्षणे सगळी.

तुम्ही बोल्ड चुकीच्या ठिकाणी केलं बघा. असो, स्वकेंद्रित वृत्तीची लक्षणे, दुसरे काय!

उलट बायको ही आपली आहे म्हणून तिला मारण्यात इंटरेस्ट नसून तत्क्षणी गप्प करण्यात इंटरस्स्ट असल्याने तिला केवळ थप्पड मारण्यात येते >> धन्य आहे!

पूर्ण पाहून झाला, बरेच दिवसांनी हिन्दी सिनेमा इतका आवडला.
डिरेक्टर, अ‍ॅक्टर्स, बॅक्ग्राउंड म्युझिक सगळ्या बाजु इफेक्टिव आहेत.
शेवट सुध्दा मस्त केलाय.
शेवटी तन्वी आझमी आणि तापसीचा पूजा झाल्यानंतर संवाद, तापसी आणि तिच्या नवर्याचा शेवटचा संवाद, तिच्या भावाचा आणि होणार्या बायकोचा संवाद छान घेतलेत !
तस्पसीचं वडिलांशी रिलेशन , तिच्या वडिलांचं पात्र आवडलं.
सगळ्यांचाच अभिनय मस्तं झालाय, तापसी आणि तिच्या नवर्याचं काम केलेला अ‍ॅक्टर सर्वात जास्त आवडले.

शेवटी तन्वी आझमी आणि तापसीचा पूजा झाल्यानंतर संवाद>> मला पण हा खूप आवडला. त्यात ती म्हणते की, "आपने विक्रम की बिबी को प्यार किया, अम्रुता को नही. " नीट विचार केला तर अनेक बायकांना हा लागू होईल. सून आवडते कारण ती आपल्या मुलाची बायको असते म्हणून. मुलाची काळजी घेते, त्याच्या मनासारखे वागते तोवरच. एक व्यक्ती म्हणून तिच्या गुण-दोषांकडे बघण्याचा मोठेपणा किती सासू- सासरे दाखवू शकतात?

कालच पाह्यला. थेट्रात जाऊन बघायचे होता होता राहून गेले होते.
खूप दिवसांनी इतका नुआन्स्ड आणि संयत हिंदी सिनेमा बघितला. छान वाटले.
आवडला अर्थातच.
मेन प्रसंगानंतर एकेक बारीक सारीक घटना तिला आरसा दाखवत जातात, पायरीपायरीने वास्तव उमजून येत जाते हे फारच उत्तम प्रकारे मांडलेय पटकथेत. अनुभव सिन्हाबरोबरच मृण्मयी लागूलाही हॅटस ऑफ. आणि ते जिवंत करताना तापसी पन्नूनेही अप्रतिमरित्या साकारले आहे.
कुमुद मिश्रा, रत्ना पाठक शाह, तन्वी आझमी वगैरे तर एकसे एक अभिनेते आहेतच. पण बाकी सगळ्यांनीच अभिनय अप्रतिम केलाय.
ती सुनिता असलेली अभिनेत्री.. तिने इतर कशात काम केले आहे का? आणि वकील नेत्राही. तिचा इतर कुठे अभिनय बघता येईल का?

शेवटाला विक्रम जे बोलून दाखवतो ते थोडे सुलभीकरण आणि जास्त ड्रॅमॅटिक वाटले पण ते दुसर्‍या कश्या प्रकारे कदाचित येऊन चालणार नव्हते.

बायकोला मारायचे समर्थन करणारे डॉक्टर म्हणवणारे महाशय पूर्वी इथे माबोवर बघितले होते त्यामुळे प्रतिक्षिप्त क्रिया वगैरे म्हणत समर्थनांचे आश्चर्य अजिबातच वाटले नाही.

वरती कुणीतरी एक प्रश्न विचारलाय.
>> भावाने बहिणीला थप्पड मारली, किंवा उलट, तर संबंध तोडावेत असे तुम्ही म्हणणार काय?.<<
लहानपणीच्या दोघांनाही समजत नसतानाच्या मारामार्‍या नसतील, जाणतेपणी हे घडलेले असेल तर हो संबंध तोडावेत. दुसरी व्यक्ती केवळ नात्याने भाऊ वा बहिण आहे म्हणून संबंध जपून ठेवायच्या लायकीची नाही.

