अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुलटर बाईंचा ट्रम्पवर राग आहे कारण तिला हवं असलेलं ' नो टू कलर्ड इमिग्रेशन' धोरण त्याने राबवलं नाही. तिला असा माणूस हवा आहे जो सर्व भारतीय, मेक्सिकन वगैरे जनतेला पोत्यात घालून वेशीबाहेर सोडून येईल आणि काळ्याना त्यांच्या पूर्वीच्या पायरीवर ठेवेल. ट्रम्पने नुसतीच बडबड केली. पण तिला हवं असलेलं हे कार्य केलं नाही.

>>> हिटलर उदयाला आला तेव्हा आपण या जगात नव्हतो.. त्याने सगळ्या जर्मनीला कसे त्याच्या नादी लावले व सत्तांध होउन स्वतः कसा डिक्टेटर झाला.. याचे हुबेहुब प्रात्यक्षिक आपल्या डोळ्यासमोर सध्या उलगडत आहे...
--- https://en.wikipedia.org/wiki/Beer_Hall_Putsch

हे पहा: The Beer Hall Putsch, also known as the Munich Putsch,[1][note 1] was a failed coup d'état by Nazi Party (Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei or NSDAP) leader Adolf Hitler, Generalquartiermeister Erich Ludendorff and other Kampfbund leaders in Munich, Bavaria, on 8–9 November 1923, during the Weimar Republic. Approximately two thousand Nazis marched on the Feldherrnhalle, in the city centre, but were confronted by a police cordon, which resulted in the deaths of 16 Nazi Party members and four police officers

अरे पण ह्या सगळ्याचा ऊद्देश फक्त मक क्रिएट करणे होता ना...असो...जाॅर्जीयामधे काल तात्यानी जिथे रॅली घेतली त्या एरीयात रिप. मते कमी झाली. रिप पार्टी साठी तात्या लायेबिलीटी झाले होते पण कालच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झालंय....आणि अनेक रिप धुरीणांनी हे मान्य करायला सुरूवात केलीये.

कॅपिटलमधे चाललेल्या गोंधळामुळे जॉर्जियाचे ऐतिहासिक विजय झाकोळले गेले. सिनेट आणि कॉग्रेस डेम्सच्या ताब्यात आलंय. मागे २५ व्या पानावर माझं विशफुल थिंकिंग लिहीलं होतं. पर्ड्यू जिंकणार(च), त्याची सीट शुअरशॉट आहे वगैरे इथेच वाचलं होतं.
स्टेसी अब्राम... डेम्स ओज हर अ लॉट.

सीबीएस म्हणतंय कि हे सगळं - ट्रंपच्या ११ वाजताच्या स्पीचसकट - प्लॅनिंगने केलेलं आहे.

मी रात्री अडीच ला वाचले सी एन एन वर. आता सकाळी अपडेट बघितला की कॅपिटॉल परत सेक्युअर झाले म्हणून. इतर देशांत रेजीम चेंज घडवून आण ताना कसे वाट्ते?! लोकशाहीचा तमाशा.

>>> अरे पण ह्या सगळ्याचा ऊद्देश फक्त मक क्रिएट करणे होता ना
--- लोल, ते काही कॉपी-पेस्ट विद्वानांचं म्हणणं हो! मास्तर नसूनसुद्धा, वेळोवेळी अशी चुकीची माहिती ते मोठ्या आत्मविश्वासाने देत असतात! ट्रम्पतात्यांच्या आतल्या गोटातली बित्तंबातमी जितकी इवान्का किंवा जॅरेड कुशनरला नसेल, तितकी ह्या स्वयंघोषित विद्वानांना असते! Happy

बाकी केली लेफ्ल्रबैंचे पराभवानंतर मतपरिवर्तन झालेले दिसते. आज त्यांनी अ‍ॅरिझोनातल्या इलेक्टर्सना वैध ठरवायच्या बाजूने मतदान केलं. सोबतच अनेक व्हाईट हाऊस स्टाफर्सनी उद्विग्न होऊन आपले राजीनामे दिल्याचं वृत्त आहे.

@अमा - >>> इतर देशांत रेजीम चेंज घडवून आण ताना कसे वाट्ते?!
--- अगदी, अगदी! ट्विटरवर आजच वाचलेलं:
If the United States saw what was going on in the United States and how the United States were treating its people, the United States would have invaded the United States.

>>> जॉर्जियाचे ऐतिहासिक विजय झाकोळले गेले....पर्ड्यू जिंकणार(च), त्याची सीट शुअरशॉट आहे वगैरे इथेच वाचलं होतं.
--- जॉर्जियातल्या रनऑफ इलेक्शन्स ह्या मुळात व्होटिंग राईट्स अ‍ॅक्ट मधून पळवाट म्हणून आणि 'व्हाईट पॉवर' टिकवायची म्हणून केला गेलेला उपाय आहे. अधिक माहितीसाठी हे पहा (पृष्ठ क्र. ६७) - https://www.nps.gov/subjects/tellingallamericansstories/upload/CivilRigh...

