अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>एओसी ने गळा कापायची भाषा केली आहे ? आणि समजा केली असली तर ह्यांनी केलेले समर्थनीय होते होय ?<<
अर्थात नाहि. पण तु आज, आणि मागे सुद्धा हा "बॅनन"चा मुद्दा आवर्जुन काढला होतास म्हणुन लेडि बॅनन (एओसी) चं ट्वीट उदाहरणा दाखल दिलं. बाकि काहि नाहि. माझ्यामते भाषा वेगळी असली तरिहि गर्भितार्थ तोच आहे. पोलिटिकल अ‍ॅडवर्सरिजची लिस्ट तयार करायला घेण्यामागचा हेतू मला सांगावा लागु नये असं वाटतंय. यु अग्री?

>>नॅन्सी पलोसी किती मुर्ख आहे हे तिने आज सिद्ध केले..<<
ते तर आहेच रे, पण $१.८ ट्रिल्यनचं पॅकेज ट्रंपने दाखवलं ते केवळ एक गाजर होतं. इट वुड हॅव नेवर सीन ए डेलाइट. असो.

इथे लिहित रहा, रोजच्या रडगाण्यात तुझ्या पोस्टस म्हणजे एक रिलिफ असतो... Happy

“आता मागे वळून पाहता , कुणि काहीही म्हणा , जगात काय वाटेल ते झाले तरी आम्ही तात्यालाच मते देणार असे विचार करणारे इतके लोक आहेत हे कुणालाच वाटले नव्हते.”...

अजय... विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट... या तुमच्या व सर्व डेमॉक्रेटिक पक्षाच्या समर्थकांच्या विचारातच गोची आहे.

२०१६ मधे ट्रंप हिलरीला हरवुन (व सर्व मुर्ख पोलस्टर्सना .. त्यांचा मुर्खपणा सिद्ध करत) .. अनपेक्षितपणे जिंकला.. त्यापासुन डेमॉक्रॅटिक पक्ष व त्यांचे लिडर्स यांनी काहीच बोध घेतला नाही.. तेव्हापण ते सगळे आश्चर्यचकित होउन.. हेच म्हणत होते.. ट्रंपला एवढी मते कोणी व कशी दिली? (मुर्ख पोलस्टर्सवर त्यांचा पुर्ण भरवसा होता).

त्यापासुन जर का ते शिकले असते की ..सगळे पोल्स्टर्स हे मुर्ख आहेत व त्यांच्यावर विश्वास ठेवु नये .. तर निवडणुकीच्या आधीच नॅन्सी पलोसी अश्या वल्गना करत बसली नसती. फुकटच्या आत्मविश्वासमुळे.. शी ऑल्मोस्ट मॅनॅज्ड टु लुज द मेजॉरीटी इन द हाउस!

त्याउलट.. रिपब्लिकन पक्षाचा.. श्रुड व आडमुठ्या मेजॉरीटि लिडर..मिच मॅकॉनल.. २०१४ पासुन .. जास्त गाजावाजा न करता.. सुमडिकपणे.. मस्त खेळी खेळला.

२०१३ मधे डेमॉक्रॅटिक पक्षानेच केलेल्या नविन नियमाचा पुरेपुर उपयोग करुन त्याने गेल्या ६ वर्षात .. लोअर व अपिल्स कोर्टात..शेकड्याने कंझरव्हेटिव्ह जजेस नेमले.. इतकेच नव्हे तर गेल्या ४ वर्षात ३ ... एक्स्ट्रिमली कंझरव्हेटिव्ह तरुण सुप्रिम कोर्टाचे जजेस नेमायला त्याने रिपब्लिकन पार्टीला मदत केली व रिपब्लिकन बेसला अति खुष केले. त्या त्याच्या कामगिरीमुळे रिपब्लिकन बेसने.. भरभरुन व्होटींग करुन ......सेनेटमधली त्यांची रिपब्लिकन मेजॉरीटी ऑल्मोस्ट टिकवुन ठेवली आहे.

तितकेच नव्हे तर गुबरनेटिरिअल रेसेस मधेपण रिपब्लिकन गव्हर्नर्सना खुप राज्यात गव्हर्नरशिप्स व स्टेट हाउसेस जिंकण्यात मॅकॉनलच्या कामगिरीमुळे मदत झाली. त्या रेसेस जिंकल्यामुळे.. आता रिपब्लिकन पार्टीला...त्या राज्यात... त्यांना अनुकुल होइल असे.. जेरीमिअँडरींग करायला रान मोकळे झाले आहे.

असे कंझरव्हेटिव्ह जजेसची नेमणुक व जेरीमिअँडरींगवरचा हक्क.. या २ गोष्टींमुळे.. पुढची काही दशके.. मिच मॅकॉनलच्या क्रुपेने.. अमेरिकेच्या लेजिस्लेटिव्ह व ज्युडिशिअल सिस्टिमवर.. रिपब्लिकन पार्टीची मगरमिठी असणार आहे. सुप्रिम कोर्टात ६-३ अशी रिपब्लिकन मेजॉरीटी असल्यामुळे.. ओबामाकेअर व रो विरुद्ध वेड ..या दोन गोष्टीं पुढच्या १-२ वर्षात नामशेष होतीलच.

डेमॉक्रेटिक पार्टीला व त्यांच्या फॉलॉअर्सना.. मिच मॅकॉनलचा कितीही तिटकारा वाटत असला तरी.. डेमॉक्रॅटिक पार्टीत.. मॅकॉनलसारखा.. बेरक्या व शकुनीमामासारखा... लिडर असायला हवा होता.. असे सुप्तपणे त्या पक्षातील अनेकांना वाटत असेल.

