प्रतिजैविके :--समज आणि गैरसमज.

Submitted by सुबोध खरे on 21 February, 2020 - 01:10

प्रतिजैविके :-- समज आणि गैरसमज.

सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?

सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ.

यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.

यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.

या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव

जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी किंवा जिवाणूंनी इतर जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.

यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.

जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.

१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.

२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.

दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.

काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
पाळी पुढे ढकलण्यासाठी वहिनीला दिलेली औषधे डॉक्टरांना न विचारता घेतली आणि नंतर पाळी आली नाही म्हणून माझ्याकडे आलेल्या महिलेला तुम्ही "गरोदर आहात" त्यामुळे पाळी अली नाही हे सांगितल्यावर धक्का बसला. अर्थात तिला गर्भपात करून घेण्याची पुढची कटकट आणि खर्च आलाच.

दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.

३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.

४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.

५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.

६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.

७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते.

दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो.

अशीच स्थिती क्षयरोगाच्या रुग्णात दिसते. सुरुवातीला औषधे घेतल्यामुळे क्षयरोगाचे जंतू मोठ्या प्रमाणावर मरतात आणि त्यांचे विष शरीरभर पसरते. यामुळे रुग्णाची भूक जाते जेवण पचत नाही आणि त्याचे वजनही कमी होते. यामुळे अनेक रुग्ण विशेषतः हातावर पोट असणारे आणि शारीरिक कष्टाचे काम करणारे रुग्ण औषध सोडून देतात. यामुळे रोग बरा तर होत नाहीच परंतु शरीरात शिल्लक राहिलेले क्षयरोगाचे जंतू या प्रतिजैविकाला जुमानेनासे होतात( antibiotic resistant)

या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.

८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.

काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?

"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.

९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात केवळ "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही.

याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.

यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"

मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1

१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.

प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे

१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते

२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.

३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.

४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.

प्रतिजैविकांबरोबर अँटासिड देण्यासाठी कोणतेच तर्कशास्त्र नाही.
बरेच वेळेस सुदृढ प्रकृतीच्या बैठी कामे करणाऱ्या लोकाना( ही जमात आताशा फारच वाढलेली आहे) "अशीच" ऍसिडिटी होत असते. त्यामुळे नंतर कटकट नको म्हणून आणि भरपूर औषधे दिली नाहीत तर लोकांना हा डॉकटर बरोबर नाही असेही वाटत असते त्यासाठी डॉक्टर सर्रास अँटासिड लिहून देत असतात.
माझा एक अत्यंत हुशार, उत्कृष्ट असा हाडांचा डॉक्टर असलेला आणि नैतिक आणि प्रामाणिक व्यवसाय करणारा वर्गमित्र प्रत्येक रुग्णाला अँटासिड लिहून देतो. या मागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. यावर चर्चा ही झाली आहे. केवळ त्याचे वैयक्तिक मत.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे. एड्स होतो तेंव्हा ही प्रतिकारशक्तीच खच्ची होते म्हणून माणूस अनेक रोगांना बळी पडतो.
तुम्हाला साधे कापले खरचटले तर कोणतेही औषध न घेता तुम्ही बरे होताच की.

प्रत्येक पेशींच्या पृष्ठभागावर त्यांच्या आतील रासायनिक रचनेचा आलेख लिहिलेला असतो. हा आपल्या पासपोर्ट सारखा असतो. आपल्या शरीरात दर सेकंदाला असंख्य जंतू प्रवेश करत असतात. या येणाऱ्या प्रत्येक जंतू अथवा पेशीचा "पासपोर्ट तपासणे" हे पांढऱ्या पेशीतील काही विविक्षित तर्हेच्या पेशींचे काम असते. पेशी हा पासपोर्ट तपासून तुमची "स्व" आणि "परकीय" अशी विभागणी करतात आणि ज्या पेशी परकीय आहेत त्यांना दुसऱ्या सैनिक पांढऱ्या पेशींकडे सुपूर्द करतात. या सैनिक पेशी परकीय पेशींचा नाश करीत असतात. तेंव्हा शरीरात शिरलेले जंतू हे ताबडतोब नष्ट केले जातात. जेंव्हा शिरले जंतू हे पांढऱ्या पेशींपेक्षा संख्याबलाने "फारच जास्त" असतात तेंव्हा ते पटकन शरीरभर पसरतात आणि आपल्याला रोग होतो. या वेळेत तूमचे शरीर काही स्वस्थ बसलेले नसते, ते नवीन पांढऱ्या पेशी तयार करण्याचे काम जोमाने करत असतात. ज्यावेळेस नवीन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात तेंव्हा नैसर्गिक रित्या रोग आटोक्यात येऊ लागतो.