त्यातला महत्त्वाचा भागः
With the demise of the county unit system, Georgia politicians looked for other ways to preserve white power. In 1963, state representative Denmark Groover from Macon introduced a proposal to apply majority-vote, runoff election rules to all local, state, and federal offices. A staunch segregationist, Groover's hostility to black voting was reinforced by personal experience. Having served as a state representative in the early 1950s, Groover was defeated for election to the House in 1958. The Macon politico blamed his loss on "Ne**o bloc voting." He carried the white vote, but his opponent triumphed by garnering black ballots by a five-to-one margin.

Groover soon devised a way to challenge growing black political strength. Elected to the House again in 1962, he led the fight to enact a majority vote, runoff rule for all county and state contests in both primary and general elections. Until 1963, plurality voting was widely used in Georgia county elections, and the decision on whether to have a majority or plurality was left to the option of each local party executive committee throughout the state.

Why did Groover propose this significant alteration in January 1963? Two decades after
introducing the majority vote plan, he candidly admitted that back in the 1950s and 1960s, "I was a segregationist. I was a county unit man. But if you want to establish if I was racially prejudiced, I was. If you want to establish that some of my political activity was racially motivated, it was."

आणि आतापर्यंत हे डावपेच यशस्वीही होत होते. त्यातून वर पर्ड्यूला incumbency advantage ही होता.
मात्र, स्टेसी अब्राम्सचं ग्रासरुटमधलं काम आणि सिनेट कंट्रोलमुळे मिळालेली प्रसिद्धी यामुळे या खेपेला टर्नआऊट वर परिणाम झाला नाही. कित्येक लोकांनी - विशेषतः शहरात आणि उपनगरांत - प्रायमरीज, मुख्य निवडणूक आणि रनऑफ अशा तिन्ही वेळेला लांबचलांब रांगांना न जुमानता (obvious ploy to discourage voting - very effective on a weekday!) मतदान केलं आणि त्यातून हा बदल घडून आला.

वास्तविक अटलांटाच्या सुशिक्षित उपनगरांमध्ये, पारंपरिक मेनस्ट्रीम रिपब्लिकनांचं वर्चस्व आहे. ट्रम्पतात्यांनी जे काही चार वर्षं दिवे लावले, ते पाहता ह्या वर्गाने बायडनला वाढत्या संख्येने मतं दिली असली तरी - थोडं डोकं थार्‍यावर असलेला, फिस्कली कन्झर्व्हेटिव्ह आणि सोशली मॉडरेट रिपब्लिकन अद्यापही ह्या काऊंटीज जिंकू शकतो. त्यामुळे मुख्य निवडणुकीत पर्ड्यु आणि लेफ्लरना ट्रम्पतात्यांपेक्षा ह्या काऊंटीजमध्ये अधिक मतं मिळाली होती. मात्र रनऑफमध्ये दोन्ही उमेदवारांनी ट्रम्प विरुद्ध ब्रायन केम्प/Raffensperger वादात - तात्यांची बाजू घेतली आणि हातच्या सीट्स गमावल्या.

प्लीज नोटः सँक्च्युअरी सिटीज, स्ट्रॅटेजिक जेरीमँडरिंग इत्यादी गोष्टींचा इथे बादरायण संबंधही नाही! Happy

लोलोलोलोल

काही व्यक्तींनी हिंसा केल्यावर संपूर्ण ब्लॅक लाइव्हस मॅटर ला हिंसक म्हणून ब्रँड करणारे आज काय बोलतायत बरे ?

अमेरिकेसारख्या प्रगत देशात ही मारामारी वगैरे घटना घडते हे वाचून नवल वाटले. मुकुंद यांनी लिहिलेली सिव्हिल वॉरची शक्यता मलाही पटलेली नव्हती . प्रगत देशात असे काही होणे विरळाच . पण तात्या आणि समर्थक ज्या पद्धतीने वागत आहेत ते पाहून शक्यता आता नाकारता येत नाही.
तिसऱ्या वर्गातील देशांना लोकशाहीचे धडे देण्याऱ्या अमेरिकेवर ही पाळी आली हा एक विरोधाभास . एकंदरीतच तात्या हे प्रकरण अमेरिकेसाठी लज्जास्पद आहे. हे सगळं लवकरात लवकर संपून बायडन काकांनी सूत्रे हाती घ्यावी.

जाता जाता : तात्याच ट्विटर आणि फेसबुक खोट्या अफवा पसरवतात म्हणून बॅन केले आहे. अमेरिकन निवडणूकित सोशल माध्यमांची ही कृती कौतुकास्पद आहे.

