चला आपण यांना मदत करूया.

Submitted by हर्पेन on 13 April, 2020 - 07:40

मैत्रीचा लढा करोनाशी

टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.

मैत्रीचे सांगोल्याचे मित्र शाम पवार अशा अनेक कुटूंबांच्या संपर्कात आहेत.

आवाहन क्र. १

राजस्थान, डोह येथील रहिवासी असून एकूण 57 लोकांचा कबिला आहे यामध्‍ये 13 कुटुंबीय, ज्यामधे पंधरा मुली आणि 17 मुले आहेत, डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकले आहे. अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.

आवाहन क्र. २

हत्तीद, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर हे ४७६४ लोकसंख्या, ७८९ कुटूंब असलेलं गाव. गावातल्या ३० कुटूंबांना अशाच मदतीची गरज आहे. यात विधवा, परित्यक्ता महिला व वृध्द, निराधार कुटूंब आहेत. यादी

IMG-20200413-WA0053.jpg

आवाहन क्र. ३

जत चे यल्लमा देऊळ प्रसिद्ध आहे. देवळात दर्शनासाठी येणारे भाविक इथल्या देवदासींना भिक्षुकी देत असतात. पण सध्या देऊळ बंद आहे. परिणामी या देवदासींवर भुकेलं रहायची वेळ आली आहे.

या ४५ जणी जवळच्या देवदासी वस्तीत राहतात. त्यांना अजून कुठलाही मदत मिळालेली नाही.

यापैकी काही देवदासींना मुलेही आहेत.

आवाहन क्र. ४

IMG-20200413-WA0054.jpg

जत शहरातच राहणारे हे मदारी लोक. एकूण 34 कुटुंब, ज्यात 55 मुले आणि 52 मुली आहेत. सापाचे व माकडाचे खेळ दाखवून हे पोट भरतात. सध्या त्यांना काही काम नाही.

IMG-20200412-WA0063.jpg

या लोकांना १५ दिवसाचे राशन द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला निधी हवा आहे. प्रत्येक कुटुंबाला निदान १५ दिवस पुरेल इतके साहित्य देण्याचा प्रयत्न आहे. याचा खर्च प्रत्येकी रु. ८५० आहे.

IMG-20200413-WA0055.jpg

तुम्हाला शक्य असेल तेवढा निधी द्यावा असं या कुटूंबांच्या वतीने आवाहन करत आहोत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा, चांगला मुद्दा व खूप महत्वाचा, अजिबात किरकोळ नाही. तुम्हाला काही कळले तर नक्की लिहा इथे. थँक्स.

हर्पेन, नाही हो, तुम्हा सर्वांचेच खुप कौतुक आहे एकत्रीत टीमचे.

(जरा उशीरच झालाय इथे लिहायला, त्याबद्दल दिलगीर आहे)

मैत्रीचे मित्र शाम पवार यांच्या डायरीतून -
दिनांक : ७ मे २०२०

“काल जत येथे जात असताना कर्नाटक बेळुंखी येथून पायी चालत निघालेले गोंदिया जिल्हा येथील मजूर सांगली जिल्हा हद्ध येथे पोलिसांनी त्यांना अडवून ठेवले. तेंव्हा आम्ही त्यांची माहिती घेतली आणि तहसीलदार यांना फोनवर माहिती दिली. साहेबांनी त्यांना कचेरीत येऊन फॉर्म भरण्यासाठी सांगितले, खाण्याचे विचारले. त्यांच्याजवळ काहीच नव्हते , म्हणून त्यांना आपल्या साहित्यातील काही साहित्य - २ कि. रवा, २ कि. तांदूळ व ३ पॅकेट बिस्कीटे - या ९ मजुरांना दिले.

मागच्या आठवड्यात याआधी मदत दिलेल्या राजस्थानी , देवदासी, तृतीयपंथी माकडखेळ करणार्‍या लोकांना गरजेनुरुप दुसर्‍या वेळेस मदत करण्यात आली. तसेच त्यातल्या ४ गरोदर महिलांना पौष्टीक आहारही देण्यात आला.

नमस्कार !

राज्याबाहेरचे अनेक जण जे टाळेबंदीच्या वेळेस पुण्यात अडकले होते ते आता आपल्या घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ॲानलाईन फाॅर्म भरावा लागतो, प्रक्रिया पूर्ण झाली की मोबाईलवर टोकन मिळते. पण अनेकांकडचे पैसे संपल्यामुळे फोन बंद आहेत. काहींना प्रक्रिया माहित नाही. अर्धवट माहिती मिळाल्यामुळे जिथे बस सुटत आहेत असं कळलं - पुणे स्टेशन / स्वारगेट इ. ठिकाणी की लोक तिथे पोचत आहेत आणि गर्दी करत आहेत.