जेंव्हा पांढऱ्या पेशींचे वाढलेले प्रमाण सुद्धा जंतूंना अटकाव करू शकत नाही अशा वेळेस शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर इ रोगांनी माणसे मरत असत ती या कारणाने.

या मधल्या काळात शरीराला हानी पोचू नये म्हणून हे अतिरिक्त जंतू प्रतिजैविके देऊन मारले जातात आणि रोग पटकन आटोक्यात येतो. यामुळेच प्रतिजैविकांचा शोध लागला आणि लक्षावधी अपमृत्यू टाळता आले.

जन्म मृत्यू चे हे प्रमाण संतुलित होते त्यामुळे १९५० पर्यंत जगाची लोकसंख्या आटोक्यात होती दुर्दैवाने मागच्या तीन पिढ्यानि सरासरी सात ते आठ मुलांना जन्म दिला आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगाची लोकसंख्या गेल्या साठ वर्षात तिप्पट झाली.

कर्करोगाच्या पेशींचाही पासपोर्ट बदललेला असतो त्यामुळे अशा ९९ % कर्करोगाच्या पेशी आपोआप आपले शरीर नायनाट करीत असते. उरलेल्या १% पेशींचा पासपोर्ट आपल्या "स्व" पासपोर्टशी मिळताजुळता असल्याने त्या पेशींचे "परकीय" म्हणून निदान होत नाही आणि त्या पेशींपासून कर्करोग होतो.
ऑटो इम्यून डिसीज मध्ये आपल्या प्रतिकारशक्तीत बिघाड होतो आणि "स्व" च्या पेशी परकीय समजून त्यावर हल्ला चढवला जातो.

सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही.

दोन तास ताप आटोक्यात येत नाही म्हणून लगेच इंजेक्शन द्या म्हणणारे कित्येक पालक दिसतात. एक मूल आणि त्याची काळजी वाहायला दोन आई बाप आणि चार आजी आजोबा या मुळे हे सर्रास दिसत्ते आहे.
नुसते तेवढेच नव्हे तर डॉक्टरकडे गेले की परत ताप येत कामा नये किंवा हगवण ताबडतोब थांबली पाहिजे हा आग्रह असतो. औषध दिले आणि त्यानंतर दोनदा शौचास झाले की डॉक्टर बदलणारे पालक आज काल भरपूर दिसतात.

मुलाच्या आजारपणासाठी आज रजा काढली आहे उद्या रजा मिळणार नाही तेंव्हा आज संध्यकाळपर्यंत मूल खडखडीत बरे झाले पाहिजे हा आग्रह -कम- धमकी असल्यावर नवशिका डॉक्टर प्रतिजैविकांचा मारा करतो.

मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आजारावर औषध/ प्रतिजैविक घेतलेच पाहिजे असे मुळीच नाही. बहुसंख्य आजार स्वतः हून बरे होतील मग औषध घ्या अथवा घेऊ नका. सर्दी खोकल्यासारखे अनेक साधे आजार घरगुती उपचारांनी बरे होतातच आणि सुरुवातीला तसेच करावे असाच मी आग्रह धरेन.

बाकी अनुभव म्हणाल तर लोकांना "बाहेरची बाधा" "भूत" "साक्षात्कार" यांचाही "अनुभव" येत असतोच.
शास्त्रीय कसोट्यांवर टिकला तर तो पुरावा म्हणता येईल.

आले, हळद, कांदा लसूण यात जंतुनाशक गुण आहेत परंतु त्यावर पूर्ण संशोधन होऊन त्याचे औषधात रूपांतर अजून तरी झालेले नाही. तोवर याचे जंतुनाशक गुण आयुर्वेदाला माहीत होतेच म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हशील आहे?

१२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन.

बहुसंख्य आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी चे लोक आम्ही प्रतिकार शक्ती "वाढवतो" त्यामुळे रोग होणारच नाही असा दावा करतात. दुर्दैवाने यातील एकही दावा पुराव्याने अजून तरी शाबीत झालेला नाही.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे.

हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

श्रीमंत लोकांचा शत्रु आहे ए सी

कार ए सी असते , पण ड्रायवहरला असेल तर आणि त्याच्याबरोबर रोज 2 तास करमध्ये बसल्यावर काय होईल ?