उलट डेमॉक्रेटिक पार्टीला नॅन्सी पलोसी सारखे.. नुसत्या मुर्ख पोलस्टर्सवर( परत एकदा!) विश्वास ठेवुन.. मोठमोठ्या वल्गना करणारे ...करोना व्हायरस रिलिफ बिल ३.२ ट्रिलिअन वरुन... २.२ ट्रिलिअनवर व आतातर फक्त ९०० बिलिअनवर.. येउन... तडजोड करायला तयार होणारे.. लिडर्स मिळाले आहेत.

पण हा बेरक्या मिच मॅकॉनल .. तो आधीपासुन म्हणत होता तसे.. फक्त ५०० बिलिअन्सचेच रिलिफ बिल.. तिच्या घशात उतरवणार आहे...असेच मला वाटत आहे.

एक स्वींग , इंडिपेंडंट व्होटर म्हणुन... राज , शेंडेनक्षत्र... तुम्हाला एक साधा प्रश्न आहे...

यु गाइज( पक्षी कट्टर ट्रंपभक्त).. यु गाउज.. यु कांट हॅव्ह युअर केक अँड इट इट टु... एका बाजुला व्होटर फ्रॉड झाले आहे असे म्हटले तर .. नुसते प्रेसिडेंटशिप मिळवायलाच डेमॉक्रेटिक लोकांनी त्या फ्रॉडचा उपयोग केला असे तुम्हाला खरच वाटते? तुम्हाला माहीत असेलच की अमेरिकेत नुसत्या प्रेसिडेंटला अगणीत पॉवर नसते.. त्याच्या जोडीला.. सेनेट मेजॉरीटी असली तरच प्रेसिडेंट त्याचा अजेंडा पास करु शकतो.

व्होटर फ्रॉड करणे जर एवढे सोप्पे असते अमेरिकेत तर डेमॉक्रॅटिक पक्षाने सेनेट मेजॉरीटी सुद्धा सहज गॉबल अप केली असती.

शिवाय.. ज्या राज्यात ट्रंप... फ्रॉड झाले फ्रॉड झाले ...असे कोकलत आहे त्या सगळ्या राज्यात रिपब्लिकन गव्हर्नर्स व अ‍ॅटर्नी जनरल्स आहेत.. ते सगळे व त्या सगळ्या राज्यातील.. रिप्ब्लिकन पार्टीनेच नेमलेले ..जजेस सुद्धा केसेस डिसमिस करत आहेत.. असे म्हणत देअर इज नो प्रुफ.. इतकेच काय.. ट्रंपसमोर हाताची घडी घालुन.. मान खाली करुन .. ट्रंपचे कधीही पाय धरेल.. ( व चाटेल)...अशी बॉडी लँगवेज असलेला.. ट्रंपने स्वतः नेमलेला.. त्याचा अ‍ॅटर्नी जनरल बिल बारसुद्धा म्हणत आहे.. देअर इज नो फ्रॉड!

असे असताना.. फक्त ट्रंप ( व रुडी ज्युलिआनीसारखा जोकर) म्हणतो की फ्रॉड झाला आहे म्हणुन फक्त त्याच्या एकट्यावरच विश्वास ठेवायचा? दॅट काइंड ऑफ डीप स्टेट कॉन्स्पिरसी थिअरी.... इज व्हेरी व्हेरी हार्ड टु बिलिव्ह अँड .. इव्हन हार्डर टु डायजेस्ट! सॉरी!

शेंडेनक्षत्र यांचे खरे आहे.
खोट्या मतदानाचे पुरावे सगळ्या लोकांनी मिळून नष्ट केले. अगदी रिपब्लिकन गव्हर्नर्स, इतर अधिकारी यांच्या डोळ्यादेखत. पण त्यांना धमकी देऊन गप्प बसवले. त्यांच्या बायकामुलांना पकडून ओलिस ठेवले. नि तसे करणारे सगळे गोरे होते म्हणून पोलिसांनी त्यांना पकडले नाही.

जसे माणूस खरोखरच चंद्रावर गेला होता असे सांगून सगळ्या लोकांना फसवले तसे.

सेप्टेंबर ११ चा हल्ला पण डेमोक्रॅट्सनीच केला. पण रिपब्लिकन म्हणजे संतमहात्मे. त्यांनी डेमोक्रॅट्स्ना क्षमा केली.

ओबामा खरोखरच केनियात जन्मलेला असून मुसलमान होता, पण शेंडेनक्षत्र सारखे काही थोडे लोक सोडले तर इतर ३२९ मिलियन लोकांनी मिळून पुरावे लपवले.

आता कठीण आहे. बायडेन सरळ सरळ रिपब्लिकन लोकांना गोळ्या घालून ठारच मारणार आहे, त्यांचे सगळे पैसे, मालमत्ता जप्त करणार.
ओकेसी, वगैरे चार बायका भर कॅपिटॉल मधे जाऊन मकॉनेल इ. ना गोळ्या घालणार. तिने स्वतःच सांगितले आहे!
असो.
काही नवीन सिनेमे, नाटके?

>>तुम्हाला एक साधा प्रश्न आहे...<<
मुकुंद, माझं उत्तरहि साधंच आहे. नाहि.

मला स्वत:ला ट्रंप सगळे खटले हरावा असंच वाटतंय. आणि हे त्याच्या अडेलतट्टुपणा मुळे नाहि, तर निवडणुकित फ्रॉड झालेला नाहि हे सुप्रीम कोर्टात सिद्ध व्हावं म्हणुन. निवडणुका हा लोकशाहिचा पाया आहे, त्यात कुठल्याहि प्रकारे अफरातफर झालेली नाहि याचं समाधान, बाय्डन निवडुन आला या वैषम्यापेक्षा खूप जास्त आहे...

