ज्वारी/ बाजरी च्या पाककृती सुचवा

Submitted by VB on 5 March, 2020 - 01:03

सध्या घरातील एका व्यक्तीला आहारात साखर, गुळ, गहु, तांदुळ, दुध, फळे वर्ज्य करायला सांगीतले आहे डॉकनी, सो त्यामुळे ज्वारीची भाकरी अन भाजी एवढेच खातेय. रोज तेच खाऊन कंटाळुन हल्ली निट पोटभर जेवतही नाहीये.

सो ज्वारी - बाजरीच्या सोप्या पाककृती सुचवा प्लिज.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maayboli.com/node/73552
जर Autoimmune thyroiditis हा आजार असल्यामुळे आपणास असे पथ्य सांगितले असेल तर आपण जरूर सेकंड ओपिनियन घ्या असेच मी सुचवेन.
कारण या आजारात आपली थायरॉईड ग्रंथी काम करणे बंद होते आणि त्या साठी आपल्याला आयुष्यभर सकाळी एक गोळी घ्यावी लागते. एवढे सोडून या आजारात इतके कडक पथ्य करण्याची माझ्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे गरज नाही आणि त्याला पुरेसा शास्त्राधार नाही.

जालावर दिलेला कोणताही सल्ला हा अत्यंत मर्यादित असाच असतो आणि तो बरोबर असेलच याची खात्री देता येणार नाही

आपण तज्ज्ञ डॉक्टरांना शक्य असेल तर एंडोक्रिनॉलॉजिस्टना दाखवावे आणि योग्य उपचार करावे असाच सल्ला मी देईन.

हा धागा आज पाहिला. खूप पर्याय सुचवलेत लोकांनी ज्वारी बाजरी चे, ते आंबील का काय ते, त्याची कृती नाही दिसली. माहीत असल्यास पोस्ट करणे.

कुठल्याही पीठाची आंबील ज्वारी बाजरी पिठी राजगिरा शिंगाडा पीठ ... कढईत तुप जिऱ्याची फोडणी हवी असेल हिंग, कढीलिंब, किसलेले आलं त्यात दोन मोठे चमचे पीठ मंद आचेवर भाजायची. कढईत गॅस वरून खाली उतरवून हलवायचं दोन मिनिटं मग एक वाटी पाणी आणायचं गुठळ्या मोडून कढी गॅस वर ठेवून परत एक वाटी पाणी, मीठ , चवीला साखर व आंबट ताक अर्धी वाटी टाकून शिजू द्यावे. वरून तूप /बटर टाकून गरमागरम खावी.

बाजरीच्या पीठाची धिरडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली खाल्ली आहेत. आजी बनवायची ती जाडसर असायची. ती संपता संपायची नाहीत.
आई जाळीदार मऊ धिरडं बनवायची. आम्ही त्याला डोसा म्हणायचो.
बाजरीची पेज आईची आई बनवायची. थंडीत बाजरीची पेज आणि सोबत पालेभाज्या.
वाफवलेल्या गवारीला मीठ मसाला लावून ते ताटात तोंडी लावण्यासाठी असायचं. हे वडलांना यायचं. एकदाच बनवलं होतं.
आई बाजरीच्या धिरड्यासोबत लाल कांद्याची चटणी आणि गवार्ली गवार द्यायची. बाजरीबरोबर काहीही टेस्टी लागतं
हरभर्‍याचं एक काहीतरी बनवायचे ते लक्षात नाही.
यातली कुठलीच रेसिपी माहिती नाही.

Bajrichya pithache unde kartat. Nagpanchami la tava thevat nahit tevha. Bajrichya pithachi tup mith pani takun ukad kadaychi, malun ghyaychi mag lahan vati sarkha akar deun vafvun ghyayche.. varana barobr khayche kiva tup gul takun churun khayche

हा धागा आज पाहिला. काही प्रकार घरी होत असले तरी नवीन प्रकारही बरेच आले इथे 👍

बाजरीचे पदार्थ मात्र समहाऊ हिवाळ्यात (च) खाण्याची पद्धत आहे आमच्याकडे, ते वर्षभर नाही करत. दुधात शिजवलेला (Slow cooked ) कुटलेल्या बाजरीचा रामखिचडा हा विशेष पसंतीचा प्रकार, हिवाळी मेन्यू.

ज्वारीची भाकरी, उकडपेंडी, शिंगोळे हे मात्र वरचेवर होतात.

आता इथे दिलेले नवीन पदार्थ करून बघणार. 👍

आम्ही ज्वारी बाजरी मिश्र पिठ्याच्या भाकरी करतोय सध्या. ३:१ प्रमाण. त्याने उन्हाळ्यातही काही त्रास वाटला नाही.

ज्वारीची खिचडी मी खाल्लीय दोनदा तरी, पण रेस्टॉरंट मध्ये. (मिलेट्स स्पेशल रेस्टॉरंट.) ठीक ठीक वाटली, त्या वारी थाळीमध्ये ज्वारी खिचडी होती, मुद्दाम ऑर्डर केली नाही कधी, मिळते वेगळी.

ज्वारी (खूप जास्त वेळ) भिजवून त्याची साबुदाण्याच्या खिचडीच्या रेसिपीने चांगली खिचडी होते. चावताना थोडा जास्त व्यायाम होतो पण चव चांगली लागते आणि साबुदाण्याचा गिल्ट असेल तर तो जातो.

बाजरीच्या पीठाचे गोड दिवे छान लागतात. डेझर्ट म्हणून ही देता येतात.
ज्वारीच्या पिठाची ताकातली उकड मस्त होते. ज्वारीच्या पिठाची धिरडी ही छान लागतात. ज्यांना बेसन सोसत नाही त्यांच्यासाठी ज्वारीच्या पिठाचं पिठलं हा ही चांगला ऑप्शन आहे.

ज्वारीची भाकरी करताना पाण्या ऐवजी पालकाची उकडून पेस्ट वापरा. मस्त भाकरी होते.

पण तांदूळ गहू चालत नसतील तर ज्वारी सुद्धा चालेल की नाही हे विचारा.
राजगिरा वापराने उत्तम.

Pages