ऐतिहासिक विद्रोह : बुधवार 6/1/2021

प्रेसिडेंट इलेक्ट जोसेफ बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यासाठी जमलेल्या कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत स्विंग राज्यातील निवडणूकांना आव्हान दिले आहे. रिपब्लिकन लीडरशिप या विरूद्ध आहे..टेक्सास सिनेटर टेड क्रूझ आणि इतर कॉग्रेस सदस्यांकडून अलबामा, अलास्का या दोन राज्यातील निवडणूकांचे सर्टीफिकेट स्वीकारल्यानंतर एॅरिझोना (बायडन विजय) मधील निवडणूकीला चॅलेंज करण्यात आले. संयुक्त अधिवेशन दोन तास रद्द करण्यात आले. हाऊस व सिनेट स्वतंत्र रित्या दोन तासांची चर्चा करण्यासाठी रवाना झाले. सिनेट मेजॉरिटी लीडर मिच मॅकोनेल (रिपब्लिकन लीडरशिप) यांनी शेवटी आपल्या पक्षाच्या सदस्यां विरूद्ध भूमिका मांडली व बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

50 राज्यांपैकी जवळपास 7+ राज्यातील निवडणूकीवर टेड क्रूझ व इतर सिनेट रिपब्लिकन्सकडून आक्षेप घेण्यात येतील. याचा अर्थ बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी किमान 24 तासांपेक्षा जास्त कालावधी लागेल ज्याने 6 जानेवारी ही पारंपारिक तारीख उलटेल असा अंदाज होताच त्यावर शिक्कामोर्तब झाले.

राष्ट्रपती निवडीची घोषणा सर्व राज्यातील इलेक्टरची मतमोजणी केल्यानंतर उपराष्ट्रपती करतात. विद्यमान उपराष्ट्रपती माईक पेन्स यांना मिशिगन, एॅरिझोना, व्हिस्कनसन, पेनसिल्वेनिया, नेवाडा, जॉर्जिया मधील इलेक्टर काऊंटला नकार देण्याचे अधिकार आहेत, अशा तद्दन खोट्या गैरसमजातून स्वतःच्या उपराष्ट्रपतीं विरूद्ध ट्रम्पनी मोहीम उघडली. उपराष्ट्रपतींकडे घोषणा करण्याशिवाय कोणतेही अधिकार नसतात याची कल्पना असूनही शेवटच्या प्रयत्नांना सुरू ठेवले. माईक पेन्स प्रचंड दबावाखाली आले होते. माजी सल्लागार जिम मॅटीस सारख्या लोकांनी या विरूद्ध स्टेटमेंट दिले आहे. शेवटी माईक पेन्सनी डोनाल्ड ट्रम्प विरोधात भूमिका घेत आपण संविधानाची शपथ घेतलेली असून लोकांच्या मताचा आदर करत असल्याने अशा कोणत्याही असंवैधानिक पध्दतींना विरोध करणार असल्याचे स्टेटमेंट जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्पनी लगेच ट्विटरवरून आपल्याच उपराष्ट्रपतीं विरूद्ध कठोर शब्दात टिका केली.

संयुक्त अधिवेशनाच्या सुरूवातीलाच माईक पेन्सनी आपल्या अधिकारांची मर्यादा स्पष्ट केली. तिकडे कॅपिटल हिलबाहेर डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा मोर्चा सुरू होता. डोनाल्ड ट्रम्पनी जमावास संबोधन कमी भडकविण्याचे काम जास्त केले. भडकलेल्या जमावाने कॅपिटल हिलची सुरक्षा ब्रेक केली. त्यानंतर अगदी वेबसिरीज मधील घटना असाव्यात अशा कथांची सुरुवात झाली. कॅपिटल हिलबाहेर सुरक्षा होती तिला इतक्या सहज ब्रेक करणे निव्वळ अशक्य आहे. कॉनफेडरेट झेंडे घेऊन हिलच्या दुसऱ्या मजल्यावर निदर्शकांनी कूच केली. माईक पेन्स आणि क्रमवारीतील महत्वाच्या नेत्यांना सिक्रेट सर्विसने बिल्डींग मधील गुप्त ठिकाणी रवानगी केली. सिनेट चेंबर बंद करण्यात आले. गॅलरीत अनेकांनी आडोसा घेतला. तिकडे काचांची फोडाफोड सुरू होती. स्टॅट्यूटरी हॉल पर्यंत मजल पोहचली. हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या ऑफीसमध्ये तोडफोड करण्यात आली.

DC च्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयातील एक्सप्लोजिव डिव्हाईस जप्त करण्यात आले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयाला
त्वरित रिक्त करण्यात आले. नॅशनल गार्डच्या त्वरित हस्तक्षेपाची अपेक्षा होती मात्र त्यांनी सुरूवातीला नकार दिला. काही क्षणातच प्रेस सेक्रेटरी @PressSec यांनी नॅशनल गार्ड परिस्थितीवर काबू मिळवण्यासाठी रवाना झाल्याचे जाहीर केले.

वॉशिंग्टन पूर्ण राज्य नसल्याने मेयर हतबल होते. व्हर्जिनियाने 200 सैनिकांचा ताफा कॅपिटल हिलकडे रवाना केला. तोपर्यंत प्रचंड नासधूस झाली.