तात्या एको चेंबर मधे लोकांचे समज काय आहेत याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे टाउनहॉल मधले हे एक कार्टून
https://townhall.com/political-cartoons/2020/12/04/178693?hpnl=true

फॅक्ट्सः
- रूडी व इतरांना जेव्हा मुलाखतींमधे "मीडियाने" विचारले तेव्हा ते म्हणत की आम्ही मीडियाला पुरावे द्यायला बांधील नाही, योग्य वेळी देउ वगैरे वगैरे
- यांनी कोर्टातही कोणतेही पुरावे दिलेले नाहीत

पण हे आपल्याला माहीत आहे. असंख्य लोकांचा असा समज आहे की इतके ढळढळीत पुरावे (!) दिलेले असूनही "डीप स्टेट" वाले तात्याच्या विरूद्ध आहेत. यात डीप स्टेट बरोबर सध्या व्हेनेझुएला, चीन, स्पेन व इतर बरेच देश सामील आहेत. तसेच डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन्स व इव्हन जजेस सामील आहेत. तसेच प्रत्येक दिवशी जो ट्रम्पविरोधात बोलतो तो आपोआप डीप स्टेट मधे सामील होतो.

ते थ्रिलर पिक्चर्स मधे असते ना? नायक एखादा पुरावा घेउन पोलिसाकडे जातो. तो त्याला सांगतो की आता चिंताच करू नको, मी सर्वांना अडकवतो. तो नायक तेथून बाहेर पडल्यावर तो पोलिस नेत्याला फोन लावून पुढच्या सीन मधे त्याच्याच बरोबर दारू पिताना दिसतो आणि अशी साखळी दाखवतात - तसे सध्या ट्रम्प सपोर्टर्सना वाटत असेल Happy

माझ्यामते भाषा वेगळी असली तरिहि गर्भितार्थ तोच आहे. पोलिटिकल अ‍ॅडवर्सरिजची लिस्ट तयार करायला घेण्यामागचा हेतू मला सांगावा लागु नये असं वाटतंय. यु अग्री? >> हो फक्त पहिल्या वाक्याशी सहमत नाही. रिप्ब्लिकन लोकांना एओसी ची अ‍ॅलर्जी आहे ह्याची कल्पना आहे पण तिच्या नि बॅनन इत्यादी च्या वक्तव्यामधे जमिन अस्मानाचा फरक आहे. ' अमका तमका जिओपीचा समर्थक आहे ह्याची नोंद घ्या' नि 'अमका तमका जिऑपीचा समर्थक असल्यामूळे त्याचा गळा चिरायला हवा' ह्यामधे मला तरी भरपूर तफावत दिसते. विचारंमधे फरक असला तर थेट हातघाई वर उतरा असा मोठा फरक आहे.

तसे सध्या ट्रम्प सपोर्टर्सना वाटत असेल >> आरोप करणार्‍याने पुरावा देण्याऐवजी,
१. बचाव करणार्‍याने उलटपक्षी पुरावा द्यावा नि
२. आरोप केला आहे तेंव्हा आता तो खरा आहे असे धरून पुरावा शोधण्यासाठी तपास करावा
अशा प्रकारचे सगळे खटले आहेत आत्तापर्यंतचे. त्यात दु:खाचा भाग हाच आहे कि 'म्हातारी मेली तरी चालेल, पण काळ सोकावतो'

असामी +1

मला ती AOC अजिबात आवडत नाही. राजकारणातली किम कार्डाशियन वाटते.
पण तिच्या त्या बोलण्याचा आणि बॅननचं गळे चिरून मुंडकी व्हाईट हाऊसच्या प्रवेशद्वारावर लावण्याचं बोलणं याची काहीही तुलना होत नाही. बॅनन एकूणच टोकाचा रेसिस्ट आहे. तो सुंदर पिचाई, सत्या नदेलाबद्दल पण एकदा वादग्रस्त बोलला होता. पण हे गळे चिरायचं वक्तव्य सगळ्यावर कडी करणारं होतं. Only a psychopath can find it normal.

>>हो फक्त पहिल्या वाक्याशी सहमत नाही. <<
सिरियस्ली? यु डिडंट गेट द हिडन/इंप्लिसिट मेसेज? अरे ती सरळ सरळ सांगते आहे, या लोकांची माहिती काढुन ठेवा, कारण हे लोक पुढे ते सगळं नाकारणार आहेत, डिजिटल फुटप्रिंट डिलिट सुद्धा करण्याची शक्यता आहे, ब्ला ब्ला ब्ला, याड याड याडा. एनीवे, लकिलि मोस्ट ऑफ द फोक्स आर नॉट नाइव लाइक यु. आणि मला अजिबात आश्चर्य वाटलं नाहि एका बाबतीत. बॅनन वाज डेफिनेटली राँग, अँड सो डझ एओसी; बट यु सेंस्ड डॉग विसल इन बॅनन्स कामेंट, अँड एओसीज ट्विट वाज जस्ट ओके फॉर यु... Proud

नाउ, मार्क माय वर्ड्स. उद्या बायडन पोटस झाला तर रिपब्लिकन्स्च्या बरोबरीने त्याचं बीपी वाढवण्याचं काम एओसी, नीरा टंडन (इफ शी गेट्स अप्रुव्ड) आणि काम्ला हॅरिस करणार आहेत. या तीन देवीयां आर अन्स्टॉपेबल, अन्कंट्रोलेबल, अँड मोस्ट इंपॉर्टंटली अन्फॅदमेबल फॉर देर पोलिटिकल अँबिशन्स... Wink

(जस्ट टु रिफ्रेश योर मेमरी; नीरा डिडंट हेजिटेट टु ट्विट इन रिस्पाँस टु मिशेल ओबामाज '१६ कोट - "... गोइंग हाय ड्झंट एफिंग वर्क". दॅट्स ए व्हेरी बोल्ड, अँड एपिक रिस्पाँस टु फ्लोटस हायली रिगार्डेड कोट. यु सी व्हॉट्स कमिंग? Wink )

स्टीव्ह बॅनन चे वाक्य आणी एओसी चे ट्वीट यांची तुलना होऊ शकत नाही. यू आर ट्रायिंग टू स्टिक बार्क ऑफ ओक ट्री टू मेपल ट्री. बॅनन ने सरळ सरळ हिंसेला उद्युक्त केले आहे तर ए ओ सी म्हणते आहे की ट्रंप समर्थकांचे ट्वीट्स जपून ठेवा, उद्या ते ट्वीट डीलीट करून विश्वामित्री पवित्रा घेतील. त्यात मला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. अ‍ॅम आय मिसिंग समथिंग ?

