ज्वारी/ बाजरी च्या पाककृती सुचवा

Submitted by VB on 5 March, 2020 - 01:03

सध्या घरातील एका व्यक्तीला आहारात साखर, गुळ, गहु, तांदुळ, दुध, फळे वर्ज्य करायला सांगीतले आहे डॉकनी, सो त्यामुळे ज्वारीची भाकरी अन भाजी एवढेच खातेय. रोज तेच खाऊन कंटाळुन हल्ली निट पोटभर जेवतही नाहीये.

सो ज्वारी - बाजरीच्या सोप्या पाककृती सुचवा प्लिज.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1.बाजरीच्या पिठात बारीक चिरलेली मेथी, कांदा, तिखट, मीठ इ. घालुन पिठ मळायचे (पुरी साठी मळतो तसे)
त्याच्या पुऱ्या करून तळायच्या. चटनी/ केचप सोबत छान लागतात.
2. ज्वारीच्या पिठाची उकळपेंडी.
3. ज्वारी / बाजरी किंवा मिक्स धपाटे. वेगवेगळ्या प्रकारे करु शकतो. पालक /मेथी इ. घालुन.

ज्वारीच्या पिठाचे इडली/डोसे करता येतात. तांदुळाच्या ऐवजी वापरायचं आणि उडदाची डाळ त्याच प्रमाणात.
आम्ही धिरडी पण करतो. ढोकळा पण करता येईल.

बाजरी रात्री भिजत घालायची पाण्यात. दुसर्‍या दिवशी सकाळी उपसून फडक्यावर पसरवून ठेवायची. थोडी कोरडी होत आली की अर्धवट मिक्सरला फिरवून चाळून- पाखडून (कोंडा काढून) त्याची कणी करायची. व तुरीच्या डाळी सोबत, फोडणी ची खिचडी करायची.
लाल मिरच्या, लसूण इत्यादी घालून, कुकर ला शिजवायची. खटाटोप आहे..पण वर्थ आहे! Happy
बाजरीचा रवा काढून आणायचा व गूळ, तूप, दुधातला शीरा...... अहाहा!
बाजरीचे पीठ जाडसर दळून आणायचे, व पाण्यात तिखट मीठ जिरे घालून त्याची उकड काढायची व छोट्या खारोड्या घालून उन्हात वाळवायच्या. खातांना मायक्रोवेव्ह मधे अथवा तव्यावर थोड्या तेलावर परतून घायच्या - टी टाईम स्नॅक्स.
बाजरी व ज्वारीच्या मिक्स पीठां मधे हव्या त्या भाज्या किसून घालायच्या व तिखट मीठ लसूण मिरची पेस्ट घालून मुटके वाफवून घ्यायचे व तिळाच्या फोडणीवर परतून घ्यायचे काप करुन!
Happy

तांदळाची करतात तशी ज्वारीच्या पिठाची उकडून खिशी छान होते!
बाजरीचा भात (खिचडी).
ज्वारी भिजवून उकडून छान कडीपत्ता, कोथिंबीर ह्यांची फोडणी.

डाळी/नाचणी/वरी चालणार आहेत असं गृहित धरते (वर्ज्य पदार्थात उल्लेख नाही त्यामुळे).
- ज्वारीची इडली: तांदुळासारखच प्रमाण घ्यायचं, उडीद डाळ घालायची नेहमीसारखी. फक्त ज्वारी जास्त वेळ भिजवावी लागते (१२-१३ तास).
- नाचणीच्या पिठाचे घावन.
- भिजवलेले मूग किंवा मुगाची डाळ मिक्सर मधून काढून त्याचे घावन.
- वर्‍याच्या तांदळाची खिचडी किंवा शिरा.

मिलेट्स चालत असतील का ते विचारून बघा.
भाता ऐवजी, Kodo Millet, Barnyard Millet, Little Millet वापरता येतील. (आणखी मिलेट्स आहेत पण या तिघांची चव चांगली असते.)

हे मिलेट्स धुवून, तासभर पाण्यात भिजवून, तिप्पट पाणी घालुन कुकर मध्ये ४ शिट्ट्या देऊन शिजवावे. भाताप्रमाणेच, वरण, आमटी, भाजी, दही सोबत खाता येते. मला भातापेक्षा हे मिलेट्स आवडतात.

शिवाय यांचा पुलावही छान होतो.

यांच्या इडल्या आणि डोसेही करता येतात, तांदळाच्या रव्या ऐवजी यांचा रवा वापरावा अथवा पूर्ण मिलेट्स भिजत घालुन मिक्सर मधुन काढावे.

नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे ज्वारी बाजरी पासून पोहे, फ्लेकस् व इतर उत्पादने तयार करणारा कारखाना आहे. अनेक फ्लेवरमध्ये मिळतात. माझ्या कडे आता पत्ता नाही. मिळाल्यावर देतो.

किनुआ चालतो का? तर त्याचेही खुप पदार्थ करता येतील. किनुआ किंवा किन्वाच्या काही रेसिपी मायबोलीवर सुद्धा आहेत. ज्वारी बाजरीच्या लाह्या, मक्याच्या लाह्या, मखाणे इत्यादी मधल्या वेळेला खायला देता येतील.
मध चालेल का? ओट्स चा पण ऑप्शन आहे का?

आई ग एक दम आजीची आठवण आली. आजीला आम्ही ज्वारीचे धिरडे करून द्यायचो. ज्वारी पीठ, मिरची कोथिंबीर मीठ. डाळी अलाउड असतील तर मूग डाळ तूर डाळ भिजवून छान इडल्या होतात. पाककृती लिहीते. मक्याचे पीठ चालत असेल तर ते ही मिक्स करता येइल.

मूग डाळ तूर डाळ भिजवून छान इडल्या होतात. पाककृती लिहीते. >> प्लिज लिहा

किन्वा अन मिलेटस बद्द्ल विचारुन बघते.

ओट्स चालतील कि नाही माहित नाही, पण ती ओट्स अजिबात खात नाही

>> वरी/भगर कश्यापासुन बनते?
>> वरई हे तृणधान्य आहे. ते नागली सारखेच एक पिक आहे. वरई धान्य कारखान्यात/ गिरणीत प्रक्रिया करून त्याचे तांदूळ तयार करतात तीच भगर होय.

२ किलो शाळु ज्वारीमधे १ वाटी काळे उडीद व चवीपुरते मीठ या प्रमाणात भाकरीसाठी दळुन आणावे.
ही भाकरी नुसती वरचा पापुद्रा उलगडुन त्यात शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकुन खाल्ली किंवा शेंगदाण्याचे ओलं तिखट करुन त्याबरोबर जामच भारी लागते.
ह्यालाच आम्ही कळण्याची भाकर म्हणतो. :))

शाळू ज्वारी वेगळी असते का? लहापपणी शाळू हा शब्द शेतकरी लोकांच्या तोंडून ऐकला होता. मला वाटायचे शाळू हे ज्वारीलाच दुसरे नाव आहे.

मूग डाळ एक वाटी, उडिद डाळ अर्धी वाटी व तूर डाळ अर्धी वाटी वेगवेगळे भिजत घालायचे. चार तासांनी उपसून वाटून घ्यायचे. वाटतानाच त्यात हिरवी मिरची, मीठ कोथिंबीर, आले घालायचे. चवीनुसार. जिरे थोडेसे. फार पाणी घालू नये. मग एक छोटा चमचा इनो पावडर हवी असल्यास घालायची व एक चमचा तेल. मग नेहमी प्रमाणे इडल्या करायच्या. १० -१२ मिनिटे उकडायचे. बरोबर टोमाटो चटणी द्या. चविष्ट प्रकार होतो व पोट भरीचा पण आहे.

हिवाळ्यात घेतलेल्या ज्वारी पिकाला शाळू म्हणत असावेत किंवा गावरान जात असू शकेल.‌ काही ठिकाणी खरिपात ज्वारी घेतात तर काही भागात हिवाळ्यात.

सगळ्यांच्या सुचना भारीयेत. व्ही बी, मी मध्यंतरी ज्वारीचा रवा आणला होता, त्याच्या इडल्या पण चवीला छान होतात. फार्म हाऊस म्हणून कंपनीचा होता. ज्वारीच्या पीठाचे शेंगोळे पण होतात.

हिवाळ्यात घेतलेल्या ज्वारी पिकाला शाळू म्हणत असावेत >>>>त्यालाच म्हणतात इती एक नर्स म्हणाली होती.तिचे शेत होते.

व्ही.बी, ज्वारीच्या पिठाच्या चकल्या फार सुरेख होतात.अर्थात उकड काढून करायच्या नाहीत.हे स्नॅकसाठी झाले.

