अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरय, भल्या भल्यांना न आवरलेली बाई हतबुद्ध झाली होती. असे बरेच ढूढ्ढाचार्य आहेत ज्यांना तरुण पोरे मार्गावर आणतील अशी आशा धरूया.

असे बरेच ढूढ्ढाचार्य आहेत ज्यांना तरुण पोरे मार्गावर आणतील अशी आशा धरूया.
>>>

इथे पण आहेत काही Wink

@फा, @टवणे सर - Happy Happy :), अगदी अगदी.

वर देशापेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची बनत चालली आहे, असा मुद्दा आला आहे. ते बरोबर असलं, तरी त्यापेक्षाही हा एका इगोमॅनियॅक व्यक्तीचा कल्ट बनला आहे.

इट हॅज ऑल्वेज बिन 'ट्रम्प फर्स्ट, मिडल अँड लास्ट!', नेव्हर 'अमेरिका फर्स्ट' - वेकप गाय्ज्झ!!!

१. बाकी जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प हे आता ट्रम्पकिन्सचे आवडते टार्गेट बनलेले दिसताहेत. (दुवा: https://www.ajc.com/politics/politics-blog/an-outraged-kemp-blasts-pro-t...)

Gov. Brian Kemp is fed up with the unrelenting attacks from conspiracy theorists calling on him to overturn President-elect Joe Biden’s victory in Georgia. But he’s even more enraged that some of those peddlers of false claims are targeting his wife and three daughters.

“It has gotten ridiculous — from death threats, (claims of) bribes from China, the social media posts that my children are getting,” he said. “We have the ‘no crying in politics rule’ in the Kemp house. But this is stuff that, if I said it, I would be taken to the woodshed and would never see the light of day.”

The Republican singled out the invective targeting his daughter Lucy, who has received hate-filled messages about inane false conspiracies about the death of her longtime boyfriend, Harrison Deal, who was killed in a traffic accident this month in Savannah.

२. वॉल स्ट्रीट जर्नलने (मर्डॉकच्या मालकीचं हो!) काढलेले तात्यांचे वाभाडे. मथळाच बोलका आहे:

Amid Vaccine Rollout and Historic Hack, Trump Remains Focused on Reversing Election
The president has been largely out of sight, paying little public attention to any events other than his efforts to overturn Joe Biden’s victory
पूर्ण बातमी इथे: https://www.wsj.com/articles/amid-vaccine-rollout-and-historic-hack-trum...

(बाकी कोव्हिडला होक्स म्हणणारे, व्हाईट हाऊस पँडेमिक ऑफिस डिसबँड करण्याबद्दल कानावर हात ठेवणारे - https://www.pbs.org/newshour/politics/watch-i-didnt-do-it-trump-says-of-... - ट्रम्पतात्या व्हॅक्सिनचं श्रेय घ्यायला पुढे सरसावले आहेत, हे फारच रोचक आहे!)

३. बाकी आज माईक पॉम्पेओने रशियाला हॅकिंगबद्दल जबाबदार धरलं. 'ट्रम्प फर्स्ट' ह्या न्यायाने तात्यांनी नेमेप्रमाणे ट्विटरवर आपली विद्वत्ता पाजळत गाडी चाईईईईना आणि व्होटिंग मशिन्सबाबतच्या कॉन्स्पिरसी थिअरीवर नेली!

'द बिगेस्ट लूझर'मध्ये तात्यांना स्कोप आहे! Happy

इट हॅज ऑल्वेज बिन 'ट्रम्प फर्स्ट, मिडल अँड लास्ट!', नेव्हर 'अमेरिका फर्स्ट' - वेकप गाय्ज्झ!!!>>>> सहमत. आजच्या बातमी प्रमाणे ट्रम्प मार्शल लॉ लावुन सैन्य पाठवुन नवी निवडणुक घेण्याच विचार करत होता. या योजनेत त्याला मायकेल फ्लिन व सिडनी पॉवेल या दोन सहकार्यान्चा पाठीम्बा होता. सुदैवाने इतर जबाबदार सल्लागारानी मात्र या योजनेला पाठिम्बा दिला नाही म्हणून तसे घडले नाही. या बातमीवरून ट्रम्पची मानसिकता समजते व वरील वाक्य खरे आहे हे कळते.