जाणतेपणी हे घडलेले असेल तर हो संबंध तोडावेत. दुसरी व्यक्ती केवळ नात्याने भाऊ वा बहिण आहे म्हणून संबंध जपून ठेवायच्या लायकीची नाही.
नवीन Submitted by नीधप on 6 May, 2020 - 17:44
>>>>

कडक !
अगदी फुटकळ प्रॉपर्टीच्या वाटणीवरून भावंडात भांडणे होतात. आणि आयुष्यभर एकमेकांची तोंड बघितली जात नाहीत. हि कागदोपत्री मोडली जात नाहीत म्हणून रेकॉर्डला येत नाहीत ते सोडा. पण जर पैश्यांवरून नाती तुटली जाऊ शकतात तर आत्मसन्मान जपायला का नाही?
थोडक्यात भावंडांचे नाते जन्मजात आदर्श अतूट असते अश्यातला भाग नाही, ते सुद्धा एकाच आईबापाच्या पोटी जन्म घेऊन आणि बालपणापासून एकत्र नांदूनही वाद व्हायचे ते होतातच. मग उगाच पतीपत्नीच्या नात्यातच आत्मसन्मान गुंडाळून आणि स्वप्नांशी तडजोड करून नाते टिकवायची अपेक्षा ती का?

यानिमित्ताने खूप चांगली चर्चा सुरू आहे याबद्दल सगळ्यांचेच अभिनंदन.

इथे आपण काय मतं मांडतो याईतकेच, खरेच उद्या आपल्याबाबतीत हे घडले तर आपला स्टॅण्ड काय असेल याची प्रत्येकीची उत्तरं वेगवेगळी असतील. आणि आपापलं उत्तर प्रत्येकीला आतून लख्ख करेल हे नक्की. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उत्पन्न करणं हेच या चित्रपटाचं यश आहे.

I am sure 'थप्पड'लाही हेच अपेक्षित असावे.

शेवटी तापसी समोरच्या एका घरात वडिलांना काहीतरी शोधून देताना दिसते, ते घर कुणाचं असतं. >>> ती स्वत:च्या घरात जाते. ते घर आहे...

घटस्फोट घेऊन पुढं काय करते ती हे मेन दाखवायला हवं होतं!
>>

नसते त्याच्याशी लग्न झाले तरी आपले आयुष्य जगलीच असती ना...
आणि सुशिक्षित तसेच स्वताच्या पायावर उभे राहायच्या क्षमतेची दाखवलीय ना ती. मग गरजही वाटत नाही पुढे काय हे दाखवायची..
उगाच कश्याला राधिका मसाले दाखवत बसायचे

काल बघितला.
कन्स्पेंप्ट बेस्ट आहेच, पण तो पटकथेत आणि संवादात सुंदर उतरला आहे. अत्यंत संयत आणि जबाबदार हाताळणी आणि अभिनय. तापसी एकाच वेळी घरगुती आणि ठाम मस्त वठवली आहे. ती कुठेही त्रासिक/ फॅनटिक किंवा हाय चेअरवर बसुन काही बोलत नाही. तिला जे वागायचं आहे ते जेन्युअनली तिच्या सॉफ्ट व्यक्तिमत्त्वातीलच काही आहे हे सतत दिसतं.
आजुबाजूला दिया मिर्झा, ती वकिल, तापसीचा भाऊ आणि वहिनी, दिया मिर्झाची मुलगी आणि टीनएज प्रेम, घरातली कामवाली, तिची आई, सासू ... असे असेक कंगोरे घेतल्याने कथा वेगवेगळ्या प्रतलांत फिरत रहाते आणि चमच्याने काही न भरवता बरंच काही सांगुन जाते.
चित्रपट खूप आवडला.
प्रतिक्षिप्तक्रिया आहे हे राज आणि बिपिनचंद्र यांना वाटल्याचं अर्थात नवल वाटलं नाही.

