Autoimmune thyroiditis या आजार अन यावरील ऊपचाराबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by VB on 29 February, 2020 - 01:53

नुकतेच जवळच्या व्यक्तीला Autoimmune thyroiditis हा आजार असल्याचे डॉकनी सांगीतले, त्यावर ऊपचारदेखिल चालु केले. औषधांसोबत EMS exercise सुद्धा चालु केलीये. थोडेफार गूगलुन बघीतले आजार अन EMS exercise पण तरीही काही शंका आहेतच.
तरी माबोवर कुणाला या आजाराबद्दल त्यावरील ऊपचाराबद्दल माहीत असेल तर सांगा प्लिज.

तसेच या आजारावर स्पेशालिस्ट असे मुंबई-ठाण्यातील डॉक माहित असतील तर तेही सांगा __/\__

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Alredy ek dhaga ahe thyroid varati.mazya mate 99%( nit athavat nahi) nanba ne kadhalela ahe ☺️

सुजा Happy

माझ्या मनात खरेतर खुप सारे प्रश्न आहेत. काहींची ऊत्तरे डॉकनी दिलीत, काही गुगलुन बघीतलीत पण समाधान होत नाहीये.

थॉयरॉईड खुप वर्षांपासुन आहे, नियमीत औषधे देखिल घ्यायची ती. नेहमी तपासणी केल्यावर रिपोर्टदेखिल नॉर्मल असायचे. पण हल्ली त्रास वाढल्यामुळे परत एकदा सगळ्या तपासण्या केल्या ज्यात T3, T4, TSH सोबत FSH, F3, F4 test केल्यावर कळले की टोटल थॉयरॉईड नॉर्मल होते तरी फ्री थॉयरॉईड टेस्ट मध्ये आजाराचे निदान झाले. हा आजार लवकर बरा होणारा नाहीये त्यात भरपुर पथ्य सांगीतली आहेत डॉकनी म्हणुन ईकडे धागा काढला.
मुख्य म्हणजे साखर, गुळ, गहु, तांदुळ, दुध, फळे वर्ज्य करायला सांगीतले आहे. त्यामुळे सध्यातरी फक्त ज्वारीची भाकरी अन भाजी ईतकाच आहार आहे. तरी याबद्दल कुणाचा काही अनुभव असेल किंवा काही माहिती असेल तर सांगा.