Aoc स्लोगन्स वाले tshirts विकतीये त्या वर बेन शापिरोने छान टीका केलीये ट्विटरवर.
शापिरो भंपक असला तरी कधीकधी तर्कशुद्ध बोलतो.

विकु+१.

ट्विट्स जपून ठेवा म्हटलंय कारण उद्या ते डिलीट करतील .

भारतात सध्या काही लोकांना आपले ट्वीट्स डिलीट करायची गरज पडू लागली आहे. अशा वेळी (इतर) काही जण त्या ट्वीट्सचे स्क्रीन् शॉट्स काढून ठेवतात आणि आर्काइव्ह करतात. लोकांचा ढोंगीपणा उघड करणं म्हणजे हिंसेला उद्युक्त करणं? असेल असेल!

"अपनी तो जैसे तैसे............." हे गाणं सध्या पदोपदी वाजताना दिसतं.

हिंसाचाराला उत्तेजन इत्यादी चर्चा वाचून काही उदाहरणं आठवली.

१. फेब्रुवारी-मार्च २०१६: ट्रम्पतात्यांनी रॅलीत जमलेल्या आपल्या चाहत्यावर्गाला कुणी निदर्शन करणारं आढळल्यास 'knock the crap out of them' असं आवाहन केलं आणि वर खटला चालला तर लीगल फीज द्यायची तयारीही दर्शवली. वर “Part of the problem and part of the reason it takes so long [to kick them out] is nobody wants to hurt each other anymore,” हेही ठेवून दिलं.

लगोलगच, John Franklin McGraw नावाच्या ट्रम्पसमर्थकाने नॉर्थ कॅरोलायनातल्या एका सभेत, पोलिस निदर्शकाला बाहेर घेऊन जात असताना त्याच्यावर हल्ला केला.
दुवा: https://abcnews.go.com/Politics/donald-trump-rally-videos-show-protester...

२. सप्टेंबर २०१६: Hillary wants to abolish the Second Amendment,” Trump said at a rally in Wilmington, N.C., on Tuesday. “By the way, and if she gets to pick her judges, nothing you can do, folks. Although the Second Amendment people, maybe there is, I don’t know.”

३. ऑगस्ट २०१७: Trump defended the white nationalists who protested in Charlottesville, Virginia, in August 2017, saying there were "some very fine people on both sides" of the rally which left one woman dead.

Gary Cohn या ज्यू धर्मीय, नॅशनल इकॉनॉमिक काऊन्सिलच्या अध्यक्षाने याच्या निषेधार्थ काढलेले उद्गारः
https://www.wsj.com/articles/cohn-says-administration-must-do-more-to-co...

४. ऑक्टोबर २०१८: Gianforte (मोंटानाचा रिपब्लिकन काँग्रेसमन) pleaded guilty to misdemeanor assault last year after Ben Jacobs, a reporter for The Guardian, said the then-candidate "body-slammed" him. Gianforte was sentenced to 40 hours of community service, 20 hours of anger-management counseling and payment of a $385 fine. As part of a civil settlement, he apologized for responding with physical violence to a question Jacobs asked about health care policy.

ट्रम्पतात्यांची प्रतिक्रिया: President Donald Trump praised Rep. Greg Gianforte, R-Mont., Thursday for physically assaulting a reporter during a House race last year. "Never wrestle him," Trump said of Gianforte at a campaign rally here. "Any guy that can do a body slam, he's my guy."

५. ऑगस्ट २०१९: एल पासो, टेक्ससमधल्या वॉलमार्टमध्ये जे हत्याकांड घडलं - ते घडवून आणणार्‍या २१ वर्षीय पोराने आपला रेसिस्ट मॅनिफेस्टो ऑनलाईन प्रसिद्ध केला होता. त्यातले अनेक शब्दसमूह आणि वाक्यं (उदा. Hispanic invasion of Texas किंवा 'the heavy Hispanic population in Texas will make us a Democrat stronghold.') यांचे स्रोत अनेकांना ओळखीचे वाटतील.

अर्थात, त्याच मॅनिफेस्टोमध्ये “My opinions on automation, immigration, and the rest predate Trump and his campaign for president,” असं वाक्यही आहे. यातून जो तो आपापले निष्कर्ष काढेल; पण रेसिस्ट हिंसाचाराचं थैमान डोक्यात चालू असताना, त्या माथेफिरूला हे असं मुद्दाम लिहावंसं वाटावं, यातच सारं काही आलं!