या लोकांशी बोलून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, पोलिसांशी समन्वय साधून त्यांना मदत करण्याचे काम आपले २ स्वयंसेवक गेल्या ३ दिवसांपासून करत आहेत.

हे काम जोखमीचं असल्याने आपण योग्य ती काळजी घेऊनच ते करायचं आहे. म्हणून तुमचं वय शक्यतो २५ ते ४० वर्षे या वयोगटात असावं.
तुमच्यापैकी कोणी जर या वयोगटात असाल व तुम्हाला या कामात सहभागी व्हायचं असेल तर कळवा.

फोन - ९९३०९९३००१०
ईमेल - maitri1997@gmail.com

अतिशय कौतुकास्पद.
मी ही माहिती आमच्या सर्कलमधे देत आहे. आतापर्यंत औरांगाबाद, कल्याण, वाशी, पुण्यात ढोले पाटील रोड झोपडपट्टी अशा ठिकाणी काम करणा-या वेगवेगळ्या संघटना, पक्ष, व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक इत्यादींना आम्ही वेगवेगळ्या सर्लक्समधून मदत करत आहोत.
व्यवस्थित संस्था बनवून काम करणारी ही पहिलीच संस्था माझ्या माहितीतील.
( मी यात कुठेच प्रत्यक्ष राबलो नाही).

धन्यवाद मंडळी
वरच्या निवेदनातील फोन नंबर चुकलाय, अकरा आकड्याचा झालाय, क्षमस्व
डावीकडचा एक ९ वगळायला हवाय.
खाली पुन्हा एकदा निवेदन देतो आहे.

नमस्कार !

राज्याबाहेरचे अनेक जण जे टाळेबंदीच्या वेळेस पुण्यात अडकले होते ते आता आपल्या घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ॲानलाईन फाॅर्म भरावा लागतो, प्रक्रिया पूर्ण झाली की मोबाईलवर टोकन मिळते. पण अनेकांकडचे पैसे संपल्यामुळे फोन बंद आहेत. काहींना प्रक्रिया माहित नाही. अर्धवट माहिती मिळाल्यामुळे जिथे बस सुटत आहेत असं कळलं - पुणे स्टेशन / स्वारगेट इ. ठिकाणी की लोक तिथे पोचत आहेत आणि गर्दी करत आहेत.

या लोकांशी बोलून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, पोलिसांशी समन्वय साधून त्यांना मदत करण्याचे काम आपले २ स्वयंसेवक गेल्या ३ दिवसांपासून करत आहेत.

हे काम जोखमीचं असल्याने आपण योग्य ती काळजी घेऊनच ते करायचं आहे. म्हणून तुमचं वय शक्यतो २५ ते ४० वर्षे या वयोगटात असावं.
तुमच्यापैकी कोणी जर या वयोगटात असाल व तुम्हाला या कामात सहभागी व्हायचं असेल तर कळवा.

फोन - ९३०९९३००१०
ईमेल - maitri1997@gmail.com

हर्पेन , हे लोक गरीब मजूर आहेत का सगळ्या प्रकारची प्रवासामुळे अडकलेली लोकं आहेत. त्यांच्या मदतीसाठी काही समर्पित संस्था किंवा योजना आहे का. आम्ही इथे राहून काही करू शकत असल्यास वेळोवेळी सांगावे.
धन्यवाद Happy

मी_ अस्मिता
अडकलेले आणि ज्यांना मदतीची गरज आहे असे बहुतांश लोक मजूरी करायला आलेले , कामगार वर्गातील आणि कमी शिकलेले आहेत.

अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांकरताच नवीन असल्याने तयार अशी योजना नाहीये. सगळेच जण काम करता करता शिकताहेत.
ऑनलाईन फॉर्म भरणे वगैरे प्रकारचे काही काम करण्याकरता मदत लागली तर कळवतो. मनापासून धन्यवाद Happy

ताजी घडामोड -
आवाहन क्र. १ मधील सर्व १३ राजस्थानी कुटुंबं तहसीलदारांच्या मदतीने त्यांच्या गावी परतली आहेत.