बच्चनला पोटाचा टी बी होता, म्हणून तो टी बी च्या जाहिरातीत काम करतो,

https://www.google.com/search?q=amitabh+bachchan+tb+ad&client=ms-android...

जीवाणु की विषाणु है तर खुद्द एम बी बी एस नाही कधी कधी माहित नसते
चूक.
एमबीबीएस डॉक्टरांना सीबीसी रिपोर्ट मधील पांढऱ्या पेशींचे टोटल काउन्ट, डीफरंशिअल काउन्ट आणि पेशींच्या मॉर्फोलॉजीवरून जिवाणू की विषाणूचा संसर्ग आहे ह्याचा अंदाज येतो. बाकीचे पॅथीवाले रिपोर्ट कसाही असो व्हायरल फिवर ठोकून देतात.

माझा एक रास्त प्रश्न आहे आहे रोग जंतूंना प्रती जैविक नष्ट करतात की.
प्रती जैविक मानवी शरीरातील संरक्षण यंत्रेने मार्फत रोग जंतूंचा नाश करतात .
हा प्रश्न जाणकार लोकांना विचारला आहे.
Dr khare,black cat (he pan doctor आहेत असे मी वाचलं आहे)

माझ्या माहितीतील एक पेडियाट्रिशिअन अनेक अॅंटिबायोटिक देऊनही दोन तीन वर्षांची मुलं बरी होत नाही हे पाहून पालकांचे ' टिबी सगळीकडे असतोच, कळत नाही. आपण टिबीची ट्रिटमेंट चालू करु.' असे म्हणून टेस्ट निगेटिव्ह आली तरीही टिबीच्या औषधांचा कोर्स चालू करायचा. काही पालक एमडी स्त्री बालरोग तज्ज्ञाकडे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी गेले तर ती हादरलीच हा प्रकार पाहून. तिनं पालकांना आश्वस्त केल्यानंतर पालकांनी डॉक्टर ला धारेवर धरले. शेवटी माफी मागितली. पण फरक पडला असेल असं वाटत नाही. त्या मॅडमकडे मुलं एकदम ठणठणीत बरी झाली.

फक्त मैक्रोबायोलॉजिकल असेल तर पुन्हा थुनकी तपासणी करायची ती निगेटिव्ह येते,
किडनीचा TB चे निदान लघविमधील टीबीचे जंतू तपासणी करून करता येते, ह्यालाही मायक्रोबायोलिजिकल पोझिटिव म्हणतात. ह्या केस मध्ये टीबी बरा झाला की नाही ह्याची खात्री करायला थुंकी तपासणी करून चालत नाही, लघवीची टिबी करता तपासणी करावी लागते.

अग्गोबाई
खरे की काय

ह्यात अग्गोबई करण्यासारखे काय आहे? खरंच आहे.

पॅथॉलॉजीस्ट हातावर आतल्या बाजूला इंजेक्शन देऊन टेस्ट करतात ती कोणती मग?

मोंटू टेस्ट, फार खात्रीची नसते.

किडनीचा TB चे निदान लघविमधील टीबीचे जंतू तपासणी करून करता येते, ह्यालाही मायक्रोबायोलिजिकल पोझिटिव म्हणतात.

हो , जिथला टी बी तिथले सैम्पल, थुंक्तितला टीबी एकदम कॉमन आहे, म्हणून ते उदाहरण दिले

अग्गोबाई
खरे की काय
ह्यात अग्गोबई करण्यासारखे काय आहे? खरंच आहे.
Submitted by आग्या१९९० on 23 February, 2020 - 10:50
>>> अहो आज रविवार. काळबोका हवेत तरंगत असतो. त्यात रात्र म्हणजे शुद्धीत असेल याची गॅरंटी नाही.

माझा एक रास्त प्रश्न आहे आहे रोग जंतूंना प्रती जैविक नष्ट करतात की.
प्रती जैविक मानवी शरीरातील संरक्षण यंत्रेने मार्फत रोग जंतूंचा नाश करतात .
हा प्रश्न जाणकार लोकांना विचारला आहे.
Dr khare,black cat (he pan doctor आहेत असे मी वाचलं आहे)

माझ्या ह्या शंकेच निरसन करा.
ही फालतू आहे म्हणून दुर्लक्ष करण्याच्या लायकीची नक्की नाही.
धागा कर्त्या ची जबाबदारी आहे उत्तर देणे

राजू लिहिणार नव्हतो पण लिहितो. शरिरातील संरक्षण यंत्रणा कमी पडते म्हणून प्रतिजैविकांची मदत घ्यावी लागते.