६. एप्रिल २०२०:
(अ) मिडवेस्टात कोव्हिडने अक्राळविक्राळ रुप धारण केल्यामुळे मिशिगन, ओहायो, मिनेसोटा ह्या राज्यांनी सार्वजनिक जागी मास्क घालून वावरणे, मोठ्या मेळाव्यांवर निर्बंध इत्यादी उपाय जाहीर केले. मिशिगनची गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमरने व्हीपी अधिक White House Coronavirus Task Force चे लीड यांच्यासोबत काम करत आवश्यक ती साधनं आणि उपकरणं मागवण्याची तजवीज केली. (या एकत्र येऊन कोव्हिडविरोधात काम करण्याबद्दल व्हिटमरची प्रशंसा करणारं पेन्सचं भाषण जालावर आहे)

(ब) पण अर्थात, तात्यांच्या रिइलेक्शनच्या दृष्टीने अशी सौहार्दपूर्ण परिस्थिती फायद्याची नव्हती. २०१६ मध्ये त्यांनी जेमतेम दहा हजारांच्या मताधिक्याने मिशिगन जिंकलं होतं (तुलनेने २०२० मध्ये बायडनला दीड लाखांचं मताधिक्य आहे) - त्यामुळे काहीही करून 'केऑस' निर्माण करणं तात्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. त्यामुळे, जेव्हा मग सार्वजनिक जागी मास्क्स लावून वावरावं अशा "जुलमी" उपायांच्या निषेधार्थ जेव्हा स्वयंचलित रायफली आणि बंदुका घेऊन निदर्शक जेव्हा मिशिगनच्या कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसले - तेव्हा ट्रम्पतात्यांनी “LIBERATE MICHIGAN!” and “LIBERATE MINNESOTA!” अशी ट्विटरवर राणा भीमदेवी आरोळी ठोकली. (ओहायोतही तितकेच कडक निर्बंध लागू होते; पण ओहायोचा गव्हर्नर रिपब्लिकन असल्याने त्या राज्यातल्या लोकांची मास्कमुळे होणारी तथाकथित कुचंबणा अर्थातच महत्त्वाची नसते.) बाकी शेलक्या विशेषणांनी (Gretchen 'Half' Whitmer, 'that woman from Michigan') गव्हर्नर व्हिटमरला ट्विटरवर नावं ठेवणं, इत्यादी तात्यांच्या लीळा चालू होत्याच!

(क) गव्हर्नर व्हिटमर यांच्या अपहरणाचं कारस्थान रचल्याबद्दल 'Wolverine Watchmen' ह्या राईट-विंगर ग्रुपच्या चौदा सदस्यांना अटक (दुवा: https://en.wikipedia.org/wiki/Gretchen_Whitmer_kidnapping_plot)

६(ब)मुळे ६(क) झालं असा दावा नाही - पण हा घटनाक्रम विचारात घ्यावा असा आहे.

७.परवाचीच गोष्टः
जॉर्जियाच्या रिपब्लिकन voting systems implementation manager ने सुनावलेले खडे बोलः
(दुवा: https://www.bbc.com/news/election-us-2020-55153918)

Mr Sterling said he himself had a police guard outside his home, while the wife of Georgia's Secretary of State, Brad Raffensperger, was "getting sexualised threats through her cell phone".

"Mr president, you have not condemned these actions or this language," added Mr Sterling. "Senators, you have not condemned these actions or this language.

"We need you to step up and if you're going to take a position of leadership, show some!"

He added: "Death threats, physical threats, intimidation, it's too much, it's not right, they've lost the moral high ground to claim that it is."

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असो, ह्या व्यतिरिक्त अवैधरीत्या AR-15 rifle मिळवून, दुसर्‍या राज्यात जाऊन तिथल्या निदर्शकांवर गोळीबार करणार्‍या (ज्यात दोन व्यक्ती मरण पावल्या) सतरा वर्षीय Kyle Rittenhouse ची पाठराखण; संशयितांना गाडीत बसवताना पोलिसांना 'Please don't be too nice' असं सांगणं अशी यादी मोठी आहे - पण गोष्टी योग्य त्या परिप्रेक्ष्यात आणून पहायला इतकी उदाहरणं पुरेशी असावीत!

नंदनराव,
लै भारी अभ्यास. भारी प्रतिसाद.

त्याचे काय आहे, बॅनन, ओएसी यांचे बोलणे शब्दशः घ्यायचे नसते, लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते.
बॅननला सांगायचे आहे की त्यांचे पुतळे उभारा व्हाईट हाउस समोर, म्हणजे ते तिथल्या कामगारांना स्फूर्ति देतील.
ओएसी ने यादी करा म्हंटले याचाच अर्थ कुणा कुणा ला ठार मारायचे याची यादी करा. तुम्ही बर्‍याच सिनेमात पाहिले असेल की खलनायक कुणा कुणाला मारायचे याची यादी करून एकामागून एक सर्वांना मारतो.
उद्या म्हणाल, ट्रंप म्हणाला की डिसिन्फेक्टन्ट प्या!
त्याचे म्हणणे डिसिन्फेक्टंट वापरा.

तुम्ही मला विचारत जा. मी वरती सिद्ध करून दाखवले आहे की मला नेहेमीच आतल्या गोटातली माहिती असते.
योग्य वेळ आली की (म्हणजे शार्पी सापडली की) सगळे पुरावे सादर करतील मग निवडणूक रद्द नि बायडेन इ. सर्व डेमोक्रॅट्स ना फाशी!!
आनंदी आनंद गडे!!

राज.. सुप्रिम कोर्टातच का सिद्ध व्हावे? लोअर कोर्टांवर एवढा अविश्वास? अमेरिकेतले सगळे खटले सुप्रिम कोर्टाने सोडवत बसवायचे काय? हे मु़ळीच पटण्यासारखी गोष्ट नाही!

हॉनेस्टली..उलट तुमच्या जॉर्जिया मधे रिपब्लिकन गव्हर्नर व रिपब्लिकन निवडणुक अधिकार्‍यांना व त्यांच्या बायकोंना ट्रंप सपोर्टर्सकडुन ज्या धमक्या मिळत आहेत व ज्या प्रकारे मिशिगन गव्हर्नर ग्रेचन व्हिटमरच्या अपहरणाचा व खुनाचा कट शिजवला जात होता... त्या गोष्टी मला लोकशाहीसाठी जास्त धोकादायक वाटतात.