{{{ आजच्या बातमी प्रमाणे ट्रम्प मार्शल लॉ लावुन सैन्य पाठवुन नवी निवडणुक घेण्याच विचार करत होता. }}}

म्हणजे भारताचं १९७५ आता अमेरिकेत घडणार का?

स्मार्टमॅटिक व डॉमिनियन ने काही गफला केल्याचा क्लेम कधीच केला नसल्याचा खुलासा न्यूजमॅक्स ने केला आहे. हे न्यूजमॅक्स म्हणजे गेल्या काही दिवसांत ट्रम्प ने ज्यांना फॉक्सपेक्षाही जास्त भाव दिला आहे त्यापैकी एक.

फॉक्सनेही म्हणे असाच खुलासा केला आहे.

तिकडे रूडी व कॅम्पेनने सुप्रीम कोर्टाला पुन्हा एक पेटिशन केले आहे. आरोप तेच आधीचे आहेत. यात आता नवीन काय आहे माहीत नाही. आता हे डीटेल्स वाचायचा कंटाळा आला Happy

https://youtu.be/8UE-dQsx5pY

डेव्ह रुबिन नावाच्या यडच्याप "क्लासिकल लिबरल"चा ट्रम्प बायडेंन meltdown बघून जाम मजा आली.

Happy सुरूवातीला "ट्रम्प जिंकलाय" वगैरे ऐकून सध्या बघत असलेल्या द मॅन इन द व्हाइट कॅसल मधे आल्टरनेट रिअ‍ॅलिटीज दाखवल्या आहेत (जर्मनी/जपान दुसरे महायुद्ध जिंकतात - अशी काल्पनिक कथा) त्याची आठवण झाली Happy

>>> स्मार्टमॅटिक व डॉमिनियन ने लॉसूट च्या नोटिसेस दिल्यामूळे हा बदल झाला आहे.
--- लोल! तात्यांचे वकील कोर्टात गेले की मतमोजणीबद्दल गुळमुळीत बोलू लागतात आणि कोर्टाबाहेर येऊन वल्गना करतात, त्यातलाच प्रकार.

अ‍ॅलेक्स जोन्स ह्या सतत पॉपकॉर्नच्या लाह्यांसारख्या फुटत असणार्‍या (ह्यानेच ते कनेक्टिकटमधले सँडी हूक मधले स्कूल शूटिंग हे सेकंड अमेंडमेंटच्या विरोधकांनी रचलेला बनाव, असं सांगत नीचपणाचा कळस गाठला होता) तथाकथित 'लिबर्टी फायटर'ने कोर्टात असा बचाव केला होता!
President Trump's Favorite Conspiracy Theorist Is Just 'Playing a Character,' His Lawyer Says

हा खेळ जुना आहे - पण अगदी हुच्चशिक्षित लोकही याला बळी पडत असतात, हे इथेही दिसतंच आहे!

