ज्वारी/ बाजरी च्या पाककृती सुचवा

Submitted by VB on 5 March, 2020 - 01:03

सध्या घरातील एका व्यक्तीला आहारात साखर, गुळ, गहु, तांदुळ, दुध, फळे वर्ज्य करायला सांगीतले आहे डॉकनी, सो त्यामुळे ज्वारीची भाकरी अन भाजी एवढेच खातेय. रोज तेच खाऊन कंटाळुन हल्ली निट पोटभर जेवतही नाहीये.

सो ज्वारी - बाजरीच्या सोप्या पाककृती सुचवा प्लिज.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरम बाजरीची भाकर कुस्करून त्यात गुळ आणि साजूक तूप घालून नीट एकजीव करावे. यालाच मलिदा म्हणतात. यात गाजराचे तुकडे घातले तर अजून छान लागते.
नवनाथांना मलिद्याचा नैवेद्य दाखवतात.

गरम बाजरीची भाकर कुस्करून त्यात गुळ आणि साजूक तूप घालून नीट एकजीव करावे. यालाच मलिदा म्हणतात. यात गाजराचे तुकडे घातले तर अजून छान लागते.
नवनाथांना मलिद्याचा नैवेद्य दाखवतात. >>> ओके, धन्यवाद

अहो महत्वाचे म्हणजे बाजरी प्रकृतीला उष्ण असते. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना त्रास होउ शकतो. ती एक काळजी घ्या. कमी प्रमाणात द्या .

आमच्या जुन्नर भागात पुर्वी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात भिजवून आंबिल बनवत. फुरमोल म्हणत तीला. खूप चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ होता. आता रेसिपी मिळणं अवघड आहे.

रात्र भर आंबवायचे , दुसऱ्या दिवशी गरम पाणी करून ते उकळत असताना हे मिश्रण घालून शिजवायचे , त्यात लसूण , आले , कॅथॉनबीर घालायची

नाचणीच्या पिठाचीही करतात

एक प्रश्न, ऊकड नुसतीच खाणे म्हणजे पिठ खाल्ल्यासारखे वाटत नाही का??? >>>

व्यवस्थित शिजली नाही तर पीठ खाल्ल्यासारखं वाटतं.

तरीही, नुसती खायला आवडत नसेल तर वरून तेल्/तूप आणि कुठलीही कोरडी चटणी घालून खाता येते. नुसतं तेल्/तूप पण छान लागतं.

दूध चालणार नाही म्हणजे दुग्धजन्य कोणतेच पदार्थ चालणार नाहीत ना? दही, ताक, लोणी, तूप काहीच चालणार नाही.
गुळपण चालत नाहीय.

ताई, ( मी ह्या बद्दल माबो वर बर्‍याच शिव्या खाल्लेल्या आहेत) पण व्हीगन फूड ऑप्शन्स शोधून बघा. ह्यात सर्व दूध कटाप होईल. त्या बरोबरीने प्लांट बेस्ड सर्च करा. डॉक्ट् रांनी अलाउ केलेल्या भाज्या व फळे ह्यांचे सलाड, टोफू चालत असल्यास त्याचे सलाड पनीर ऐवजी. सूप्स आणि वर इडल्या सांगितल्या त्यात आळी पाळीने वेग वेगळ्या भाज्या घालता येतील. व्हेज कबाब करता येतील. सुके खोबरे चालत असल्यास ते घालून व्हेज कबाब जरा चमचमीत होतील. बेबी कॉर्न अमेरि कन स्वीट कॉर्न वाइल ड राइस चाल्तो का ते बघा. वाइल्ड राइस, किनवा हे महाग प्रकार आहेत. पण तांदुळाला ऑप्शन.

इथे किती वेगवेगळे पर्याय सुचवलेत सगळ्यांनी!
उन्हाळ्यात नाचणीचे सत्व देता येइल. बार्ली चालेल का विचारा. चालणार असेल तर बार्लीचे डोसे पण छान होतात.
https://www.misalpav.com/node/22682
सकाळी फळभाजी आणि रात्री पालेभाजी असे करुन , तसेच तीच भाजी वेगवेगळ्या प्रकारे करुन वैविध्य आणता येइल.
उदा. आमच्याकडे फ्रोजन पालक खात्रीचा तर नुसती लसूण-हिरवी मिरची, गोळाभाजी, पालक पनीर टाईप पण पनीर नाही, मूग-दाल पालक, पालक घालून ज्वारीचे थालीपिठ , चैन म्हणून पालकाच्या वड्या .

ब्लॅककॅट. Happy

छानच पाककृती आल्यात.

साखर, गुळ, गहु, तांदुळ, दुध, फळे वर्ज्य करायला सांगीतले आहे डॉकनी,

तुमच्या जीवन शैली मध्ये एवढा आमूलाग्र बदल सांगितला आहे?

आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरने?

एकदा डॉक्टर बदलून पण पहा/( सेकंड ओपिनियन)

@ डॉ. सुबोध खरे, सध्या ज्यांच्याकडे ईलाज चालु आहे, ते MD मेडीसिन आहेत, अन रीझल्टदेखिल बर्यापैकी पॉझिटीव्ह आहे.

जमल्यास माझ्या खालील धाग्यावर काही सुचवू शकाल का बघा.

आपला किंवा कोणत्याही डॉक्टरचा उपमर्द करण्याचा हेतू नाही/ नव्हता.

परंतु अशी जीवन शैली ज्यात गूळ, साखर,( म्हणजे सर्वच्या सर्व गोड पदार्थ वर्ज्य) चहा कॉफी बिनसाखरेची

गहू, तांदूळ म्हणजे पोळी पाव शिवाय भाताचे सर्वच्या सर्व प्रकार इ अनेक सर्व खाद्यपदार्थ वर्ज्य

दूध म्हणजे दही ताक पनीर चीज चहा कॉफी सर्व वर्ज्य

आणि फळे वर्ज्य म्हणजे आपल्याला जीवन सत्व आणि खनिजे मिळण्यासाठी भाज्या आणि ज्वारी बाजरी सारखी धान्ये आणि सामिष पदार्थ एवढाच पर्याय राहतो

हि जीवन शैली आपल्याला आयुष्यभर स्वीकारणे किती शक्य होईल याचा विचार करणे आवश्यक आहे.

रोज तेच खाऊन कंटाळुन हल्ली निट पोटभर जेवतही नाहीये.

यामुळे आपल्याला खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता भासण्याची शक्यता आहे यास्तव हा सेकंड ओपिनियनचा पर्याय सुचवला.

राग नसावा.

बाकी पाककृती हा माझा विषय नाही आणि लोकांनी अनेक उत्तम पर्याय सुचवलेले आहेतच.

Pages