बाजरीच्या पिठासाठी.....१ चमचा चणा डाळ,१ चमचा उडीद डाळ,अर्धा चमचाधणे,मिरी,१-२ लवंग ,रात्रभर/२ तास भिजवा.नंतर मिक्सरमधे बारीक वाटून त्यात मावेल इतके बाजरीचे पीठ घाला.मळून त्याचे वडे थापून तळून घ्या.फार सुरेख लागतात.वडयांची भाजणी नसल्यास असे केले की कळतही नाही. की हे फक्त बाजरीच्या पिठाचे आहेत म्हणून.त्यात हवे तर तुम्ही तिखट, कोथिंबीर घालू शकता.मी प्रयोग केला नाही.

नाचणी आणि उडीदडाळ बारीक वाटून रात्रभर आंबवत ठेवावी.दुसर्‍या दिवशी पोळे किंवा इडल्या कराव्यात.
अमांनी सांगितल्याप्रमाणे पीठ तयार करून त्याचे पोळे काढावेत. पिवळी मूग डाळ घेतल्यास वाटून त्यात कांदा,कोथिंबीर्,आले,हि.मि.,घालून पोळे काढावेत.
मक्याचे पीठ चालत असल्यास कांदा,मिरची कोथिंबीर घालून थालिपीठ करावे.टॉमेटो मिक्सरमधून काढून त्यात हे सर्व भिज्वावे.त्यात हवी तर मेथी चिरून घाला.

ज्वारीच्या पिठाचे आंबील होते, नाचणी मिक्स करूनही होते

ज्वारी भरड दळून त्याच्या कण्या करतात, शिजवून ताक घालून खातात, म्हणजे गव्हाचे दलिया असतात तसे

बाजरीच्या पीठाच्या पुर्‍या व वांग्याच भरीत हा मेन्युही जबरदस्त असतो (पण हे जेवायचं तर फक्त केळीच्या पानावर)
फक्त बाजरीचे पीठ मळताना त्यात मिठासोबत २,३ चिमुट कसुरी मेथी चुरडुन टाकावी.
करुन बघा.... जर का नाही आवडलं नां तर पीठाचे, वाग्यांचे झालेला खर्च भरुन द्यायची तयारी आहे.
अजुन एक
ज्वारीच्या पीठात मोजकं बेसन, बारीक चिरलेला कांदा, मीठ, तिखट (मिरची पुड्/पावडर) टाकुन थापलेली भाकरी त्यावर शेंगदाणा, तीळ किंवा सुर्यफुलाचे कच्चे तेल टाकुन खावुन बघा ( हा प्रकार नाश्ता, जेवण म्हणुनही चालुन जातो)

सर्वांचे आभार, ज्वारी /बाजरीच्या एवढ्या पाकृ असतील असे वाटले नव्हते.

तळणीच्या रेसिपीज शक्यतो नाही करणार पण बाकीचे नक्की करुन बघणार..

<<< VB mi hi same problem face kartey..

Submitted by श्रवु् on 5 March, 2020 - 16:30 >>> तुम्ही काय खाताय मग, कि डायेट प्लॅन बनविलाय.
आमच्याकडे जिला हा त्रास होतोय तिचे वय ५४ वर्षे आहे म्हणुन शक्यतो तळणाचे पदार्थ टाळतोय.

बाजरीच्या पीठाच्या पुर्‍या व वांग्याच भरीत हा मेन्युही जबरदस्त असतो (पण हे जेवायचं तर फक्त केळीच्या पानावर)
फक्त बाजरीचे पीठ मळताना त्यात मिठासोबत २,३ चिमुट कसुरी मेथी चुरडुन टाकावी.
करुन बघा.... जर का नाही आवडलं नां तर पीठाचे, वाग्यांचे झालेला खर्च भरुन द्यायची तयारी आहे. >>> नक्की , अन ईथे तुम्हाला सांगेन सुद्धा.

झटपट हौणारा बाजरीच्या भाकरीचा मलिदा. ह्या मलिदाची चव वेगळीच असते.

Submitted by अंकु on 5 March, 2020 - 15:49 >>>> हे कसे करत्तात, रेसिपी द्या प्लिज

VB.. mala acidity sodun dusara kassalahi tras nahi.. but navryala .. dibetics with high cholesterol ahe.. to patticha khanara ahe. tyamule samzatch nahi roj kay vegle vegle dyache..

ज्वारी/बाजरीच्या पिठाची ताकातली उकड... लसूण-हिंग-हळद-हिरव्या मिरचीची फोडणी... एकदम चविष्ट, पोटभरीचा प्रकार... वन डिश मील
पर्यायी फोडणी - तीळ, कढीपत्ता-हिंग (लसूण, हळद नाही) - हे पण टेस्टी लागतं.

Pages