राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

ते हिरॉईन अठरा वर्षे वयाची नाही त्याचं काय झालं! मी ही सिरीयल बघत नाही पण चर्चा वाचते. अठरा पूर्ण आहे का नाही? काळजी Sad

मला हिरोइनच्या बाबांचे कामही खूप आवडले. असतात अशी माणसे>>>>> हो... त्यामच पण काम मस्त आहे....

मला खूप आवडली ती मुलगी. भारतीय मतांनुसार जे हिरोइन मटेरियल असते त्यातले तिच्यात काहीही नाही पण तरीही खूप छान वाटते ती. मला ती जोडी व तो हिरो खूप आवडला. हिरोला सिनेमात पण चान्स मिळायला हवा. सणसणीत उंच, तगडा देखणा व मुख्य म्हणजे अभिनयाची जाण आहे....>>>>> प्रचंड सहमत.दोघांना अभिनया ची जाण आहे ....दोघांची स्माईल पण छान आहे....

राजसी, नका करू काळजी..
हिरॉइन 6 महिन्यात होणार आहे 18 वर्षांची ऑफिशियली!

मी बघत नाही पण मलाही वाटतं सरुदे सहा महीने झटकन. नाहीतर सिरीयलवाले पाच महीने पंचवीस दिवस नीट नेतील आणि पाच दिवस असताना नको ते ट्विस्ट आणतील, किंवा ती बहीण परत यायची पाच महिने झाल्यावर, नवऱ्याला सोडून ह्याच्याकडे आणि तिच डंका पिटेल बहीण १८ पूर्ण नाही. हे लग्न बेकायदेशीर आहे करत.

असं झालं तर टिपिकल सिरीयल होईल, त्यामुळे त्यांनी असं करू नये असंहि वाटतं.

हो मलाही असं वाटतंय की आईना तर नाही होणार ही मालिका. काहीही झालं तरी वेळेत संपू दे आणि नीट काहीतरी गोष्ट असली पाहिजे, उगाच लोकांना आवडतेय म्हणून घाला पाणी असं नको.

आईनाच करतील असं मलाही वाटतं, ती गार्गी फुले त्या संजूला हात बघून सांगते तुझं सात दिवसांत लग्न होणार हा प्रोमो बघितला तेव्हापासून.

हो मलाही वाटलं, असं दाखवायला नको होतं. लग्न कायदेशीर नाही आणि त्यात वडलांनी खोटी कागदपत्रे केली हे ही बेकायदेशीर. दुसरा काही twist हवा होता पण इतकं बेकायदेशीर नको होतं. किमान आता मुलीने नवऱ्याला सांगायला हवं सर्व. आधी सांगून सहा महिन्यांनी लग्न करूया असं सांगायला हवं होतं खरंतर, पण actually काय घडलं ते बघत नसल्याने माहिती नाही, तिच्यावर बहुतेक वडलांनी दबाव टाकला असावा.

स्टोरी अशी नको होती हे नक्कीच वाटतं. फक्त आता त्या हिरोची काही चूक नसताना त्याच्यावर प्रकरण शेकू नये असं वाटतं.

तसं हे सिरीयलवाले बरेचदा बेकायदेशीर गोष्टी दाखवतात पण ग्रामीण भागात काहीजण मुलींचे लवकर लग्न लावतात, सज्ञान व्हायच्या आधी आणि तसं करू नये म्हणून काही जण झटत असतात. सिरीयल घरोघरी बघितली जाते, अगदी ग्रामीण भागातही, त्यामुळे अशी गोष्ट दाखवणे योग्य नव्हतं.

हो बहुतेक वडिल खुप दबाव आणतात, विष वगैरे पण घ्यायला लावत असतात ते ती स्वरा पळून गेल्यावर, मी त्यावेळच्या प्रोमो मध्ये बघितलं होतं, अजून बॅकलॉग कंप्लीट झाला नाहीये माझा, त्यामुळे पूर्ण माहिती नाही. पण परवा संजू सांगायचा प्रयत्न करते आपल्या हिरोला, पण त्याला ते तिच्या बिझनेस बद्दल वाटतं. नाही सांगू शकत ती.

या मालिकेच्या स्टोरीवरून आठवल ,काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवर अशाच प्रकारची मालिका होती"मांडला दोन घडीचा डाव" ज्यात हिरवीणीच्या बहिणीच हीरोबरोबर अफेयर असत,पण ती आओव्हर अँब्मिशियस असते,आणि हीरोने लग्नासाठी हट्ट धरल्यावर लग्नाच्या दिवशी पळून जाते,मग घराण्याची इज्जत वगैरे म्हणून तिच्या मोठ्या बहिणीला म्हणजे हिरवीणीला हीरोशी लग्न कराव लगत.मग सुरुवातीला हीरोचा द्वेष आणि मग त्यांच प्रेम जमणे,ग ती बहीण येते आणि तिला एकदम व्हँम्प केल,मग नेहमीची कट कारस्थान ज्यात हीरोची काकू बहिणीला साथ देते,अस करत करत संपवली होती.
स्मिता शेवाळे,सौरभ गोखले,अनुजा साठे होते त्यात.स्मिता आवडायची,पण नंतर बाजीराव मस्तानी या ईटीव्ही
ही मराठीच्या मालिकेनंतर दिसली नाही फारशी.
तर या मालिकेतही बहिणीला वगैरे आणून टिपिकल मालिका नको करायला.
मालिका बघत नाही मी,पण स्टोरीवरून मांडला टाईप करतील अस वाटत आहे.