राजू लिहिणार नव्हतो पण लिहितो. शरिरातील संरक्षण यंत्रणा कमी पडते म्हणून प्रतिजैविकांची मदत घ्यावी लागते.

तू दहावी नापास आणि मूर्ख माणसं तुला स्वतःचे प्रश्न ची उत्तर माहीत नाहीत तू मध्ये बकवास करू नको.

माझ्या माहिती मधील dr khare aani black cat uttar detil

दोन प्रकार असतात

Bactericidal antibiotics kill bacteria;

bacteriostatic antibiotics slow their growth or reproduction

Jara सविस्तर आणि मराठी मधून लिहाल तर सर्वांनाच समजेल.

आर्यन वाळुंज
22 February, 2020 - 02:49
माननीय अॅडमीन साहेब. राजेश १८८ हा महिलांना कमी लेखणारा आयडी आहे. असंबद्ध प्रतिसाद देत असतो. प्रत्येक धाग्यांवर बिनबुडाचे युक्तिवाद करत असतो.

स्मिता द
22 February, 2020 - 01:07
The requested page "/hitguj/messages/119403/119403.html?1174230802" could not be found.

मला२००७७ ते २००९ पर्यंतच्या माझ्या कविता कशा मिळतील

Dr Raju Kasambe
21 February, 2020 - 04:32
माझा लेख
https://www.maayboli.com/node/73442
(४ ऑस्कर मिळविणारा ‘पॅरासाईट’ : चित्रपट अनुभव) चुकून ललित मध्ये पोस्ट झालाय. त्याला 'चित्रपट" मध्ये टाकावे ही विनंती.
आपला
राजू कसंबे

आर्यन वाळुंज
17 February, 2020 - 12:42
https://www.maayboli.com/node/73402
कृपया हा धागा उडवावा.

कांदेबटाटे
9 February, 2020 - 03:26
Pl cancel my maayboli membership.
Thanks.
Maayboli is very good but now I don't have time to spare.

सुजाता यादव
6 February, 2020 - 11:22
या सगळ्याची किंमत तूला मोजावी लागेल. ज्या दिवशी भेटशील तेंव्हा फार हाल करून मारेल तूला.
Submitted by हरिहर. on 6 February, 2020 - 11:10
>> कृपया नोंद घ्या.

भरत.
6 February, 2020 - 06:59
कृपया लक्ष द्या
https://www.maayboli.com/user/74894

हरिहर.
5 February, 2020 - 12:33
ॲडमीन साहेब एकूनच लक्ष द्या मायबोलीवर. की तुम्हाला हेच अपेक्षीत आहे? हाराकीरी करायची तर दर्जेदार वादात करेन, फालतू वादात नाही. माझा आयडी माझा त्वरीत डिलीट करावा ही विनंती.

अरुणकुमार शिंदे
5 February, 2020 - 06:39
या धाग्यात काय आहे रे तुझ्या विषयी? तू माझ्या नादी लागला तरच मी तुझ्या नादी लागायचं असा नियम आहे का रे?
Submitted by हरिहर. on 5 February, 2020 - 05:10
>> बघा. उगाच उकसवत आहे.

अरुणकुमार शिंदे
1 February, 2020 - 11:24
बोल्सोनारोच्या धाग्यावर वाचकांनी भरत यांच्या बुध्दीची प्रशंसा केली आहे. तरी भरत यांना मायबोली भुषण पुरस्कार देण्यात यावा ही विनंती.

भरत.
31 January, 2020 - 02:27

ह्यातील सुजाता यादव
अरुणकुमार शिंदे
वाळुंज
ही एकच व्यक्ती
आणि असे किती तरी आयडी बनवून हा मूर्ख इथे वावरत आहे

अरे वेड्या वडाची साल पिंपळाला कशाला लावतोय? सरळ सोपं सांगितले की शरीरातील पांढऱ्या पेशी रोगजंतूंशी लढाई करण्यात अपयशी ठरतात. म्हणून रोगजंतूंना अटकाव करण्यासाठी प्रतिजैविकांची मदत घ्यावी लागते.
लिहिणार नव्हतो हे म्हणण्याचे कारण तूझ्या आणि माझ्या प्रतिसादांना निरुपयोगी म्हणून हिणवले गेले आहे हे लक्षात येते का राजू बाळ?

हामाशेप्र.
मुळात दोष तूझा नाही राजू. तूझी आकलनशक्ती कमी आहे. तूला किती वेळा बोललो की आय क्यू तपासणी करून घे. वीतभर तूझी अक्कल आणि चालला हातभर ढलपी काढायला. चल पळ.