अमेरिकन डेमॉक्रसीची शकले उडत होती. ब्रिटिश पंतप्रधानांनी घटनेवर प्रचंड नाराजी जाहीर केली सोबत पीसफूल ट्रान्स्फर ऑफ पॉवर करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तुर्की आणि अनेक नाटो सदस्यांनी स्टेटमेंट जाहीर केले.

अंतर्गत राजकारण ढवळून निघाले. बिल क्लिंटन, बराक ओबामा, मिट रोम्नी यांनी आपापली विधाने प्रेसला रिलीज केली. बायडननी आपल्या स्टेटमेंट मध्ये हा राष्ट्रद्रोह असल्याचे सांगितले.

25th अमेंडमेटची चर्चा सुरू आहे. कॉग्रेस पुन्हा एकदा एकत्र येतेय. कॉग्रेसवुमन इलिहान ओमार महाभियोगाचा परिच्छेद वाचणार असल्याचे जाहीर केले. कॉग्रेसवुमन कोरी बुश यांनी हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या कॉग्रेस सदस्यांची हकालपट्टी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. DC मध्ये कर्फ्यू असले तरी आंदोलक अजूनही तसेच आहेत. मॉडर्न तख्तापलट करण्याचा अयशस्वी प्रयत्न संपूर्ण देशभर सुरू आहे. अनेक राज्यांच्या कॅपिटल बिल्डींग बाहेर ट्रम्प समर्थकांचा जमावडा सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाही.

जॉर्जिया सिनेट रनऑफ निवडणूकांतील निकाल जाहीर होत असताना या घटना घडल्या. पराभूत उमेदवार सिनेटर केली लॉफ्लर यांनी आश्चर्यकारक रित्या आपण राज्यांच्या सर्टीफिकेटशनवर आक्षेप घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

Drama is on..

__________

फर्स्ट लेडी मेलिनिया ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ स्टिफनी ग्रिसम यांनी राजीनामा दिला. अनेक व्हाईट हाऊस सदस्यांचा राजीनामा सत्र सुरू झाला आहे.

» White House Deputy Press Secretary, Sarah Matthews
» White House Social Secretary, Rickie Niceta

Contd..

मृगा मृगैः सङ्गमुपव्रजन्ति गावश्च गोभिस्तुरगास्तुरंगैः ।
मूर्खाश्च मूर्खः सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम् ।।

दन्गा , बडबड हे समानशील

It is very painful to witness this Sad May God bless the United States of America!
May Biden presidency and flipping of Georgia be the first of many changes in the right direction _/\_

>>> DC मध्ये कर्फ्यू असले तरी आंदोलक अजूनही तसेच आहेत.
--- आणि वर पोलिसांशी हाणामारी करतानाचे व्हिडिओज पहायला मिळाले. यांच्या जागी अ-श्वेतवर्णीय मोर्चा असता तर?

हे म्हणजे वीस डॉलरची नोट खोटी असल्याचा संशय आला की पोलिस शब्दशः मानगुटीवर बसून जीव घेतात (मुगुट घालून रत्नांग्रीच्या जेलात पाठवलेलं तरी बरं यापेक्षा!), आणि दोन मिलियन डॉलर्सचा केला की वाशिण्ग्टन डीशीस पाठवतात - पुतिननियुक्त लोकप्रतिनिधींचा नेता!

https://www.foxnews.com/politics/potus-to-pay-2-million-admits-misuse-of...

https://www.youtube.com/watch?v=JpUxQyLCBbk&feature=emb_logo

कालच्या गोंधळाला फक्त ट्रंप जबाबदार नाही. त्याच्याइतकेच किंवा जास्तच रीप्बलिकन्स, फॉक्स न्यूज आणि आंधळेपणानं त्याला सपोर्ट करणारे लोकही आहेत.

ट्रम्प: ओ पेन्स, माझा विजय जाहीर करा ना?
पेन्स: साहेब, मला माझ्या लायनीपरमाने जाऊ दे.
ट्रम्प: अहो चटचट स्टेटमेंट लिहून घ्या की बायडन हरला आणि मी जिंकलो
पेन्स: आमाला पॉवर नाय
ट्रम्प: तुम्हाला पॉवर नाही? म्हणजे तुम्ही रिपब्लिकन नाही?
पेन्स: रिपब्लिकन नाही तर काय वोक आहे?

ट्रम्प जहाज बुडणार, हे पेन्स दादांनी लाईफ जॅकेट परिधान केल्यावर बऱ्याच MAGA टाळक्यांना उमगले असावे अशी आशा.

चला, जॉर्ज्या रनऑफचा निकाल देखील रिपब्लिकन्स्च्या विरोधात लागला. लॉफ्लरची सीट शेकि होतीच, पण पर्डुचा पराभव अनपेक्षीत. आता ओबामाकडे नसलेलं सेनेट बाय्डन कडे आहे. ए बिग लेवरेज?! Wink

बहुतेक सेनेट सीट बरोबर लॉफ्लर्ची ड्रिमची ओनरशीप पण गेल्यात जमा, किंग जेम्सने बोली लावलेली आहे.