फारेंड.. थ्रिलर चित्रपटाचे उदाहरण.... Biggrin

नंद्या ४३... Happy

<<<"आरोप करणार्‍याने पुरावा देण्याऐवजी,
१. बचाव करणार्‍याने उलटपक्षी पुरावा द्यावा नि
२. आरोप केला आहे तेंव्हा आता तो खरा आहे असे धरून पुरावा शोधण्यासाठी तपास करावा">>>
रशिया, चीन, उत्तर कोरिया सारख्या प्रगत देशात असेच कायदे असतात, त्या मानाने अमेरिका मागासलेली आहे. म्हणूनच MAGA, KAGA यांची गरज आहे.
सर्व देशात मिळून एक टक्का मते जरी संशयास्पद असली तरी सर्व मते रद्द करायला पाहिजेत, जसे सफरचंदांच्या टोपलीत एक जरी खराब असले तरी सर्व सफरचंदे खराब होतात. तेंव्हा देशातील सर्व मते सुप्रीम कोर्टाने तपासून घेइस्तवर निवडणुकीचा निकाल रद्द.

सुप्रीम कोर्ट? आता नवीन पवित्रा आलेला आहे मार्केट मधे.

"आम्हाला कोर्टाची गरजच नाही. आम्ही थेट लेजिस्लेस्टर्सशीच बोलू. फाउन्डिंग फादर्स...."
https://townhall.com/tipsheet/cortneyobrien/2020/12/05/giuliani-we-dont-...

कधी काळी जिओपी खरच "पार्टी विथ डिफरन्स" होती. 2000- 2004 च्या डिबेट्स आठवल्या की हे प्रकर्षाने जाणवते. 2008 मधे तर ओबामा- मकेनने तर सिवीलाईज्ड अपोजिशन चा कळस चढवला. नाही म्हणायला पॅलीन बाईंच्या मुर्ख चाळ्यांचं समर्थन करण्यापासून जिओपीला वैचारीक उतरण लागली म्हणा किंवा तिने खरे रंग दाखवायला सुरूवात केली म्हणा, पण फरक जाणवू लागला होता. तात्यानी मात्र एलीवेटरनी स्वतः खाली येवून जिओपीला माडीवर बसविली तेव्हापासून तर ती अगदीच ओळखू येईनाशी झालीये.
वा पो नुसार २४९ पैकी फक्त २५ जिओपी काॅग्रेसमन बायडेनला प्रे इलेक्ट मानतात. आणि वरच्या लिस्टा करण्याच्या चर्चेनुसार खुद्द तात्यानीच त्या २५ लोकांची यादी मागवलीये.

>>राज.. सुप्रिम कोर्टातच का सिद्ध व्हावे?<<
कारण सद्ध्याच्या परिस्थितीत सुकोच मार्ग काढु शकते. तुला आणि मला वाटतंय, ट्रंपने खालच्या कोर्टांचा निर्णय मानावा पण त्याच्या कँपेनला तसं वाटत नाहि. म्हणुन सुको...

कुठलीहि केस कोर्टात नेण्यामागे दोन उद्देश असतात. १. न्याय मिळवणे, विच इज ऑब्वियस आणि २. वेळकाढुपणा करता यावा, जेणेकरुन पुढे परिस्थिती बदलेल अशी आशा बाळगता येते. इथे ट्रंप कँपेनचा वरकरणी उद्देश #१ असला तरीहि भर #२वर जास्त आहे. त्यांची वकिलांची फौज त्याच दिशेने कार्यरत आहे. दि अन्डुइंग या वेबसिरिज मधे हाय प्रोफाय्ल डिफेन्स लॉयर एका प्रसंगात सांगते, तो डायलॉग साधारण असा - "आय कॅन विन एनी केस. बट आय कॅनॉट वेव ए वांड अँड मेक थिंग्ज बेटर. पिपल हायर मी टु क्रिएट मक; आय मक अप द स्टेट्स केस सो दे कॅनॉट मीट देर बर्डन. दॅट्स व्हॉट आय डु, क्रिएट मक!".

ट्रंप लिगल टीम इज डुइंग द सेम एक्झॅक्ट थिंग, क्रिएट मक. सो दे मे फाइंड अ‍ॅन ओपनिंग टु टर्न थिंग्ज अराउंड...

वा पो नुसार २४९ पैकी फक्त २५ जिओपी काॅग्रेसमन बायडेनला प्रे इलेक्ट मानतात. >>> मनातून ते ही समजून असावेत पण जाहीर बोलण्याचे धाडस करत नाहीत. कारण रिपब्लिकन मतदार अजूनही ठामपणे ट्रम्पच्या मागे आहे आणि जे लोक त्याला विरोध करतील त्यांच्यावर हे लोक तुटून पडतात. कालही जॉर्जियामधे रन ऑफ इलेक्शन ज्या सिनेटर्स करता आहे त्यांच्यासाठी कॅम्पेनिंग करायला आलेला ट्रम्प त्यांच्याबद्दल त्रोटक काहीतरी बोलून स्वतःचीच दर्दभरी कहाणी आळवत बसला, आणि पब्लिकही त्या सिनेटर उमेदवारांचे बोलणे ऐकायचे सोडून "स्टॉप द स्टील" वगैरे ओरडत होते.

तेथे जीओपी समोर वेगळाच प्रश्न आहे. सिनेटच्या दृष्टीने रन ऑफ इलेक्शन महत्त्वाची आहे. पण लिन, पॉवेल पासून ते ट्रम्प पर्यंत सगळे लोक ही निवडणूक प्रोसेस फ्रॉड आहे, यात तुमच्या रिपब्लिकन गव्हर्नर, सेक्रेटरी ऑफ स्टेट पासून सगळे सामील आहेत, हे लोक मते फिरवतात, डॉमिनियनची मशीन रिग्ड आहेत वगैरे सांगतात. मग त्यानंतर "मात्र ५ जानेवारीला मतदान करायला विसरू नका" असे म्हणायचे म्हणजे शोले मधे अमिताभ बाकी सगळे सांगून "मै ये रिश्ता पक्का समझू?" विचारतो तसे झाले. त्यामुळे हुकमी पुरावा नसताना तात्याच्या आवाजात आपला आवाज मिसळून प्रोटेस्ट करावे, की पहिले ५ जानेवारीला दोन सिनेट सीट खात्रीने येतील असे करावे यात ते सापडले आहेत.