आता अर्थात ही बेघर आणि रोजगारविहीनांची समस्या तितकीशी तीव्र राहिलेली नसावी बहुधा, पण मला ह्या धाग्यावर सुरुवातीपासून वाटत होते, की ज्या गावशिवारात असे निर्धन गरजू लोक आहेत, त्यांना जवळच्याच शिवारातले पडून राहिलेले उत्पादन विकत घेऊन त्यावर दळण वगैरे जुजबी प्रक्रिया करून तिथेच वाटता येणार नाही का? अर्थात तगड्या स्वयंसेवकांच्या मजबूत साखळीची गरज होतीच आणि कदाचित सरकारी परवाने वगैरे किचकट प्रोसिजर ला तोंड द्यावे लागले असते. शिवाय एकाच ठिकाणी सर्व जीवनावश्यक वस्तू मिळणेही तितकेसे सोपे नसणार.

एकाच ठिकाणी सर्व जीवनावश्यक वस्तू मिळणेही तितकेसे सोपे नसणार
>>> +१

पण
बेघर आणि रोजगारविहीनांची समस्या अनेक ठिकाणी अजूनही तितकीच तीव्र आहे. जे आपापल्या गावी जात आहेत त्यांनाही तिथे गेल्यावर लगेच हाताला काम मिळेल असे नाही.

मैत्री तर्फे लवकरच हातावर पोट प्रकारचे व्यवसाय करणार्‍या लोकांकरता छोटी कर्जे (मायक्रो फायनान्स) उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्याबाबतचे अधिक तपशील लवकरच कळवले जातील.

वरील पोस्ट मधे नमूद केल्यानुसार

मैत्रीतर्फे नुकतीच पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील अकरा लघु व्यावसायिकांना आपले व्यवसाय पुन्हा सुरू करता यावेत ह्याकरता म्हणून भांडवल म्हणून काही आर्थिक मदत देऊ करण्यात आली. ही मदत 'बिनव्याजी कर्ज' स्वरुपात असून कामाच्या गरजेनुसार प्रत्येकी पाच पासून ते पंधरा हजार पर्यंतची रक्कम देऊ करण्यात आली. देऊ केलेली एकूण रक्कम एक लाख दहा हजार इतकी आहे. असे समजते की ह्या वस्तीतील लोकांना कोणतीही बँक कर्जपुरवठा करत नाही त्यामुळे खासगी कर्ज मिळाले / घेतले असता व्याजदर चढा द्यावा लागतो. ज्यांना ही मदत देऊ करण्यात आली त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप, पेस्ट कंट्रोल करणे, बेकरी, मोबाईल दुरुस्ती, छोटे वाणसामानाचे दुकान, भाजीपाला विक्री, गोळ्या बिस्कीटे विक्री दुकान, मासे भाजीपाला विक्री, रिक्षा चालवणे अशा प्रकारचे असून ह्या व्यावसायिकांमधे तीन महिलाही सामील आहेत. ह्या व्यावसायिकांची वार्षीक उलाढाल अंदाजे दोन ते सहा लाख रुपये इतकी आहे.

योजना अशी आहे की हे सगळेजण जास्तीत जास्त म्हणजे वर्षभरात ही रक्कम परत करतील आणि त्यानंतरही ही रक्कम अशाच प्रकारे अजून इतर व्यावसायिकांना दिली जाईल.

ह्या लोकांपर्यंत पोचण्याकरता तसेच योग्य व्यक्तींची निवड करण्याकरता श्री. आनंद जाधव आणि श्री. केशव वाघमारे यांची मोठीच मदत झाली.

अशाप्रकारे लॉकडाऊननंतर इतरही अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरता मदत करण्याचा मैत्रीचा मानस आहे. ह्याकारणाकरता म्हणून मैत्रीला देणगी द्यायची असेल त्यांनी मैत्री कार्यालयाशी जरूर संपर्क साधावा.

छान!!
असे लोक माझ्या माहितीत आहेत. दहा ते पंधरा टक्के दरमहा व्याजाने पैसे घेतात. देणारेही गुंड टाईप लोक असतात. हे आपल्याच लोकांना वर येऊ देत नाहीत. तुम्ही छान काम करत आहात.

धन्यवाद म्हाळसा.

मैत्री च्या इतरही ल काही उप क्रमांबाबत जाणून घेण्याकरता
मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२० - https://www.maayboli.com/node/73411
हा एक धागा आहे तो नजरेखालून गेलाय का.

Pages