टरबुजाची भाजी

Submitted by BLACKCAT on 8 March, 2020 - 12:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टरबूज , कांदा

मसाला - कच्चे शेंगदाणे, दोन मिरच्या, लसूण , आले , कोथिंबीर - हे मिस्करमधून भरड वाटून 3-4 चमचे करून घ्यावे

इतर फोडणी वगैरे

मीठ , साखर , तिखट

क्रमवार पाककृती: 

तीन टरबूज आणले , चव गोड होती , पण थोडासा फुटासारखा स्वाद होता, फूट म्हणजे करी कुकुम्बर , म्हणून सरळ एकाची भाजी केली.

टरबूज मोठ्या फोडी कापून घेतल्या. तेल तापवून जिऱ्या मोहऱ्याची फोडणी केली , कांदा परतला, त्यात हळद घातली , मसाला वाटण घातले , खाली लागू नये म्हणून एक कप पाणी घातले. मसाला शिजला की तरबुजाच्या फोडी घातल्या, तिखट घालून शिजवले, शेवटी मीठ , साखर घातले, पाणी आपोआपच भरपूर सुटते.

मस्त भाजी होते

कढीसुद्धा करता येईल.

टरबूज - मस्क मेलन , musk melon

वाढणी/प्रमाण: 
2-3
अधिक टिपा: 

IMG_20200308_211759.jpg<

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_20190816_223142.jpg

असे आहे, नेटवर यलो मेलन म्हणून दाखवत आहे

मी मस्त मसाला वाटण पाणी न घालता नुसते मंद आचेवर परतुन घेतले असते. काकडीच्या भाजीसारखी चव असेल भाजीची अस वाटतंय.