गेले ८-१० दिवस स्टॉप द स्टील खटले शांत झाल्याने सध्या त्या एको चेंबर मधे काय चालू आहे याची उत्सुकता होती. म्हणून तात्याच्या ट्विट वरच्या प्रतिक्रिया वाचल्या. बाकी फॉक्स व नॅशनल रिव्यू मधे याबद्दल बातम्या येणे आता कमी झाले आहे (टाउन हॉल मधे अजून येतात बहुधा). पण जनरल ट्रम्प वोटर्स अजूनही तात्या वाक्यं प्रमाणम् मोड मधेच आहेत. त्यांचा एकूण समज असा आहे की-
- एक मोठा इलेक्शन फ्रॉड झालेला आहे. अमेरिकाभर पसरलेला. त्याचे धडधडीत पुरावे कोणालाही सहज दिसण्यासारखे आहेत.
- मेनस्ट्रीम मीडियाने हे सगळे दाबले आहे. आता गेल्या काही दिवसांत या मेन स्ट्रीम मीडिया मधे फॉक्स, नॅशनल रिव्यू, कॉन्झर्वेटिव्ह ब्लॉगर्स वगैरेही सामील झालेले आहेत.
- कोर्टांनी पुरावे "बघितलेलेच नाहीत". डाव्या गटाला घाबरून त्यांनी असे केलेले आहे. आता तर खुद्द ट्रम्पच म्हणत आहे की सुप्रीम कोर्ट कमकुवत आहे. बाकी विशेषणे इथे मिळतील. ही वाक्ये आता पुढच्या काही दिवसांत त्या एको चेंबर्सच्या इतर लोकांकडून वापरली जातील
- वॉशिंग्टन मधले सगळे भ्रष्टाचारी "स्वॅम्प" साफ करायला निघालेल्या ट्रम्पच्या विरोधात सगळे हितसंबंधी उभे आहेत. सुरूवातीला यात फक्त डावे, लिबरल्स व डेम्स होते. आता हे "आरोप सर्कल" दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बेसिकली ट्रम्पच्या विरोधात जो बोलेल तो आपोआप या गटात जातो. त्यामुळे रिपब्लिकन्स, त्यांनी नेमलेले अधिकारी, खुद्द ट्रम्पनेही नेमलेले जजेस.
- आम्ही - म्हणजे "खरे रिपब्लिकन्स्/कॉन्झर्वेटिव्ह" मतदार ट्रम्प च्या मागे ठामपणे आहोत.
- जे रिपब्लिकन नेते आमच्या मताचा आदर करणार नाहीत त्यांना यापुढे आमचे मत मिळणार नाही. इथे त्यांनी घ्यायची अ‍ॅक्शन म्हणजे सहा जानेवारीला निवडणुकीचा निकाल डावलून ट्रम्पला सपोर्ट करणे.

ही "पल्स" बघितली तर अनेक रिपब्लिकन नेत्यांचे धाबे का दणाणले आहे, आणि हाउस मधल्या १०५ लोकांनी इलेक्टोरल वोट ला का विरोध केला होता ते लक्षात येते. आता पब्लिक "मॉस्को मिच" च्या मागे लागले आहे पुन्हा.

#TrumpTapes

ट्रम्पतात्यांनी जॉर्जियाच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट Brad Raffensperger आणि अन्य अधिकार्‍यांना फोन करुन जवळपास तासभर पकवलं, गर्भित धमक्या दिल्या ('“That’s a criminal offense, And you can’t let that happen. That’s a big risk to you and to Ryan, your lawyer.”) आणि खोटीनाटी माहिती अनेकदा रिपीट केली (बेसिकली, ट्रम्प बिइंग ट्रम्प!).

तर ह्या तासभर चाललेल्या संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग नुकतंच उपलब्ध झालं आहे.
दुवा: https://www.washingtonpost.com/politics/trump-raffensperger-call-georgia...

जॉर्जियातले बिचारे पदाधिकारी बिचारे लूझरतात्यांचा व्हर्बल डायरिया सहन करतात आणि जिथे शक्य होईल तिथे विनयपूर्वक तात्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देतात (“Well, Mr. President, the challenge that you have is, the data you have is wrong.” किंवा "Respectfully, President Trump: What you’re saying is not true.”) - पण अर्थात ट्रम्पतात्या केव्हाच त्यापलीकडे पोचले आहेत.