उगाच कश्याला राधिका मसाले दाखवत बसायचे>>>> Biggrin
पुढे तिचे चांगलं होईल किंवा वाईटही होईल किंवा आला दिवस ढकलला असे सपक आळणी जीवन राहिल. ते सगळं गौण आहे. जे वातावरण तिला नको आहे ते तिला पुढे सोसावे लागले नाही हे महत्त्वाचे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून नवर्‍याने मारले म्हणून त्याला तात्पुरती 'क्लिन चीट' दिली तरी अगदी तोंडदेखलं 'सॉरी' ही येत नाही त्याच्या तोंडून. घटस्फोटावर सहीच्या दिवशी सॉरी म्हणतो. जाऊ दिराला फोन आल्याने तो त्रस्त होता म्हणून समजून घालू बघते. दुसर्‍या दिवशी सासू तिची चौकशी पण करत नाही. मुलगा नीट झोपला ना ते विचारते. सासरा असून नसल्यासारखा. तिच्या वडिलांऐवजी त्याच्या वडिलांनी असे का झाले हे विचारले असते तर त्याचा परिणाम वेगळा दिसला असता. एकूणात ती एक थप्पड खाल्ली म्हणून अमुला घरातील आपल्या स्थानाची जाणीव झाली हे आहेच. पण ते स्थान बदलण्यासाठी लागणारे वातावरण ही उपलब्ध नाही (रिकोर्स नाही) ही जाणीव अधिक बोचरी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर इंग्लिश विंग्लिश मध्ये शशी गोडबोलेला ही घरात तशी किंमत नसते पण जेव्हा तिचे मन ते स्थान बदलण्याचे ठरवते तेव्हा त्याला आवश्यक वातावरण (गाठीशी थोडा पैसा, सासूचे पाठबळ, नवरा स्वतःच चालवणारा पण वेळेला तसा समंजस इ.) उपलब्ध आहे हे महत्त्वाचे. प्रत्येक नात्यात चढउतार असतात पण ते नातं बहरायला जे वातावरण लागतं ते अजिबातच नसेल तर तिथे जास्त वेळ न घालवलेला बरा.

परवाच पाहिला आणि आवडला. पण थोडा मेलोड्रामॅटीक हवा होता असे वाटले. तापसीची घुसमट काहीकेल्या बाहेर निघत नाही असे वाटत होते. रच्याकने महेश भटचा अर्थ ही अश्याच विचारसरणीवर आधारित होता पण त्याने आवश्यक तिथे मेलोड्रामा पेरला होता.

दे दे प्यार दे नावाचा एक सिनेमा पाहिला त्यात बायको नवर्‍याला राखी बांधते असा सीन आहे. तो एक प्रासंगिक विनोद निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि त्याला तेवढ्यापुरतंच घ्यायचं आणि सोडून द्यायचं की दिग्दर्शक अली वकील आहे हे समजल्यावर बहिणीबरोबर लग्न करायचे तुमचे संस्कार आहेत असा टोमणा त्याला मारायचा?

इथे थप्पड सिनेमात जो प्रसंग दाखवला आहे त्यानुसार त्या विशिष्ट घटनेत नवर्‍याने बायकोला मारलेल्या थपडेचे "प्रतिक्षिप्त क्रिया" असे वर्णन (समर्थन नव्हे) केले तर लगेच प्रतिसादकाला 'तुमच्यावर बायकोला थप्पड मारायचे संस्कार आहेत वाटतं?" असे हिणवायचे?

बायदवे, दिग्दर्शकाला काय दाखवायचे ते त्यालाच ठाऊक त्या प्रसंगात मला मात्र ती थप्पड फक्त एका वैतागलेल्या व्यक्तिने एका पुन्हा पुन्हा वैताग आणणार्‍या मुर्खाला मारलेली थप्पड वाटली. अत्यंत धर्मनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष थप्पड वाटली ती मला.

" प्रतिक्षिप्त क्रिया वगैरे म्हणत समर्थनांचे आश्चर्य अजिबातच वाटले नाही" लिहिणारे मूर्ख मायबोलीवर देखील सापडत आहेत - धर्मनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष, इत्यादी.

Pages