अरे मुकुंद, अमेरिकेत यादवी वगैरे कहि होणार नाहि रे. पण काल झालेल्या व्हायलंसचा निषेध. डिसी मधे आणि सोमिवर व्हायलंस करणारे फुटकळ लो लाइफ्स काहि वेळातंच पुर्विसारखे आपापल्या बिळात जातील. सिस्टम इज केपेबल ऑफ हँडलिंग सच नुसंस. नो वरीज...

ए बिग लेवरेज?>>> वुई विल सी! वुई हॅव अ‍ॅट लिस्ट टू ईअर्स. इथेच लिहीता येईल.

डिसी मधे आणि सोमिवर व्हायलंस करणारे फुटकळ लो लाइफ्स >>>> म्हणजे कोण? ट्रंप?

सिस्टम इज केपेबल ऑफ हँडलिंग सच नुसंस. नो वरीज...>>>दॅट इज नॉट द पॉईंट. पॉईंट इज या सगळ्याला जबाबदार अमेरीकेच्य सर्वोच्च पदावर बसलेला नेता आहे. ज्याने केवळ आणि केवळ स्वतःचा फुटकळ इगो जपण्यासाठी हजारो लोकांना फूस लावली आणि संसदेवर हल्ला करवला. संसद हे लोकशाहीचं प्रतीक आहे. म्हणजे लोकशाहीवरच हल्ला केला गेला. हे अ‍ॅक्सेप्टेबल आहे, देशप्रेम आहे, 'यू आर स्पेशल, वुई लव्ह यू' वगैरे मुक्ताफळं उधळली हा 'सच नुसंस'????? सिरीअसली??? हा फक्त 'नुसंस' आहे??

आणि बाकी सगळ्यांना फूस लावून हा बिळात जाऊन बसला. सच अ डिस्ग्रेस टू द कंट्री अँड टू द प्रेसिडेंसी. आज स्टॅटमेंटमधे 'फोर ईअर्स ऑफ ग्रेटेस्ट प्रेसिडेंसी इन द हिस्टरी' म्हणला :कपाळबडवती:

प्लिज नोटः आय हॅव पर्पजली रिटन इन 'मिंग्रजीं, (होपफुली) सो यू विल रीड द एन्टायर पोस्ट.

ए बिग लेवरेज? >> नाही, दुर्दैवाने बायडन सभ्य मनुष्य आहे. त्याला जनाची नसली तरी मनाची तर चाड आहे. त्याच्या आधीच्या एककल्ली सायकोपाथ मनुष्यासारखे हेकट, उर्मट पणे वागणे त्याला जमणार नाही त्यामूळे तो दोन्ही बाजूण्मा सामावून वागण्याचा प्रयत्न करेल. मॉस्को मिच मायनॉरिटी मधे असला तरी अजूनही आहे त्यामूळे आधी सुरू असलेला हलकटपणा पुढेही सुरू राहील.

पण काल झालेल्या व्हायलंसचा निषेध. >> हे विधान आवडले. व्हायलंस ईन्सआईट करणार्‍यांना नि व्हायलंस करणार्‍यांबद्दल पण एखादा चुकार शब्द असता तर ...... असो, तात्याच्या नंतरच्या (जे आत्ता उडवले गेले आहे) त्या 'आय अ‍ॅम प्राऊड ऑफ यू, आता शांतपणे घरी जा' व्हिडीयो ची आठवण झाली उगाचच आपली.

हा 'सच नुसंस'????? सिरीअसली??? हा फक्त 'नुसंस' आहे?? >> अंजली अगदी मनातले बोललीस.

प्लिज नोटः आय हॅव पर्पजली रिटन इन 'मिंग्रजीं, (होपफुली) सो यू विल रीड द एन्टायर पोस्ट. >> आज ऐकत नाहीयेस एकदम Happy

>>त्यामूळे तो दोन्ही बाजूण्मा सामावून वागण्याचा प्रयत्न करेल. मॉस्को मिच मायनॉरिटी मधे असला तरी अजूनही आहे त्यामूळे आधी सुरू असलेला हलकटपणा पुढेही सुरू राहील.<<
आय्ला म्हणजे काय? मेजॉरिटि नाहि म्हणुन इतके दिवस जाहिरपणे रडारड होती, आता मिळाली तर सगळ्यांना सामावुन घेण्याचा स्टांस? तुझं मकानेल बाबतचं मत गृहित धरलं, तर मग लोकांची कामं कशी होणार? इदर वे, पिपल वोटेट फॉर यु वुड गेट स्क्रुड; असं म्हणायचं आहे का तुला... Lol