मिशिगनमध्येही तात्यांनी हाच प्रयोग करून पाहिला - मोनिका पामर ह्या डेट्रॉईटच्या मतमोजणी अधिकार्‍याला वैयक्तिकरीत्या फोन करणे, Mike Shirkey (सिनेट मेजॉरिटी लीडर) आणि Lee Chatfield (हाऊस स्पीकर) ह्यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलावून त्यांच्यावर दडपण आणणे - पण त्यांची डाळ शिजली नाही.

आता जॉर्जियातही तेच चालू आहे. गव्हर्नर ब्रायन केम्पला तर रोजच ट्विटरवर लाखोली वाहणं चालू असतं.
मात्र Brad Raffensperger शी झालेल्य संभाषणातलं खालील वाक्य महत्त्वाचं आहे - आणि तात्यांचा इरादा स्पष्ट करायला पुरेसं आहे!

"So look. All I want to do is this. I just want to find 11,780 votes, which is one more than we have.

दोन दिवस धामधुमीचे आहेत Happy आज जॉर्जियामधे रन-ऑफ इलेक्शन (मूळ निवडणुकीत कोणालाच ५०% पेक्षा जास्त मते न पडल्याने टॉपच्या दोन उमेदवारांमधली पुन्हा लढत) सुरू आहे. ते निकाल बहुधा रात्री पर्यंत कळतील. सिनेट मधे बहुमताकरता दोन्ही पैकी किमन एक रिपब्लिकन्सना जिंकणे आवश्यक आहे.

तर उद्या सिनेट व हाउस मधे इलेक्टोरल मतांचे अधिकृत सर्टिफिकेशन होईल. ही सहसा फक्त फॉर्मॅलिटी असते. माइक पेन्स ने ते अधिकृत करणे अपेक्षित असते. त्याला ओव्हरराइड करण्याचा अधिकार आहे हे ट्रम्पने आज ठणकावून दिले आहे. अर्थात ट्विट मधे. घटनेत असे काही नाही असल्या किरकोळ प्रकारांचे लोड तो घेत नाही.

टेड क्रूझ व इतर ११ लोक याला ऑब्जेक्शन घेणार आहेत. त्यावर कदाचित चर्चा व मतदान होईल. पास होण्याची शक्यता नसलेल्या ऑब्जेक्शनला पाठिंबा देउन स्वतःचे हसे करून घ्यायचे की ट्रम्पला लॉयल्टी दाखवून आपले पुढचे राजकीय करीयर अबाधित ठेवायचे या पेचात अनेक रिपब्लिकन सिनेटर्स असतील.

अशी ऑब्जेक्शन अनेकदा घेतली जातात - वेगवेगळ्या कारणांनी. मागच्या वेळी घेतली गेली होती पण ती अधिकृतरीत्या नोंदवली गेली नव्हती. फक्त तेथील डिबेट मधे घेतली गेली होती. त्यावेळेस ती नाकारून ट्रम्पची निवड नक्की करणारा तेव्हाचा व्हीपी जो बायडेन उद्या स्वतःच अधिकृतरीत्या अध्यक्ष होईल.

मात्र या सगळ्या मधे रॅफेन्सपर्गर आणि केम्प ना टोटल रिस्पेक्ट!

ट्रंप इतका वेंधळेपणा करतो की यापेक्षा वेडेपणा करणे ह्युमनली इंपोसिबल आहे असे वाटते, आणी मग तो त्यावर कडी करतो !

Trump shared the wrong number for a Michigan lawmaker. A 28-year-old has gotten thousands of angry calls.

https://www.washingtonpost.com/nation/2021/01/05/michigan-trump-wrong-nu...