कुठलीच औषध रोगाशी प्रतिकार करत नाहीत तर आपल्या शरीराची प्रतिकार करणारी यंत्रणाच त्यांच्या शी लढते.
एकच रोग झाले ली एकच औषध घेणारे विविध रोगी एकच वेळी बरे होत नाहीत .

ह्याचे स्पष्टीकरण ध्या असे का होते.
ह्या मध्ये काही दगावतात सुद्धा
का?
जर औषध प्रतिकार करून रोग जंतूंचा नाश करत असतील तर असे घडूच शकत नाही

वाळुंज
तुझ्या सारखं
बायकांचा आयडी घेणारा
पुरुषांचा आयडी घेणारा
तृतीय पंधिय लोकांचा आयडी घेणारा
इथे दुसरा एक पण व्यक्ती नाही

धागा कर्त्या ची जबाबदारी आहे उत्तर देणे.

तुमची धुळवड खेळून झाली की सांगा
मग मी प्रतिसाद देईन.

मला धुळीची ऍलर्जी आहे.

बच्चनला पोटाचा टी बी होता, म्हणून तो टी बी च्या जाहिरातीत काम करतो,

हे आपल्याला कुणी सांगितले?

bacteriostatic antibiotics slow their growth or reproduction

Static means to stop growth.

Bactericidal means which kills bacteria.

Bacteriostatic antibiotics function via inhibition of bacterial protein synthesis. Due to merely inhibiting further growth of bacteria, bacteriostatic antibiotics require a functioning host immune system to fully clear overgrowth

क्षय रोगात

पूर्वी जन्तु दिसला होता , उपचार झाला व आता दिसत नाही , तर त्याला tb cured म्हणतात , बाकी क्लिनिकल केसेस ना उपचार पूर्ण झाल्यावर tb treatment completed असे लिहितात

हे केवळ सोयीचे म्हणून केले जाते. रिफाम्पिसिन हे औषध दिल्यावर 2-3 आठवड्यात थुंकीतील जंतू नाहीसे होऊन ( sputum negative) रुग्ण दुसऱ्याला रोग संक्रमित करत नाहीत याचा अर्थ रुग्ण *बरा झाला* असे नाही.

आणि 9 महिने उपचार करूनही सर्व रुग्ण बरे होतात असे नाही. तेंव्हा रुग्णाच्या अनेक चाचण्यामध्ये (रक्ताच्या थुंकीच्या क्षकिरण CTScan इ )आणि रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली तरच उपचार बंद करतात.

जीवाणु की विषाणु है तर खुद्द एम बी बी एस नाही कधी कधी माहित नसते , बहुतांश वेळेला आधी विषाणु डेमेज करतात ण मग जीवानुहि नंतर येतात , असे असते ,

हे बरोबर

त्यामुळे एंटीबायोटिक तर सगळेच देतात

हे चूक आहे.

आपल्याला सर्दी झाली असेल आणि नुसतं पाणी गळत असेल किंवा शिंका येत असतील तर ती विषाणूजन्य सर्दी आहे त्यासाठी प्रतिजैविकाची गरज नाही
पण हाच स्त्राव पांढरा किंवा पिवळसर अथवा हिरवट असेल तर आपल्याला जिवाणू मुळे सर्दी झाली आहे त्यावर प्रतिजैविक द्यावे लागू शकेल.

बाकी डॉक्टर कित्येक वेळेस प्रतिजैविक का देतात याची काही कारणे मी वर उद्धृत केलेली आहेतच.

@Rajesh 188

माझा एक रास्त प्रश्न आहे आहे रोग जंतूंना प्रती जैविक नष्ट करतात की.
प्रती जैविक मानवी शरीरातील संरक्षण यंत्रेने मार्फत रोग जंतूंचा नाश करतात .

दोन्ही गोष्टी सत्य आहेत.

जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो.

म्हणजेच प्रतिजैविके ही जीवाणूंना मारतात

हे मूळ लेखतच लिहिलेले आहे

आणि

Bacteriostatic antibiotics function via inhibition of bacterial protein synthesis. Due to merely inhibiting further growth of bacteria, bacteriostatic antibiotics require a functioning host immune system to fully clear overgrowth

हे वर प्रतिसादात लिहिलेले आहे.

ज्या रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्याला जंतुसंसर्ग अर्थातच जास्त होतो

अशा रुग्णाला bactericidal antibiotic. देणे आवश्यक ठरते कारण वर म्हटल्याप्रमाणे bacteriostatic antibiotics need a functioning immune system.

Pages