पहीला भाग बघितला होता, चुकून अंगठी प्रेयसीऐवजी तिच्या बहीणीच्या बोटात घालतो. नंतर खूप दिवसांनी एक बघितला त्यात त्या बहीणीला का त्याला गायब करतं कोणीतरी, मग डेरींग नाही झालं बघायचं.

मालिका बघत नाही मी,पण स्टोरीवरून मांडला टाईप करतील अस वाटत आहे.>>>>>वाटत तरी नाहीये अजूनपर्यंत. आईना सारखं नंतर केलं तर माहिती नाही.

शुभांगी गोखले टिपरे मालिकेचा टोन सोडायला तयार नाहीत. मधुनच ते दुधाच्या ग्लास फोडणे हे प्रसंग म्हणजे कहर आहे. गोखलेला अशी कामे देउन इतर मालिकांची कॉपी करणे म्हणजे पैसे वाया घालणे आहे.
मुलाचा मोठा भाउ पण वाया घालवलाय. हीरोच्या स्माइलवर किती दिवस टिकणार आहे?

संजू ने एकदा GST तुला कसे माहिती असे रणजीतने विचारल्यानंतर स्वतःच माझा कुटिरोद्योग आहे त्यामुळे मला माहीती आहे असे त्याला सांगितले होते. मग आता तो पापडांचा उद्योग रणजीत ला माहिती नाही असे का दाखवताहेत? रणजीत म्हणतो तूच सांगायची वाट पाहत होतो. तिने तर आधीच सांगितलं होतं. दिग्दर्शक, पटकथा लेखक विसरले वाटतं...

मालिका बघत नाही मी,पण स्टोरीवरून मांडला टाईप करतील अस वाटत आहे.>> तुम्ही सान्गितलेली स्टोरी एक्दम वेगळी आहे फक्त मोठ्या बहिणिएवजी लहानीशी लग्न होते हे एक्मेव साम्य सोडल तर, सो फार तरी मालिका आवडतेय मला,, हिरो-हिरॉइन मधे हळुहळू फुलणार प्रेम छान दाखवलय .

तुम्ही सान्गितलेली स्टोरी एक्दम वेगळी आहे फक्त मोठ्या बहिणिएवजी लहानीशी लग्न होते हे एक्मेव साम्य सोडल तर,.......सध्याच नाहीच म्हणायचय,नंतर करतील अस वाटत आहे कारण मालिकेत ट्रँगल असायलाच हवा असा या लोकांंचा अलिखित नियम आहे.कलर्सचा तर आहेच आहे.

मला ह्या सिरीयल मधल्या सगळ्यांची अॅक्टिंग आवडत्या. शुगो पण छान करतेय कि मला नाही टिपरे चा सूर वाटला कुठे, संजूची ती मैत्रिण पण मस्तच करते काम. मला त्या दोघींचे डायलॉग पण खुपच आवडतात. भारी जमलेत. आईची भूमिका करणारी आणि तो पंजाबराव पण छान जमून आलीये भट्टी. नावं पण छान आहेत सगळी, गावाची माणसांची

शुगोचा आवाजच तसा आहे, टिपरे सारखा. संजुची आई गळ्यात काय घालते ते काळ्या दाण्यासारखं. बेबी मावशी तिथेच राहते का. मोठी जाऊ वैफल्याने भरलेली आहे. येता जाता कुचकट बोलत असते. नवरा बायकोच पटायला पाहिजे खरं तर, तोही तसाच तुसडा आहे, अजय पुरकर.

संजुची आई गळ्यात आपण वट सावित्री ला
काळया मण्यांचा दोरा घालतो तस घालते...
परवाच्या एपिसोड मध्ये ती साजिरी शी बोलताना रस्त्यात लई डबरं अस्त्यात म्हणाली, भारी वाटल ऐकून, आमच्या कोल्हापूर ची भाषा

परवाच्या एपिसोड मध्ये ती साजिरी शी बोलताना रस्त्यात लई डबरं अस्त्यात म्हणाली, भारी वाटल ऐकून, आमच्या कोल्हापूर ची भाषा >>>>>>>> ती भाषा काना ला एकायला छान वाटते.... सिरियलच्या भाषेत बोलायच तर लय भा री वाट्त..... Happy ........डायलॉग पण खुपच छान लिहिलेत.... टीपीकल गावा कडे बोलतात तसे... आणी..... कलाकार बोलतात पण छान. .... अस ओढुन ताणुन बोलल्या सार खे वाट्त नाही....

Pages