पेन्स: रिपब्लिकन नाही तर काय वोक आहे? >>> Happy

ट्रम्प जहाज बुडणार, हे पेन्स दादांनी लाईफ जॅकेट परिधान केल्यावर बऱ्याच MAGA टाळक्यांना उमगले असावे अशी आशा. >>> कालच्या भरवशावर खूप जण होते. एको चेंबर्स मधे अनेकांना असे वाटत होते की कान पेन्स निकाल फिरवणार. ट्रम्पने तर पब्लिला फूस लावलीच. पण अनेक रिपब्लिकन नेते, सिनेटर्स, रिप्रेझेण्टेटिव्हजनी सुद्धा या आगीत तेल ओतले गेले दोन महिने. टोटल बकवास लॉसूट्स (६२ पैकी ६१ फुस्स झाले. त्यातले अनेक तर हास्यास्पद होते), पार्किंग मधे नाचवलेले पण कोर्टात सादर न केलेले "पुरावे", एका बाजूने मीडियाला शिव्या देताना पुन्हा मीडियामधेच केलेल्या वल्गना - बिग बिब्लिकल बॉम्बशेल्स वगैरे- यातून स्वतःच्याच लॉयल मतदारांना दोन महिने नुसतेच झुलवत ठेवले, ते ही यातून काही निष्पन्न होणार नाही हे माहीत असताना.

काल अचानक नैतितकेचे पाठ वाचणारे बहुतेक रिपब्लिकन नेते गेले दोन महिने कुंपणावर बसून कल जिकडे जाइल तिकडे जाउ छाप पवित्रा घेत होते. काल शेवटी जहाज बुडणार हे दिसल्यावर लगेच ट्रम्पला डिसओन करून लोकशाहीची काळजी यांनाच होती छाप वक्तव्ये सुरू केली.

चार वर्षे ट्रम्पची कारकीर्द कशी होती याबद्दल एकवेळ वाद होईल. पण ३ नोव्हेंबरनंतर त्याने जे काय केले ते क्रिमिनल आहे. इथल्या परिभाषेत ही वॉज अ सोअर विनर, अ‍ॅण्ड अ‍ॅन इव्हन सोअर लूजर.

व्हीपी ला सहसा पुढच्या वेळी प्रेसिडेण्टपदाचा - किमान उमेदवारीचा चान्स असतो. पेन्स च्या डोक्यात तसे काही असेल तर त्याने ताबडतोब ट्रम्पला हटवून जीओपी च्या बेस ला आवाहन करायला हवे. नाहीतर त्याची राजकीय कारकीर्द संपल्यातच जमा आहे. आता पुढे येउन काही केले तरच जीओपी मधे जी ट्रम्पविरोधी फॅक्शन आहे व पुढचे काही दिवस वाढेल - त्याचा फायदा घेण्याचा चान्स आहे. त्याला पार्टी सपोर्टही मिळेल.

प्रॉब्लेम आहे ट्रम्पने मतदारांमधे जो भस्मासूर उभा केला आहे त्याचा. ही निवडणूक टोटल फ्रॉड होती. खरे म्हणजे ट्रम्प जिंकला आहे. असंख्य पुरावे होते पण कोर्टाने ते बघितलेलेच नाहीत. केम्प पासून पेन्स पर्यंत सगळे गरीब बिचार्‍या ट्रम्पच्या मागे हात धुवून लागले आहेत, व हे सगळे प्रोटेस्ट वगैरे करून आपण लोकशाही वाचवत आहोत वगैरे डिल्यूजन मधे अजूनही असंख्य लोक आहेत. यांना ठामपणे सत्य काय आहे ते सांगायची हिंमत फार कमी रिपब्लिकन्सनी केली आहे. आताही ते कितपत करतील माहीत नाही.

फारेंड दोन्ही पोस्ट +१
हा बाटलीतून बाहेर आलेला राक्षस रिपब्लिक पार्टीच जाळून टाकेल.

दुसर्‍या पोस्ट ला अनुमोदन फा. विकू हा राक्षस फक्त पार्टीच जाळेल का अशी शंका आहे आत्ता.

आता मिळाली तर सगळ्यांना सामावुन घेण्याचा स्टांस? >> समोरच्या बाजूला समजुन घेऊन एकत्र काम करता येते. तू पडलास तात्याचा समर्थक, त्यामूळे तुला न समजणे सहज समजू शकतो रे. पण जनरली बरेच लोक असच काम करतात रे. 'माझं तेच खर' ( तुमचा शब्द : alternate truth ) हा हेका धरणारा बायडन तरी वाटत नाही. एखाद दुसर्‍या बाबती मधे होईलही पण जनरली मध्यम मार्ग काढला जआईल असे मला वाटते. मॉस्को मिच , लायिंग टेड क्रूज सारखे नतद्रष्ट लोक नि फा ने वर म्हटलय तसे "गेले दोन महिने कुंपणावर बसून कल जिकडे जाइल तिकडे जाउ बघणारे पण काल अचानक नैतितकेचे पाठ वाचणारे लिंड्से ग्रेहम सारखे रिपब्लिकन नेते " त्यात काड्या घालण्याचा पूर्ण प्रयत्न करतील ह्याचीही मला पूर्ण खात्री आहे.

