उकड शेंगोळे , उकडशेंगोळे

Submitted by काउ on 27 January, 2015 - 03:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेंगोळ्यासाठी ... दोन वाट्या ज्वारीचे पीठ , अर्धी वाटी बेसनपीठ , अर्धी वाटी कणिक , तिखट , मीठ , हिंग , तेल , पाणी

रसासाठी ... तेल , फोडणीचे पदार्थ , मीठ , तिखट , मसाला , चिंच , गूळ.

कांदा कापून , भरपूर लसूण पाकळ्या ठेचून व भरपूर पाणी.

पाव किलो मटार सोलुन तीही घातली.

क्रमवार पाककृती: 

ज्वारी पीठ, बेसन , कणिक मिसळुन त्यात तिखट , मीठ , हिंग , चमचाभर तेल व पाणी घालुन घट्ट मळुन घ्यावे. त्याच्या शेंगोळ्या कराव्यात.

नंतर तेल तापवुन मोहरी , जिरे , हळद व हिंग घालुन फोडणी करावी. त्यात लसूण , कांदा घालुन परतावे. त्यातच तिखट घालावे. गरजेनुसार मसाला घालावा. माझ्याकडे मटार होते. तेही घालुन परतले.

मग भरपूर पाणी घातले. ते उकळल्यावर शेंगोळे सोडले.

शेंगोळे शिजले तरी भरपूर शिजवावे. त्यातील ज्वारीच्या पिठाचे कण पाण्यात मिसळुन घट्ट रस तयार होतो. मग मीठ , गूळ व चिचंचेचा कोळ घालुन पुन्हा थोडे शिजवले.

खाताना एक चमचा तूप घालावे.

sheng.jpgsheng1.jpgsheng2.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ माणसांसाठी
अधिक टिपा: 

संदर्भ : मिसळपाव.

http://www.misalpav.com/node/30093

माहितीचा स्रोत: 
http://www.misalpav.com/node/30093
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला, मला वाटल की काउनी कुळथाचे केले की काय. कारण मी त्याचे खाल्लेले. पण हेही करुन बघेन.

आहे छान पण मुळ रेसिपि कुणा दुसर्याची आहे, तिथे तुम्ही प्रतिसाद ही दिलेत , तिची परवानगी घेउन प्रकाशित केली असती तर बर झाल असत

मी ही कृती स्वतंत्रपणे केलेली आहे. मायबोलिव या नावाची कृती मिळाली नाही. अन्यथा त्या ठिकाणी फक्त माझे फोटो अपलोड केले असते.

मितान म्हणजे मायबोलीवरची मितान असेल तर तिलाच सांगता येइल की पाककृती इथे लिहायला.

मायबोलीवर हुलग्याच्या पिठाचे शिंगोळे बनवायची एक पाककृती आहे. जुन्या मायबोलीत असेल कदाचित.

ते मी कसं सांगणार? तुमचं मिसळपाववर खातं आहे तर तिथल्या रेसिपीच्या प्रतिसादात तिलाच विचारू शकता.

पाकृ नवीन आहे पण फोटो बघून रेसिपी करायचा उत्साह मावळला.
काऊ, जरा माबोवरिल इतर रेसिपिचे फोटो पाहत चला

जामोप्या रेसीपी आवडली मला.
वाटाण्या ची अ‍ॅडिशन चांगली आहे.
फोटो मात्र नाही चांगला.