अरे हे सगळे अँटीफा वाले लोक आहेत जे "मागा" च्या टोप्या घालून लूटालूट, दंगल करायला आले आहेत. तुला असे कसे वाटू शकते की तात्या चे समर्थक असे करू शकतातच. . त्यांच्या नेता तर शांतताप्रिय संत असून नेहमी लोकशाही मार्गानेच गोष्टी झाल्या पाहिजेत असे म्हणत आला आहे. Wink

तात्या एको चेंबर्स मधे गेले काही दिवस "पेन्स बरोबर हे फिक्स करणार आहे ६ तारखेला" असा ठाम विश्वास असलेले मेसेजेस फिरत होते. जगात सगळीकडे टनांवारी पुरावे पडले आहेत असा अजूनही पब्लिकचा समज आहे. ६२ पैकी ६१ खटले का फेटाळले गेले याबद्दल लोड घेत नाहीत हे लोक. कोर्टाने ते बघितलेच नाहीत असाही एक समज आहे.

ट्रम्पच्या विरोधात असलेल्यांचे "आरोप सर्कल" आज आणखी वाढून त्यात मॅकोनेल आणि पेन्सही सामील झाले असतील. अ‍ॅन कूल्टर आधी ट्रम्पच्या विरोधात होती का लक्षात नाही. ट्रम्पने कूल्टर वगैरे काय बोलतील असे अफाट बोलून गेल्या ३-४ वर्षांत असल्या लोकांना इररिलेव्हंट करून टाकले होते. आज तिनेही पिंका टाकल्या आहेत ट्रम्पविरोधात. तर पब्लिक तेथे तिलाही झाडते आहे.

"काय सगळे जग त्या बिचार्‍या ट्रम्पच्या मागे लागले आहे" छाप इनोसंट प्रतिक्रियांकरता तरी टाउनहॉल, ओअ‍ॅन वगैरे बघावेत.

असाम्या, मी तर म्हणतो हे ह्युगो चावेझचं कारस्थान आहे - अमेरिकेचं व्हेनेझुएला बनवण्याचं!

आपल्या गोतावळ्यातील लोकांना आणि पाठीराख्यांचे गुन्हे माफ करणं, आपल्याच उपाध्यक्षाला लोकशाहीची पाठराखण केली म्हणून नावं ठेवणं आणि आपल्या गुंड समर्थकांना (प्राऊड बॉईज!) संसदेत घुसण्याची चिथावणी देणं (आधी लिबरेट मिशिगन आणि आता तर थेट कॅपिटॉल) - छे, छे, आपले सत्यप्रिय, "स्पष्टवक्ते", मर्यादापुरुषोत्तम, लोकशाही परंपरांवर निस्सीम प्रेम करणारे आणि वेळीअवेळी राष्ट्रध्वजाला मिठ्या मारणारे ट्रम्पतात्या असं करणं शक्यच नाही - हा नक्कीच अँटिफा, ओबामा, हिलरी, मेनस्ट्रीम मीडिया आणि चावेझचा डाव आहे!

>>> ट्रम्पने कूल्टर वगैरे काय बोलतील असे अफाट बोलून गेल्या ३-४ वर्षांत असल्या लोकांना इररिलेव्हंट करून टाकले होते.

--- हे अतिशय कळीचं वाक्य आहे. ट्रम्पने डिबेटमध्ये 'बायडन निवडून आला तर तुम्हांला बर्गर खायला मिळणार नाही (गोइंग आफ्टर काऊज), हपिसाच्या खिडक्या काढून टाकतील' असे तारे तोडले होते. गेल्याच आठवड्यात त्याने आपल्या जावयाच्या तीर्थरुपांना आणि आपल्या पाठीराख्या काँग्रेसमनना पार्डन्स बहाल केली. पण कुठेही याची विशेष प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही - कारण 'रोज मरे, त्याला कोण रडे?'

एकंदरीतच चर्चेची, नीतीमत्तेची आणि सार्वजनिक संकेतांची पातळी ट्रम्पने आणि त्याच्या भक्तांनी किती खालावून ठेवली आहे, याचंच हे निदर्शक आहे.