परवा एक सोयीने एडिट करून काढल्यासारखी सीसीटीव्ही व्हिडीओ क्लिप बाहेर आली आणि रूडी ते टाउनहॉल सर्वांनी पुन्हा एकच राळ उडवून दिली. मग खुद्द जॉर्जियाच्या अधिकार्‍यांनी त्यांनी तो एडिट केलेलाच नव्हे तर आधी व नंतरचा दोन तासांचा व्हिडीओ पाहिला व त्यात काहीही ऑड नसल्याचे जाहीर केले. ते प्रकरण अजून मिटलेले नाही. रूडी वगैरे लोकांना आत्मविश्वास असेल तर ती क्लिप घेउन ते कोर्टात जातील (कॅम्पेनने पुन्हा एक खटला दाखल केलेलाच आहे - यांचे खटले मुंबईत सकाळी स्टेशनवर गेले की जिकडे जायचे तिकडे नेणारी लोकल येतेच तसे येतच असतात. नाहीतरी ट्रम्पच्या खिशातून काही जात नाही), नाहीतर मीडियामधेच तेच नाचवत बसतील. फॉक्स व नॅशनल रिव्यू मधे काल-आज त्याचा कमी होत गेलेला उल्लेख एकूण कल दाखवतो.

पण अनेकदा प्रेशर आणल्यावर पुन्हा एकदा ट्रम्पने टीका केल्यावर गव्हर्नर केम्पने मेल-इन पाकीटांवरच्या सह्या ऑडिट करण्याची ऑर्डर दिली आहे. त्याचे काय होते पाहून. जॉर्जिया मधे लोकांनी विनंती केल्यावरच मेल-इन मतपत्रिका दिली जाते. ती विनंती स्वीकारताना एकदा व नंतर मतपत्रिकेचे पाकीट आले की अजून एकदा असे दोन वेळा सह्या मॅच केल्या जातात. हे मॅचिंग मशीनने केले जात नाही, उपस्थित लोक एकत्रितपणे करतात - आणि त्यांचा प्रेफरन्स अगदी ढळढळीत फरक दिसला तरच सही नाकारण्याकडे असतो. त्यामुळे यातून काही चुका निसटल्या असणे शक्य आहे. पण हे अनेक वर्षे व अनेक निवडणूका होत आलेले आहे. यावर्षी कोव्हिड मुळे प्रमाण जास्त असेल पण निकाल बदलण्याइतक्या चुका दिसतील का नाही माहीत नाही. आणि यातून फ्रॉड सिद्ध करणे जवळजवळ अशक्य आहे. पण ऑडिट मधे खूप फरक दिसला तर ही निवडणूक भरवसा ठेवण्यासारखी नाही अशी टूम निघेल. आणि त्यामुळे एकतर पुन्हा निवडणूक घ्यावी (जॉर्जियामधे) किंवा ही निवड रद्द करून एखाद्या वेगळ्या पद्धतीने जॉर्जियाचा निकाल ठरवावा याबद्दल वाद होतील, ते बहुतांश कोर्टात जातील.

मात्र मी जितके वाचले आहे त्यावरून हे जर वेळेत झाले नाही (१४ डिसेंबर) तर जॉर्जियाचा निकाल पूर्णपणे दुर्लक्षित करून बाकीच्या राज्यांच्या सीटस वर निकाल नक्की होईल. एका राज्याकरता पूर्ण देशाची प्रोसेस थांबणार नाही.

खटले जास्तीत जास्त लांबवत ठेवायचे म्हणजे विरुद्ध बाजू कंटाळून शेवटी तडजोडीला तयार होते, म्हणजे आपली बाजू वरचढ होते नि मनाप्रमाणे तडजोड करता येते. हा मार्ग कायदेशीर आहे. ट्रंपने अनेक कंत्राटदारांचे पैसे बुडवून शेवटी त्यांना कफल्लक करून त्यांचा धंदा दिवाळखोरीत काढला. स्वतः ट्रंपचे जेव्हढे धंदे बुडले नाहीत त्यापेक्षा जास्त धंदे इतरांचे त्याने बुडवले आहेत.
पण हे सगळे कायदेशीर आहे.
त्याने अनेक धंद्यांत दिवाळखोरी काढली याला हसू नका. या श्रीमंताच्या खेळी असतात. त्याने अनेक वर्षांपूर्वी शेकडो दशलक्ष डॉलर्सचा तोटा दाखवला नि त्याच्या मुळे त्याचे आयकर पुढील बरीच वर्षे खूप कमी झाले. आय आर एस ने अजून ते मान्य केले आहे, म्हणजे त्यात फसवाफसवी सापडलेली नाही. सगळे कसे कायदेशीर.
ही एक प्रकारची हुषारीच आहे.
राजकारण म्हणजे श्रीमंत नि काही थोड्या लोकांचा खेळ आहे. तो वर्षानुवर्षे चालू आहे.
प्रत्येक खेळाचे नियम वेगळे असतात. जसे अमेरिकन फूटबॉलमधे खेळाडू सरळ एकमेकांवर धावून जातात नि त्यांना जमिनीवर पाडतात, चेंडू हिसकावून घेतात. एरवीच्या वागण्यात असे वागणे म्हणजे चक्क गुन्हा. पण खेळ म्हणून मान्य, त्याची वाहवा.
राजकारण हाहि एक खेळच म्हणून सभ्यता, खरेपणा, नीतीमत्ता वगैरे गोष्टी तिथे नसतात.