फा पहिल्या पोस्टला +१. पण,
ट्रंपला केवळ ६३ दिवसांपूर्वी ७४ मिलियन लोकांनी मतदान केले आहे. काल जे झालं तो कळस होता म्हटलं (अर्थात हे पुढचा कळस येई पर्यंतच! हे जाणुन आहे. आणि पुढचा कळस यायला अजुन वाव आहे, तब्बल १४ दिवस आहेत) तर तशाच क्रिमिनल गोष्टी/ अन-रिपब्लिकन गोष्टी गेल्या चार वर्षांत अनेकोनेक विटेवर विट रचत झाल्या आहेत. त्या होऊनही जर ७४ मिलियन लोक पाठिंबा देत असतील तर कालच्या गोष्टीने किंवा सत्य सांगुन रिपब्लिकन मते मिळणार नाहीत तर माथेफिरू गोष्टी केल्याने मिळतील हा विश्वास रिप्स लीडरशिपचा अधिकाधिक दृढ झाला आहे, झाला असेल.

राक्षस २००८ला बाहेर निघाला आहे. त्याने रिपब्लिकन पार्टी नाही कदाचित पण रिपब्लिकलाच हाळा लागतील! :रागः

७४ मिलीयन लोकांना सर्व क्रिमिनल गोष्टी माहीत असूनही ते त्याच्याच मागे आहेत असे नाही रे. अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत एकतर पोहोचतच नाहीत किंवा फॉक्स द्वारे सुलभरीत्या डायल्यूट करून पोहोचतात ("no collusion!"). त्यामुळे बहुतेकांचे इम्प्रेशन "माणूस भंपक आहे. पण डावे, चीन वगैरेंना तोच ठोकू शकतो. बाकीचे कमकुवत किंवा विकले गेलेले आहेत" असे आहे.

सगळीकडे असेच एको चेंबर्स भरले आहेत. शहरी मध्यमवर्गीयांना दिसणारे मोदी वेगळे व (खर्‍या किंवा सो कॉल्ड) वैचारिक्/लिबरल संप्रदायला दिसणारे वेगळे. विकुंना दिसणार्‍या सोनिया गांधी वेगळ्या व आपल्याला व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी मधून भेटणार्‍या वेगळ्या Happy त्यामुळे देशद्रोही, जगद्रोही व युनिव्हर्सद्रोही कृत्ये करणार्‍या सोनियाजी विकुंना तरीही कशा आदरणीय आहेत असा प्रश्न मला पडण्यासारखे आहे Proud

राज... यादवी युद्ध होउ शकणार नाही हे तु छातीठोकपणे सांगु शकतोस?

अमेरिकेचा राजकिय इतिहास व या लोकांचा पिंड याचा जर तु थोडासुद्धा अभ्यास केलास तर तुझ्या विधानातला फोलपणा तुला दिसुन येइल...

हिस्टरी रिपिट्स इटसेल्फ!... इफ वुइ डु नॉट लर्न एनिथिंग फ्रॉम इट...

१८६० ची अमेरिका ..स्लेव्हरी, स्टेट राइट्स व स्टेट सॉव्हर्निटी या मुद्द्यावर... जेवढी डिव्हायडेड होती त्याच्यापेक्षा जास्त आज डिव्हायडेड नसली तरी तितकीच डिव्हायडेड आहे!....

“हाउस डिव्हायडेड.. ऑन इटसेल्फ... कॅनॉट स्टँड” ... अ‍ॅब्रॅहम लिंकनचे हे १८५८ च्या इलिनॉय सेनेटर साठी नॉमिनेट केल्यावर केलेले वक्तव्य... आजही तेवढेच लागु पडु शकते... खासकरुन ट्रंपसारखा भस्मासुर जर लवकरच गाडुन टाकला नाही तर..

गेल्या ५ वर्षात त्याने जी अनेक वेळा.. जी अनेक मुक्ताफळे केली आहेत ती जर अमेरिकेच्या ऐतिहासीक पार्श्वभुमीवर बघीतलीस तरच तुला कळेल मी काय म्हणत आहे.

नंदन.. जर तुला इतिहासात रस असेल तर विलिअम शेररचे... “ राइझ अँड फॉल ऑफ थर्ड राइश”.... हे अप्रतिम पुस्तक जरुर वाच..

त्यात शेररने तो म्युनिक बिअर हॉलचाच प्रसंग नाही तर ...सबंध १९१८ ते १९४५ चा तत्कालीन इतिहास... जबरदस्त डिटेलमधे लिहीला आहे...

१९१८मधे .. व्हर्सायचा तहानंतर जर्मनीत तयार झालेले वायमार प्रजासत्तक “ नोव्हेंबरचे हरामखोर“.. असा त्यांचा प्रचार करुन.. त्याने कसे कमकुवत केले.... तिथपासुन ... पुढच्या १५ वर्षात त्याने जर्मन जनतेला ...हळु हळु आपल्या जाळ्यात कसे ओढले.. मग..१९३३ मधल्या बर्लिनमधल्या राइशटॅग फायरचे कारण साधुन... १९३३ मधे तो जर्मनीचा सत्ताधिश कसा झाला व त्या १५-२० वर्षात..... त्याने कसा परत एकदा... जर्मनीला “ ग्रेट अगेन!” ... बनवणार आहे.... असे म्हणत जर्मन जनतेचा कंप्लिट ब्रेन वॉश केला व शेवटी जर्मनीला त्याने दुसर्‍या महायुद्धाच्या खाईत कसे लोटले.. हा सगळा इतिहास त्याने मस्त लिहिला आहे.