"काय सगळे जग त्या बिचार्‍या ट्रम्पच्या मागे लागले आहे" छाप इनोसंट प्रतिक्रियांकरता तरी टाउनहॉल, ओअ‍ॅन वगैरे बघावेत. >> Happy

नंदन, सोरोस राहिला त्या लिस्ट मधे बघ Wink

Ossoff wins!!

अंजली - कोणी प्रोजेक्ट केला विन? अजून दिसत नाही कोठे.

मॅकोनेल यापुढे मेजॉरिटी लीडर म्हणून बोलतोय की मायनॉरिटी हे त्यावरून ठरेल Happy

Not 'projected ', they have declared him as a winner.
And with his win, Georgia turns blue!!!

हो दिसले आता. लिन वूड वगैरेंचे मिक्स्ड मेसेजेस आणि तेथे "रॅली" करता गेल्यावर तात्याने स्वतःचीच दर्दभरी कहाणी ऐकवणे याचाच परिणाम असेल.

नाहीतर ही सुद्धा इलेक्शन टोटल फ्रॉड आहे अशीही टूम निघेल आता. ट्रम्प ऑलरेडी म्हंटलाच आहे तसले काही. पण आता त्याला त्यात इण्टरेस्ट नसेल.

वॉव..

अमेरिका.. जिथे आधुनिक लोकशाहीचा जन्म झाला... ज्या अमेरिकेने जगाला लोकशाहीचे बाळकडु दिले..तिथेच आज लोकशाहीला असा काळीमा फासला जाइल असे वाटले नाही. सत्तांध झालेल्या ट्रंप सारख्या डिल्युजनल कॉन आर्टीस्टच्या चिथावणीच्या नादी लागुन अंध झालेले त्याचे भक्त.. गुंडागर्दी करत चक्क कॅपिटल बिल्डींग मधे घुसले व सेनेट चेंबरमधे गॅव्हल घेण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली...

इव्हांका ट्रंप या गुंडाना पॅट्रिअट्स म्हणत आहे... धन्य!

मी मागेच म्हणालो होतो.. अमेरिकेत परत एकदा सिव्हिल वॉर अटळ आहे. पण मला इथे ठणकावुन सांगीतले गेले होते... या सगळ्या भिती अवाजवी आहेत.. त्याचा बाउ करायची जरुर नाही..

घ्या....सिव्हिल वॉरची नांदी..... Sad

रिपब्लिकन पार्टी इज पार्टी ऑफ लॉ अँड ऑर्डरची पार्टी म्हणे... ही पार्टी २००८ च्या टी पार्टी रेव्होल्युशनने केव्हाच हायजॅक केली आहे.

हिटलर उदयाला आला तेव्हा आपण या जगात नव्हतो.. त्याने सगळ्या जर्मनीला कसे त्याच्या नादी लावले व सत्तांध होउन स्वतः कसा डिक्टेटर झाला.. याचे हुबेहुब प्रात्यक्षिक आपल्या डोळ्यासमोर सध्या उलगडत आहे...

नो वंडर सत्तांध ट्रंपला नॉर्थ कोरियाचा डिक्टेटर किम जोंग एवढा प्यारा आहे.

वाइट इतकेच वाटते की या सत्तांध झालेल्या माणसाचे व त्याच्या गुंड अनुयायांचे हे सगळे चाळे. आवरायला आज अमेरिकेत कोणीच नाही..त्याच्याच पार्टीतले सेनेटर्स व काँग्रेसमन .. षंढासारखे. बघत बसले आहेत.. आणी उलट त्या सगळ्या चाळ्यांना व्यवस्थित खतपाणी घालत आहेत.

माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर असेच व्हायचे.. हंत.. हंत!

खरय मुकुंद ! न्यू यॉर्क मधे चाललेला खटला निकाली लागून तात्या खरोखर जेलमधे गेला पाहिजे. कुठे नेऊन ठेवलाय देश !

Pages