आपण उगीचच त्यावर आपल्या अज्ञानामुळे वादावादी करत बसतो.
काही नवीन विनोदी, रहस्यमय चित्रपट, नाटके यांच्या बद्दल लिहा.

नंदन.. तुझ्या वरच्या पोस्टमधे तु मस्त एखाद्या वकिलासारखे .. उदाहरणासकट व सोर्सेस देउन .. उदाहरणे दिलीस.

फारेंड... शोलेचे उदाहरण इथे एकदम चपखल बसले आहे Biggrin

राज.. तु काय म्हणत आहेस बघ.. ट्रंपचा उद्देश फक्त मक क्रिएट करुन कुठे ओपनींग मिळतेय का ते बघायचे...

असे मक क्रिएट करणे.. तेही..कुठलाच पुरावा नसताना.. हे लोकशाहीला धोकादायक आहे असे नाही वाटत तुला?

आणी असा मक क्रिएट केल्यामुळेच वर फारेंड पर्फेक्ट बोलला.. एकीकडे असे म्हणायचे की इलेक्शन प्रॉसेस कशी फ्रॉड आहे... ही इलेक्शन प्रॉसेस फक्त डेमॉक्रॅट्स आणी फक्त डेमॉक्रॅट्सच राबवतात.. आणी रिपब्लिकन पार्टी गरीब गायीसारख .. फक्त आपली मत रिग केलेल्या मतपेटीत आंधळ्यासारखी टाकुन येतात.. रिपब्लिकन पक्षाच्या इलेक्शन ऑब्झर्व्हर्स्च्या डोळ्यावर पट्टी बांधुन.. त्यांच्या डोक्याला बंदुक लावुन डेमॉक्रॅट्स दिवसाढवळ्या निवडणुका जिंकत आहेत.. तेही रिपब्लिकन बालेकिल्ले असलेल्या राज्यात...

याच्यावर सारासार बुद्धी असलेल्या माणसांनी विश्वास ठेवायचा? आणी असा विश्वास ठेवायचाच असा एकीकडे प्रचार करायचा आणी त्याच प्रचारात.. बोलायचे.. सेनेट रेस मधे परत एकदा.. असल्या रिग्ड इलेक्शन प्रोसेस मधे स्वतःला झोकुन द्या व मतदानाला जा! ... हाउ कॅन यु पॉसिबली रिकन्साइल दिज २ थिंग्स?

मग आता कळले.. फारेंडचे.. शोलेचे उदाहरण कसे चपखल आहे इथे ते?... Happy

>>हे लोकशाहीला धोकादायक आहे असे नाही वाटत तुला?<<
एव्हरीटाइम समबडि स्टार्ट्स क्राइंग आउट लाउड, "लोकशाहि खतरेमे", आय गेट अ‍ॅम्युज्ड. इझंट धिस ऑल अबौट एफिंग डिमाक्रसी? आणि आता जर "मक" क्रिएट करण्याचा प्रश्न आहे, तर २००० मधले इवेंट्स वेर नॉट मकि इनफ फॉर यु, ऑर दोज वेर ओके अ‍ॅज पर योर डेफिनिशन ऑफ डिमाक्रसी?

>>सेनेट रेस मधे परत एकदा.. असल्या रिग्ड इलेक्शन प्रोसेस मधे स्वतःला झोकुन द्या व मतदानाला जा! ... हाउ कॅन यु पॉसिबली रिकन्साइल दिज २ थिंग्स?<<
अरे बाबा, अगदि सेंसिबल आणि टॅक्टिकल सूचना आहे ती. निवडणुक एका महिन्यावर आलेली आहे, इतक्या कमी वेळात इलेक्शन रिफॉर्म होउन निवडणुका फूलप्रुफ होणं हि अशक्यप्राय बाब आहे. अशा परिस्थितीत निवडणुकांवर बहिष्कार टाकुन डेम्सना दोन्हि सीट्स प्लॅटर वर द्या; असं आवाहन ट्रंपने करायला हवं होतं का? बाकिच्यांचं राहुदे, पण तुझा हा प्रश्न वाचुन मला खूप आश्चर्य वाटलं आहे...

मक क्रिएट करण्याचा हक्क असणे आणि असे करणे योग्य गोष्ट असणे ह्यात फरक आहे.
लाखो लोकांना निवडणूक धाधांत फ्रॉड आहे असे स्वतः हह्रल्यावर पटवून देणे किंवा तसा प्रयत्न करणे जर threat to democracy नाहीये, तर I don't know what is.

Whataboutism:
(दुवा: https://en.wikipedia.org/wiki/Whataboutism)

Whataboutism, also known as whataboutery, is a variant of the tu quoque logical fallacy that attempts to discredit an opponent's position by charging them with hypocrisy without directly refuting or disproving their argument.

Whataboutism is particularly associated with Soviet and Russian propaganda. When criticisms were leveled at the Soviet Union during the Cold War, the Soviet response would often be "What about ..." followed by instancing of an event or situation in the Western world.

बाकी चालू द्या Happy

लिंडसी ग्रॅहॅम म्हणतोय जॉर्जिया मधे सिव्हिल वॉर सारखे वातावरण तयार होत आहे.

ओशन्स-१२ मधला जॉर्ज क्लूनी आठवला: "I was once in a bank locker when it was getting robbed" Wink

लिंडसी ग्रॅहॅम म्हणतोय जॉर्जिया मधे सिव्हिल वॉर सारखे वातावरण तयार होत आहे. >> लिंडसी बद्दल तात्या कडे काही तरी जाम मसाला ठासून भरलेला असावा अशी मला दाट शंका आहे. तो नि टेड ह्याच्यांत सर्वाधिक लांब कोलांटी कोणी मारली असेल ह्यात जबरदस्त स्पर्धा आहे.

Pages