ते वाचताना तुला त्यात व ट्रंपने जे गेल्या ५-६ वर्षात केले व करत आहे.. त्यात खुप साम्य दिसुन येइल.

“ मेक अमेरिका ग्रेट अगेन!” हे पान त्याने हुबेहुब हिटलरच्या. “ मेक जर्मनी ग्रेट अगेन!”... या विचारातुन घेतले आहे. हिटलरने जसा..गोबेल्सचा उपयोग.. “ आल्टरनेटिव्ह रिअ‍ॅलिटी“.. चा प्रचार करायला करुन घेतला .. तसाच ट्रंप.. केलिअ‍ॅन कॉनवे.. रुडी ज्युलिआनी...वगैरे हे जे त्याचे सरोगेट्स आहेत... त्यांचा उपयोग.. “ आल्टरनेट टृथ“.. तयार करायला करायला घेतो..

मग त्या “ आल्टरनेट टृथ “ व “आल्टरनेट रिअ‍ॅलिटीलाच” रिअ‍ॅलिटी आहे असे समजुन मग त्याचे ब्रेन वॉश केलेले आंधळे भक्त... अमेरिकन निवडणुक पद्धत कशी करप्ट आहे.. डेमोक्रॅट्स स्टोल द इलेक्शन फ्रॉम हिम.. तोच कसा खरा प्रेसिडेंट आहे.. सगळे न्युज चॅनल्स कश्या फेक न्युज देतात.. सगळे जग त्याच्या विरुद्ध कसे आहे... अश्या “ आल्टरनेट रिअ‍ॅलिटी“ वर आंधळ्यासारखे विश्वास ठेवतात.

त्याचीच परीणीती म्हणजे.. “ मागा“ हॅट्स घालुन.. ए के ४७ हातात घेउन.. ट्रंप सपोर्टर्सनी केलेला कालचा.. अमेरिकेच्या संसदेवरचा व पोलिसांवर केलेला हल्ला..

@मुकुंद - आभार, ते पुस्तक कधीपासून वाचण्याच्या यादीत आहे. तूर्तास सिन्क्लेअर लुईसचं 'It Can't Happen Here' वाचतो आहे - विषय हाच. त्यात लिहिलेली वर्णनं जशीच्या तशी आजच्या काळात लागू पडतात.

बाकी, एकंदरीत 'डिनाय - डाऊनप्ले - डायव्हर्ट'ची स्ट्रॅटेजी पाहून आश्चर्य वाटलं नाही. ये तो बाबुराव का पुराना इष्टाईल है! Happy

दुपारी साडेबारा वाजता तात्या आपल्या समर्थकांना 'कॅपिटॉलला जा आणि तिथल्या न जुमानणार्‍या ("वीक") सिनेटर्सना "शो ऑफ स्ट्रेन्ग्थ" दाखवा असं आवाहन करतात (Now it is up to Congress to confront this egregious assault on our democracy. And after this, we're going to walk down and I'll be there with you. We're going to walk down-- We're going to walk down. Anyone you want, but I think right here, we're going to walk down to the Capitol-- And we're going to cheer on our brave senators and congressmen and women and we're probably not going to be cheering so much for some of them. Because you'll never take back our country with weakness. You have to show strength and you have to be strong.) आणि ही मेंढरं मग कॅपिटॉलमध्ये घुसतात - हा योगायोग निश्चितच नाही.

तात्यांनी फक्त स्वतः मोर्चाचं नेतृत्व करायचंच काय ते बाकी ठेवलं होतं! बरोबर आहे - व्हाईट हाऊस ते कॅपिटॉल हे प्रचंड अंतर तात्या चालतील कसे काय? गोल्फ कार्ट्समधून मोर्चा निघाला असता फ्लोरिडातल्या म्हातार्‍यांसारखा तर गेले असते की नै टुण्णकन? Wink

असो, घुसखोरांची ओळख हळूहळू पटू लागली आहे. त्यात सॅन डिएगोहून वॉशिंग्टनला गेलेली एक व्हेटरन सैनिक होती (जी कॅपिटॉलच्या आत मृत्युमुखी पडली), एक अयशस्वी अ‍ॅक्टर जो अनेक क्यू-अ‍ॅनॉनच्या निदर्शनांत सामील होता (शिंगं बाधून फिरणारा) आणि एक तर चक्क West Virginia House of Delegates चा रिपब्लिकन सदस्य - West Virginia delegate records himself storming U.S. Capitol
(दुवा: https://apnews.com/article/social-media-electoral-college-west-virginia-...)

Pages